नाहीचा अर्थ नाही असतो भाग 2

नाहीचा अर्थ नाही असतो
नाहीचा अर्थ नाही असतो भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.......

शालिनी केबिन मधे गेली.

"बस. "

" नाही सर मी ठीक आहे. सर आम्ही परीक्षेच्या शेड्यूल बद्दल बोलत होतो. मुलांची चाचणी परीक्षा आहे. तर घाई करावी लागेल. पेपर सेट करायचा आहे. मी जावु का खूप काम आहेत." ती शक्य तितकी भराभर बोलत होती. कधी तिथून जाऊ अस तिला झाल होत.

" नाही थांब. " संग्राम तिच्या कडे बघत होता. तो उठून आला. शालिनी दचकली. तिने पदर सावरला. ती थोडी बाजूला सरकली.

" खूप सुंदर. साध्या साडीत तू खूप छान दिसते. किती दमते रोज. कशाला एवढी धावपळ करतेस. मला कसतरी वाटत. माझ ऐक. मला हो बोल . आरामात रहा माझ्या जवळ."

काय बोलता आहेत हे. बापरे मला इथून जायला पाहिजे. तिला धोक्याची घंटा समजली. ती जायला वळाली. संग्राम तिच्या मागे उभा होता. त्याने तिला जावू दिल नाही.

" समजल नाही का मी काय म्हणतो ते. पगार पुरतो का? शाळे व्यतिरिक्त काय करते तू घरी. "

" संध्याकाळी शिकवणी साठी मुल येतात." शालिनीने सांगितल.

"इतका त्रास का करून घेते. पैसे हवे का तुला? मला सांग ना मग. त्याने पाकीट काढल. तिच्या समोर ठेवल. घे जितके घ्यायचे तितके."

"नाही नको साहेब. मला जायच आहे." तिचा तो अवघडलेला पणा. घाबरलेली नजर त्याला खूप आवडली. त्याच्यातला पुरुष जागा झाला. मी सांभाळेल हिला. काय हव ते बघेल. सुखी ठेवेल.

" शालिनी तुझ्या सारख्या सुंदर मुलीला कोणी ही राणी सारख बनवून ठेवेल. मला तर एक समजत नाही एवढी तरुण तू. कशी काय एकटी रहाते. झोप येते का तुला?"

शालिनी संग्राम कडे बघत होती. काय बोलताय हे.

"नाही म्हणजे काही हव असेल तर मी आहे सेवेला . छान राहू आपण. "

" शट अप. "

" घाबरते कश्याला. मी काही रोज त्रास देणार नाही तुला. आठवड्यात एकदा जेव्हा आबा साखर कारखान्यात जातात तेव्हा मी बोलवतो तिथे यायच. फक्त दोन तास. त्या बदल्यात तुझ पूर्ण आयुष्य सुखात जाईल एवढे पैसे देईल मी तुला. काळजी करायची नाही. "

" काहीही बोलू नका सर तुमच लग्न झाल आहे. वहिनी साध्या आहेत. तुम्ही अस करु नका. माझ्या मागे का लागले तुम्ही. मी एक साधी सरळ मुलगी आहे. "

"माहिती आहे मला तू किती छान आहेस ते . माझ प्रेम आहे तुझ्या वर. मला तू खूप आवडते. "

" जस मागच्या वर्षी तुमच प्रेम सरला मॅडम वर होत. तुम्ही का नुकसान करत आहात माझ. "

"माझ्या सोबत तुझ चांगल होईल. नुकसान नाही. समजल का. माझ ऐकल नाही तर मी तुला बरबाद करून टाकेल. या गावत कोणी तुला नौकरी देणार नाही उपाशी मरशील तू. विचार कर यावर. "

शाळा चांगली मूल चांगले होते. हाच एक प्रॉब्लेम होता. संग्राम.. तो आबा साहेबांचा मुलगा होता. एवढ काय ते त्याच कर्तुत्व होत. अतिशय टारगट. वय तिशीच्या पुढे. लग्न झालेल. त्याला एक मुलगा होता. शालिनी जेव्हा पासून शाळेत जॉईन झाली तेव्हा पासून तो तिला त्रास देत होता. वाटेल ते बोलत होता. त्याला पैशा साठी बढती साठी सपोर्ट करणारे खूप होते.

शालिनी केबिन बाहेर आली. तिचे हात पाय थरथरत होते. किती घाण घाण बोलतो हा मला. विरोध तरी कसा करणार. पूर्ण पुरुष प्रधान कारभार. त्याच्या कडे पॉवर होती. पैसा होता. मी एकटी असल्याचा फायदा घेतो तो.

ती स्टाफ रूम मधे येवून बसली. बॉटल मधून पाणी पिल. सविता, सावंत सर जवळ आले. "काय म्हणत होता तो."

"तेच नेहमी प्रमाणे होकार दे. माझ्या सोबत रहा. बरच घाण घाण तोंडाला येईल ते बोलतो."

"वाजवून द्यायची ना एक."

"नौकरी जाईल माझी. तुला माहिती आहे. आमची किती कठीण परिस्थिती आहे. उपाशी रहायची वेळ येईल किंवा हे गाव सोडव लागेल." तिच्या डोळ्यात पाणी होत. सविता, सावंत सर हळू हळू संग्राम बद्दल बोलत होते. माजला आहे तो.

शालिनीची परिस्थिती गरिबीची होती. ती तिच्या आई सोबत अगदी लहान घरात रहात होती. पंचवीशीतली शालिनी अतिशय साधी होती. नशीबच खराब अस होत तीच . वडील पाच वर्ष पूर्वी आजारपणात वारले होते.

शालिनीचा घटस्फोट झाला होता. तीच रूप याला कारणीभूत होत. सेकंड इयरला असतांना वडील सिरियस होते. त्यांच्या डोळ्यासमोर व्हाव म्हणून झटपट लग्न झाल. लग्नानंतर तिने पुढे शिक्षणासाठी तिकडे शहरात अ‍ॅडमिशन घेतल.

तीच छान रहाण सुंदर दिसण घरच्यांच्या डोळ्यात खुपत होत. नवरा प्रकाश घरी आला की सासुबाई त्याचे कान भरायच्या. मग सुरू व्हायचा तिचा छळ. फटके मारल्या शिवाय बोलायचा नाही तो. खूप संशय घ्यायचा तिला त्रास द्यायचा .सगळ्याला कंटाळली होती ती. त्यात वडील वारले. ती माहेरी आली तर वापस गेली नाही.


🎭 Series Post

View all