Oct 22, 2020
स्पर्धा

नैराश्य आणि त्यावर केलेली मात

Read Later
नैराश्य आणि त्यावर केलेली मात

पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट

राधिकाचा पहिलं पाऊल पडलं निशांत च्या घरात, गृहप्रवेश झाला, राधिका आणि निशांतच लव मॅरेज होतं त्यामुळे दोघेही खूष खुश होते आणि पाहुणेमंडळी सुद्धा.....

गृहप्रवेश झाला, बाकीच्या सगळ्या विधी झाल्या आणि पावणे आपापल्या घरी निघून गेले ...
रात्र झाली," मधुचंद्राची रात्र" दोघेही एकमेकांमध्ये वाहून गेले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या घरातला राधिका चा पहिला दिवस आहे म्हणून तिला कामाला सुट्टी मिळाली, नव्याचे नऊ दिवस संपले आणि आता राधिका कामाला लागली घरातली कामे, बाहेरची कामे सगळे राधिका करायची..... राधिका आल्यामुळे  निशांतची आई   कोणत्या कामाला हात लावायची नाही...? सगळे काम राधिकालाच करावी लागायची.... राधिका हसत-हसत सगळं करायची.... निशांतचा डब्बा ,आई-बाबांचे जेवण, औषध-पाणी, कुणाला काय हवं-नको ते सगळं बघायची असेच सहा महिने निघून गेले....

एक दिवस  राधिकाला मळमळ व्हायला लागली, उलट्या झाल्या, पाळी चुकली हे माहिती होतंच, तिने एकदा डॉक्टर कडून चेक केले..... घरात बाळ येणार म्हणून सर्व खूप खूश होते... भरभर नऊ महिने निघून गेले आणि राधिकाला मुलगी झाली, इथपर्यंत सर्व ठीक होतं पण नंतर हळूहळू राधिकाच्या कानावर काही गोष्टी यायला लागल्या की हे निशांत दुसरे लग्न आहे म्हणजे राधिका ही निशांत ची दुसरी बायको आहे पहिली बायको आणि दोन मुलं दुसरीकडे राहतात, दुसऱ्या शहरात राहतात, राधिकाने निशांतला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही तो टाळाटाळ करायचा आणि पण एक दिवस सगळं सांगितलं...

त्याची पहिली बायको आणि दोन मुले दुसऱ्या शहरात राहतात असं सांगितलं, राधिका सोबत त्यांनी दुसरे लग्न का केलं याचं कारण मात्र त्यांनी सांगितले नाही,  राधिकानी खूप प्रयत्न केला जाणून घेण्याचा, पण त्यानी काहीच सांगितले नाही ,सासू-सासर्‍यांना विचारलं तेही काहीच बोलले नाही, सगळ्या प्रयत्नाला अपयश आल.....

शेवटी कंटाळून ती घराच्या बाहेर निघाली पण एवढ्याशा बाळाला घेऊन कुठे जाणार होती बिचारी ,सासर नंतर तिला फक्त एक घरच होतं ते म्हणजे माहेर, मुलीला घेऊन माहेरी आली........ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, एक तर तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते आणि निशांत नि असं का केलं  हे कळत नव्हते..... कितीतरी महिने राधिका कोणाशी बोलत नव्हती .....  एकटीच बसून राहायची, ढसाढसा रडायची......क्षणात रडायची, क्षणात हसायची, भान राहायचं नाही कधी कधी...

"ये बाळा, राधिका, सावर ग स्वतःला, किती दिवस अशी पडून राहणार आहेस" राधिकाची आई म्हणाली.

"आई, काय चूक केली होती ग मी, प्रेम च तर केलं होतं ना,   प्रेम करण चुकीचं असत का ग"...

नाही बाळा, प्रेम करण चुकीचं नाही आहे, पण ते कोणत्या व्यक्तीवर करतो  यावर अवलंबून आहे....
प्रेम कधीच चुकीचं नसत बाळा, प्रेम या शब्दात सगळं जग सामावल आहे...
"प्रेम" - माणसाला घडवत आणि बिघडवत सुदधा.... आई पुुटपुटली...
राधिका आपल्याच विचारात गढली....


     ती काहीच करत नव्हती आनंदीच ( राधिकाची मुलगी) , आजींनी नाव ठेवलं होतं,  आजीच सगळं करायची, आनंदी एक एक पाऊल टाकायला लागली, एक दिवस राधिका तिच्या रूम मध्ये चेहरा पाडून बसली होती तिथे आनंदी आली, राधिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि  "आई" आनंदीच्या तोंडातून आई  शब्द निघाला..... हे ऐकून  राधिकाने आनंदीला जवळ घेतलं ,तिला छातीशी कवटाळलं , आनंदीच्या तोंडून निघालेला आई  हा शब्द राधिकाच्या कानात गुंजत होता. ती ढसाढसा रडायला लागली, वर्षभर डोळ्यात साठवलेले अश्रू,आणि मनात दडवलेलं दुःख सगळं बाहेर आलं,      

राधिकानी ठरवलं आपण या नैराश्यातून बाहेर पडायचं, जगायचं आपल्यासाठी नाही तर , आनंदी साठी.....
तिच्यासाठी मला जगायलाच हवं हे राधिकानी मनाशी ठरवलं, यासाठी खूप प्रयत्न केला रोज मेडिटेशन करायची योगा करायची थोडावेळ बागेत फिरायला जायची, लोकांशी संपर्क वाढवला, आजूबाजूच्या मैत्रिणीशी, सगळ्यांची संपर्क साधला...... तिनी वर्षे वर काहीच केले नाही आनंदीसाठी आता तिला खूप काय करायचं होतं, राधिकाला खूप अपराधी वाटत होतं की आपण आपल्या मुलीचा एक वर्ष पर्यंत काहीच केलं नाही आता तीनी मनात ठरवलं आपण काहीतरी करायचं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं, तिने नोकरी शोधायला सुरुवात केली, शिक्षित असल्यामुळे तिला शाळेत नोकरी लागली,, आई बाबांना खूप बरं वाटलं, मुलीच सगळं करून शाळेत जायची, आई-बाबांची काळजी घ्यायची ,आई बाबांचं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काम व्हायचे नाही.... राधिका घरची सर्व कामे करून शाळेत जायची. तिच्यात  पॉझिटिव्हिटी यायला लागली ,शाळेत लहान लहान मुलांसोबत राहून तिला बरं वाटायचं ,असेच दिवस सरत गेले मुलगी मोठी झाली, राधिका तिचे सगळे हट्ट पुरवायची, कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, कधी तिला बाबांच्या आठवणी होऊ दिली नाही,  राधिकानी मनाशी निश्चय केला होता की  आपल्या मुलीला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं..... आनंदी आज तेरा वर्षाची आहे ..... आजी ,आजोबा, आनंदी आणि राधिका अस चौकोनी कुटुंब आहे.....  सगळे आनंदात  आहेत, कमी पैशात का होईना पण सुखी जीवन जगत आहेत.....

राधिकाने नैराश्यावर मात केली ... तिच्यातल्या आईपणामूळे,
तिच्या गर्भात वाढलेल्या त्या चिमुकली मूळे....

 

 

Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing