Oct 30, 2020
स्पर्धा

नैराश्य आणि त्यावर केलेली यशस्वी मात

Read Later
नैराश्य आणि त्यावर केलेली यशस्वी मात

नैराश्य आणि त्यावर केलेली यशस्वी मात

आजच्या एकविसाव्या शतकात आपल्या तरुण पिढीत झपाट्याने वाढत आहे नैराश्य म्हणजेच डिप्रेशन..!!
यावरून विषयावरून एक ब्लॉग...

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिता अभ्यासात खूप हुशार आणि पाहायला सुद्धा खूप सुंदर!! बी एस सी च्या शेवटच्या वर्षाला होती, कॉलेज मध्ये सुद्धा सगळ्यांच्या आवडीची, कॉलेज ची टॉपर... अनिता चा पहिल्या वर्षापासूनच एक ग्रुप होता, ग्रुप मध्ये तीन मुलं अमन, सचिन आणि राघव, तसेच चार मुली अनिता, सृष्टी, अनघा आणि अनुराधा... सगळे एकदम जीवाला जीव लावणारे मित्र होते.. अमन ला अनिता पहिल्या वर्षापासून च आवडायची, आणि अनिताला ही ते माहिती होते, पण अनिताचे लक्ष तिच्या करिअर कडे जास्त केंद्रित होते म्हणून तिने अमन ला आधीच सांगितले होते की मला आधी माझे करिअर घडवायचे आहे, माझे प्राधान्य आधी माझ्या भविष्याकडे बाकी सगळे नंतर......त्यामुळे का होईना अमन सुद्धा सगळ समजून घेत होता... परीक्षेचे वेळापत्रक आले, आता परीक्षा जवळच असल्यामुळे सगळे मज्जा मस्ती सोडून अभ्यासाला लागले. .. परीक्षेचा दिवस आला आणि लवकरच संपली एकदाची.... शेवटच्या पेपर नंतर सगळ्यांनी भेटायचं ठरवलं... पूर्ण ग्रुप त्यांच्या आवडत्या ठिकाणी जमा झाला..
सगळे अगदी आनंदात पण अमन मात्र खूप शांत होता, त्याला आता अनिताला रोज भेटता येणार नव्हते, राघव ने त्याला हळूच धक्का मारला आणि विचारले, काय भाऊ! काय झालेय, कसला विचार करताय?? अमन ने अनिता कडे पाहिले, अनिता सुद्धा त्याच्या कडेच बघत होती, अमन म्हणाला, काही नाही मित्रा, आता काय सगळे आपापल्या कामात गुंततील, आमची तर आठवण पण येणार नाही, अनिताला त्याचा टोमणा लगेच कळला..., ती  म्हणाली, हो मग काय..! आठवण कशाला करायचीय, त्याशिवाय पण भरपूर काम आहेत आम्हाला....! अमन: चला मग, बर आहे तर..., आम्ही पण आमच्या कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतो... आणि अमन ने सगळ्यांचा निरोप घेतला आणि तिथून निघून गेला...
त्या भेटीनंतर अमन आणि अनिताची भेट झालीच नाही....
अनिता सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या तैयारी ला लागली, 6 महिन्याने तिची एमपीएससी ची परीक्षा होती, त्याचा ती जोमाने अभ्यास करत होती, परीक्षा झाली.., पण इतक्या दिवसात अमन चा साधा एसएमएस पण तिला आला नव्हता, तिने ही स्वतः हून त्याला एसएमएस नाही केला पण सारखी त्याच्याच विचारात होती, परीक्षेचा निकाल लागला आणि दुर्देवाने अनिता काही गुणाने मागे राहिली, त्याचा तिला धक्का बसला, की मी तर तैयारी पूर्ण केली होती मग कसे का झाले..., हळूहळू त्याच विचारामुळे ती त्यातच गुंतून गेली.. आई बाबा काळजीत पडले. ... एवढी हुशार मुलगी आणि एका अपयशामुळे का खचली, तर कारण असे की सतत नातेवाईक, शेजारी तिला त्याच विषयाची आठवण काढून देत होते, आणि तिच्या आई वडिलांना सारखे म्हणत होते की आता वयाची झालीय मुलगी तिचं लग्नाचं बघा... त्यामुळे अनिता खचून गेली होती, कित्येक महिने नैराश्यात गेलेल्या अनिताला एक आधार हवा होता जो तिला समजून घेईल, तीच ऐकेल.., पण अमन चा तर कुठे काही च पत्ता नव्हता तो गेले कित्येक महिने तिच्या संपर्कात नव्हता... पण अनिता ला सारखी त्याची आठवण यायची..., आई बाबांकडून अनिता ची अवस्था बघवत नव्हती, म्हणून एके दिवशी आई बाबांनी तिच्या सगळ्या ग्रुप ला घरी येण्याचे आमंत्रण दिले. राघव, सचिन, सृष्टी, अनघा, अनुराधा सगळे आले, अनघा अनिताची खूप जवळची मैत्रीण, तिने अनिताला तिच्या रूम मधून बाहेर आणले, अनिताला सगळ्यांना बघून थोड बरे वाटले, कारण कित्येक दिवस कोणीच भेटले नव्हते..., अनिताने सहज राघव ला विचारले की अमन नाही आला? तो कुठे आहे?
तेवढ्यात बाहेरून आवाज आला, एक बुके घेऊन दारात सूट बूट घालून अमन उभा होता, मॅडम मी आलोय ना, हे बघा इथेच आहे... आईबाबांनी त्याला आत बोलावले, अनिता त्याच्या कडे बघतच होती, आणि थोडी नाराज सुद्धा होती.., त्याने बुके अनिता समोर धरला आणि म्हणाला काय अनिता मॅडम, आमची आठवण येत होती का? अनिता काही ही उत्तर न देता सोफ्यावर जाऊन बसली, अमन बाजूला बसून तिला बुके देत, तुझ्या आवडीची फुल मिळाली म्हणून घेऊन आलो, घे ना.... तिने बुके घेतला..., इतके दिवस कुठे होता?
अमन: अग थोडा कामात होतो, आणि तु सुध्दा तर बिझी होती ना म्हणून म्हटल उगाच डिस्टर्ब नको करायला तुला.... झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात कर आता.... तिचा चेहरा पडलेला पाहून अमन तिच्या जवळ येऊन म्हणाला, हे बघ अनिता एका अपयशाने खचू नये, तोच अभ्यास तु पुन्हा सुरू करून, अपयशावर यश मिळवून सगळ्यांचे तोंड बंद करू शकते, तुझ्यात तेवढी क्षमता पण आहेच...
अनिता: आता नाही होणार अमन..
राघव आणि अनघा दोघेही उत्तरले, का नाही अनिता? तु हुशार आहेस, शिवाय महत्वाचं म्हणजे तुला मदत करायला आम्ही सगळेच आहोत, या वेळेस तुला आम्ही एकटे नाही सोडणार. अनिता हलकेच हसून, thank you guys... अनिताला हसताना बघून आई बाबांच्या चेहऱ्यावर एक सुखद समाधान होते की आता त्यांची मुलगी परत तोच तोच विचार करणार नाही, त्यातून बाहेर येण्याचा नक्की प्रयत्न करेल. ... सगळ्यांचे जेवण आटोपले, हळूहळू सगळ्यांनी अनिताला निरोप दिला, अमन थोडावेळ अजून थांबला, अनिताची आई म्हणाली तुम्ही दोघं गप्पा करा मी माझे काम आवरते, तिचे बाबा पण रूम मध्ये आराम करायला गेले ..
अमन आणि अनिता हॉल मध्ये सोफ्यावर बसले, अमन: काय ग कसला विचार करतेय पुन्हा?
अनिता: सुरुवात कुठून करायची हाच विचार करतेय? सगळ हरवून बसले मी मागे...
अमन: Hey darling, काय हरवले ग तुझे? बघ मी इथेच आहे...
अनिता: शॉक मध्ये येऊन डोळे मोठे करून काय? काय म्हणालास??
अमन: जे तू ऐकलेस...हसून....
अनिता: तबीयत ठीक आहे ना तुझी? काय बदबडतोयस?
अमन: हे बघ, मी इतके दिवस कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो याचा अर्थ असा नाही की माझं तुझ्यावरच प्रेम कमी झालंय, किंवा मी आता तुझ्या वर प्रेम करत नाही..प्रेम आता ही करतो, एवढे दिवस काही प्रोब्लेम मध्ये अडकलो होतो म्हणून कोणाच्याच संपर्कात नव्हतो, पण आता सगळे ठीक आहे.. तु डिप्रेस आहेस, तु एकटी एकटी राहतेय हे सगळ मला आई बाबांनी सांगितलं.. ऐकुन विचार केला पुन्हा एकदा कसे तुला ठीक करायचे? तुला तुझ्या विचारातून कसे बाहेर काढायचे? म्हणून मग हा प्लॅन केला आम्ही सगळ्यांनी तुला सरप्राइज भेटायचा, जेणेकरून तुला तुझ्या रूम च्या बाहेर येता येईल... आणि एमपीएसी मध्ये सगळ्यांना एका प्रयत्नाचे यश मिळेल असेल नाही, सतत आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे, त्यापेक्षा अधिक अभ्यास करायचा, चुका कुठे झाल्या त्या सुधारायच्या, स्वतः वर विश्वास ठेवायचा ग, होत सगळ व्यवस्थित... आई बाबांकडे बघ ना., किती काळजी त्यांना तुझी, एकुलती एक मुलगी अशी नैराश्यात असेल तर त्यांना किती त्रास होत असेल.. त्यांच्या कडे बघायला कोण आहे दुसरं? तूच त्यांचं सर्वस्व आहेस.... आणि तू फक्त स्वतः चा च विचार करायचा हे मात्र न पटण्यासारखे आहे... 
अनिता: हो अमन..!! एवढे दिवस मी फक्त स्वतः मध्येच होते, माझ्या पेक्षा पण जास्त त्रास त्यांना होतोय याचं कधी भानच राहिले नाही... सॉरी अमन... उद्या मी आई बाबांना पण सॉरी म्हणेल, आणि नवीन जोमाने अभ्यासला सुरुवात करेल, या वेळेस खचून जाणार नाही... तु आहेस ना सोबतीला...?
अमन: always dear... मी तुझ्याच सोबत आहे आता,प्रॉमिस...
अमन अनिताला काळजी घे आणि  बाय म्हणून निघून जातो ... दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात होते, सगळ आधी सारखं, अनिता अभ्यासात गुंतलेली असते, काही महिन्याने परीक्षा येते, परीक्षेचा रिझल्ट या वेळेस पॉझिटिव्ह असतो, अनिताचा दुसरा क्रमांक येतो, चांगल्या पोस्ट वर तिची नोकरी लागते, बोलणाऱ्याचे तोंड सुद्धा आता तीच कौतुक करतात... आणि काही महिन्यानंतर अमन सोबत अनिताचे लग्न होते.. ती अगदी मागचे सगळे विसरून आनंदाने नवीन आयुष्याला सुरुवात करते.. तिने आई बाबा आणि अमन च्या मदतीने नैराश्यावर यशस्वी मात केलेली असते ....

यावरून एक स्पष्ट होत जो व्यक्ती डीप्रेस आहे त्याला आणखी एकटे करू नका, त्यांच्या गप्पा मारा, त्यांना समजावून सांगा.., त्यांच्या सोबत रहा... त्यांना आधार द्या... आणखी तेच तेच आठवून त्यांना त्रास देऊ नका... त्यांची काळजी घ्या..
काही दिवसापूर्वी आपला आवडता अभिनेता असाच डीप्रेस होऊन आपल्याला सोडून गेलाय.. आत्महत्या करणे हा उपाय नाही, असा निर्णय घेण्याआधी आपल्याला सांभाळणारे आपले आई वडील, भाऊ बहीण यांचा पण आपण विचार करायला पाहिजे...
आत्महत्या करण्यासारखं दुसरं पाप कोणतेच नाही... म्हणून आपल्या माणसांची काळजी घ्या.. आपल्याच विश्वात राहू नका...

Circle Image

Snehal Malokar

Fashion designer

I'm Snehal. I like to read intersting Stories, intersting books. I love to design dress..