नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग १६

True love

मागच्या भागात आपण  पाहिले की, संकेतच्या आईला त्याची काळजी वाटू लागली ,तिने त्याच्या बाबांना त्याचं कारणही सांगितले... संकेतला आवडणाऱ्या मुलीचे वडील फार कडक होते, ते लग्नाला परवानगी देणार नाही पूर्ण कल्पना आली..पण फार कल्पकतेने संकेतच्या वडिलांनी स्वतःची कहाणी सांगितली.. कशाप्रकारे त्यांनी स्वतःच प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न केले ,संयम ठेवला आणि शेवटी त्यांचं प्रेम त्यांना भेटले....
 

तो उन्मळून पडला होता ...त्याला काहीच सुचत न्हवते.. त्याच्या जगण्याचा उद्देश हरवला होता.... पण वडीलांनी जणू त्याला एक मंत्र दिला होता..."जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर शेवटपर्यंत संयम ठेवून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा,नियती एक दिवस तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस समोर उभी करतेच"...फक्त गरज असते कितीही संकट आले तरी त्या संकटाच्या वादळात सुद्धा स्वतःचे पाय घट्ट रोवून उभे राहायचे..  जेव्हा वादळ जात तेव्हा उरत स्वतःच मजबूत झालेलं अस्तित्व.....

संकेतने मनाशीच विचार केला..आता घट्ट उभं रहायचं.. गळून नाही जायचं... स्वराप्रती असलेलं प्रेम पवित्र होतं ..त्याला आतल्या आत  कुठे तरी वाटायला लागले.. नक्कीच काही तरी मार्ग मिळेल..त्याला स्वराला मिळवायच होतं.. पण कोणताही चुकीचा मार्ग त्याला निवडायचा न्हवता... मनात खूप वेळा आलं त्याच्या  ,स्वराबरोबर पळून जाऊन लग्न करायचे... त्याला माहित होतं की  राक्षसी मन  सतत उकसवत आहे त्याला ,पण त्याने त्या विचारांवर सतत विजय  मिळवण्याचा प्रयत्न केला...स्वराला मिळवण्याचा निर्णय पक्का होता आणि योग्य मार्गाने मिळवने त्याचा निश्चय होता...  त्याने पूर्ण विश्वास ठेवला  स्वतःच्या अंतर्मनावर ..गर्भगळीत झालेला संकेत जणू सज्ज झाला त्याक्षणी...

न जाणे का??पण त्याला कॉलेजला जाण्याची ईच्छा झाली...बाईक घेतली आणि सरळ कॉलेजला गेला..
ह्याआधी मित्रांच्या टोळक्या बरोबर फिरणारा आज एकटाच फिरत होता ,मनाशीच हसत होता..

स्वरा जवळ न्हवती त्याक्षणी पण ती जवळ आसल्याचा  भास मात्र होत होता..असं वाटतं होतं, की आता येईल त्याला भेटायला ...त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या...कसं बरं हे मन,किती गुंतवले..एक अशी मुलगी जिला मी कधी ओळखत न्हवतो. तिचा माझा काही संबंध न्हवता.तिच्या आधीही आयुष्य जगत  होतो..

मित्रांच प्रेम पाहिल की, त्याला कितीवेळा असं वाटायचं ..असं कसं मित्र प्रेमात पडतात.?????.. अगदी तो चिडवायचा त्यांना.....तेव्हा मित्र त्याला बोलायचे ,तू जेव्हा पडशील ना खऱ्या प्रेमात तेव्हा कळेल प्रेम माणसाला वेडं करत.. स्वतःच अस्तित्व विसरायला भाग पाडते ते असते खरं प्रेम,स्वतापेक्षा जास्त ज्याचा प्रत्येकक्षणी विचार करावा वाटतो ,ते म्हणजे प्रेम.......
संकेतला आज आठवत होते,खरंच प्रेमाची शक्तीच वेगळी...ह्रदयच्या अनेक कप्प्यामधून निघणाऱ्या  भावनांचा कल्लोळ आज त्याला सांगत होता..संकेत तू खरं प्रेम केलंस..... तू वेडावला आहेस....

ज्या स्वरासाठी वेडावला होता  ,त्या स्वराला कधी एकदाचा जाऊन भेटतो ह्याच्या साठी आतुर झाला होता...तो नेहमीच्या ठिकाणी बसला.. जिथे स्वराबरोबर खूप सुंदर काळ व्यतीत केला होता... तीच लाजन, हसणं ,तीच बैचेन होणे, तिचा मधुर आवाज ,तिचे बोलके डोळे,तिचा निरागस चेहरा ..सर्वच आठवत होता आणि त्याला प्रतिसाद देत होती त्याच्या गालावरची खळी ..पुन्हा जावं मागे,कॉलेजच्या जीवनात... पुन्हा जगावं स्वरासोबत ते क्षण ..कोणाचं बंधन नसेल.. फक्त स्वरा आणि मी ..व्यक्त करता येईल प्रेम ,जे अव्यक्त होते... अव्यक्त राहिले होते, स्वराचा अपघात झाला नसता ,तर आता पर्यंत व्यक्त झालो असतो.. प्रेम व्यक्त 
करणं युध्दापेक्षा कमी न्हवतं, स्वरासमोर व्यक्त होण्याच्या विचाराने दडपणाखाली यायचा,हृदय धडधडायचं त्याचं.. पोटात गोळा यायचा. पण तरीही तो करणार होता  प्रेम ..खरं प्रेम.. व्यक्त त्यादिवशी,पण काळाने घात केला....अनपेक्षित घडलं अचानक.

त्याची नजर स्थिरावली एकाएकी ..काही तरी पाहिलं त्याने ,आणि एवढया वेळ स्वराच्या आठवणीत रमलेला  संकेत  हुंदके देऊन रडु लागला,काय झालं असे अचानक ???....का रडु लागला संकेत ??नक्की काय पाहिले त्याने???

पाहू पुढच्या भागात....

क्रमश .

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि नावासहितच शेअर करा...
मला फॉलो करायला विसरू नका....

🎭 Series Post

View all