नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलिकडे भाग २४

Its about true love

स्वराचे बाबा स्वराचे लग्न जमवत होते तरी पण काही केल्या  लग्न जमत न्हवते ,चांगली चांगली स्थळ निघून जात होती....

तिच्या बाबांनी अचानक निर्णय घेतला,दुसऱ्या शहरात स्थलांतर करायचा... ह्या निर्णय त्यांनी स्वराच्या आईला आणि स्वराला सांगीतला..उद्याच्या उद्या आपण शिफ्ट होत आहोत... 

खरं तर हे घर फार छानच होते... चांगली भरभराट झाली होती. स्वराच्या पणजोबांनी घर घेतले होते.वेगळीच नाळ जोडली होती त्या घराशी..स्वराच्या आईची आणि स्वराची पण इच्छा होत न्हवती घर सोडून जाण्याची, पण काही पर्याय न्हवता..वडील बोलतील ती पुर्व दिशा.....

स्वराच्या आईने बांधाबांध सुरू केली.स्वराचे वडील उभे होते,तोच त्यांच्या नजरेस एक पत्र पडलेले दिसले..ते त्यांनी पाहिले ...स्वराचंच अक्षर होते..... हे तेच पत्र होते जे तिने लग्नाच्या दोन दिवसआधी लिहिले होते... संकेतसाठी ..त्याच्या अनेक आठवणी... ते पत्र तिच्या बाबांनी वाचले... त्यांचे डोळे रागाने लालबुंद  झाले त्यांना प्रचंड राग आला....स्वरावर हात उचलणार तोच तिची आई मध्ये आली .....तिच्या आईला बडबड करू लागले...

"एक तर पोरींना जन्माला घातलं ते घातलं आणि त्याही अश्या ......एक गेली पळून आणि हीसुद्धा त्याच मार्गावर..... जरा वळण लावायचं होतंस... बघ ह्या पोरींमुळे मान वर करून चालायची लाज वाटते..समाजात काहीच मान नाही..जिथे जावं तिथे लोक हसतात मला...तू पण तशी आणि तुझ्या पोरीही ...

हे ऐकताच 

न जाणे आज स्वराच्या आईला काय झाले.. आज तिची सहनशक्ती संपली ,ती उत्तरली..आवाज वाढवला तिनेही....ज्या नवऱ्याला बघून ती थरथर कापत होती आज चक्क तिने डरकाळी फोडली.....

ओरडून बोलू लागली.....काय बोललास ?????


आवो जावो करणारी बायको चक्क अरे तूूूरे  बोलू लागली...

हे ऐकताच स्वराचे वडील चक्रावले.. हिच्यात एवढी हिम्मत आली कशी.. मला आवाज चढवुन बोलते.... त्यांनी सरळ काठी हातात घेतली आणि तिच्या डोक्यात घालायला जाणार तोच स्वरामध्ये आली .....दोघींनी मिळून प्रतिकार केला....आज माय लेकी ऐकून न्हवत्या घेणार......

स्वराचा बाबा पुन्हा तिच्या अंगावर धावून गेला...स्वराच्या आईने आज चंडिकेचे रूप घेतले... तो जसा जवळ आला तसं ही जोरात ओरडली " खबरदार अंगावर आलास तर,अंगाला हात लावलास तर ,तुझी बोटं चेचून काढीन,...हे ऐकून स्वराचा बाबा जागीच थांबला ....एवढ्या दिवस असणारी गरीब गाय ,आज अशी कशी बोलू लागली...स्वरा सुद्धा चाट पडली आईचं हे रूप पाहून.......ही तीच आई होती, जी नेहमी बोलायची जाऊ दे  स्वरा बाबा आहे,आपण बाई माणसाने सहन केलंच पाहिजे, तरच संसार टिकतो...गडी माणूस बाईला काही बोलला तरी चालेल, पण बाईचा आवाज चार भिंतीच्या पलीकडे अजिबात जाता कामा नये...घरची इज्जत घरच्या बाईच्या हातात असते..... मग आज काय झालं आईला..पण स्वरा मनोमन सुखावली... आई आज एवढ्या वर्षाची भडास काढत होती.....

स्वराचा बाबा तिला घाबरला  ,हे रूप कधीच पाहिलं न्हवतं... कुठून आली हिच्यात शक्ती... त्याने स्वतःला सावरलं....ए वेडी झालीस का???डोकं ठिकाणावर आहे ना तुझं???कोणाशी बोलतेय कळतंय का तुला????

स्वराची आई : हो,मला माहित आहे मी अश्या माणसाशी बोलत आहे ज्याने बायकोला कधी बायकोचा दर्जा दिला नाही....ज्या माणसाला बायको म्हणजे काम करणारी मशीन वाटते .. ज्या माणसाला मुली नको होत्या ,वंशाला दिवा हवा होता.. ज्या माणसाला संसारातला "स" माहीत नाही..ज्या माणसाने बाप म्हणून पोरींना कधी जवळ घेतले नाही..विश्वास ठेवला नाही....फक्त आणि फक्त स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवले...स्वार्थ पाहिला..माझे आई वडील गेले तरी मला शेवटचं त्यांना पाहू दिलं नाही..माझ्यावर सतत अन्याय करत राहिला.. आतासुद्धा स्वतःच्या  अहंकारपायी माझ्या मुलीला आलेलं संकेतसारखं स्थळ नाकारतो आहे..मी अश्या माणसासोबत राहिली जो माझ्याशी कधीच माणुसकीने वागला नाही...मीच आपली संसाराचा गाडा एकटी हाकत  आले...उगाच एकटीने आयुष्य कसं काढणार ह्या भीतीपोटी आयुष्यभर तुझा अन्याय सहन करत राहिले....मला तर कधी बायको म्हणून प्रेम तर नाहीच दिले पण पोरींना सुद्धा कधी जवळ केलं नाही...मग कसं वाटणार तुझ्याविषयी प्रेम सांग???

वाचलं होतं मी स्वराच पत्र खूप आधीच वाचलं होतं.....

हे ऐकताच स्वरा आई कडे अचंभीत होऊन पाहू लागली....

हो स्वरा...वाचलं होतं मी पत्र.... तुझं पत्र वाचून कळलं की ,नक्की प्रेम काय असते, संकेत किती चांगला मुलगा आहे हे तेव्हाच मला कळलं..जो माझ्या मुलीला इतका जपतो तो नक्कीच तिचा योग्य जोडीदार आहे हे तेव्हाच पटलं होतं... संकेतवर प्रेम असूनसुद्धा तू   आमच्यासाठी नको असलेल्या  लग्नाला तयार झाली....माझ्या संस्कारात नक्कीच कमी पडली नाही...आमच्या प्रेमापोटी ,आमच्या इज्जतीची नेहमीच काळजी घेतलीस ...

 तुझ्या बाबाने मला आयुष्यभर तुच्छ वागणूक दिली....कधीच प्रेम दिले नाही ...आणि जर तुला जर तुझं खरं प्रेम मिळत असेल तर त्यात मी तुझा साथ देणार..माझं सुंदर संसार करायचं स्वप्न होतं... राहून गेलं..एकतर्फी नातं निभवत होते,समाजात अब्रू नको जायला म्हणून तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करत होते.मानसिक रुग्ण झाले आहे मी आणि आता तुझीही हीच गत होत आहे पण आता नाही गप्प बसणार ......मी अन्याय सहन केला, तुझयाबरोबर नाही अन्याय होऊ देणार.


स्वराच्या बाबाला पाहून बोलू लागली 
 ..खूप मोठी चूक होती माझी ,जे मी तुझ्याबरोबर आयुष्य काढले....वाया घालवलं आयुष्य ,तुझ्यासारख्या पाषाण हृदयी  माणसासोबत .....बस आता नाही.......खूप झालं,अती झालं तुझं...


स्वराचे बाबा: मग काय करणार आहेस..सोडून जाणार आहेस का??
(हसत)..कोणी नाही तुला..कोणाकडे जाणार..माझ्याशिवाय कोणीही नाही तुझं...कोणी नाही विचारनार....

आई: माझं कोणी नाही म्हणून एवढ्या दिवस अत्याचार करत होतास ना??पण मला कोणाची गरज नाही ...मीच आहे माझं सर्वस्व.. तुझा भ्रम आहे तो ,मी जगू शकते आयुष्य...तुझ्याशिवाय सुद्धा जगू शकते....आणि आता तोडलं आहे बंधन "लोक काय म्हणतील " मी जगेल .....जगून दाखवेन .....

स्वराचे बाबा: चार दिवस एकटी राहा,बघ बाहेरच जग कसं आहे...

स्वराची आई: तुझ्यापेक्षा बाहेरच जग बरं... तू काय दिलंस एकनिष्ठ राहून..नेहमी अपमानास्पद वागणूक दिली मला आणि माझ्या पोरींना...तुझा तोरा आता तुझ्याकडे ठेव... मी चालली माझ्या पोरीला घेऊन ....


तिने स्वराचा हात पकडला आणि घराच्या बाहेर निघून गेली....स्वराचा बाबा फक्त पाहत होता तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ...स्वप्न वाटत होते त्याला पण हेच सत्य होते, सोडून गेली होती बायको आणि मुलगी ...आज माया लेकी बंधनमुक्त झाल्या होत्या..आता कसलीही भीती न्हवती ..आता मुक्त विहार करू शकत होत्या दोघी,मोकळ्या आकाशात ..आज जाचातून मुक्त झाल्या होत्या..स्वतंत्र झाल्या होत्या...

काय होते पुढे??पाहू पुढच्या भागात.....

अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक, कंमेंट आणि  नावासहित शेअर करा.मला नक्की फॉलो करा..

🎭 Series Post

View all