नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग ३१

Its about true love

लेकी आईला भेटायला आल्या..दोघींना पाहून आजवर स्वतःला सावरत असलेली आई ढासाळली ,स्वरा आणि सारिकाला बिलगली आणि रडु लागली.
सारिका आईचे डोळे पुसत तिला बोलली आई सॉरी , माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना...बाबा पण तुझ्याशी भांडले.. खरंच आई मी असं न्हवतं करायला पाहिजे......

आई:"सरु बाळ असं काही नाही...उलट मला असं वाटत की, तुम्हा दोघींचं चांगलं झालं..प्रेम करणारा जोडीदार मिळाला, नाही तर माझं बघ,काय उपयोग .आयुष्यभर प्रेम तर नाहीच पण सन्मानसुदधा नाही.....लाचारीच आयुष्यच हाती आले.सगळं काही तुझ्या बाबांच्या मनाप्रमाणे वागूनसुद्धा शेवटी अपमान...तुम्ही दोघी आयुष्यात खुश राहाल ,मला  विश्वास आहे...आणि आईला काय हवं असते ,आपली मुलं सुखात आहे हेच पुष्कळ आहे...असंही आता संसारच्या मोहातून बाहेर पडले आहे"एकटा जीव सदाशिव"....खरच आता सुंदर आयुष्य जगते..लग्न म्हणजे सहवास ,प्रेम, विश्वास.... माणूस लग्नसुद्धा त्यासाठीच करतो ना??आपलं कोणीतरी असावं..आपल्याला समजून घ्यावे,आपल्याला शेवटपर्यंत साथ दयवी..... पण माझ्या वाट्याला यातील काहीच न्हवतं.. वाट्याला आले ते फक्त आणि फक्त बंधन, दडपण, अपमान.... तुझ्या बाबांनी कशी वागणूक दिली हे नाही सांगू शकत... मुळात जो माणूस मी नवरा म्हणून निवडला, निवडला म्हणण्यापेक्षा नशिबी आला तो चांगला नवरा तर कधीच झाला नाही,ना वडील.लग्न माझ्यासाठी सुख न्हवतं तर ते बंधन ज्या बंधनात जखडले होते.. आणि अश्या पद्धतीने जखडले जिथे मी स्वतःला सोडवू शकले असते पण आई म्हणून फक्त आणि फक्त सहन करत राहिले... तुमच्या दोघींचं काय होईल..एकटीने मी जगु शकेल का???अनेक संभ्रम मनात होते....पण जेव्हा माझ्यावर होणारा अन्याय माझ्या पर्यंत सिमीत होता तोपर्यन्त माझी सहनशक्ती साथ देत होती, जेव्हा तुम्हा दोघींवर सुद्धा अन्याय होऊ लागला,तेव्हा जाणीव झाली चुकीचे वागले मी माझ्याशी ....मोठी चूक होती.माझ्या मुलींच्या संस्कारावर दुसरा तिसरा शिंतोडे न्हवता उडवत तर तो तुमचा वडील...मग कसं काय सहन करणार ग पोरीनो???
असं बोलतात खरं प्रेम जिंकत ,पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं,मनापासून तुझ्या बाबांवर प्रेम केलं.. असं वाटलं हा माणूस कधीतरी बदलेले ..पण नाही माझा भ्रम होता..खुप मोठा  भ्रम, निराशा झाली... आशावाद सोडला आहे..आता नको काही अपेक्षा ठेवायला.. तुमचा बाबा कधीच बदलणार नाही हे सत्य स्वीकारले आहे..पुरे आता..मनाचा खेळ थांबवला.. हरले आहे आता खरच हरले.. मोडला संसाराचा डाव आता... पण तुम्ही पोरीनो सुखाचा सांसार करा... एकमेकांना समजून घ्या, आदर करा.....मी नाही माझ्या मुली सुखाने नांदत आहे हे माझ्यासाठी स्वर्गसुखच आहे....

योग्यच केले मी,योग्य केले आई म्हणून माझ्यातल्या   आईने मुक्त केले त्या बंधनातून ज्यातून  कधीच मला मुक्त होता आले असते...

स्वरा आणि सारिका आज आईच्या मनाची स्तिथी समजत होत्या... पुन्हा आईला बिलगल्या.....

दोघींच्या डोक्यावरून हात फिरवला....पदराने डोळे पुसतच बोलली चला आता जेवायला बसू सकाळपासुन तुमची वाट पाहत होती, पाणीसुदधा नाही प्यायली....

तिघी जेवायला बसल्या..
आईने आमरस पोळी केली होती.... किती महिन्याने माया लेकी भेटल्या होत्या... दोघींनी आईला हाताने घास भरवला...आईला आज अश्रु अनावर होत होते...त्यांच्यासाठी सोहळाच होता..दिवस गप्पामध्ये निघून गेला..रात्र झाली ...आईच्या पोटावर हात ठेवून दोघी झोपून गेल्या...आज तृप्त झाल्या आईच्या कुशीत दोघी.....

चार दिवस कसे निघून गेले कळलेच नाही..स्वराला संकेतचा फोन आला...

स्वरा रडु लागली .....काय बोलला संकेत ..सर्वच तर सुरळीत होते.... सारिकाने स्वराच्या हातातून फोन घेतला तर कळले 
तिच्या बाबांचा अपघात झाला आहे... सारिकाने आईला  सांगितले....

आता मात्र खंबीर झालेली आई अचानक हतबल झाली..त्याने जरी प्रेम केले नसले तरी तिने तर मनापासून केले होते.... सर्व राग एका क्षणात जणू नाहीसा झाला...तिने लगेच सामानाची  बांधाबांध केली ,आणि मुंबईला रवाना झाल्या.........


संकेतनेच  स्वराच्या बाबांना दवाखाण्यात दाखल केले होते....स्वराच्या बाबांची कंडीशन सिरिअस होती....संकेतचे आई,बाबा सुदधा होते...स्वरा,तिची आई बहीण आली...तिघी रडु लागल्या....संकेत धीर देत होता.. स्वराची सासू तिच्या आईला, बहिणीला धीर देत होती...डॉक्टर आले..ते बोलले की रक्त खूप गेले आहे..लवकरात लवकर अरेंज करावे लागेल.. संकेत लगेच तयार  झाला त्याचे ब्लड ओ पोसिटीव्ह होते ....

चार तासाने डॉक्टर आले आणि त्यांनी आता स्वराचे बाबा व्यवस्थित असल्याचे सांगितले....सर्वांच्या जीवात जीव आला.. स्वराची आई धावतच त्यांना पाहायला गेली..

काय असेल त्यांचे reaction???
ते खुश होतील??का आहे तोच द्वेष कायम राहील पाहू पुढच्या भागात..

लेख आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या.
©®अश्विनी पाखरे ओगले...

🎭 Series Post

View all