नैवेद्य आधी तिला

Naivaidy Adhi


नैवेद्य आधी तिला !!!

बाबा हॉल मध्ये पेपर वाचत बसले होते, शांतता होती... kitchen मध्ये बराच वेळ आई होती उभी काहीतरी खटपट करत पण आता कुठे दिसत नाही ती.. साराला कसला तरी सुगावा म्हणा किंवा वास आला होता... तो kitchenमधून येत होता... काही जळले का बघत ती kitchen मध्ये गेली तरी आमटीसाठी ठेवलेल्या खोबऱ्याचा जळल्याचा वास येत होता ते किती वेळचे जळून खाक झाले होते...

अरे बाबा अरे कुठंय तुझं लक्ष आणि आई कुठंय.. ते गॅस वर खोबर जुळून खाक झाले पुरते . !!

आई...अग आई कुठे ग तू...बघ जरा इकडे..तू बाबाला सांगून गेली असशील लक्ष ठेवायला आणि ते खोबरे पूर्ण स्वाहा झाले ग...

इकडे बाबा तिच्या ह्या बोलण्याला हसत होते.. मिश्कीलपणे...मान डोलवत...आणि पेपर मधून डोकं बाहेर काढून म्हणत होते साराला..

सारा,आज तुला आणि मला शिक्षा आहे,आज तू तुझे आणि माझे जेवण बाहेरून मागव बाई...आज भर सनावाराच्या दिवशी उपासमार नको...आज जरा शीत युद्ध झाले आहे ग. ..

काय ???, बाबा काय हे....!! आता तुम्ही लहान आहात का...आताच भांडायचे होते का...जरा धीर धरता येत नव्हता का...सगळा स्वयंपाक होऊ द्यायचा ना...मग भांडायचे होते ना.. ..हे बाकी असे झाले.....वघा भक्ष खायला आला आणि नेमके तुमच्या पायातले कुठे हरवले हे शोधत बसलात... आधी पळ काढायचे बघायचे तर ....आता मला रोहितच्या घरी त्याच्या आईने बोलावले होते.... मी इथूनच पोट भर जेवून जाणार होते.... म्हणजे तिथे मला जेवायची गरज पडली नसती....त्यांनी formality केली असती जेव म्हणायची आणि मी formality केली असती नको नको मी आत्ताच आईच्या हाताच्या लुसलुशीत मऊ पुरण पोळ्या खाऊन आले म्हणण्याची.... आणि परत त्यांना दाखवायला ही घेऊन गेले असते काही पोळ्या आणि मग मी त्या घरात मोठेपणा मिरवला ही असता ना माझा... आईला ही आत्ताच रुसायचे होते... काय आईपण... पण हे घडले कश्यावरून इतके की आईने फक्त देवासाठी नैवेद्य केले आणि आपल्याला उपाशी ठेवले...

अग त्याला कारण ही तूच होतीस....बाबा म्हणाले

मी,तुमच्या वादाला कारण कसे काय मी तर आत होते बाबा मला का मध्ये घेत आहात.... सारा

हो तूच आहेस dear कारण...आई आणि माझे भांडण ही तुझ्यामुळेच झाले...नाहीतर आमचे सुरळीत चालले होते... तिला मी स्वयंपाक करण्यात आज मदत ही करणार होतो...सगळे कसे आनंदात चालू होते.... छोटे छोटे काम मी टुपू टुपू करत होतो...जेवण तयार व्हायला काहीच वेळ शिल्लक होता...आणि आपण सगळेच येथेच्छ ताव मारणार होतो आणि ती काही पोळ्या तुझ्या होणाऱ्या सासरी ही डब्यात घालून तुझ्यासोबतच देणार होती...त्यावरून घरी तयार केलेले तूप ही देणार होती...पण मध्ये ...

आहो बाबा पण मध्ये कुठे माशी शिंकली मग, हे सगळे मस्तच चालू होते की,मग आई का हो रागावली...आणि आता कुठे बसली... सारा म्हणाली

अग, सारा आता तू सासरी जाणार आहेस,मग तुला दरवेळी आई सणावाराला थोडीच असे तूप आणि पुरण पोळ्या,आमटी भजी पाठवणार ना...आणि मग तू थोडीच तुझ्या सासरी तुझ्या आईच्या हाताच्या खास जेवणाचा तोरा मिरवणार.. मग आईच म्हणाली जरा आता काही दिवस तरी तिला हे संस्कार,जेवण,रीत भात, वरण भात...हे शिकवून पाठवले पाहिजे...नाहीतर तिचे उठता बसता उद्धार होतील....आज जे तिथे हे घेऊन जाशील मग त्यांना चटक लागेल...मग ते तुझ्याकडे पुरण पोळी मागतील आणि तू आईकडे येऊन म्हणशील का आई मला हे बांधून दे...नाही ना..एकी कडे आईला वाटते की तिला स्वबळावर हे करता आले पाहिजे.... आईच काय तर त्यांना समजले पाहिजे की मुलगी ही खूपच गुणाची आहे... मग ते होण्यासाठी तुला आता आणि आजपासूनच हे स्वयंपाक आणि काम हाती घेतले पाहिजे... आता तुम्ही मदत करण्याऐवजी तिला kitchen मध्ये पाठवले पाहिजे....आणि मी टाळत राहिलो...तिला राग आला...तिने मला ऐकवले तुझी बाजू का घेतात म्हणून....आता तरी तिला उगाच पाठीशी घालणे बंद करा..आणि मी तरी ही तिला मदत करतच राहिलो...आपले मला वाटले वाद नको...काम छोटे आहे... भूक जोरात लागली आहे... पण तिला मी आता खपत नव्हतो.. मग तिचा पारा चढला...तरी मी तुला बोलावले नाही हे पाहून तिने देवसमोरच नैवेद्य ठेवून ती तसेच ते खोबरे ठेऊन निघून गेली...म्हणत होती तुमची मुलगी ही अशीच वाया गेली आहे.. तिला वाचवा...सासरी जाण्याआधी तिला शिकवा... मग म्हणाली...बघू ह्या खोबऱ्याचा कोण वाचवते ते....आणि त्याला तसाच जळत ठेऊन गेली ती निघून....बराच वेळ ती बघत होती दाराच्या फटीतून की मी वाचवतो का ते.... जळत राहिला तो..पण माझे ही लक्ष नाही हे पाहून तीने ही दार total बंद केले होते... बसली मग फुगून.. आणि तितक्यात तू आलीस आणि तू तुला वाया जाण्यापासून वाचवलेस... म्हणजे त्या खोबर्याला वाचवलेस.... अशी होती ही कहाणी....

ओ बाबा,काय हे स्वयंपाक करणे... क्या ये रीत भात.... तिकडे काही नाही हे अस...तिकडे तर देव जास्त मानतच नाहीत ते...मग मला नाही tension.... पण भूक तर मला ही लागलीच आहे.... पोट भरून गेले तर मला म्हणता येईल मला काही नको माझे पोट भरले आहे.... निदान म्हणतील की हिला हिच्या घरी जेवायला मिळते हो....

A असे आहेत का तुझ्या सासरचे लोक...बाप रे...मग तू तर जेऊनच जा तिकडे... संस्कार महत्वाचे आहेत...नाव घालवू नकोस...आई म्हणते तेच खरे... तू जा आई स्वयंपाक कर...कच्चा बच्चा कसा ही कर पण कर...आणि तुझ्यासोबत मला ही घाला दोन घास ...बाबा

काय हो बाबा तुम्ही पण...मी करेन तर prefect... नाहीतर नाही करणार...सारा बोलून गेली..

सारा बोलून तर गेली होती मी करेन तर perfect पण तिला स्वयंपाक कुठे जमतो...आणि आमची मालकीण तर आत जाऊन बसली आहे... आता भर सणवार पोट दुखीत जाईल....

बाबा मी जरा आईला सांगते ,आता बस कर,उठ राग सोड आणि जेवण बनव.....पण ...सारा म्हणत..

इकडे ती आईला बाहेरून म्हणत होती,आई उठ ग मला बाबाला खूप भूक लागली आहे कर स्वयंपाक.. आणि ती काही बाहेर आलीच नाही..

सारा आणि बाबा हॉल मध्ये गुपचुप बसूनच एकमेकांकडे बघत होते... snacks खाल्ले..पाणी प्यायले तरी भूक ती भूक,असे खाऊन थोडीच भागणार होती....

सारा आता रुसून बसली होती आईवर... पण नेहमीसारखी आई तिला बोलवायला नाही आली,भूक वाढतच होती....आईच्या हातची चव आणि जेवणाची चव आठवून दाताचे पाणी गिळत होती.... कधी हॉल कधी किचन कडे बघत होती.... आई आली नाही म्हणजे खरंच तिचा हेतू चांगला असेल...आज निदान तिच्या समाधानासाठी मी काही जे येईल ते करून आधी तिला त्याचा भोग अर्पण करते...ती ही उपाशी असेल..

तिने पुरण पोळ्या केल्या, श्रीखंड बोलावले, आमटी केली,कुरडई पापड...भजे केले त्याचा मंद सुवास घरभर पसरला होता आई आता आतून खुश झाली होती शेवटी तिच्या जिद्दी पुढे लेकीने हात टेकले होते... आपली जशी भूक आहे तशीच तिला ही असेल तिला एकच भूक आहे ती म्हणजे मी तिच्यासारखी एक गृहिणीची ही आघाडी संभाळावी आणि जेवण तयार करून ताट आईच्या खोलीबाहेर ठेवले आणि तिला प्रेमपूर्वक विनंती केली....तू म्हणशील तसे फक्त तू बाहेर ये

आई बाहेर आली होती...साफ सुतरे किचन आणि जेवणाचे भरलेले ताट पाहून तिचे ही मन आणि डोळे भरले होते...

आज पहिल्यांदा ती आयते जेवत होती...मन प्रसन्न होते तिचे ही आणि साराचे ही..

★★★★★★★★★★★★★★★★★

तुम्हाला काय वाटते आई जो विचार करते तो योग्यच आहे का,की मुलींनी सासरी जाण्याआधी स्वतःच्या संसाराला लागणारी प्रत्येक शिकवण गाठीशी बांधूनच जायला हवी...तिने ही खास ओळख जपावी आईच्या हाताच्या चवीची..

पोस्ट लेखिकेच्या नावासोबत share करायला माझी काहीच हरकत नाही

©®अनुराधा आंधळे पालवे