नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग ५

Love life

संकेतने ठरवलं पूर्ण मनाशी, मला जे वाटतंय स्वराविषयी ते सांगायलाच हवे... नाही तर आयुष्यभर खंत  राहील.,प्रेम व्यक्त न  केल्याची.

 स्वरासाठी छान गुलाब घेतले आणि तिला आवडते ती डेरी मिल्क....स्वराला जो आवडतो तोच शर्ट घातला ..मस्त perfume मारला....स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता..तू छान प्रपोस करशील तिला डोन्ट worry..घरातून बाहेर पडताना देवाच्या पाया पडला ,जणू शक्ती मागत होता...आज पहिल्यांदाच तो कोणत्या तरी मुलीला प्रपोस करणार होता...स्वप्न पाहू लागला ,जेव्हा स्वरा त्याला हो बोलेल ,तेव्हा तो तील गुढग्यावर बसून सर्वांसमोर फिल्मी style ने लग्नासाठी मागणी घालेल... साहेबांनी ती तिच्यासाठी heart shape ची रिंग सुद्धा घेतली होती.. त्याने ठरवलं होतं आज काहिही करून  तिच्या मनातलं प्रेम ओठावर अणायचंच.

मनात अनेक गुलाबी स्वप्न रंगवत तो कॉलेजला पोहोचला... शोधू लागला तो स्वराला .तिच्या मैत्रिणींना विचारू लागला.. पण स्वरा आली न्हवती...वेड्यासारखी वाट पाहू लागला..कधी येते ती ..तिला फोनसुद्धा करत होता पण तिने उचलला नाही.प्रतीक्षा करत होता.कधी येतेय....त्याला एक एक क्षण खूप मोठा वाटत होता...मनात विचार करू लागला ..का बरं ,आज स्वराला उशीर झाला...सतत घडाळ्यावर नजर ...संध्याकाळ झाली...तो वाट बघत बसला..फुल कोमेजले... रडवलेला चेहरा करून निघून गेला तो...पहिल्यांदा त्याने इतकं बळ एकवटून प्रपोस करण्याचं धाडस केलं होतं..पण सर्व पाण्यात गेलं...त्यापेक्षाही त्याला स्वराची काळजी वाटू लागली...का नाही तिने फोन केला...रात्र झाली..तो न जेवताच झोपला... स्वराचाच डोक्यात विचार घोळत होता....तोच मेसेज आला ,त्याला वाटलं स्वराचा मेसेज असेल रोजच्या प्रमाणे .ती न विसरता मेसेज करते खासकरून take care आठवणीने लिहिते,त्याने पटकन फोन  पहिला .तर भलत्याचाच मेसेज होता...त्याची  तळमळ होऊ लागली...काय नक्की झालं स्वराला आज....एक दिवस तिचा आवाज ऐकल्याशिवाय  जात नाही आणि  आज तर मेसेजसुद्धा नाही...

त्याने लागेच तिच्या मैत्रिणींला आशूला  फोन केला... संकेतच्या सांगण्यावरून  आशूने सुद्धा तिला फोन केला पण तरीही तिने उचलला नाही..संकेतला खूप काळजी वाटू लागली तिची..काही तरी विचित्र डोक्यात येऊ लागले.अखी रात्र जागून काढली त्याने... त्याला झोप आली नाही...अनेक विचारांच काहूर डोक्यात माजलं होत...

सकाळ झाली..त्याचा फोन वाजला .पाहतो तर काय स्वराचाच फोन होता ,ते पाहून कुठे त्याचं मनावरचं ओझं दूर झाले... त्याने फोन उचलला...हॅलो स्वरा,काय हे काल का नाही आली कॉलेजला किती वाट पाहिली.??फोन नाही घेतला माझा???काय झाले...

तेथून स्वरा फक्त रडत होती....

ती  त्याला बोलली ,मला एकदा भेटायचं आहे ..तू कॉलेजला भेट..

काय बोलणार होती स्वरा ??का रडत होती??पाहू पुढच्या भागात...

अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहितच शेअर करा..
मला फॉलो करा...

🎭 Series Post

View all