नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २३

ITs about true love..

संकेत गेल्यावर इथे स्वराच्या वडिलांनी स्वतःच अक्राळ विक्राळ रूप दाखवायला सुरू केले...ते बोलू लागले..हीसुद्धा त्या पोरांच्या प्रेमात पडली आहे म्हणून तो घरापर्यंत आला..हजार वेळा बोललो होतो मुलांशी बोलत नको जाऊ ,कॉलेजला अभ्यास करायला पाठवलं होतं प्रेम करायला नाही.... माझ्या डोक्याला ताप  ..काही नाही आठ दिवसात तुझं लग्न लावतो मुलगा पाहून. नाही तर मोठ्या बहिणीप्रमाणे पळून जाशील....
स्वरा: नको,बाबा .नाही करायचं लग्न..मी नाही पळून जाणार खरंच..

बाबा: मी तुझा बाप आहे ...आता हे ठरलं.. आजपासून तुझं बाहेर जण बंद.. लवकरात लवकर मुलगा बघून तुझं लग्न लावणं हाच पर्याय आहे...

आता तर प्रकरण अजून चिघळले.. स्वराला काहीच सुचत न्हवते.. वरून तिच्या बाबांनी तिचा,तिच्या आईचा फोन सुद्धा स्वतःकडे ठेवून घेतला होता...सर्वच दरवाजे बंद झाले होते संकेतकडे जाण्याचे....

संकेतच्या आईने ,स्वराच्या आईला चौकशी करण्यासाठी  फोन केला पण फोन तर स्वराच्या बाबाकडे होता..स्वराच्या बाबांनी फोन स्वीच ऑफ करून ठेवला होता..एका मित्राच्या ओळखीने एक मुलगा पहिला...तो मुलगा स्वराला पाहायला आला..इंजिनिर होता मुलगा, दिसायलाही बरा...मुलाला स्वरा पसंत पडली.. पण स्वराने मान वर करूनसुद्धा त्याला पाहिलं नाही.....त्या मुलाने तेव्हाच सांगून टाकले मला मुलगी पसंत आहे.. उद्या माझ्या आई वडिलांना घेऊन येतो..

स्वराच्या वडिलांनी तिला सक्त बजावलं ..मुलाचे आई वडील आले की अजिबात तोंड नाही पडायचं.. आणि मुलाशी नीट बोलायचं.....

दुसऱ्यादिवशी मुलगा आई वडिलांना घेऊन आला ..स्वरा मनात नसतानासुद्धा हसून बोलली सर्वांशी... आईला तिचा त्रास कळत होता पण हतबल झाली.मुलाच्या आईवडिलांनी कळवतो म्हणून संगीतले...स्वराच्या वडिलांना ठरवले त्यांच्याकडून होकार आला की लगेच लग्न उरकुन टाकूया.....

चार दिवस झाले, मुलाकडून फोन नाही आला ,स्वराचे बाबा विचारात पडले. मुलाला स्वरा पसंत आहे मग...अजून का नाही त्यांनी फोन केला....न राहून स्वराच्या वडिलांनी फोन केला..त्या मुलाने नकार दिला...कारण विचारल असता त्याने काहीच सांगितलं नाही.....

स्वराच्या वडिलांना राग आला...त्यांना वाटलं कदाचित स्वराच प्रेमप्रकरण तर कळलं नसावं..स्वरावर जाम भडकले.. तिला ओरडू लागले.."तूच कारण आहे ,तुझ्यामुळे चांगलं स्थळ गमावल......नाक कापलं माझं.....

स्वरा आतून सुखावली ,तिला बरं वाटलं..असही  तील लग्न न्हवतच करायचं... स्वराचे बाबा रोज स्थळ आणत होते... पण कोणीही तिला होकार कळवत न्हवतं.... तिला पाहून मुलं पसंत करायची ..मात्र घरी गेल्यावर नकार कळवत होती.... सारखं सारखं हेच होत होते.... काही कळत न्हवते....स्वराच्या मोठ्या बहिणीने असे केले कडाचीत म्हणून तिला कोनी हो बोलत नसावे असे  वाटत होते..  पण त्यामागचे कारण विचित्र होते..

इथे संकेतने बाहेर जाऊन काम न निर्णय घेतला..स्वराला विसंरण शक्य न्हवते पण तरीही त्याने लांब जाण्याचा निर्णय घेतला...सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते.... त्याने हार मानली होती नशीबापुढे.....त्याची आई सतत प्रार्थना करत होती काही तरी चमत्कार होऊ दे..शेवटी आईच काळीज ,मुलाच दुःख तिला सहन होत न्हवतं... आणि खरंच त्या आईच्या प्रार्थनेत शक्ती असते तसेच झाले... चमत्कार झाला..तिच्या मनासारख झालं.....

पाहू पुढच्या भागात.
अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहित  शेअर करा.. नक्की  मला फॉलो करा.

🎭 Series Post

View all