Oct 23, 2020
स्पर्धा

नैराश्य आणि त्यावर केलेली मात नापास होणे गुन्हा नाही

Read Later
नैराश्य आणि त्यावर केलेली मात नापास होणे गुन्हा नाही

मुलांचे निकाल लागले आहेत, काही मुलं छान गुणांनी उत्तीर्ण झाले ,तर काहींना हवे तसे यश नाही मिळाले...काही मुलं नापास झाली...अमक्याचा  मुलगा  व९३% marks मिळाले म्हणून छान अभिनंदन केले गेले..कोणाच्या मुलाला 55% भेटले म्हणून तेवढया अंदनदात त्याच कौतुक केलं जातच असे नाही...मुळात ज्यांना 80 किंवा 90 टक्के मिळतात त्यांच्यासाठी फार कौतुकाचे शब्द निघतात,स्टेटस ठेवला जातो.. शुभेच्छाचा वर्षाव जोरात होतो...पण ज्या मुलांना नाही मिळाले तेवढे मार्क्स त्यांचं काही कौतुक होतं नाही हे ही तितकेच खरे..जे नापास झाले त्यांचं तर पहायला नको.लोकं असे reaction देतात जस काय खूपच मोठा गंभीर काही तरी झालं असावे.. 

प्रत्येक विदयार्थी पास होण्यासाठी अभ्यास करतच असतो, छान गुण मिळावे प्रत्येकाला वाटत असते... पण काही कारणास्तव result वर खाली होतं.. माझ्या ओळखीची मैत्रीण होती.. तिला बारावीत खूप छान टक्के पडले  होते.क्लास मध्ये टोपर होती..त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा केल्या गेल्या..तिलाही फार कॉन्फिडन्स होता की graduation ला तिला छान मार्क्स पडतील..तीसुद्धा भरपूर मेहनत घेत होती... पण,सकाळी सातच कॉलेज ,त्यानंतर लगेच कलास कधी कधी ती पाणी सुद्धा प्यायची नाही..अगदी दुपारी दोन वाजता घरी गेली की मग काय खायची आणि थकवा आल्यामुळे झोपून जायची..उठल्यावर थोडा फार अभ्यास केला तर केला..पण जेव्हा ती कॉलेजला,क्लासला  जायची तिला हवे तसे लक्ष देता येत न्हवतं. अभ्यासाच्या नादात तिने खाण्याकडे पूर्णपणे  दुर्लक्ष केले.  पण झालं नंतर  असे की ती भरपूर कमजोर झाली,सतत चक्कर येऊ लागली,शरीरातल रक्त कमी झाले, मग डॉक्टरांना दाखवण्यात आले...औषध सुरू झाली..भरपूर वेळ निघून गेला..जिला अभ्यास जीव की प्राण होता, तिला त्या गोष्टीची भीती बसली....जी मुलगी टोपर होती ,चक्क तिने सांगितले मला परीक्षा नाही द्यायची आहे,कसेबसे घाबरत तिने पेपर दिले.. आणि झाले असे की ,ती एका विषयात चक्क फेल झाली...सर्वांना आश्चर्य वाटले.. असं कसं झाले....खरं तर तिने स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले,त्यामुळे तिला अभ्यासावर   लक्ष केंद्रित नाही करता आले...हेच कारण होते..

खरं तर फार शुल्लक कारण होतं.. जर तिने तेव्हाच लक्ष दिले असते तर ,कदाचित फेल झाली नसती,त्यानंतर तिला फार डिप्रेशन आले..तिच्याबरोबरची मुलं पुढे गेली..आणि ती पाठी राहिली.. तिने पुन्हा परीक्षा दिली आणि पास झाली. आता ती छान नोकरी करते.प्रत्येक कामात हुशार आहे...ऑफिसमध्ये तिच्या कामावरून तिला ओळखलं जातं...

सांगायचा मुद्दा हाच की,त्या वयात मुलांना समजत नाही आपण काय करावे, निरनिराळ्या गोष्टी आकर्षित करतात.. त्यामुळे कुठे तरी मन डाइव्हर्ट होते .त्यामुळे कॅपसिटी असूनसुद्धा काही मुलं फेल होतात, काही मुलांना कमी गुण येतात..

कधी कधी असेही पाहायला मिळते की ज्या मुलांकडून काटावर पास होण्याची अपेक्षा नसते ते सुद्धा छान मार्क्स काढून उत्तीर्ण होतात.. 

मुळात योग्य वेळी योग्य पद्धतीने अभ्यास करने महत्वाचे ...जर विद्यार्थाना छान मार्गदर्शन असेल तर नक्कीच ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील... त्यामुळे असं म्हणता येईल की,कमी गुण मिळाले ,किंवा नापास झाला विद्यार्थी ह्याचा असा अर्थ मुळीच नाही होत की ढ आहे.फक्त त्याला जे  वेळेवर ,करायचे होते, त्यावेळी केले नाही .अर्थात स्मार्ट वर्क.. 
एकच  सांगेन विदयार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येत असतील, तर ते अडथळे बाजूला काढा... नक्कीच यश तुमच्या हातात आहे....फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम...

शेवटी तुम्ही माणूस म्हणून जर उत्तम आहात तर नक्कीच जीवनाच्या परीक्षेत नक्कीच टॉपवर आहात..आपलं भवितव्य result वर अवलंबून नसते, ते आपल्या सकारात्मक शक्तीवर,आपल्या विश्वासावर अवलंबून असते..म्हणून गुण कसेही येऊ द्यात ,खचू नका...तुम्ही हुशार आहात,टलेंट आहे तुमच्या मध्ये, मेहनत करण्याची तयारी आहे,जिद्द आहे ,चिकाटी आहे तर तुम्हाला आयुष्यात यश नक्की भेटेल.... संयम ठेवा आणि योग्य मार्ग,योग्य मार्गदशन निवडा.. तुम्हाला हवे ते नक्कीच मिळणार..

अश्विनी पाखरे ओगले.. ©®

Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..