Feb 23, 2024
नारीवादी

नाहीचा अर्थ नाही असतो भाग 3

Read Later
नाहीचा अर्थ नाही असतो भाग 3
नाहीचा अर्थ नाही असतो भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.......

आईकडे राहून शालिनी ग्रॅजुऐट झाली. नंतर पुढच शिक्षण घेतल. आई घर काम करायची. तिने पण पार्ट टाईम नौकरी केली. शिक्षण पूर्ण झाल. शाळेत जॉईन झाली. पगार चांगला होता. तिला नववी दहावीचा वर्ग मिळाल होता . खूप समजूतदार हुशार होती शालिनी. सुंदर शिकवायची. मुलांची लाडकी टीचर होती . पण आता संग्राम मुळे ती पूर्ण त्रासुन गेली होती.

एकटी मुलगी म्हणजे अपाॅरचुनीटी वाटते का लोकांना? तिला आधार नाही. नवरा, भाऊ, वडील सोबत नाही. मग ती आपलीच आहे. हक्क दाखवा तिच्यावर. वाटेल ते बोला. काय करणार आहे ती. जास्तीत जास्त आपली कंप्लेंट करेल. तेव्हाच तेव्हा बघू. शालिनी त्रासली होती अश्या लोकांना.

बेल झाली शालिनी विचारातून बाहेर आली. पुढचा तास दहावीचा होता. ती वर्गात गेली. काही सुचत नव्हत. ती नुसती बसुन होती. पूर्ण वर्ग अभ्यास करत होता. चला कामाला लागाव लागेल. फालतू विचार सोडा. सीलॅबस पूर्ण झाला नव्हता. तिने शिकवायला सुरुवात केली.

संध्याकाळी शिकवणी झाली. मुल घरी गेले.

"शालिनी आज काय झाल तुला ? आज अशी गप्प गप्प का?" आईने विचारल.

" नाही आई मी ठीक आहे."

"मला समजत तुझ्या चेहऱ्यावरून."

"आई शाळेत खूप पाॅलीटीक्स आहे. काही काही लोक खूप त्रास देतात मला."

कोण? त्या घाबरल्या.

"आई म्हणून मी काही सांगत नाही. तू शांत हो."

"आबा साहेबांना भेट त्यांना सांग."

" हो आता अस काहीतरी कराव लागेल. मला हिम्मत करावी लागणार आहे. "

पुढच्या आठवड्यात अस झाल. संग्रामने शालिनीला काहीतरी कारण काढून केबिनमध्ये बोलवलं. ती सविता सोबत गेली. त्याने सविताला काम सांगून बाहेर पाठवल.

"काय विचार केला आहे शालिनी? मी आता जास्त वाट बघू शकत नाही. "

" कश्या बद्दल? "

" आपल्या बद्दल. "

" ते शक्य नाही."

"आज पाच वाजता मी सांगतो तिथे मला भेटायला यायच."

"मला जमणार नाही." ती बोलत होती. अचानक संग्रामने तिला मागून मिठी मारली. "जमणार नाही म्हणजे काय? मी सांगतो ते करायच. स्वतः च डोक वापरायच नाही. रहायच आहे ना गावात? "

ती घाबरली. वळली एक साटकन त्याच्या थोबाडीत ठेवली. तो खूप चिडला. " माझ्या वर हात उचलते. ही हिम्मत. आहे कोण तू."

संग्रामने तिचे दोघी हात धरले. तिला स्वतः कडे फिरवल. शालिनी सुटायची खूप धडपड करत होती. तिची ताकद त्याच्या पुढे कमी पडत होती. तो जवळ येत होता.

त्याच वेळी प्रिन्सिपल सर आत आले. त्या दोघांना त्या अवस्थेत बघून त्यांनी तोंड फिरवल. संग्राम तिला वाटेल तस बोलला. खूप अपमान केला. तिला तिथून हाकलून दिलं. ती पटकन तिथून निघून गेली.

सगळी कडे तिची संग्रामची चर्चा होत होती. त्यांच अफेअर आहे. शालिनी पैसे बघून संग्राम साहेबांच्या मागे आहे. नेहमी काही तरी कारण काढून ती त्यांच्या केबिन मध्ये जाते. मी आज त्यांना नको त्या अवस्थेत बघितल. काही काही बायका मोठ्या माणसांच्या मागे लागून जातात. उगीच त्यांना बदनाम करतात. कोणी नाही तिच्या आयुष्यात वाटत असेल तिला ही.

लोक तोंडाला येईल ते बोलत होते.

त्या दिवशी शालिनी खूप रडली. आई पण तिच्या बाजूला गप्प बसुन होती. काय कराव तिने सविताला फोन केला.

"आबा साहेबांना सांग. तुझी बाजू खरी आहे. तू नाही ते लागले तुझ्या मागे."

"हो आज बोलते मी आबा साहेबांशी."

शालिनी आवरून शाळेत आली. तिला आत सोडल नाही. प्लीज एकदा प्रिन्सिपल सरांना भेटू द्या. ती आत गेली.

"तुला शाळेतून काढून टाकल आहे. अश्या चरित्रहीन बाईला शाळेत ठेवल तर मुलांवर काय संस्कार होतील. इथे येण्या आधी लाज वाटली नाही का? " प्रिन्सिपल सर ओरडत होते.

" सर तुम्हाला ही माहिती आहे नक्की काय झालं ते. का अस बोलताय. मी काही केल नाही. "

"मला सांगून काही उपयोग नाही. मी स्वतः बर्‍याच वेळा तुम्हाला संग्राम सरांच्या केबिन मधे बघितल आहे." ती तिथून निघाली. गेट वर तिने वॉचमनला विचारल.
" आबा साहेब आलेत का शाळेत. मला त्यांना भेटायचा आहे."

"त्यांना भेटून काही फायदा नाही. काम हव असेल तर तुमच्या साठी संग्राम साहेबांचा एक निरोप आहे."

काय?

"तुम्हाला संग्राम साहेबांनी फार्म हाऊसवर बोलवलं आहे. नौकरी करायची असेल तर आज तिकडे जावून या. फोन करून जा. "


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//