Nov 30, 2021
कविता

नकळत

Read Later
नकळत

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आठवण त्याची स्मरते 

मी माझ्या नकळत

ओठावरती येते नाव त्याचे 

 माझ्याही नकळत..... 

 

अशीच एकटी हसत राहते 

मी माझ्या नकळत

त्याचेही असे होत असेल का? 

त्याच्याही नकळत….

 

कल्पनेच्या आभाळ विश्वात 

वर्णन होते त्याचे नकळत

कौतुकाचे रंग भरताना त्यात 

मी हरवुन जाते नकळत....

 

उणिव तुझ्या अस्तित्वाची 

जीवनात भासली कधी नकळत

वाट पाहात उभी तुझी मी 

 येशील का? जीवनात माझ्याही नकळत….

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now