Jan 19, 2022
नारीवादी

नातं बरोबरीचे (भाग-१)

Read Later
नातं बरोबरीचे (भाग-१)

नातं (बरोबरीचे) भाग - १

अभिज्ञा राजे...!! या नावातच बरच काही आहे. आई बाबांना एकुलती एक, लाडाची आपली अभिज्ञा. घरची श्रीमंत, पण तिला त्याचा अजिबात गर्व नव्हता, आणि स्वभावाने बोलकी असल्यामुळे तिचा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता... अभिज्ञा ने इंटेरियर डिझायनिंग मध्ये पदवी प्राप्त केलेली, तिला घर डेकोरेट करायला खूप आवडायचं, म्हणून तिने त्यातच करिअर बनवायचे ठरविले, आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन पदवी मिळविली. आणि स्वतः ची कंपनी स्थापित केली. तिच्या क्षमतेमुळे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट तिला मिळत गेले आणि आज इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात तिचे आणि तिच्या कंपनीचे खूप मोठे नाव झाले..

एका महत्त्वाच्या मीटिंग मध्ये सिद्धार्थ रॉय सोबत अभिज्ञा ची ओळख झाली.. कामानिमित्त एकमेकांशी रोजच संवाद होत होता.. मीटिंग कधी ऑफिस मध्ये तर कधी कॉफी शॉप मध्ये, अशाप्रकारे दोघं ही एकमेकांना ओळखू लागले.. खाजगी आयुष्याबाबतीत पण सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करू लागले.. अशातच त्यांच्यात मैत्री झाली..

आणि काही महिन्याने त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले.. एके दिवशी सिद्धार्थ ने ठरवले की अभिज्ञा ला आपण आपल्या मनातलं सगळ सांगायचं.. आणि त्याने तिच्यासाठी डिनर डेट ची तैयारी केली, आणि तिला फोन करून बोलावले, तिच्या साठी सगळ सरप्राइज होत. काही वेळ गप्पात झाल्या, आणि  त्याने तिला एकाच वाक्यात विचारले, "अभिज्ञा, will you marry me.??" अभिज्ञा थोडावेळ घेत त्याला म्हणाली, "इतकं सगळ करायची काय गरज होती सिद्धार्थ? मी तसे पण तुझ्या प्रेमात तेव्हाच पडले जेव्हा तुला मी हळूहळू ओळखू लागले होते." तुझ प्रत्येक कामात नीटनेटकेपणा मला खूप आवडायचा., त्यावर सिद्धार्थ उत्तरला, "हट तेरेकी!! एवढी मेहनत वाया गेली माझी" काय यार तु पण, इतकी सगळी तयारी केली आणि साध तु कौतुक पण केल नाही.?
अभिज्ञा म्हणली, अस तर तुला तुझं कौतुक पण ऐकायचं आहे? कशाला तुझं कौतुक करायचं मी, हे सगळ मला इंप्रेस करायला च केलं होत ना, मग त्यात काय एवढं.! सगळेच मूल अस करतात, तिने डोळा मारत त्याला चिडवल आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, खूप छान डेकोरेट केलं रे, खूप आवडलं मला, अलगद त्याच्या मिठीत स्वतः ला सामावून घेतले आणि त्याला "I Love You" म्हणाली. दोघांनी मस्त गप्पा करत करत जेवण केले, आणि आपल्या स्वतः च्या लग्नाची प्लॅनिंग सुद्धा केली..

सिद्धार्थ घरचा एकुलता एक, लाडात वाढलेला, आई अवंतिका साठी तर तो हिरा होता तिचा, सिद्धार्थ ची आई थोडी गर्विष्ठ होती, तिला तिच्या श्रीमंतीचा गर्व होता..  आणि सिद्धार्थ च्या बाबतीत तर खूपच पॅझेसिव होती .. त्याने घरी सांगितलं, तर घरून सुद्धा होकार मिळाला. आता वेळ होती तु मुहूर्त काढायची, एकदाचा मुहूर्त मिळाला की दोघेही लग्नबंधनात अडकणार होते...

एकदाचा मुहूर्त निघाला,  दोन महिन्यानंतर चा होता पण तैयारी साठी वेळ मिळाला म्हणून दोघेही आनंदात होते.. साक्षगंध दहा दिवसाने करायचं ठरल, सगळी खरेदी झाली, दोन दिवसावर साक्षगंध आल आणि त्यातच अभिज्ञा ची एक कॅनडा मध्ये मीटिंग आली त्याच दिवशीची, तिने तिच्या सासू ला सांगितलं की माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, गेली नाही तर खूप नुकसान होईल, तर आपण हे साक्षगंध दोन - तीन दिवस समोर postpone करूया का?? अवांतिकाने तिला सरळ नाही म्हटल आणि खडसावून सांगितलं की ते शक्य नाही, तु तुझी मीटिंग समोर ढकल हवी तर, एवढं काय महत्वाचं काम आहे? तिला वाईट वाटल की आपल्या कामाला इथे काहीच महत्व नाही, सिद्धार्थ च काम काम आणि माझं काम काहीच नाही.. तिच्या बिसनेस च खूप नुकसान झालं, पण त्याच्याशी सिद्धार्थ ला काहीच घेणं देणं नव्हत.. तो म्हणाला होईल सगळ ठीक.

काही दिवसांवर लग्न आल, लग्नाला दहा दिवस होते, त्याच वेळी सिद्धार्थ ची एक महत्त्वाची मीटिंग आली, त्याच्या आईने म्हणजेच अवंतिकाने सिद्धार्थ ला म्हटले की मीटिंग महत्वाची आहे, आपण लग्न पोस्ट पोर्न करूया. तु मीटिंग संपवून ये मग पुन्हा  तारीख काढुया. आणि अभिज्ञा ला घरी बोलावून अशा पद्धतीने सांगण्यात आल की लग्न फक्त सिद्धार्थ च च होत तीच नाही. तिला कळून चुकल की आपली इथे किंमत नाही, आणि सिद्धार्थ त्याच्या मॉम पुढे काहीही बोलू शकत नाही..
तिने तेव्हाच ठरवलं की जो पर्यंत सिद्धार्थ ला या गोष्टी समजत नाही, त्याला त्याची चूक कळणार नाही तो पर्यंत मी या नात्यात पुढे जाऊ शकणार नाही... आणि अवंतिका ला तिने आपल उत्तर कळविल. सिद्धार्थला न सांगता ती काही दिवसांसाठी कामाने दिल्ली ला निघून गेली.

काही दिवसाने सिद्धार्थ भारतात परतला आणि त्याला अवंतिका ने सांगितलं की तु तुझ्या साठी चुकीची मुलगी निवडली होतीस, तिने या लग्नाला नकार दिलाय, तिने मला स्पष्ट सांगितले.. सिद्धार्थ न बोलता स्वतः च्या खोलीत गेला, त्याला ठाऊक होते की अभिज्ञा अस करणार नाही, कारण काही तरी वेगळेच आहे, आपल्याला तिच्याशी बोलायला हवं...

आता पुढे काय होणार हे बघुया पुढच्या भागात...

पुढील भाग लवकर येईल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Snehal Malokar

Fashion designer

I'm Snehal. I like to read intersting Stories, intersting books. I love to design dress..