नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग १२

True love always wins

मागच्या भागात आपण पाहिले की,स्वराचा अपघात होतो,संकेत तिला दवाखान्यात घेऊन येतो... त्याची स्वराच्या प्रती काळजी स्वराच्या आईला दिसून येते ..आता पाहू पुढे.......


संकेत निघून जातो... खरं तर तो वॉर्डच्या बाहेरच   उभा राहतो... स्वराच्या अगदी जवळ जरी उभं राहता येत नसले तरी तिच्या आसपास राहावंस वाटते...

इथे स्वराची आई स्वराला पाहून रडु लागते... स्वराही आईला रडताना पाहून स्वतः रडु लागते...

तोच तिचे वडील रागानेच बोलतात "बस करा तुमचा तमाशा,ह्या पोरीला काय नीट रोडवर बघून चालता नाही येत का????"...हे वाक्य संकेत ऐकतो,त्याला प्रचंड राग येतो..असं कसं बोलू  शकतात स्वराचे वडील,ती अगदी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली असते तिची काळजी तर दूर पण हे विचित्रपणे वागणं त्याला खटकतं... कारण त्याच्या घरात आईला ,त्याच्या बहिणीला अशी अजिबात कधी वागणूक, किंवा अश्या पद्धतीने बोललं जात नाही..संकेतला स्वराची दया येते..मला जर इतका राग येतो, तर स्वराला किती त्रास होत असावा??
ह्याची कल्पना त्याला अस्वस्थ करून जाते.. त्याक्षणी तो मनाशी  विचार पक्का  करतो ,लग्न करेल तर फक्त आज फक्त स्वराशी.तिचा भविष्य काळ फक्त आणि फक्त प्रेमाने भरला पाहिजे... संकेत घरी जातो...मुलाच्या शर्टावर रक्ताचे डाग पाहून संकेतची आई जोरात ओरडते.... तसा तो आईला मी ठीक आहे,माझ्या मैत्रिणींचा अपघात झाला ,तिला उचलून मी दवाखाण्यात जात असताना हे तिचे डाग पडले.. 

हे ऐकताच जीवात जीव येतो तिच्या ..त्याची आई त्याला अंघोळ करायला सांगते.. तो रूमवर जातो, अंगावरच शर्ट काढतो आणि तसेच घडी घालून ठेवतो, कारण त्यावर त्याच्या स्वराचे रक्त लागलेले असते, त्याच्यासाठी ते रक्त खूप मौल्यवान असते..
शॉवर खाली अंघोळ करतो, पण सतत त्याला स्वराचा उतरलेला चेहरा आठवत असतो.वरून तिच्या वडिलांच खोचटपणे बोलणे.स्वराच्या काळजीने वेडापिसा होतो तो...आज त्याला त्याच्या वडिलांचा अभिमान वाटतो.. कारण वडिलांनी कधीही त्याला अश्या पद्धतीने बोलले न्हवते.. उलट आईला नेहमी सन्मान दयायचे... नाशीबवान समजत होता स्वतःला अश्या घरात त्याचा जन्म झाला होता जिथे एकमेकांचा आदर केला जात होता,प्रेम दिलं जात होतं,भावनांचा आदर केला जात होता...त्याने कधीच पाहिलं न्हवतं वडिलांनी आईला किंवा बहिणीला ह्या पद्धतीने जोरात ओरडलेलं.. नेहमी हळू आवाजातच बोलायचे...
म्हणूनच संकेतसुद्धा तसाच होता, प्रेमळ...हळू आवाजात बोलणं, मदत करण्याची वृत्ती, सांभाळून घेण्याची वृत्ती... हेच संकेतचे गुण स्वराला आकर्षित करत होते.. कारण मुलगी म्हणून तिचे वडील तिच्याशी कधीच नीट बोलले नाही...कधी नीट वागले नाही...स्वराला मानसिक त्रास होत होता ह्या सर्व गोष्टींचा ,नेहमी दडपणाखाली असायची... कशातच लक्ष लागत न्हवते,पण संकेत आला आणि तिचं आयुष्य प्रेमाने भरले..खूप प्रेम दिले, काळजी घेतली... तिचा नेहमी सन्मान केला.... खरंच तीसुद्धा वेडावली संकेतसाठी....

संकेत त्या दिवशी खूप रडला,डोळे सुजले होते...सतत हाच विचार करत होता कसं बरं मुक्त करावं स्वराला ....काय करावे...

रात्री थोडंसच जेवला..त्याच्या आई वडिलांनी त्याचं बदललेलं वागणं पाहिलं...वडिलांनी विचारपूस केली,पण त्याने काही सांगितले नाही...रूमवर निघून गेला... सकाळी उठल्यावर ...लगेच तयार झाला आणि स्वराला भेटण्यासाठी निघाला... हॉस्पिटलला गेला,पण नंतर विचार केला,तिच्या वडिलांना नाही आवडणार... उगाच मझ्यामुळे पुन्हा काही तरी स्वराला बोलतील.. दिवसभर हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहिला....त्याने दिवसभर काही खाल्ले नाही..पाणी सुद्धा प्यायला नाही....कशी असेल स्वरा??तिला दुखत तर नसेल ना??हाच विचार करू लागला....येरझऱ्या मारत होता..कासावीस होऊ  लागला....
असं वाटत होतं त्याला  आताच्या आता जावं आणि स्वराला बिलगून खूप रडावं...पण शक्य न्हवतं... तिच्या बाबांचं रूप ,स्वभाव त्याने जवळून पाहिलं होतं.... हा विचार फक्त मनापर्यंतच मर्यादित राहणार होता... पहिल्यांदा हतबल झाला होता आयुष्यात... त्याला जे जे  हवे ते आई वडिलांनी त्याला दिलं होतं... पण स्वरा ,स्वरा त्याच्या आयुष्यात यावी त्याला वाटत होतं, पण ते सहज न्हवते... खरंच कठीण होते...

तोच ,स्वराच्या आईने संकेतला  खिडकीतून पाहिलं...आता तिला खात्री पटली होती,संकेत हा फक्त मित्र नाही तर नक्कीच स्वराचे सुंदर भविष्य आहे... तिने मनोमन विचार केला ,स्वराचं लग्न होईल तर फक्त तिच्यावर  खरं प्रेम  करणाऱ्या संकेतवर ....तेच योग्य आहे....

स्वराने जणू अर्धी लढाई जिंकली होती, तिलाच माहीत न्हवतं ,आईच्या डोक्यात काय चालू आहे...शेवटी आई ती आई ...ती मुलांचा चांगलाच विचार करते... स्वराच्या आईने मनोमन संकेतला स्वरासाठी निवडल होतं... स्वराच्या बाबांपुढे तिची नजर वर करण्याची हिंमत न्हवती होत... काय होईल पुढे... आई म्हणून ती स्वराला साथ देणार होती का बायकोचं नातं निभावण्यासाठी तिच्या बाबांच्या मनाप्रमाणे करणार होती?????

काय होते पुढच्या भागात पाहू

अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास मला फॉलो करा..
लेख लाईक, कंमेंट आणि नावासहित शेअर करा©®

🎭 Series Post

View all