Login

नाद खुळे आम्ही

Nad Khule
आधी माझ्याकडे फोन होता..आणि मी सतत फोनवर असायचे..video.. कधी लेखन करण्यात दंग असायचे...
हे पाहून मग आई वडील दोघे ही खूप चिडवायचे रागवायचे..बोलायचे..
आता मी आईला फोन घेऊन दिला आहे..आता आई फोनवर भजन ,कीर्तन, वाचन,लेख, आणि पाककृती बघते नवं नवीन गोष्टी शिकते ,ऐकते, वाचन करते आणि त्यामुळे तिला मोबाईलची गोडी लागली आहे..
आता मी फोन हातात घेतल्यावर आई चिडत नाही, रागवत नाही, बोलत नाही..
पण वडील अजून ही रागवत असतांना आई त्यांची साथ देत नाही...रागवत नाही
म्हणून आता वडिलांना ही फोन घेऊन देण्याचा विचार करत आहे...बघू कितीपत यश येते माझ्या ह्या आयडिया ला ?? म्हणजे ते ही आम्हाला जोडले जातील?
आणि रागवणाऱ्या पक्षात कोणी ही राहणार नाही...
सगळ्यांना इकडच्या पक्षात खेचून घेऊ..☺️

सध्या घरा घरात हेच चालू आहे ( हे फक्त काल्पनिक आहे, खऱ्या आयुष्याशी संबंधित नाही )
©®अनुराधा आंधळे पालवे