नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २०

Its about true love

संकेतच्या वडिलांनी संकेतसाठी स्वराला लग्नासाठी रीतसर मागणी घालायची असे ठरवले.. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संकेत त्याचे आई वडील आणि संकेतही स्वराच्या घरी गेले....

घरी स्वराची आई आणि स्वरा होती.. संकेतला पाहून स्वरा खूप खुश झाली...संकेतच्या आई वडिलांना स्वरा पाहताक्षणी आवडली....स्वराच्या आईनेही  संकेतला ओळखले कारण संकेतच होता ज्याच्यामुळे तिच्या लेकीचा जीव वाचला होता...आणि तिला माहीत होतं की,तो स्वरावर प्रेम करतो...


स्वराच्या आईने संकेतच फार कौतुक केलं...धन्यवाद दिले त्याला....संकेतने,  त्याच्या आई वडिलांनी ,स्वराची विचारपूस केली....दोघ एकमेकांकडे चोरून पाहत होते..दोघाच्या डोळ्यात पाणी आले होते,किती दिवसाने पाहिले होते एकमेकांना......

स्वराच्या आईने चहा पाणी केला.....तशी स्वराची आई होतीच पाहुणचार करण्यात कुशल.. पण स्वराही आपली उठून आईला मदत करू लागली,तोच संकेत तीला बोलला "स्वरा तू आराम कर,मी करतो आईंना मदत"...

आई नको नको म्हणत असतानासुद्धा ,त्याने काही ऐकले नाही.स्वराच्या आईला आता तर खात्री पटली की,हा संकेत नक्कीच योग्य जोडीदार आहे आपल्या लेकीसाठी...

थोड्या वेळाने संकेतच्या वडिलांनी विषय काढला... स्वराचे बाबा कुठे आहे???..त्यांच्याशी बोलायचं होतं..

स्वराची आई बोलली ते कामा निमित्त गावी  गेले आहेत.....येतील दोन दिवसात....एव्हान स्वराच्या आईला कल्पना आली की, त्यांना नक्की काय बोलायचं आहे,ती मनोमन सुखावली..  तिने देवाकडे प्रार्थना केली,की माझ्या मुलीच्या नशिबात संकेतच म्हणून जोडीदार मिळू दे.......

संकेतच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितले.."आम्हाला तुमची स्वरा खूप आवडली,स्वरासाठी लग्नाची मागणी घालायला आलो आहोत,स्वराला आम्ही राणी सारखी ठेऊ"

हे ऐकताच स्वराच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले.... स्वराला तर माहीत सुध्दा न्हवतं, की नक्की का आला होता संकेत मात्र आता तो तिच्यासाठी सुखद धक्का होता..थोडयावेळासाठी तिला ते स्वप्नच वाटले..... खरंच संकेत असा  लग्नासाठी मागणी घालेल आई वडिलांना घेऊन ,असं कधीच वाटले न्हवतं... पण ती खूप सुखावली..... आज तिच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता....संकेत मात्र तिचा आनंद  डोळ्यात साठवत होता..तोसुद्धा तितकाच खुश झाला होता.....

स्वराच्या आईला तर संकेत आधीच आवडला होता... ती बोलली" तुमच्या मुलासारखा जोडीदार,तुमच्यासारख प्रेमळ कुटुंब  माझ्या मुलीला भेटण म्हणजे तिचं नशीब म्हणेन मी.....माझी काहीच हरकत नाही..मला सुद्धा संकेत जावयी म्हणून खरंच पसंत आहे....

फक्त तिच्या बाबांना मनवणं जरा अवघड आहे....काही महिण्या पूर्वी माझ्या मोठ्या मुलीने ती एका मुलावर प्रेम करते हे सांगितल तेव्हा त्यांनी नकार दिला...तिला घरात बंदीस्त केले, नंदेच्या मुलाबरोबर आधीच लग्न  जमवले होते... पण तिने तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाबरोबर लग्न केले..तिच्याशी आता सारे संबंध तोडले आहेत...अगदी माझ्यासाठी मेली बोलतात.... मलाही भेटू देत नाही....


त्यांच्या विचाराप्रमाणेच वागावे लागते.. विरुद्ध वागलेलं आवडत नाही त्यांनी....त्यांनीच होकार द्यायला हवा......


हे ऐकून संकेतचे वडील बोलले....

खरं तर आम्हाला सर्व कल्पना होती,म्हणून आम्ही रीतसर मागणी घातली.. आणि आपल्या पोरांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे.आम्ही  तिला खूप खुश ठेवू .स्वरा आमच्या घराचा स्वर्ग करेल..

मला खात्री आहे स्वराचे वडील तयार होतील....बरं ते येण्याची आम्ही वाट पाहतो.. ते आले की कळवा..आम्ही पुन्हा येतो ...

संकेतच्या वडिलांनी,स्वराच्या आईला  दोघांना एकांतात बोलण्याची विनंती केली......

स्वरा आणि संकेत एकांतात बोलू लागले...


दोन मिनिटं तर दोघे एकमेकांना भरभरून बघू लागले..दोघे रडु लागले एकेमकांना पाहून...

संकेतने स्वराचा हात पकडला....... बोलू लागला...

संकेत: स्वरा,तुला मी आवडतो ना???खरं खरं सांग हा .....

स्वरा: हो संकेत ,मला तू खूप आवडतोस...माझ्या आई नंतर जर कोणी माझ्यावर प्रेम केलं तर तो तूच आहेस..माझ्या बाबांना तर मी मुलगी म्हणून नकोशी झाली होती.....कधीच माझ्याशी नीट बोलले नाही....पण जसा तू माझ्या आयुष्यात आला ,तू तर प्रेमाचे रंग भरले.. पण बाबांच्या भीतीपोटी मी शांत राहिली......त्या दिवशी मी कॉलेजला त्यासाठीच आली होती,दिवासभर तुझी वाट पहिली..मला सुद्धा तू आवडतो हे सांगायचे होते....... मला माहित होतं बाबा मला परवानगी नाही देणार.. पण माझं मन मला ओरडून हेच सांगत होत की व्यक्त हो आता तरी.....अपघात झाला आणि मला नाही व्यक्त होता आले....

संकेत: (हसला)...
मग आता व्यक्त हो,आता तर मी तुझ्यासमोर आहे....

हे ऐकताच स्वरा लाजली...

स्वरा: खरंच संकेत मीसुद्धा खूप खूप प्रेम करते....तू माझा जोडीदार व्हावा हीच मनोमन प्रार्थना करते रोज..प्रत्येक क्षण तुच मनात असतो...


संकेत:स्वरा,.. मी कधी प्रेमात पडेल असे वाटलं न्हवतं.. पण तू आलीस आणि आयुष्यात प्रेम किती महत्वाचे असते, ह्याची जाणीव झाली...माझा तुझ्याप्रती असलेला आदर अनेक पटीने वाढला जेव्हा मी तुला विचारलं होत " तू काय करशील जेव्हा तुला कोणी प्रपोस करेल???
आणि तू उत्तर दिलं होतंस.. " जो मला प्रपोस करेल त्याच्यासमोर हात जोडेल आणि म्हणेल माझ्यावर नको प्रेम करू..मी माझ्या आई वडिलांनी निवडलेल्या मुलाबरोबरच लग्न करेल....

तू स्वतःच्या आनंदापेक्षा,भावनापेक्षा  आई वडिलांचा विचार केला....पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडलो.....

स्वरा: संकेत, माझे आई वडील माझ्यासाठी खूप खास आहेत,त्यांनी मला जन्म दिला,मोठं केलं,शिकवलं मग मी माझ्या मनाची नेहमी समजूत घालायची ,तुझ्यावर खूप प्रेम असूनसुद्धा व्यक्त नाही केलं....पण आज आईच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप बरं वाटलं...फक्त...

असे बोलून स्वरा गप्प बसली ....


संकेत: फक्त काय स्वरा.....???

स्वरा: फक्त बाबा तयार व्हायला हवे आपल्या लग्नासाठी... मला वाटत की ते नाही तयार होणार...

संकेत: स्वरा होतील तयार मला विश्वास आहे...

स्वरा: खरंच,बाबा तयार झाले की किती बरं होईल ना संकेत??

संकेत: हो ,आणि ज्या दिवशी तुझे बाबा तयार होतील लगेच मी वरात घेऊन येईल माझ्या नवरीला घ्यायला 

हे ऐकताच स्वरा लाजली....

दोघांचं बोलणं झालं.....
संकेतच्या घरच्यांनी निरोप दिला..स्वराला गहिवरून आलं ..मनात खूप प्रश्न होते तिच्या आणि आईच्या बाबा आल्यावर कसं सांगायचं त्यांना???काय असेल त्यांची प्रतिक्रिया...??पाहू पुढच्या भागात.....

अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहित शेअर करा.....
मला नक्की फोलो करा

🎭 Series Post

View all