गावी जाताना घालावी लागणारी साडी आधीच सानिकाला सांभाळता येत नव्हती .त्यात डोक्यावर पदर घ्यायची सक्ती तीचे सासू-सासरे आणि नवरा करीत होते. चार दिवसांसाठी गावाकडे यात्रेला जात होते तिचे कुटुंब ..... तशी ती पहिल्यांदाच गावाला जात होती. सासूबाईंनी तिला थोडीफार कल्पना दिली होती" अगं आपल्या इथलं मॉडर्न वागणे गावाकडे चालत नाही हो,...... आमच्या सासूबाई खूप कडक आहेत त्यामुळे तिथे थोडं खानदानीपणानेच वागायला पाहिजे..... जरा जपून हो सानिका कुठेही चुकून आपली शोभा करून घेऊ नकोस.... माझ्या सासूबाई पाणउतारा करायला मागे पुढे बघायच्या नाहीत..... " त्यांच्या असल्या बोलण्याने आधीच सानिका घाबरली होती.... त्यात साडी डोक्यावर पदर हे खूप अवघड जात होते .
सम्यक मात्र तिच्याकडे गालातला गालात बघून हसत होता ...त्यामुळे तिचा चिडून पापड झाला होता पण ती काही बोलूही शकत नव्हती. शेवटी एकदाच
आलं घर.... आल्याबरोबर आजीने पायावर पाणी घालून ओवाळून आत घेतलं .त्याचे तिला खूप कौतुक वाटलं आणि अगदी हसत तिचे स्वागत केल आहेत हो आपले संस्कार मुलीवर तिच्या नेसलेल्या साडी कडे बघून आजी पुटपूटली. हातपाय धुणे फ्रेश होणे सगळं झाल्यावर जेवणाची पंगत झाली. त्यांच्यासाठी खास पुरणपोळी केली होती चविष्ट पुरणपोळी व कटाची आमटी पापड मन तृप्त झाले साऱ्याचे.... सगळे निवांत गप्पा मारत बसले होते. सानिकाला थोडी तहान लागली होती गव्हाचं गोड अन्न त्यात उन्हाळा तिच्या घशाला कोरड पडली होती. तिला दिसलं सम्यक जवळच पाण्याचा तांब्या होता... तिने त्याला हाक मारली" सम्यक प्लीज पाणी पास कर ना ते मला...." तिचं हे बोलणं ऐकून आजे सासूचे डोळे विस्फारले.. नाकाचा शेंडा लालबुंद झाला त्यांच्या आणि त्या म्हणाल्या.." अग नवऱ्याला नावाने हाक मारतेस का? तुझे संस्कार हेच शिकवलं वाटतं आईन i नवऱ्याचं नाव घेऊ नये बाई माणसाने आयुष्य कमी होतं त्याचं "...म्हटल्यावरती सानिका अगदी हिरमुसून गेली एवढ्या लोकांच्यामध्ये ऐकून घ्यायला लागलं तिला त्यामुळे अपमानास्पद वाटत होते तिला....आणि तिच्या दृष्टीने कहर म्हणजे तिची बाजू कोणीही घेतली नाही आजीसमोर... रूम मध्ये आल्यावर तिला हुंदकाच फुटला. सम्यकला ती रडतेय ह्याची कल्पना नव्हती तो चेष्टेत म्हणाला. " उद्यापासून मला नावाने हाक मारायची नाही ग समजले तुला.... नाहीतर माझे आयुष्य कमी होइल,"..... " असे का? थांब आता तुला शिकवते चांगलाच धडा" असे म्हणून ती बाहेर निघून आली.चहाची वेळ आली तशी तिने" अहो ऐकलंत का चहा घेताय ना गडे" म्हटले..... सम्यक बघतच राहिला
.बिस्कीट मागितले तर" धनी घ्या बिस्किटे " .......
चहा पुरला का ग सगळ्यांना असे सासूने विचारताच सानिका म्हणाली" थांबा हं सासूबाई इकडच्या स्वारीला विचारते आणि हवा का म्हणून?" तिच्या सासूने कपाळाला हात मारून घेतला.
संध्याकाळी तिला अंगणात पाहून तिच्या सासर्यानी विचारले " कुणाला शोधतेस ग सानिका" ..त्यावर ती म्हणाली" आमचे हे कुठे दिसत नाही हो मामांजी" आता डोक्याला हात लावला आज हिला काय झाले? पप्पा वरून सरळ मामंजी.....
संध्याकाळच्या वेळी सम्यक तिला तळ्यावर फिरायला जावूया म्हणाला.तशी सानिका म्हणाली" सासूबाईंना विचारून येते, मालक फिरायला जावूया म्हणताहेत जावू का म्हणून" .....आता सम्यकच डोके गरगरायला लागले.तो जरा चिडूनच म्हणाला " अग ए बाई जरा जास्तच होतेय हे ? हे कोण कोणत्या नावांनी हाक मारतेस मला.... मला बेबी , सम्यक, हनी म्हणत होतीस लाडाने विसरलीस का? त्यावर फणकारून सानिका म्हणाली" नवऱ्याला नावाने हाक मारू नये.म्हणे आयुष्य कमी होते त्याचे......" आणि त्याला वेडावून दाखवीत ती आत पळाली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा