नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग ८

True love always win

स्वराचे लग्न जवळ आले होते... दोनच दिवस बाकी होते.. तिच्या हातावर मेहेंदी होती ,त्यावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव "मंगेशचे" नाव होते...तरी तिला संकेतच आठवत होता..सगळे तिच्या रूपाचं कौतुक करत होते..आजी कडाकडा बोटं मोडून नजर काढत होती.. तिची  आई कामाच्या व्यापात होती पण लेक जाणार ह्या भावनेनं सतत भावनिक होतं होती....तसा स्वराने आईला कधीच कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला नाही ,किंवा काही हट्ट केला नाही..स्वरा शेंडफळ होती..आईने जेवढे लाड करायचे होते तेवढे केले होते..आईला स्वराच खूप कौतुक वाटायचं,कारण स्वराचा स्वभावच खूप गोड होता..जो तो स्वराच सतत कौतुक करायचा.. आपल्या मुलांचं कौतुक ऐकले की प्रत्येक आई वडिलांची मान ताठच होते... आईला कल्पना होती स्वराला ,मंगेश बरोबर लग्न करायचे नाही .....पण बाबापुढे आयुष्यभर तिने नमतच घेतले होते..त्यात स्वराची बहीण पळून गेली ह्याचा दोष तिच्या माथी बाबांनी सहज मारला... मुलीकडे लक्ष दिले नाही ,म्हणून तिने हे पाऊल
 उचलले...स्वराची आई लेक पळून  गेल्यापासून नाराज झाली होती,जो तो तिला सतत टोमणे मारत होता.. हसू झाले होते.ती सुद्धा मानसिक त्रासातच होती..पोटच्या पोरीने असे केले होते.. मुलगी गेल्यापासून स्वराच्या बाबांनी ,तिच्या आईशी बोलणे टाकले होते... स्वराला प्रचंड दडपण आले होते... म्हणून तर घरात असे वातावरण आणि जर लग्नाला नकार दिला तर अजून बाबा आईशी विचित्रपणे वागतील..

आईची काहीही चूक नसताना,बाबा असे वागत होते...तिला आईचा त्रास अजिबात बघवत न्हवता... त्यात लग्न होऊन जाणार ,त्यानंतर आईचं कसं होणारे हा विचारसुद्धा तिच्या मनाला खात होता....

आईचा केविलवाणा चेहरा पाहिला की ,तिला प्रचंड त्रास व्ह्यायचा..त्यामुळे ती मनात नसताना सुद्धा नको असलेल्या नात्याला तयार झाली होती...नेहमीच आई बाबा ,त्यांचा मान तिच्यासाठी महत्वाचा राहिला होता..आजही होता....पण ह्या दुविधे मध्ये असतानासुद्धा ,तिला संकेतला विसरने मुश्किल होऊन बसले होते..


कसं विसरणार होती संकेतला????

किती प्रेम करत होता तो...न बोलताही त्याचे डोळे तिला सांगून जायचे.. किती आदर करत होता तो ...मैत्रीच्या पलीकडे नाते गेले होते आणि अगदी ते प्रेमच आहे ह्याची जाणीव सतत सतत तिला होत होती.. कधी न्हवे ते आज ती खूप तुटून पडली होती..

ज्या प्रेमाने त्याच आयुष्य बदलून गेले होते.. विविध रंग भरले होते आज त्याच प्रेमाच्या विरहाने तिचा प्रत्येक क्षण बेरंग झाला होता...तिला जगण्यातच रस न्हवता....

तिचं मन जणू ग्वाही देत होत..संकेतच तुझ्यासाठी योग्य आहे पण तरीही तिने प्रेम आणि जन्मदात्यामधून निवडलं होतं जन्मदात्याला.... त्यांना त्रास देऊन तिला सुखी राहायचं न्हवतं...

तरीही आजपर्यंत जे प्रेम संकेतने दिले होते, त्याच्या सर्व गोड आठवणी एकदा अनुभवायच्या होत्या ,तिने कागद घेतला आणि त्याच्यावर संकेतच्या पहिल्या भेटीपासून शेवटपर्यंतच्या आठवणी लिहू लागली आणि अश्रूंना वाट करून दिली......लिहीत होती त्याच पवित्र प्रेम...त्याची तिची झालेली पहिली भेट....हळू हळू मैत्रीच रूपांतर प्रेमात होताना ओथंबून आलेल्या अनेक भावना आज जश्याच्या तश्या उतरवत होती त्या कागदावर..त्याने दिलेली पहिली भेट...तिच्यासाठी तासनतास वाट बघणं.. त्याच्या डोळ्यातील चमक,त्याचं मनातलं प्रेम..कँनटीनमध्ये घडलेल्या आठवणी,कॅम्पस मध्ये हरवलेले क्षण वेचत होती....तो सोबत असताना ,सुरक्षित असल्याची भावना...तिला निरोप दिल्यावर,ती नाहीशी होईपर्यंत  तिथेच थांबन,तिला सतत पाहणं .तिला पाहिल्यावर सुंदरस हास्य ..निरागसता होती संकेतमध्ये ,मन मोकळा पण मन घेवडा असा..स्वराच्या मनात काय चाललं आहे हे तिच्यापेक्षाही जास्त संकेतला कळायचं...कोणी दुसऱ्या मुलाने स्वराला पाहिलं की संकेतला कसतरी व्हायचं ...बैचेन व्हायचा..स्वराला त्याची अगतिकता समजायची,त्याचा चेहरा उतरून जायचा...त्याचे हावभाव सतत सांगायचे स्वरा तू फक्त माझी आहेस,फक्त माझी....वेडावला होता तो तिच्यासाठी..सर्व काही तिने कागदावर लिहिले...खूप गोड।आठवणी आज जगली, सर्व काही आठवल,क्षणात हसत होती तर क्षणात रडत होती .. मनातल्या मनात संकेतला मनापासून माफी मागितली..संकेतशी सवांद साधत होती..
संकेत तू मला खूप प्रेम दिलं..पण मी तुला काहीच देऊ शकली नाही...तू माझ्या आयुष्यात आला ,मला खूप सुंदर आठवणी दिल्या, ज्या मी कधीच विसरनार नाही....खूप छान भावना होती ,माझ्यासाठी कोणीतरी माझ्यावर खूप प्रेम करत आहे..कितीवेळा तू प्रयत्न केला ,मला प्रपोस करण्याचा आणि मी फक्त तुला हुलकावणी दिली..कारण मला लव मेरेज न्हवतं करायचं.. आईबाबांना न्हवतं दुखवायच... पण आज मन खूप त्रासले आहे..तुझी खूप आठवण येते.दोन दिवसाने मी कोना दुसऱ्याची होईल...त्यानंतर तुझा विचार करणे माझ्यासाठी योग्य   नाही, म्हणून आजचा क्षण फक्त तुझ्याबरोबर घालवते आहे,तू नाहीस आता माझ्याजवळ  पण तुझ्या जिवंत आठवणीमुळे तुझा भास  होतो आहे..असे वाटते आहे बाजूलाच आहेस...बरं झालं तू मला प्रपोस नाही केलं,नाही तर तुझा सामना मी करू शकले नसते कधीच..मी सुदधा खूप प्रेम केलं तुझ्यावर फक्त व्यक्त नाही केलं..आपल्या दोघांचं अव्यक्त प्रेम...खरं प्रेम..नेहमीच नेहमीच जिवंत राहील.....काळजी घे संकेत .खुश राहा.. मी देवाकडे  प्रार्थना करेल ,तुला खूप छान जोडीदार मिळो, नेहमी आनंदी राहा... तुला कधीच विसरणार नाही ...कधीच नाही ..


                         तुझं अव्यक्त प्रेम 
                          स्वरा...


स्वराने आज मनमोकळं केलं...कधी झोप लागली तिला कळलं नाही ..सकाळी उठून पाहते तर घरात कालवा चालला होता ,काय झाले होते??पाहू पुढच्या भागात...

 

अश्विनी पाखरे ओगले..©®

🎭 Series Post

View all