नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग १

Friendship

स्वरा खूप हुशार मुलगी होती, बारावीला छान मार्क्स होते, क्लास मध्ये टोपर होती.. बोलणं तीच फार आकर्षक होतं.. दिसायलाही खूप सुंदर.. मनमिळावू.. प्रत्येक मैत्रिणीला ती आपलस करायची,तेरावीला तिच्या आयुष्यात एक मैत्रीण आली सोनाली...सोनाली तिची छान गट्टी जमली..सोनालीचा स्वभाव फार विरुद्ध होता स्वराच्या... स्वरा माणसांची मन सांभाळून बोलायची तर सोनाली मागचा पुढचा विचार अजिबात करायची नाही.स्वरा मनापासून तिला स्वतःची मैत्रीण मानायची.. सर्व सुख दुःख सांगायची... सोनाली फार प्रेकटिकल विचार करणाऱ्या मधली होती आणि स्वरा खूप भावनिक.....

सहजच एका कॉलेजच्या मुलाशी  मैत्री झाली..संकेत नाव होते त्याचे..तो फारच छान होता..स्वरा घाबरायची मुलांशी बोलायला पण सोनाली तर बिंदास बोलायची... हळू हळू सोनालीमुळे संकेतशी ती बोलू लागली..वर्ष सरले... आता संकेत, सोनाली,आणि स्वरा छान फ्रेंड झाले..

संकेतचे वागणं स्वराला जरा वेगळं वाटू लागलं... तिला भीती वाटायची जेव्हाा संकेतला पहायची, कारण संकेत एकटक तिच्याकडे बघत राहायचा.. तिलाही आता त्याची ओढ लागली...कधी व्यक्त नाही केले...संकेत ,सोनाली जरी बाजूला बसली असेल तरी स्वराला शोधत बसायचा...सोनालीला हे अजिबात आवडायचं नाही...कारण सोनाली संकेतच्या प्रेमात पडली होती.. आणि संकेत स्वराच्या... खूपच प्रेम करू लागला...सोनालीला ह्या गोष्टीचा प्रचंड राग येऊ लागला...

स्वरा लांब राहण्याचा प्रयत्न करायची,पण संकेत मात्र तिला अजिबात एकटीला सोडत न्हवता... कॉलेजमध्ये velentine day होता.. एक दिवस आधीच संकेत तीला बोलला तुझ्यासाठी सरप्राईस आहे....स्वराला कळलं होतं काय सरप्राईस  आहे,म्हणून ती त्या दिवशी  कॉलेजलाच नाही गेली..संकेत ने फोन केला ..तू का नाही आली??तीने काही तरी बहाणा देऊन वेळ मारून नेहली....

तो फोनवर पुढे  काही बोलणार तोच तिने फोन ठेवला....तिच्या ह्रदयाची धडधड वाढली होती..तिला चांगला मित्र गमवायचा न्हवता.. जर आज संकेतने प्रपोस केले असते तर???हा प्रश्न मनाला विचारू लागली.....दुसऱ्या  दिवशी कॉलेजला गेली..तरी तिला भिती वाटतं होती की ,संकेत प्रोपोस करतोय की काय???पण नाही तसं काही नाही झालं..मुद्दामून त्याने तिला प्रश्न विचारला का नाही आली काल????त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती... ती आपली लाजली... गप्प बसली....

हे सर्व सोनालीच्या डोक्यात चाललं होतं.. काहीही करून तिला स्वरा आणि संकेतला लांब करायचे होते... म्हणून तिने मुद्दामून एक दिवस संकतेशी विनाकारण भांडण केले आणि स्वराला बोलली तुला माझ्याशी मैत्री ठेवायची आहे का संकेतशी???तिची द्विधा मनस्थिती झाली..कोणाला निवडावे??प्रेमाला की मैत्रीला????
सोनाली अधिपासूनची मैत्रिण होती, आणि संकेत आताच आयुष्यात आला होता... स्वराला खरं तर दोघे हवे होते... सोनाली आणि संकेत..संकेतच्या येण्याने आयुष्यात खूप खुश होती... कोणी तरी आपल्यावर प्रेम करते आहे ही भावना खुप प्रिय असते..ते सुंदर क्षण जगत होती..तिला गमवायचे न्हवते ..नात्यांचा आदर करणारी होती ती..तिला सोनालीचा कट लक्षात आला नाही..तिने निवडली मैत्री...सोनालीने संकेतला झिडकी दिली आणि बोलली ह्यापुढे स्वरा तुझ्याशी कधीच  बोलणार नाही...

सोनाली खूप चुकीचं वागली होती...स्वराच्या निरागस मनाला तिची चतुराई  लक्षात नाही आली,तिचा कपट लक्षात नाही आला....काय झाले पुढे पाहू पुढच्या भागात...

🎭 Series Post

View all