नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग ६

True love wins

मागच्या भागात आपण पाहिले की, संकेत स्वराला प्रपोस करणार होता.. पण ती आली नाही..दुसऱ्या दिवशी फोन वर रडत होती... तिने भेटायला बोलावलं संकेतला...आता पुढे पाहू..

संकेत आधीच आला  कॉलेजला आणि तिची वाट पाहत बसला...सतत घड्याळाकडे पाहत होता... तासभर झाला.तो अस्वस्थ झाला होता, आज येते की नाही त्याला शंका आली..पुन्हा फोन केला..तर तिने कट केला फोन आणि मेसेज केला.अर्ध्या तासात येते..तेव्हा कुठे संकेतच्या जीवात जीव आला...स्वराला आवडतात म्हणून त्याने तिथे मोगऱ्याची फुलं गोळा केली आणि तिला दिसू नये म्हणून लपवून ठेवली..संकेत  फक्त आणि  फक्त तिला कशात आनंद भेटेल ह्याचाच विचार करायचा..तिच्या चेहऱ्यावर हास्य यावे म्हणून सतत तिला joke सांगायचा... डोळ्यात तिच्या एकटक पाहायचा.. काय शोधायचा तिच्या डोळ्यात देव जाणे...खरंच मजनू झाला होता......

तोच स्वरा हळू हळू पावलं टाकत आली...चेहरा उतरला होता तिचा ..संकेत पळतच गेला तिच्याकडे... दोघ केनटिनमध्ये जाऊन बसले.. संकेतने तिला आवडतो तो पिज्जा ऑर्डर केला...स्वरा शांतच बसली होती..संकेतने बोलायला सुरवात केली...

संकेत: स्वरा,काय झाले???का रडत होती तू फोनवर???

स्वरा प्रयत्न करत होती ,स्वतःला सावरण्याचा... पण तिला हुंदका आवारता नाही आला....

रडु लागली....
संकेत लगेच उठला ,त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिचे डोळे पुसू लागला...मग तर स्वराचा बांध अजून सुटला, अजून रडायला लागली जोरजोरात..आजुबाजुची लोकं तिला पाहायला लागली...

संकेतने तिच्या पाठीवर हात फिरवला....तोच स्वराला फार  असहज वाटले.. तिने कंट्रोल केला..आज पहिल्यांदाच संकेतने तिला स्पर्श केला होता...ती असहज झालेली पाहून संकेत पुन्हा स्वतःच्या जागेवर बसला....विनवणी करू लागला plz रडु नको,plz.....
.तिला असे रडताना पाहून त्याचाही तोल ढासळला,त्याच्याही डोळ्यात पाणी आले..

थोड्यावेळाने स्वरा शांत झाली....तिने स्वतःला सावरलं... ती बोलू लागली....

संकेत,"माझ्या बहिणीचे लग्न ,माझ्या आत्याच्या मुलाबरोबर ठरले होते.माझी बहिण लहान होती तेव्हाच  बाबांनी हा निर्णय घेतला होता....माझी बहिण ऑफिस मधल्या मुलाच्या प्रेमात पडली...तिने बाबांना सांगितले तसे ,पण बाबा तयार नाही झाले..लग्न करायचे तर बहिणीच्या मुलाशी... आठच दिवस होते लग्नाला ,आणि काल माझी ताई त्याच्यासोबत पळून गेली....बाबांना फार मोठा धक्का बसला..आता अजून इज्जत जायला नको,म्हणून आत्याने , सरळ तिच्या मुलाच लग्न माझ्याशी लावायला बोलली.... बाबांनििही एक क्षणाचा विलंब न लावता, मला न विचारता आत्याला हो बोलले.... मला नाही करायचे त्याच्याशी लग्न..मी कधीच त्याला त्या नजरेने पाहिले नाही..असं वाटलं न्हवतं की असे काही करेल... ताईला तीचं प्रेम मिळालं..माझं काय??माझ्या का नाही मनाचा विचार केला बाबांनी??मला नाही करायचे लग्न.....

संकेत तिला बोलला"तू सांग ना बाबांना "

स्वरा बोलली, मी बाबांना बोलली पण ,ते सरळ बोलतात लग्नाला नाही बोललिस तर आम्ही विष पिऊन आत्महत्या करू..... आता काय करू संकेत मी ???माझ्याकडे काहीच पर्याय नाही....

खूप स्वप्न रंगवली होती मी,लग्न माझ्यासाठी खूप मौल्यवान स्वप्न होतें... पण हे स्वप्न अश्या पद्धतीने धुळीस मिळेल वाटलं न्हवतं....मी नेहमी आई बाबांचा विचार केला,पण आता समाजात इज्जत जायला नको ,म्हणून माझं लग्न त्याच्याशी लावणार आहेत...

ती रडु लागली...पुन्हा संकेतने डोळे पुसले.. खरं तर संकेत आतून पूर्ण कोसळला होता....त्यालाच रडु येत होते.. स्वराला प्रपोस करणार होता,आणि हे काय होऊन बसले??आधाराची  जास्त गरज त्यालाच होती....त्यालाच समजत न्हवते आता काय करावे ??त्याला वाटलं आता संपलं सर्वच....त्याने तरी तिला धीर दिला..काळजी करू नको काही तरी मार्ग निघेल...


त्याने स्टेशनला सोडले तिला..रोज  ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिला पाहत राहायचा... पण आज मात्र तिला जाताना पाहू नाही शकला.. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते... लाचार  झाल्यासारखे वाटले..डोळे पुसले आणि सुसााट पळत सुटला वाऱ्याच्या वेगाने....घरी आला,रूममध्ये गेला... जोरजोरात रडु लागला..स्वतःलाच कोसत होता..त्याला राग आला स्वतःचा ..का नाही प्रपोस केलं आधी तिला???,स्वतःलाच प्रश्न विचारत होता"का नाही केलं प्रपोस, आता मित्र म्हणून तिचं लग्न थांबवण्याचा अधिकार नाहीच आहे"..पण ती खुश राहील त्याच्याबरोबर??का तिचे बाबा असे वागत आहेत??का तिच्या मर्जीविरोधात तिचे लग्न करत आहे...तो फक्त रडत होता,रडत होता..ते सहन न्हवतं होत त्याला,कारण पहिल्यांदाच तो प्रेमात पडला होता,खऱ्या प्रेमात... किती आंनद दिला होता स्वराने त्याच्या आयुष्यात येऊन..त्याला स्वप्न वाटत होते हे,पण हेच सत्य होते स्वरा आता  कोणा दुसऱ्याची अर्धांगिनी होणार होती.... निघून जाणार होतं त्याच प्रेम त्याच्या आयुष्यातून?????

काय होतं??पाहू पुढच्या भागात....

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट आणि नावासहितच शेअर करा????
मला फॉलो करायला विसरू नका....

🎭 Series Post

View all