नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग 10

True love

मागच्या भागात आपण पाहिले की,स्वराचे तोंडावर आलेल लग्न मोडले..तिलाही तेच हवे होते... आता पाहू पुढे...

तिने संकेतला फोन लावला..पण फोन लागला नाही...तिने त्याला मेसेज sent केला ,मला तुला भेटायचं आहे.. उद्या सकाळी दहा वाजता कॉलेजला ये....ती वाट बघत होती संकेत reply देईल..दोन दोन मिनिटाला ती फोन पाहत होती..पण काहीच reply नाही आला ...पहिल्यांदाच असे झाले होते.. नाही तर संकेत कधीच असा न्हवता करत.खरं तर त्याने मेसेज वाचला न्हवता... स्वराची उलघाल होत होती...काय करावे???तरीसुद्धा ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेली...

तिला वाटलं संकेत येईल...सतत कॉल करत होती ती पण त्याचा फोन स्वीच ऑफ होता .दिवसभर वाट पाहत होती... तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले..कधी एकदाच संकेतला सांगते आहे असे झाले...तशीच बसून राहिली... तिची नजर समोर असलेल्या सीटवर गेली...त्यावर कॉलेजच्या अनेक मुलांनी मुलींनी  प्रेमात पडल्यावर स्वतःची नाव कोरली होती...तिने निरखून पाहिलं तर त्यात एक नाव तिला चमकवून  गेलं ते होते संकेत लव स्वरा..   हा तिच्यासाठी सुखद धक्का होता.. खरंच ते नाव माझं आणि संकेतच आहे का..??किती तरी स्वरा आणि संकेत होते कॉलेज मध्ये ...न राहून ती उठली आणि जवळ जाऊन पाहू लागली तर तिला खात्री पटली कारण त्या नावाच्या शेवटी ,एक गोष्ट तिची ओळखीची वाटली ती म्हणजे  ते अक्षर .हो ते अक्षर स्वराच्या ओळखीचं होत.. ते संकेतचच होत...तिला  आता खरंच खात्री पटली होती, संकेत तिच्यावर प्रेम करतो..तिने हात फिरवला त्या अक्षरावर तर जणू तिला भास झाला जणू काही संकेत तिच्या पाठी उभा आहे.. मागे वळून तिने पाहिले तर कोणीही न्हवते.. तिचा बांध सुटला होता .पळत वॉशरूममध्ये गेली खुप रडु लागली.संकेतला हाक मारू लागली.. संकेत ये,एकदाच ये...i love you too.... please संकेत एकदाच ये.. मला तुला बघायचं आहे..तुला सांगायचं आहे की,मीसुद्धा तुझ्यावर खूप खूप प्रेम करते... ये ना संकेत....... तोच तिचा फोन वाजला ,तिला वाटलं घरून फोन आला आहे.. उशीर झाला होता म्हणून आईने केला असावा, फोन पाहते तर काय?? संकेतचा फोन ...ती खूप खुश झाली..लगेच फोन उचलला ,

स्वरा: संकेत कुठे आहेस तू??
मला भेटायचं आहे...

संकेत: स्वरा मी कॉलेजलाच येतो आहे, तुझा मेसेज आताच वाचला...तुझ्या मैत्रिणीने सांगितले तुझं लग्न मोडले.. आता तुझं स्वप्न पूर्ण होणार...मी खूप खुश आहे तुझ्यासाठी..मी लगेच येतोय..

स्वरा: हो ना संकेत ,लग्न मोडले ...माझ्या होणाऱ्या नवऱ्याने त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केले..टळलं रे लग्न ,मी खूप खुश आहे..बरं , बाकीचे भेटल्यावर बोलू... मला तुला काही तरी बोलायचं आहे ..मी वाट पाहते....लवकर ये....

संकेत:स्वरा मलाही तुला काही तरी बोलायचं आहे ,भेटल्यावर बोलू...

आता दोघांना एव्हान कल्पना आली की काय बोलणार होते एकमेकांशी...स्वरा आणि संकेतच हृदय जोरजोरात धडधड करू लागले....

स्वरा संकेतच्या  आठवणीत हरवली..गोड आठवणीत.. ती वेड्यासारखी वाट पाहू लागली..संकेतही स्वराला आता कसं बरं प्रपोस करावं ह्याचा विचार करू लागला . घाबरला होता तो....प्रेमाची कबुली द्यायची होती आज....त्याच्या पण गाली हास्य येत होतं.. देवाला आभार मानले.. स्वराच लग्न मोडले म्हणून .येता येता मंदिरात गेला..देवापुढे नतमस्तक झाला ..जणू  स्वराला प्रपोस करण्याचं बळ मागत होता..गहिवरून आले त्याला ,आज अश्रू अनावर झाले, कारण स्वराच लग्न ठरल्यापासून तो खूप डिप्रेशनमध्ये गेला होता...सतत रडत होता,किती दिवसाने त्याच्या चेहऱ्यावर हसू आले होते.संकेत  कॉजेला जायला निघाला..तोच त्याच्या लक्षात आले स्वरासाठी घेतलेली अंगठी विसरला.. पुन्हा घरी गेला अंगठी आणायला...

इथे स्वरा वाट पाहत बसली होती,सतत गेटवरच लक्ष होते, कधी येतोय संकेत आणि कधी पळत जाते त्याला भेटायला.. तिच्या हृदयाची धडधड सुरू होती,तिलासुद्धा भीती वाटत होती,पण तिचा निर्णय पक्का होता.. संकेतवर प्रेम करते हे सांगणार,पुढे काय होईल माहित नाही पण तेच तिला योग्य वाटत होते..संकेतवर प्रेम आहे आज सांगायचच होतं.. घड्याळाकडे पाहत होती सतत....तोच तीच लक्ष पुन्हा त्या सीटवर लिहिलेल्या नावावर गेलं..तिनेही बॅगमधून मार्कर काढला आणि बरोबर त्या नावाच्या खाली swara also love sanket  असे लिहिले... कोणी आपल्याला बघत नाही ना ह्याची तिने खात्री केली...पटकन मार्कर बॅगमध्ये ठेवला... आज तिने प्रेमाची कबुली दिली होती..संकेतच्या समोर कसं बोलायचं ह्याचं बळ जणू एकवटत होती..आज तो कॉलेजचा कॅम्पस प्रेममय झाला होता..ग्वाही देत होता जणू स्वरा आणि संकेतच्या खऱ्या प्रेमाची..

ती बाहेर आली ,वाट पाहू लागली ..ती अधीर झाली संकेतसाठी..दूरवर नजर फिरवत होती..संकेतला आवडते म्हणून तिने केडबरी घ्यायचा विचार केला...तोच रोड क्रॉस करणार ,तिचा तोल गेला तिच्या पायावरून  गुढघ्याच्या खाली रिक्षा गेली..डोक्यालाही जबर मार लागला...ती बेशुद्ध झाली..आजुबाजुची लोकं जमली.. तेवढ्यात संकेत आला ,गर्दी पाहून तोही काय झाले पाहू लागला..बघतो तर काय स्वराच... त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत न्हवता.. स्वरा बेशुद्ध झाली होती.. ज्या संकेतची आतुरतेने वाट पाहत होती ,तो आला होता आज प्रेमाची कबुली दयायला पण स्वरा बेशुद्ध झाली..त्याने  लगेच तिला उचलली आणि पळतच दवाखाण्यात घेऊन गेला..त्याने तिच्या मैत्रिणीला फोन करून स्वराचा अकॅसिडेंट झाला आहे हे तिच्या घरच्यांना कळवायला सांगितले....पाहू पुढे काय होते????

 

मला फॉलो करायला विसरू नका.
©®अश्विनी पाखरे ओगले... 

🎭 Series Post

View all