Jan 19, 2022
नारीवादी

नातं बरोबरीचे (अंतिम भाग)

Read Later
नातं बरोबरीचे (अंतिम भाग)

नातं (बरोबरीचे) शेवटचा भाग

मागील भागात आपण बघितले की अभिज्ञा ने सिद्धार्थ ला चूक कळावी म्हणून लग्नाला नकार दिला. आता सिद्धार्थ परत आलाय, आता बघुया तो अभिज्ञा ला समजून घेतो अथवा नाही.

सिद्धार्थ अभिज्ञा च्या घरी जातो, तेव्हा त्याला कळते की ती दिल्ली ला गेलीय कामानिमित्त, आणि ती उद्या वापस येणार आहे. सिद्धार्थ ला तिच्याशी बोलायचं असत पण ती त्याचा साधा फोन पण उचलत नाही. त्यामुळे तो थोडा चिंतेत असतो, तसा च घरी येतो. आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन बेड वर पडून विचार करत बसतो. तेवढ्यात त्याची आई खोलीत येते आणि त्याला विचारते, सिद्धार्थ काय झालंय? कसला एवढा विचार करतोय?
सिद्धार्थ: काही नाही, अभिज्ञा बद्दल विचार करतोय की काय चुकल माझं की तिने एवढा मोठा निर्णय घेतला तो ही मला न सांगता?
अवंतिका: पण का एवढा विचार करतोय?
सिद्धार्थ: मॉम, मी अभिज्ञा ला गेले दोन वर्षांपासून ओळखतो ती कधीच शुल्लक कारणावरून असा निर्णय घेणार नाही, मला माहिती आहे माझ्या कडूनच काहीतरी चूक झालीय. त्यामुळे मला जावंच लागेल त्याशिवाय ती येणार नाही. आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
अवंतिका: ठीक आहे, ती आल्यावर बोल, आता चल जेवून घे..
सिद्धार्थ: मी येतो तु जा..

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा येणार असते म्हणून सिद्धार्थ आधीच तिच्या घरी जातो, काही वेळाने अभिज्ञा येते, सिद्धार्थ ला बघून सरळ आपल्या खोलीकडे जाते, थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आल्यावर सिद्धार्थ ला विचारते, तु काय करतोय इकडे?.
सिद्धार्थ: हा काय वेडेपणा आहे अभिज्ञा, लग्न मध्येच सोडून का गेली तु??
अभिज्ञा: काय??? डोक ठिकाणावर आहे का तुझं?? मी सोडून आलेय लग्न मध्येच? की तु गेला मला न सांगता मध्येच लग्न सोडून??
सिद्धार्थ: अरे यार!  महत्त्वाची मीटिंग होती, तुला तर माहितीये ना, मला बिसनेस मध्ये हलगर्जीपणा नाही चालत, सगळ वेळेच्या वेळेवर पूर्ण करायचं असत, आणि हे तर खूप मोठं टेंडर होत, दुसऱ्या कोणाला पाठवून नसत चाललं आणि मॉम तुला सांगणार होतीच म्हणून मी गेलो.
अभिज्ञा: ओहह! तुझा बिसनेस म्हणजे तुझं स्वप्न  नाही का? आणि माझं काय? माझी मीटिंग होती तेव्हा ते महत्वाचं नव्हत ना.. आणि लग्न काय फक्त तुझच होत म्हणून तुझ्या मॉम ने पुढे ढकलल,  नाही का?
सिद्धार्थ: काय बोलतेय तु? काय झालय एवढ?
अभिज्ञा: तुला सगळ माहितीये सिद्धार्थ, या आधी पण मी खूप वेळा तुला याची जाणीव करून दिलीय, की तुझ्या मॉम ना माझ्यापासून काहीतरी प्रोब्लेम आहे? तुझ्या समोर त्यांना काहीच दिसत नाही, तु साधी एक मीटिंग करून आलास तरी दिवसभर मला फोनवर तुझे ते गोडवे ऐकावे लागतात, जसं काही खूप मोठं पहाड तु फोडून आणले, आणि मी एखादी मोठी डील जरी मिळविली तरी सगळे असे रिअँक्शन देतात जसे ते खूप काही मोठं नव्हत... माझ्या साठी सुद्धा माझं काम तेवढंच महत्वाचं आहे जेवढा तु आहेस, You know Siddharth, मला असे वाटायला लागले की या नात्यात फक्त मीच आहे, तु कुठेच नाही? आणि मला एकटीला च या नात्यात पुढे राहायचं आहे.. म्हणून मी हा निर्णय घेतला..
सिद्धार्थ: तु मला एकदा सांगायचं तरी? "I respect Whatever you have earned in life, I am really proud of you, I did not express this but I believe this."
अभिज्ञा: हे सगळ तु मला सांगतोय, एकदा तरी तुझ्या मॉम ना सांगितलं का?? त्यांनी मला कधीच समजून घेतले नाही, माझी आणि माझ्या कामाची तिथे काहीच किंमत नाही.. तूच सांग काय कमी आहे माझ्यात? मी एवढे शिक्षण घेतले ते फक्त एक गृहिणी बनून राहायला? माझा स्वतः चा बिसनेस आहे, माझे पण माझ्या आयुष्यात काही स्वप्न आहेत....  हो..! मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत आयुष्य जगायचे आहे पण मला माझ्या स्वप्नांना पण प्राधान्य द्यायचं आहे, मला तुझ्यासोबत जग बघायचं आहे तुझ्याशिवाय नाही..! माझं पूर्ण जग तुझ्या अवतीभोवती फिरत पण त्यात मीच कुठे नसते, फक्त तूच असतो...त्यामुळेच मला असा निर्णय घ्यावा लागला... sorry but I had no other choice.

तेवढ्यात अवंतिका तिथे येते आणि अभिज्ञा ला म्हणते, आयुष्यात नेहमीच पर्याय असतात. सगळे तिच्या कडे बघतात.
अभिज्ञा जीवनात नेहमी दोन पर्याय असतात जवाबदारी आणि स्वातंत्र्य, आपण दोघांपैकी नेहमी एक निवडू शकतो, एका सुनेची जवाबदारी असते की ती नेहमी आपल्या कुटुंबाला आपल्या स्वप्ना पेक्षा आधी ठेवेल, जर तिची इच्छा असेल तर, पण तू स्वतः च स्वातंत्र्य निवडले. निवडण्यात चूक तुझी नाही आमची झालीय, तुला आम्ही सून करून घ्यायला तय्यार झालोत.
सिद्धार्थ: मॉम प्लीज एक वेळा तिला समजून घे, तीच ऐक तरी., तिच्या कडे कारण आहेत त्याचे..
अवंतिका: हो सिद्धार्थ, मी ऐकतच आहे, पण तुला एक सांगू, I done my MBA from London and I had a career, no one ask me what will I do? I also had dreams. मला पण खूप वाईट वाटले होते जेव्हा मी माझे करिअर सोडले, पण मी तुझ्यासारखे पळून गेले नाही अभिज्ञा, मला कळले होते की गृहिणी बनून राहणे पण सोपे नाही, त्यात पण खूप कासोट्यांना समोर जावे लागते, घर सांभाळणे हा सुद्धा एक मोठा जॉब आहे.. मग काही वर्षाने सिद्धार्थ तु आला, तुझ्या आवतिभोवती च माझे जग फिरू लागले, तु मोठा झाला, आपल शिक्षण पूर्ण करून तु तुझ्या पप्पांचा बिजनेस जॉईन केला, काही दिवसाने अभिज्ञा तुझ्या आयुष्यात आली, पण मग मी का तिच्यासाठी तुझ्या स्वप्नाचा आणि तुझा त्याग करू? ते ही एका सूने साठी? आणि मला काय मिळालं या सगळ्यात?? हो मला सूनेसोबत एक छान आयुष्य बनवायचे आहे पण माझ्या अटींवर!!!!
त्याचवेळी तिथे अभिज्ञा ची आजी त्यांच्या रूम मधून बाहेर येते, आणि अवंतिका ला विचारते, अवंतिका तु हे जे केलस ते बरोबर आहे अस तुला वाटतयं का??
अवंतिका: "Maybe not, but this is happening since ages, always women have to sacrifice, everyone knows it's wrong, but this happens, we have to leave our dreams, career, everything....!"

आजी: अग पण आता काळ बदलला आहे. आता लग्न म्हणजे आधी सारखं फक्त मुलांना सांभाळणं आणि घर सांभाळणं नव्हे. आता मुली सुद्धा मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत. आता आधी सारखं काहीही राहिलं नाही. लग्न झाल्यावर पहले सारखं सगळ बायको नेच केलं पाहिजे असं नाही, आता दोघं ही एकमेकांच्या सहवासाने घर सांभाळताना पाहायला मिळतात. दोघं मिळून एकत्र संसार सांभाळतात, कामं वाटून घेतात, दोघांचे पण स्वतः चे काही स्वप्न आहेत, ते पूर्ण करण्यासाठी एकमेकांना समजून सांभाळून घेतात.
अभिज्ञा: मला सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबासोबत हीच समानता पाहिजे.

सिद्धार्थ: अभिज्ञा, "whenever I said I am proud of you, I always meant, I started respecting you." तु मला खूप महत्त्वाच्या विषयाची जाणीव करून दिली, आपण एक आहोत तर आपले अधिकार आणि जवाबदारी पण सामान असायला हवी.. आणि तिचा हात पकडुन तिला प्रॉमिस करतो की यापुढे तुला अशी तक्रार करावी लागणार नाही.. यापुढे तु जर पळाली ना मला सोडून तर मी पण तुझ्या सोबत पळेल. सगळेच हसतात. (पण अवंतिका सोडून....)

आजी: अवंतिका, वेळ बदलत चालली आहे, नात्यांचे अर्थ बदलत आहेत, आता आपल्याला पण बदलायला हवं. "जुना तो नसतो जो त्या काळात जन्मलेला आहे, जुना तो आहे जो अजून ही तिथेच अडकला आहे." तु तर शिकलेली आहे, तु या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

अवंतिका: हो आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. मला वाटत होत जस आयुष्य मी जगत आलेय तसच आयुष्य माझ्या सुनेने पण जगावं., पण नाही आता काळ बदलला आहे. मी पूर्ण प्रयत्न करेल जेवढा आदर मी सिद्धार्थ च्या स्वप्नाचा करते तेवढा तुझ्या स्वप्नाचा पण करेल. मला क्षमा कर अभिज्ञा. तिला जवळ घेत अवंतिका तिला आलिंगन देते.
अभिज्ञा: I'm sorry aunty... मी बोलायला हवं होत सगळ आधीच..

अवंतिका: आंटी नाही मॉम म्हण.!!! आणि सगळे अगदी आनंदात सहभागी होत पुढच्या कामाला लागतात.....

समाप्त

अभिज्ञा ने स्वतः च्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.. आणि आपल्याला सांगितले की लग्न झाल्यावर अधिकार आणि जवाबदारी ही दोघांची असते, घर फक्त एकटीने च नाही तर दोघांच्या मदतीने सांभाळायचे असते.. त्यालाच सुखाचा संसार अस म्हणू..

ही एक कथा आहे, वाचकांनी मनोरंजन म्हणूनच वाचावी... ही विनंती..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Snehal Malokar

Fashion designer

I'm Snehal. I like to read intersting Stories, intersting books. I love to design dress..