नागशास्त्र एक अद्भुत गाथा (भाग - एक)

माझी एक रहस्यमय कथामालिका
याचे काही संदर्भ जरी खरे असले तरी ही ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.
भगवान श्री कृष्ण आणि कालिया नाग यांच्यात युद्ध होत. आणि या युद्धात कालिया नागाचा पराभव होतो.
श्री कृष्ण कालिया नागाला डोहातून दूर जायला सांगतात. कालिया आपल्या कुटुंबासह डोहातून निघून तर जातो. परंतु मागे आपली एक खुण सोडून जातो ती म्हणजे. \"नागमणी\"
ही गाथा आहे त्या संग्रामाची जय-पराजयाची युद्धात पराजय झाल्या नंतर कालिया परत नागलोकात येतो. पण तिथले नाग त्याला स्वीकारत नाही आणि तिथूनच नागलोकाचे दोन भाग होतात. \"नागलोक आणि विषलोक\"
वर्तमान काळ...
पटवर्धनांच्या घरात एक अलौकीक मुलगी जन्माला येते. तिच्या येण्याने घर अगदी आनंदुन गेलेल असत. घरात अगदी प्रसन्न वातावरण असत सगळे खूप खुश असतात. अशातच पटवर्धनांचे गुरुजी बारशाचा मुहूर्त काढायला आणि पत्रिका बघायला येतात.
गुरुजी तीच तेज बघुन भारावून जातात त्यांचे डोळे तिच्या वरून हालतच नाहीत. त्या अलौकीक दैवी मुलीकडे बघुन गुरुजी एक भविष्यवाणी करतात.
गुरुजी: "ही कुणी साधारण मुलगी नाहीये. हिच्यात एक अलौकीक तेज आहे शक्ती आहे. हिच्या नुसत जन्माला येण्याने ढग गडगडू लागले मुसळधार पाऊस पडु लागला. तर पुढे ही मोठी झाल्यावर काय होईल? हिच्यात एक विलक्षण तेज आहे. हीचा जन्म मुळ नक्षत्रात झाला आहे अशी मुल अपार शक्तींची धनी असतात. भविष्यात हिचे जितके हितचिंतक असतील तितकेच शत्रु देखील असतील तरी देखील ही सगळ्यांना प्रेमाने सांभाळुन घेणारी असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हिच्या पंचविसाव्या वर्षा पासून हिला त्रास सुरू होईल. आणि तेव्हाच हिच्यातील शक्ती जागृत होतील. तोपर्यंत तुम्हाला हिच्यावर पूर्ण लक्ष ठेवावं लागेल. ही तुमचं नाव खूप मोठं करणार आहे. हिला वेदांगी नावाने ओळखतील. शुभंभवतु."



भविष्यवाणी ऐकून एक क्षण सगळे स्तब्धच होतात. वेदांगी मात्र हसत असते. तीच ते लोभस हसणं बघुन सगळ्यांना काय बोलाव तेच समजत नाही. सगळे घाबरलेल्या स्थितीत असतात.
25 वर्षा नंतर..
वेळ सकाळी 9 वाजताची...
वेदांगी आपल्या अंथरुणातून खडबडून जागी होते आणि घड्याळात बघते तर नऊ वाजलेले असतात. ती पटकन उठते आणि आपलं आवरून खाली हॉल मध्ये येते.
वेदांगी: "आई चहा नाश्त्याचं काय झालं? मला उशीर होतोय तुला माहीत आहे न आज मला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायला जायचं आहे इथेच उशीर झाला तर काम कशी करू मी?"
स्वर्णलता मनाशीच पुटपुटत बाहेर येते.
स्वर्णलता(मनाशीच पुटपुटत): "हो...हो... बाई आले. ह्या मुलीला अख्या जगाची काम असतात. एक आम्हीच तेवढे रिकामटेकडे आहोत घे बाई चहा आणि नाश्ता पोटभर जेऊन मग बाहेर पड."
थोडं हसुन लाडात वेदांगी आईला म्हणते.
वेदांगी(लाडात): "हे तुझं बर आहे हं आई. मला जेव्हा भूक नसते तेव्हा खा..खा.. करतेस आणि आता स्वतःहुन म्हणते तर उगीच चिडतेस आता याला काय म्हणायचं?"
वेदांगीच बोलणं ऐकून स्वर्णलताला हसु येत ती तिला म्हणते.
स्वर्णलता(हसून): "आता तुला उशीर होत नाही वाटत."
वेदांगी घड्याळाकडे बघत भर भर नाश्ता करते आणि स्वर्णलताला म्हणते.
वेदांगी: "अरेच्चा विसरलेच मी चल झाला माझा चहा आणि नाश्ता येते मी. आणि हो आज मला उशीर होणार आहे ह माझी वाट बघू नकोस येते मी."
वेदांगी आईला सांगून युनिक वास्तू संग्रहालयाकडे निघते. तिच्याबरोबर तिचा असिस्टंट अनय देखील असतो. दोघ प्रोजेक्टवर करायला युनिक वास्तू संग्रहालयात जातात. आणि प्रोजेक्टच नाव असत. \"नागशास्त्र\" नागशास्त्र हे एक सार आहे नागलोकाच्या राहस्यांच. इच्छाधारी नाग नागीण त्यांचं अस्तित्व खरच आहे का? नागमणी असतो का? यावर वेदांगी रिसर्च करत असते. या रिसर्चमध्ये अनय ही तिला मदत करत असतो. त्यांना रिसर्चमध्ये नागशास्त्रा विषयी माहिती मिळते. म्हणून दोघ संग्रहालयात आलेले असतात.



युनिक वास्तू संग्रहालय...
वेळ सकाळची 11:30 वाजताची...
संग्रहालयाचा दरवाजा उघडतो. तस गर्दीचा लोट आत शिरतो त्या गर्दीत वेदांगी आणि अनयही शिरतात. वेदांगी प्रत्येक वस्तूच अगदी बारकाईने निरीक्षण करत असते. आणि त्या वस्तू बघता बघता नोंदीही ठेवत असते.
काही वेळा नंतर...
अचानक वेदांगीच एका अलौकीक तेजस्वी चमकणाऱ्या पुस्तकाकडे लक्ष जात. ती जवळ जाऊन बघते तर तिला नागशास्त्र दिसत. ती ते तेज बघून आकर्षीत होते. आणि कुणालाही कळु न देता हळूच ते पुस्तक आपल्या जवळ ठेवते व बाकीच्या वस्तू बघण्यात मग्न होते.
क्रमशः

🎭 Series Post

View all