A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session93ee91e3fdd85eed691b8ef903c5638028a7278414b582fb42a1ef89e4ed82945c5d3db2): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

nairashya... aani tyavar keleli maat
Oct 20, 2020
स्पर्धा

एक अबोल मैत्री

Read Later
एक अबोल मैत्री

                                                                   एक अबोल मैत्री

                                                                                                                          -Mrs. Ujjwala Agrawal

भाग १

मला आठवतं, मी दर उन्हाळी सुट्टीत माझ्या आजीकडे जायचे. त्या काळी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मज्जाच मज्जा ! आंबे खाणे , गावभर हिंडणे, ग्यारेग्यार विकणारा आला की तापलेल्या जमिनीवर पळत पळत जाऊन खाण्याची मज्जा काही औरच. डोळे मिचकावत ते खायचे, जीभेचे रंग एकमेकाना दाखवायचे , बैलगाडीचा फेरफटका, शेतावर चे झाडाखाली बसून केले जेवण, कधी गजगे खेळून तर कधी चिंचोके जमवून, कधी पारंब्या खेळून तर आमराईत आंबे तोडून... एक न दोन, खूप साऱ्या मजेदार गोष्टी आहेत.

मग तिकडे पण भरपूर मित्र मैत्रिणी आमची वाट पहायचे. आम्ही सगळे एकत्र अख्खं गांव डोक्यावर घेत असूत, पूर्ण धमाल मस्ती !

पण ह्या सगळ्यात एक मैत्रीण जरा वेगळी होती. कायम गप्प राहणारी, फारशी कोणाात मिसळत नसे, तिच्याशी न कोणी बोलत असे, न कोणी खेळायचे. कायम एकटीच असायची. फक्त आम्हा  संगल्यान लांबून निरखत बसायची. ति जरी बोलत नसली तरी तिचे डोळे खूप काही बोलायचे. पण आम्ही तिला कधी बोलायची हिम्मत नाही केली, कारण ही तसंच होते, गावच्या पाटलांची मुलगी होती ती !

हा असा दर सुट्टीचा कार्यक्रम अगदी १०वी पर्यन्त चालला. एवढ्या वर्षात आम्हाला फक्त तिचे नावच कळले – सुवर्णा.. अगदी सोन्यासारखीच होती. खूप लहान असताना तिची आई देवाघरी निघून गेली होती आणि आमच्यासाठी हेच पुरेसे होते.

मग काही वर्षानी गावचे आणि आमचे नाते कमी होत गेले. शिक्षणाच्या निमित्ताने पण सुवर्णाला मात्र मी विसरू शकले नव्हते! तिचे डोळे, जणू त्यांना काही सांगायचे होते, आमच्यासोबत हसायचे होते, बागडायचे होते...

मध्यंतरी कॉलेज मध्ये असताना मे एकदा गावी गेले होते, तेव्हा ती कुठे दिसलीच नाही.. माहिती काढायचा बऱ्याच प्रयत्न केला तर कोणी म्हणायचे ती आजकाल इकडे नसते, कोणी सांगितले की दिवसेंदिवस तब्येतीनि खालवत गेली होती, तर कोणी म्हणाले की तिच्यावर कसले तरी उपचार चालू आहेत.. पण खरे की ते कळायला काहीही मार्ग नव्हता. कधी दिवस सरले आणि कधी परतीचा दिवस आला ते कालच नाही.

कालांतराने मे माझे शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये रुजू झाले.

 

 

भाग २

माझ्यासाठी ही सगळंच कसं नवीन होते. त्यात रुळता रुळता ६ महीने कुठे संपले ते समजलंच नाही. इथेही आमच छान एक friend circle जमले .. भरपूर गप्पा, coffee breaks, targets, deadlines, video conferencing etc…..  

मग एके दिवशी का कोण जाणे पण आम्हाला तुळशी बाग खुणावू लागली... आणि मग की, एकीच्या तोंडातून तुळशी बाग हा शब्द निघायचा अवकाश नि सगळ्याच एक पाया वर तयार..

कुठे आणि कसे भेटायचे, किती वाजता भेटाचे, काय काय शॉपिंग करायची.. बघता बघता लिस्ट तयार झाली आणि आमच्या घोळक्याच्या स्वारीने तुळशी बागेकडे कूच केली.

हा हा म्हणत भरपूर शॉपिंग केली, पाय दुखे पर्यन्त हिंडलो – फिरलो .. शेवटी पोटातले कावळे ओरडायला लागले. म्हणून तुळशी बागेचा निरोप घ्यायचे ठरवून निघतच होतो आणि कोणीतरी बाजूने गेल्याच एक आभास झाला. एक चेहरा, जो खूप ओळखीचा वाटत होता! हाक मारावी पण लक्षातच येईन.. सत्य होत की आभास म्हणावं की... विचार करत करत पुन्हा पाहायचा प्रयत्न केला तो पर्यंत ती आकृती पाठमोरी झाली होती, आणि बघता बघता क्षणात नाहीशी !

असो, मग मात्र मी परत माझ्या पोटातल्या कावळ्यांवर डोकावले आणि त्यांना शांत करायला आम्ही एक restaurant यथेच्छ पोटपूजा केली. पण डोक्यातून त्या व्यक्तीचा विचार काही जाता जाईना.

शेवटी घरी परत आले, पण मनाच्या एक कोपऱ्यात तो चेहरा सारखा डोकावत होता, कोण असेल बरे! माझे मन काही मला गप्प बसू देत नव्हते, सारखे भूतकाळात गहेवून जात होते. आयुष्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात डोकावू बघत होते ! and yes… शेवटी मला आठवलीच.. हो हो ति सुवरनाच होती, आमच्या गावाकडची.. पण इकडे अचानक अशी कशी ? खूपच बदल झाला होता तिच्यात! आधीची  सुवर्णा म्हणजे अबोल, सतत भिरभिरणारे, कायमच चेहऱ्यावर घाबरलेले भाव, कायमच एक नैराश्य!

आणि ही त्याहून खूपच वेगळी, बदललेली – एक महत्वाकांक्षी व्यक्ति, तिचा तो तेजस्वी चेहरा, चालण्याची लकब बऱच काही संगत होती. तिच्यातल्या ह्या बदलांनी मला मात्र जाम भंडावून सोडले. एक अन दोन, शेकडो विचार मनात आले. तिला खरं तर आज असे अचानक बदललेल्या रूपात पाहून मी जाम खुश होते.. पण हे सगळे.. कसे शक्य आहे.. कोणी नैराश्यावार अशी ही मात करू शकेल ह्या  गोष्टीचा विचार मी कधीच केला नव्हता, पण आज प्रत्यक्षात पहिले होते. आता मात्र तिच्या बद्दल मनात बऱ्याच प्रश्नांनी कल्लोळ माजवला होता!

प्रचंड थकल्यामुळे कधी झोप लागली ते कालच नाही. उठून आधी एक फक्कड चहा घेतला, जरा तरतरी आली आणि परत मन विचारांमध्ये गुंतले....

आणि पुनः एक विचारचक्र.. तिचा शोध घ्यायचे...

 

भाग ३

मन पुन्हा एकदा भूतकाळात गेले, सगळ्या आठवणीना उजाळा मिळू लागला.. अचानक आज सुवर्णा  दिसली आणि विशेष म्हणजे तिचा चेहरा खुललेला होता, तिचे ते लहानपणीचे अबोल वाटणारे डोळे आज अत्यंत तेजस्वी आणि अबोल वाटत होते. तिचा शोध कसा घ्यावा, कुठून सुरुवात करावी असा विचार करता करता अचानक facebook ची आठवण झाली. आणि मग काय! फेसबूक च्या search engine ला आम्ही सज्ज झालो.

सुवर्णा पाटील

आणि एका क्षणात सुवर्णा सापडली.. मी तर आनंदाने उड्याच मारल्या, तिच्या profile मध्ये डोकवायला सुरुवात केली. ज्या सुवर्णाला मी ओळखत होते ती सुवर्णा आणि आताची सुवर्णा, जमीन आसमानची  तफावत होती. ही सुवर्णा – confident, सुंदर, बोलकी आणि बिनधास्त वाटत होती. अगदी त्या सुवर्णा च्या विरुद्ध ! हा हा म्हणत तिचा संपूर्ण प्रोफाइल वाचला, वाचता वाचता एक सुखद आश्चर्याचा धक्का देवून गेला.

कसे शक्य आहे हे?  ही तीच सुवर्णा का? कुठे असेल? कशी असेल? मनाच्या अथांग सागरात नानाविध प्रश्न हेलकावे खाऊ पाहत होते..

अहो, होत्याचे नव्हते ते करून दाखविले होते तिने.. तिची जिद्द, तिचा आत्मविश्वास हाच तिला ह्या पदावर घेऊन जाऊ शकतो, नाहीतर शक्यच नाही. टी आता एक खूप प्रख्यात संगीत विश्वविद्यालची प्राध्यापिका होती. शेवटी ठरले, आता मात्र हिची भेट घ्यायची.

प्रोफाइल वरुन एक मात्र नक्की होते की ती पुण्यात राहते. ही मात्र मनाला खूप दिलासा देणारे ठरले. कारण मे देखील एव्हाना पुण्याला चांगलाच ओळखायला लागले होते, इकडचे बरेच कानाकोपरे माहीत झाले होते. माझे सगळे प्रयत्न सुरू झाले आणि एके दिवशी प्रयत्नांना यश आलेच. मला तिचा पत्ता आणि कॉनटॅक्ट डिटेल्स पण मिळाले.

खूप बोलायचे होते, खूप गप्पा मारायच्या होत्या.. आता आतुरता होती तिला भेटायची, तिला तिच्या यशस्वी वताचाळी बद्दल विचारायची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिने तिच्या नैराश्यावार कशी मात केली हे जाणून घ्यायची !

लगेच फोन मिळवला, कोणी ऑपरेटर ने उचलला. तिच्याशी भेटण्याची appointment घेतली आणि तो दिवस उजाडला !

 

 

 

 

 भाग ४

आणि तो दिवस उगवला ..

 

तिच्या ऑफिस मध्ये पोहोचले, काहीच वेळातच माझे नाव पुकारले गेले.

Myself: May I come in?

Suvarna: Yes please

मी जरा घाबरतच आता गेले, केबिन चा दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, सगळे केबिन awards आणि trophies ने भरलेले! मी तर चकितच! भान हरपून पाहताच राहिले, अगदी शुद्धच हरपल्यासारखे.. अचानक

सुवर्णा : please sit down

आणि मी भानावर आले. मी तिला माझी ओळख सांगणार इतक्यात तिनेच Manju म्हणून हाक मारली. एक क्षणात बालपणीची चित्रफीत डोळ्यासमोरून पालटली! दोघी ही अबोल! नीरव शांतता! सगळंच स्तब्ध !  

तिला आज असे पाहून माझ्या आनंद गगनात मावेनासा झाला. कसे बोलावे, कुठून सुरुवात करावी, शब्दच नव्हते! आमचे चेहरेच बोलत होते..

अचानक मोबाइल च्या रिंग ने ही शांती भंग पावली आणि आमच्या गप्पा हळू हळू रंगत येत होत्या. मी तर ती प्राध्यापिका आहे ह्याच विसर पडला. बाकी सगळे बोलून झाल्यावर शेवटी न राहवून मी तिला विचारलेच –

मी : तू.. प्राध्यापिका.. म्हणजे लहानपणीची ती अबोल, मितभाषी आणि सतत नैराश्यात असलेली सुवर्णा… संपूर्ण कायापालटच झालाय. माझ्या मते तर तू जग जिंकलस.

 

ती एव्हाना माझ्या इशारा समजून चुकली होती. तिने तिचा जीवनपटच माझ्यासमोर उलगडायला सुरुवात केली.

सुवर्णा : तुला आठवत असेल न की माझी आई माझ्या लहानपणीच देवाघरी गेली. सगळ्यांचा हट्ट आणि गावाचे पाटील ,शेवटी ह्या सगळ्यामुळे बाबांना दुसरे लग्न करावे लागले. माझी सावत्र आई इतरांसमोर खूप छान वागायची, पण मला मात्र खूप पाण्यात पाहायची. त्यामुळे माझा आत्मविश्वास डगमगू लागला. हळूहळू मग माझे संगळ्यांशी बोलणे बंद झाले, हसणे, बागडणे सगळंच दुरावले. घरातल्या वडीलधाऱ्याना पण काहीच कळेना. बाबांनी बरेच doctors, तांत्रिक मांत्रिक सगळे करून पहिले. पण कशालाच यश मिळाले नाही. माझ्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती.

मग शेवटी हवापलट करायला म्हणून आजोळी पाठवायचे असे ठरले. पुण्याला! कदाचित तिथे जाऊन माझे आयुष्य सुधारेल ह्या विचारणी बाबांनी अवजड अंतकरणाने मला निरोप दिला. माझ्या सावत्र आईला तर हेच पाहिजे होते आणि मग मी पुण्याला पोहोचले. ते कायमचेच ...

इथे माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. आमच्या शेजारीच एक बाई संगीताचा वर्ग चालवायच्या. संध्याकाळी खूप सुंदर स्वर उमटायचे. माझे ओठही आपोआप त्या स्वरांबरोबर हलायचे, माझे सुर देखील त्या सुरांमध्ये मिसळून जायचे. मी त्यात खूप रमायला लागले. कालांतराने संगीताची ओढ निर्माण झाली आणि संगीतच माझे विश्व बनले. इथेच माझ्या आयुष्याचा कलाटणी झाला.

संगीत !

संगीत !!

आणि

संगीत !!!

ह्या संगीतानेच माझ्या जीवनातल्या नैराश्याचा अंधकार कायम घालवला आणि उजेडाचा मार्ग दाखविला तो कायमचाच ! संपूर्ण जीवन बदलले ते ह्या संगीतानेच ! नवा अर्थ , नवी दिशा, नवा संघर्ष!

मला घडविले, माझ्या आयुष्याला उभारणी दिली, माझ्या पंखांना बळ दिले, माझ्या पायांवर उभे राहणीची ताकद दिली ती ह्या संगीतानेच. खरंच नैराश्य जीवनात कितीही आले तरीही त्याला संपवून टाकण्याचे बळ आपल्यात आणायचे असते आणि आपल्या आत्मविश्वासला कधीच डगमगू द्यायचे नसते.

हे आयुष्य खूप सुंदर आहे. ही जीवन रंगीबेरंगी आहे. सुखाचे, दुखाचे , हसण्याचे, रडण्याचे असे भरपूर रंग ह्यात अनुभवायला मिळतात. सुखाने हरपून जायचे नाही आणि दुखाने कोलमडून जायचे नाही ! मात्र ह्याला नैराश्याचा काळ्या रंगाने रंगू द्यायचे नाही. आयुष्याचे रंग अनुभवा, सगळ्यांच्या रंगसंगतीत मिसळून जाऊन आनंदाने जीवन जगू या.  

हा माझा संदेश, बघ तुला जर तुझ्या social media वरुण संगळ्याना देता आला तर !

बोलता बोलता ती  इथेच थांबली.

आणि ह्यात कधी वेळ संपली ते कळलंच नाही. मग जड अंतकरणाने एकमेकाना निरोप दिला तो पुढच्या भेटीची आतुरता मनात ठेवूनच आणि हाच संदेश संगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि माझे मन देखील एक सुंदर गाणे गुणगुणू लागले..

ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंगरूप

थोडे गम है थोडी खुशियाँ , यही है , यही है यही है छाँव धूप .....