नाहीचा अर्थ नाही असतो भाग 4 अंतिम

नाहीचा अर्थ नाही असतो
नाहीचा अर्थ नाही असतो भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.......

ती तिथून निघाली. काय कराव. घरी येवून तिने आबा साहेबांना फोन केला." साहेब माझ्या वर अन्याय झाला आहे. "

"काय झाल? कोण बोलत आहे?"

" मी शालिनी तुमच्या शाळेत टीचर आहे. " ती संग्राम बद्दल सांगत होती. आबासाहेब नीट ऐकत होते.

काय करतील हे साहेब काय माहिती? माझ्यावर विश्वास ठेवतील का? की स्वतःच्या मुलाची बाजू घेतील?

संग्रामच्या बाजूने बरेच लोक आहेत. माझ्या बाजूने कोण सांगेल की खरच अस झाल आहे. सविता आणि सावंत सर आहेत पण त्यांच्या नोकऱ्याही त्यांना प्रिय आहेत. सावंत सरांवर त्यांचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. सविताचे मिस्टर बाहेर गावी काम करतात. तिलाच इकडे सगळं बघायचं आहे. ती रिस्क घेणार नाही.

" कधीपासून त्रास देत आहे संग्राम?" आबा साहेबांच्या आवाजात दुःख होत.

" सहा महिने झाले जेव्हा पासून मी जॉईन झाली तेव्हा पासून त्रास देत आहे."

"तुझ्याकडे काही पुरावा आहे का याबद्दल?"

"नाही काही पुरावा नाही."

" कशावरून तू खरं सांगते आहे."

"तुम्ही खरं माना किंवा न माना. काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या बाबतीत हे झालं आहे आणि यापूर्वी पण शाळेच्या बर्‍याच टीचरला हा अनुभव आलेला आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या इज्जतीचा प्रश्न असतो. ती त्रासलेली असते तेव्हा ती खोट बोलत नाही. मला न्याय द्या सर. घरची गरिबी आहे. घाणेरडे आरोप झाले. मी काही केल नाही. अति म्हणजे आज पाच वाजता संग्रामने मला फार्म हाऊसवर बोलवलं आहे. मी नाही गेली तर नौकरी जाईल. "

"ठीक आहे फोन लाव त्या संग्रामला म्हणा मी येते आहे आज फार्म हाऊसवर . मी आहे सोबत काळजी करू नकोस."

आबा साहेबांनी फोन ठेवला.

तिने संग्रामला फोन लावला." मी आज फार्म हाऊसवर यायला तयार आहे. "

" वाह.. मी आहे तुझ्या साठी. अजिबात काळजी करू नको. " संग्राम खुश होता.

तिने परत आबा साहेबांना फोन लावला.

"आबा साहेब तुम्ही प्लीज वेळेवर या तिकडे . "

हो.

पाच वाजता शालिनीला घ्यायला गाडी आली. ती फार्म हाऊसवर आली. जीव मुठीत घेवून ती आत बसली होती. संग्राम आला. ती उठून उभी राहिली. तो जिंकल्या सारख हसला.

" रोज सारखी खूप सुंदर दिसते आहेस. तू हा योग्य निर्णय घेतला. या पुढे तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. आरामात ठेवेल मी तुला." तो जवळ येत होता. शालिनी मागे सरकली.

एकदम बाजूचा दरवाजा उघडला. आबा साहेब बाहेर आले. त्यांना बघून संग्राम दचकला.

"काय सुरू आहे हे संग्राम. ह्या कोण आहेत?"

" माहिती नाही मला आबा. मी आता आलो इकडे. वॉचमन चा फोन आला या बाई इकडे आल्या म्हणून बघायला आलो होतो काय झाल ते."

"काय ग काय करते तू इकडे?" आबांनी मुद्दाम विचारल.

"मला संग्रामने भेटायला बोलवलं होत."

" आबा ही खोट बोलते आहे. ओ बाई मला बदनाम का करताय? "

"कोण कोणाला रोज त्रास देत हे सगळ्यांना माहिती आहे." शालिनीने सांगितल.

" संग्राम मला माहिती आहे तू रोज शालिनीला त्रास देतो. आज तूच तिला इथे यायला भाग पाडल. तुझ्या मुळे बर्‍याच टीचरला त्रास झाला." आबा साहेब बोलले.

संग्राम शालीनी कडे रागाने बघत होता.

"तिच्याकडे रागाने बघून उपयोग नाही. मी काय विचारतो आहे त्याचे उत्तर मला हव आहे . अरे मी एवढं नाव कमावण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याच शाळेत स्त्रिया सुरक्षित नाही. लाज वाटत नाही का असं वागतांना. शालिनी पुढे हो एक वाजव याला."

शालिनीने संग्रामला एक थोबाडीत दिली.

" या पुढे शाळेत पाय ठेवायचा नाही. घराच्या त्या बाजूच शेत आहे तिकडे फक्त तू काम करायच. बाकी माझ्या कुठल्याही गोष्टीत मधे मधे करायच नाही. नाहीतरी तुला घरा बाहेर काढेल आणि माझ्या इस्टेटी मधला पाच रुपये तुला मिळणार नाही. आणि या पुढे कोणाला त्रास दिला तर बघ. माझ लक्ष असत सगळीकडे. पोलिसात देईल तुला. संग्राम नीघ आता. " आबा साहेब कडाडले.

शालिनी पुढे आली. " एक मिनिट संग्राम. मी लकी आहे की आबा साहेबांनी मला सपोर्ट केला. पण इतर मुलींच काय जे अश्या शेफारलेल्या मुलांच्या वासनेला बळी पडतात. त्यांच्या काय दोष आहे यात. या पुढे कधी अस करु नकोस. आम्ही म्हणत नाही आम्हाला अगदी बहिणी माना. एक माणूस म्हणून तरी आमच्याही वागा. एक लक्ष्यात ठेव मुलींच नाही म्हणजे नाही असत. ती काही तुमची प्रॉपर्टी नाही तिच्याशी कस ही वागायला. तुमच्या क्षणीक आनंद साठी कोणाच तरी पूर्ण जिवन उद्वस्त होत. अस करु नका. "

संग्राम निघून गेला. त्या नंतर तिला तो कधीच दिसला नाही.

शाळेत संग्रामला मदत करणार्‍या लोकांना आबा साहेबांनी काढून टाकल. आता शाळेत खूप सुंदर वातावरण होत. ज्ञानमंदीराच पावित्र्य नष्ट होईल अशी कुठलीही गोष्ट आता तिथे होत नव्हती.

आपल्या आजुबाजुला असे त्रास दायक लोक असतिल तर त्यांना विरोध करा. त्यांनी त्यांची जागा दाखवा. गप्प राहू नका.

🎭 Series Post

View all