नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २७

Its about true love

मागच्या भागात आपण पाहिले.. संकेत आणि स्वराच लग्न झाले...
स्वराची आई गावी निघून गेली.आता पाहू पुढे...

स्वरा दुःखी झाली होती आईच्या जाण्याने.. तिच्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात रडु होते कारण ,एकीकडे आज तिचं खरं प्रेम मिळाले होते आणि एकीकडे आई निघून गेली...आईच होती जिने आजवर समजून घेतलं होतं...आईच प्रेम हे वेगळच असते..आईच्या अनेक आठवणी दाटून येत होत्या क्षणोक्षणी.. आई कशी राहील ??कसं होईल आईच??सतत हेच डोक्यात घुमत होत....

संकेत सावरत होता तिला..पण ती मात्र कोलमडून गेली होती..घरातले सर्वच तिला आधार देत होते... संकेतने  तिला चेंज म्हणून शिमलाचे तिकीट काढले ...दोघ फिरायला गेले.....

जसं विमान उडाले तसे ,स्वराने संकेतचा हात घट्ट पकडला.स्वराने थोड्या वेळाने संकेतच्या खांद्यावर डोके ठेवले..तिला खूप सुरक्षीत वाटत होते....स्वराने अश्रूंचा बांध फोडला....संकेतला समजत होती तिची अवस्था ..तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता...संकेतचा आपलेपनाचा स्पर्श तिला सुखावून जात होता......

कधी प्रवास संपला कळलंच नाही..दोघ हॉटेलला पोहोचले.फ्रेश होऊन जेवण ऑर्डर केले...तिकडचे थंड वातावरण ...हॉटेलच्या आजूबाजूला असणारी हिरवळ डोळे सुखावून जात होती...दोघ प्रवासाने थकले होते.. कधी झोप लागली कळलंच नाही......

सकाळ झाली, संकेत जागा झाला..स्वराचा चेहरा पाहू लागला ,त्याला अजूनही विश्वास न्हवता होत की खरंच स्वरा त्याची बायको झाली आहे..स्वराचा चेहरा निरखून पाहू लागला..तोच तिलाही जाग आली..

संकेत:स्वरा झाली झोप??

स्वरा: हो, झाली..तू कधी उठलास?

संकेत: आताच उठलो बायको...

स्वरा: लाजली.....मान खाली घातली..

संकेतने: तिचा हात पकडला,का नाही आवडलं बायको बोललेलं??

स्वरा:हम्मम

संकेत: नुसतं हम्म काय,नवरा आहे तुझा नीट बोलायचं बरं का बायको.... (तिची चेष्टा करु लागला...)

स्वरा:हो का नवरोबा???

संकेत : हो ग माझी राणी.....

स्वरा नुसती लाजत होती....संकेतला फक्त तिच्या चेहऱ्यावर हास्य पहायचं होत......

संकेत: स्वरा मला काही तरी बोलायचं आहे...बोलू???

स्वरा: बोल ना

त्याने स्वराच्या मांडीवर डोकं ठेवलं...तिच्याकडे एकटक पाहू लागला.....

स्वरा ,मी खरंच खूप खुश आहे ,तू माझ्या आयुष्यात आली...खरं तर तुझ्या  वडिलांचा विरोध पत्करून ,आईनी मोठा निर्णय घेतला.... आणि मला हे पण माहीत आहे की,तुला किती त्रास होत आहे...तू त्रासात आहे हे मला नाही पाहवत...तू खुश असली की मलाही बरं वाटत पण तू खुश नाही.तू बायको होण्याआधी माझी एक छान मैत्रीण आहेस.. आणि मला असे वाटत की ,आता लग्न जरी झाले असले तरी आपलं नातं हे निखळ मित्र आणि मैत्रिणींप्रमाणे असायला हवं ....मग ह्या मित्राचं ऐकशील.....??

स्वराचे डोळे काठोकाठ भरले होते...
स्वरा बोलली " बोल ना"

संकेत : स्वरा तू स्वतःला सावर...please... जोपर्यंत तू स्वतःला नाही सावरणार तोपर्यंत आपण पुढे कसे जाणार.. आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरवात आहे ना..मग आपण पाठच्या सर्व दुःखद घटना विसरून पुढे जाऊया ना .....

स्वरा: हो संकेत, मी नक्की प्रयत्न करेन.. पण सतत आईचा विचार येतोय मनात..  एकटी कशी राहील ती ?? तिला काय झालं तर.नको ते विचार येत आहेत....

ती रडू लागली....

त्याने तिचे डोळे पुसले ....
संकेत: स्वरा ,शांत हो ....तुला माझ्यावर विश्वास आहे ना???

स्वरा :खूप विश्वास आहे,माझ्यापेक्षाही जास्त....

संकेत: मग ऐक मी काय बोलतो आहे.. आईंची जबाबदारी माझी.त्या एकट्या जरी राहत असल्या तरी ,आपण त्यांची अधूनमधून भेट घ्यायची... आपण तिकडे दोन चार दिवस रहायचे.. त्यांना आपल्याकडे बोलवायचे.. म्हणजे त्यानाही बरं वाटेल ......

स्वराला आता कुठेतरी धीर आला..तोच तिच्या आईचा फोन आला..

आई: स्वरा कशी आहे?

स्वरा: मी मस्त..तू कशी आहे  आई??

आई: मी छान बाळा... बरं जावईबापू  कसे आहेत..??

स्वरा: ते पण छान.....

आई: बरं, मी काय बोलते  आहे,ते नीट एक...मी इथे खूप खुश आहे..तू अजिबात काळजी करू नको माझी ...खूप बरं वाटतंय मला..असं वाटतंय की,तुरुंगातून सुटले आहे..मस्त इथे शेती करते.... कोंबड्या, बकऱ्या सुद्धा विकत घेतल्या आहे..छान मन रमत ..खूप मैत्रिणी आहेत..कधी दिवस निघून जातो नाही कळतं..खरंच खूप छान वाटत आहे..कसलच बंधन नाही....मग आता तू अजिबात माझा काही विचार करू नको...आता तू तुझ्याकडे आणि संसाराकडे लक्ष दे...उगाच माझी काळजी करू नकोस.. आता जावई बापूकडे लक्ष दे....सासू सासऱ्याकडे लक्ष दे..अधून मधून फोन करत जा....चल आता ठेवते  फोन ,माझी मैत्रीण आली आहे.....काळजी घे बाळा...

आईने फोन ठेवला...

स्वराला आईशी बोलून खूप बरं वाटलं.. मनावरचं ओझं हलकं झालं.. 
हसू लागली गालातल्या गालात..

संकेत: काय मॅडम आम्हाला पण सांगा ,का हसू येत आहे ते....

स्वरा...:संकेत, मी खूप उदास झाली होती ,आईचा विचार करून पण आता बरं वाटलं रे आईशी बोलून... ती खुश आहे..तिला इतकं खुश मी कधी पाहिलं न्हवतं... नाही तरी बाबांनी आम्हाला कधी हसण्याची मुभा दिली न्हवती...खरच आईने खूप सहन केलं आजवर.. आज तिच्याशी बोलत होती तेव्हा असे वाटले मी कोना दुसऱ्या बाईशी बोलत आहे.माझी आई खूप खुश आहे...खरंच बरं वाटलं संकेत..

संकेत: अरे वा! छानच की..बघ उगाच उदास बसली होतीस..नको ते विचार करत होतीस.

स्वरा: हो ना ,खरंच नको ते विचार करत बसले..sorry संकेत...

संकेत:sorry कशाला??

स्वरा: तू मला मनवत होता, तरी मी आपली तोंड पाडूनच  होते..

संकेत:sorry काय स्वरा....मैत्री मध्ये कोणी सॉरी,थँक्स बोलत का??बरं चल आता आवर..आपण छान फिरून येऊ.....

स्वरा: ठीक आहे.....लगेच आली..

संकेत आणि स्वराच्या सुंदर क्षणांना सुरवात झाली होती..काय होते पुढे पाहू पुढच्या भागात.

क्रमश..
अश्विनी पाखरे ओगले...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा....

🎭 Series Post

View all