नैराश्य,,आणि त्यावर केलेली मी मात..

Positive energy is very important in our life ...

नैराश्य.,आणि त्यावर केलीली मी मात..

या पृथ्वीतलावर प्रत्येक माणसाला काही ना काही तरी निराशा म्हणजेच नैराश्य असतेच,प्रत्येक च जण हा सुखी च असेल असे नाही,काही ना काही अडचणी असतात च,अशी च एक निराशा माझ्या आयुष्यात आली होती,पण आज रोजी मी त्या निरशेवर पूर्णपणे मात केली आहे...

माझा अनुभव सांगण्याचे कारण असे की जरी एक खूप साधी गोष्ट असली तरी माझ आयुष्य मात्र त्या गोष्टीमुळे खूप बदलून गेलं,चला तर मग जाणून घेऊया माझा नैराश्य वर अनुभव ज्यावर मी मात केली आहे,..

मी सर्वसाधारण घरातील मुलगी,आणि आमची जॉईन फॅमिली आणि त्यातच वडिलांचा मोजकाच पगार,मग काय गरजा मोठ्या अन् पगार कमी अशी आमची परिस्थिती होती,आणि अशातच माझे मराठी मिडीयम मध्ये शिक्षण चालू होते,10वी पर्यंत झाले,पण मला पुढील शिक्षण सायन्स मधून करायचे होते याला कारण म्हणजे केवळ बाबांची एक इच्छा मला पूर्ण करायची होती म्हणून,आणि ती इच्छा म्हणजेच माझ्या बाबांना गणित विषय खूप आवडायचा पण बाबा गणितं मध्ये शिक्षण घेऊ शकले नाही,मग त्यांना वाटले की आपल्या मुलांपैकी कुणीतरी गणितात करिअर करणार,पण माझ्या दोन्ही भावांना आर्ट्स ची गोडी म्हणून दोघांना आर्ट्स घ्यायचं होत,मग काय उरली मी आणि एक वडिलांची इच्छा म्हणून मी सायन्स कडे जाण्याचा निर्णय घेतला...

आणि जसा निर्णय घेतला तसे बाबा खूप खुश झाले,त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आज ही आठवितों,मला गणितात फार आवड नव्हती पण माझे गणित बऱ्यापैकी होते,आणि घेतले मी सायन्स ,पण माझे दुर्दैव की मी 12वी मध्ये गणित विष्यात च नापास झाले,मग काय पूर्णपणे हतबल झालेली मी कशातच माझे मन लागत नव्हते,अगदी नैराश्य माझ्या नशिबी आले होते,आणि बाबांना पण माझी खूप काळजी वाटत होती,त्यांनी तर मला म्हटले सुध्दा की जाऊ दे तुला नाही झेपत तर सोडून गणित आणि आर्ट्स ला एडमिशन कर...

Weखूप हताश झालेली मी,मला बाबांचं म्हणणं पटलं आणि मी पण आर्ट्स घेण्याचा निर्णय घेतला,कॉलेज मध्ये देखील जाण्याची हिम्मत होत नव्हती,म्हणून बाबा च सोबत आले तर तिथे बाबांचे एक मित्र मिळाले त्यांनी कारण विचारले असता माझ्या बाबांनी सांगितले की मी गणितात फेल झाली,तर पुन्हा आर्ट्स मध्ये एडमिशन घ्यायची आहे तर ते काका बाबांकडे पाहून हसले आणि म्हणाले की कशाला आधीच सायन्स द्यायचे माहीत आहे की आपली पोरगी तेवढी हुशार नाही तरी पण,अन् हसत हसत तिथून निघून गेले....

ही परिस्थिती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि बाबा माझ्याकडे बघत होते,,त्यावेळी बाबांनी मला येवढेच म्हटले की तू हुशार आहेस अन् तुला सहजरीत्या सायन्स झेपू शकते,,,,आता तू सायन्स च घ्यायचे आर्ट्स च विचार मनातून काढून टाक...
आणि मी देखील ठाम निर्णय घेतला काही झाले तरी आता सायन्स सोडायचे नाही,,

आणि काय पहिल्या अटेंप्त मध्ये मी विषय काढला,नंतर बी एस सी गणित मध्ये एडमिशन घेतली,व मनात इच्छा पूर्ण होती,सोबतच बाबांचा आशिर्वाद मग काय थोडा अभ्यास केला अन् चांगल्या मार्कने पास झाले,समोर एम एस सी गणित केले,आणि प्रावीण्य मिळवले ,,,त्या दिवशी मनाला खूप समाधान वाटले,आणि नंतर बी एड करून गणित विषयाची प्राध्यापिका झाले,,,

आज रोजी मी गणित विषयाची प्राध्यापिका आहे,केवळ बारावी मध्ये गणित विष्य निघाला नसल्या मुळे पूर्णपणे हतबल झालेली मी आज गणित विषयाची प्राध्यापिका झाली,,हे सर्व माझ्या आईवडिलांनी केलेल्या कष्टा च फळ मी मानते,त्या वेळी जर माझ्या बाबांनी मला योग्य मार्गदर्शन केले नसते अथवा माझे मनोबल वाढविले नसते तर आज मी काहीच करू शकले नसते....

बारावी मध्ये गणित विषयात नापास होऊन आलेल्या नैराश्या मुळे हताश न बसता त्यावर मी मात करून आज गणित विषयाची प्राध्यापिका आहे....या पेक्षा मोठे उदाहरण माझ्याकडे या विष्याकरिता दुसरे कोणतेच नव्हते....

आणि या गोष्टीमुळे मला खूप चालना मिळाली व मी जरी नैराश्य आले तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करते....व नवीन वाट निर्माण करते....

लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा....
धन्य वाद....

Ashwini Galwe Pund.....