नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २१

Its about true love

संकेतला किती दिवसाने बरं वाटलं स्वराशी भेट झाली...आणि आई वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्यात बळ आले.. कुठे ना कुठे त्याला मनात वाटत होते की स्वराचे वडील लग्नाला मान्यता देणार नाही...पण तरीही देवाकडे प्रार्थना करत होता की ,काही तरी चमत्कार होवो.

स्वराचे बाबा गावावरून परतले...त्यांचा मूड खराब होता.. काही तरी बिनसलं होत...पण ते स्वराच्या आईशी काहीच शेअर करायचे नाही...बायको म्हणजे घरात फक्त कामं करणारी मशीनच...तिने काही बोलायचं नाही...जे काम सांगीतले जाईल ते तिने गपगुमान करावे

स्वराच्या लग्नाचा विषय काढायचा होता तिला, पण त्यांचा पारा चढला होता..म्हणून ती गप्प बसली..दोन दिवसाने संकेतच्या आईने फोन केला ...स्वराचे बाबा आले असतील तर आम्ही येतो म्हणून पण ...स्वराच्या आईने मना केले.. आता जरा थांबा ,थोड्या दिवसाने मीच फोन करते तेव्हा या.....

आता स्वराच्या आईची अग्निपरिक्षाच होती...कसं सांगावं ह्या माणसाला.... सांगावं तर लागणार.पण त्यांचा दरारा एवढा होता की ,त्यांच्या समोर बोलायची सुदधा भीती वाटायची...

तिने मनाशीच ठरवलं आज काहीही करून सांगायचं...स्वराचे बाबा जेवत होते... खास तिच्या आईने छान त्यांच्या आवडीचे जेवण बनवले होते..जेवत असताना त्यांच्या दाताखाली खडा आला त्यांनी सरळ स्वराच्या आईच्या अंगावर ताट भिरकावून लावले आणि तिच्यावर हात उचलणार तोच स्वरा धावत आली... त्यांनी स्वराच्याच मुस्काटात लावली आणि रागारागाने बाहेर निघून गेले..... दोघी माया लेकी रडु लागल्या.. हा अन्याय लग्न झाल्यापासून  सहन करत होती ती...कुठेतरी आशा होती हा अत्याचार संपेल पण कसलं काय..

स्वरा आईला विचारात होती "आई ,कशाला राहते असल्या माणसाबरोबर ज्याला नीट वागताही येत नाही,किती हा राग बाबांचा...त्यांना काहीच वाटत नाही का असे विचित्रपणे वागताना????

आई: हो ग स्वरा,खरंच बरोबर बोललीस तू.....मी का सहन करत गेली मलाच समजलं नाही...चार लोकांच्या भीतीपोटी असं आयुष्य मीच निवडलं.माझीच चूक आहे ,त्यामुळे तुम्हा पोरींना सुद्धा हेच आयुष्य जगावं लागतं आहे.....

लग्न झाल्यापासून हेच आयुष्य जगते आहे... मी कुठे बाहेर जायचं नाही...कोणाशी बोलायचं नाही..माझं कोणी घरात नाही यायचं..दिवसभर फक्त काम आणि काम..तुझ्या आजीने तर अगदी सात जन्माची दुश्मनी काढल्यासारखी मला वागणूक दिली,मारहाण ,शिव्यागाळ्या तर रोजच... ताटात शीळ अन्नच असायचं.... तिने वापरलेल्या ,जीर्ण झालेल्या साड्या घालायच्या..उठता बसता फक्त उद्धार ..तुझा जन्म झाला आणि तुझी आजी देवाघरी गेली तेव्हापासून तर तुझ्या बाबांनी एक दिवस सुखाचा जाऊ दिला नाही....तेच त्यांच्या डोक्यात बसले... आधीच त्यांना मुली नको होत्या ...आणि हे असं झाले....त्यांनतर माझ्या माहेरच्यांशी सर्व संबंध तोडायला लावले.. माझे बाबा तेव्हाच मला बोलत होते ,घटस्फोट घे पण तेव्हा मी अडून बसले, मला अनामिक भीती वाटत होती.. नवऱ्याला सोडून आयुष्य काढणे हा विचार स्वप्नात सुद्धा नाही करू शकत ,माझ्या आई बाबांनी माझे हात जोडले ,सोड ह्या माणसाला,हा तुला कधीच सुखी नाही ठेवणार... पण मी नाही ऐकले ..मी माझ्या मतावर ठाम राहिली ...माझे आई बाबा देवाघरी गेले तरी ह्या माणसाने मला जाऊ दिले नाही ,शेवटचं पाहु दिलं नाही...खरंच पाषाण हृदयी माणूस ....खरंच तेव्हा आई बाबांचं ऐकायला हवं होतं.... मी खुप मोठी चूक केली....माहेर संपलं आणि माझ सासर सर्वस्व मानलं मी,पण काही उपयोग नाही ...आजतागायत एकदाही माझ्याशी नीट बोलला नाही...कधी हौस नाही,काही नाही...भीतीपोटी फक्त जगते..माझ्यामुळे तुमचीही तीच अवस्था.....

तेव्हा मी धाडस केले असते तर कदाचित हे दिवस पहावे लागले नसते.. एखाद्याला घाबरत घाबरत जगणं ह्या पेक्षा वाईट आयुष्य काय..आयुष्य थोडं असलं तरी चालेल पण स्वतंत्रपणे जगता यावे...स्वतःच आयुष्य मनमुरादपणे जगता यावे ह्यासारखे सुख नाही ..ह्या सुखापासून मी वंचित राहिले पण तुला नाही राहू देणार...


तुझं भविष्य संकेतबरोबर सुंदर असेल ह्याची मला खात्री आहे... तुला हवं तसं जगता येईल..माझ्यासारख आयुष्य माझ्या मुलीच्या वाट्याला नको....तू तुला हवं तसं जग एकच आयुष्य आहे माझ्यासारखं मन मारून जगू नको ...दिलखुलासपणे जग.. मी तुझ्यापाठीशी  आहे...

स्वराचे डोळे पाणावले.... तिने विचारलं " आई बाबा परवानगी देतील???

स्वराच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला .जणू आशीर्वाद देत होती..
काय होईल पुढे ?? कसं कळेल स्वराच्या बाबांना ?? काय पाऊल उचलेल ती ...पाहू  पुढच्या भागात...

अश्विनी पाखरे ओगले...
लेख आवडल्यास लाईक,कंमेंट आणि नावासहित शेअर कराअ,मला नक्की फॉलो करा..

🎭 Series Post

View all