पंच्याहत्तर लाख व्ह्यूज मिळवणाऱ्या ईराच्या "नाम तो सुना ही हो गा!” फेम लेखिका म्हणजे सारिका कंदलगावर यांचे खूप खूप अभिनंदन
बॉसच्या म्हणण्याप्रमाणे लोकांच्या शरीरात रक्त वाहते पण यांच्या अंगात कथा वाहतात. खरेतरे हे शब्द सारिका मॅडमांना तंतोतंत लागू होतात..
सुपरफास्ट गाडीच्या स्पीडने कुठे ही न थांबता थेट यांच्या गाडी ईरा प्लॅटफॉर्म वर कथा पोस्ट झाल्यावरच थांबते. आता शरीरातच कथा वाहताय म्हटल्यावर त्या बाहेर येणारच त्यामागे त्यांनी हे कौशल्य सातत्याने चालू ठेवलं आहे.. *"ती आणि “ती"* पासून तर " *ही अनोखी गाठ कोणी बांधली.*" पर्यंतच प्रवास न थांबता त्यांनी पूर्ण करत सोबत इतर ही कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांच्या कथा जसे मनावर ताबा मिळवतात तसेच त्याचं आदर्श व्यक्तिमत्त्व ही मनावर छाप पाडणारे आहे..
जेव्हा एक स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुढे जाते तेव्हा मला कायमच त्यांचा अभिमान वाटतो.. अशाच प्रभितावंत, हुशार , चतुरस्त्र, दमदार, वजनदार नाही नाही सॉरी बरं का ! अफाट कल्पना शक्तीच्या धनी असलेल्या... समस्त सासु सूना वर्गाच्या कनवाळू असलेल्या आमच्या सारिका मॅडम यांचा मला खूप अभिमान वाटतो.. संसारिक जबाबदारी पार पाडून अध्यापन क्षेत्रात आणि साहित्यिक क्षेत्रात ही जेव्हा उत्कृष्ट पणे कार्य करत असते तेव्हा त्या स्त्री शक्तीला सलाम करावाचा वाटतो. लेखकांच्या आणि वाचकांच्या मनातील भावना, व्यथा कथेच्या स्वरूपात निर्मिती झाली. त्यांना प्रकाशित करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं “संजना सरोज इंगळे (CEO Ira Blogging )” यांनी त्या हि एक स्त्री शक्तीच उत्तम उदाहरण आहेत त्याच्यामुळेच हे शक्य होत आहे. आधी तर तुम्हाला खूप मोठ्ठंवाला ‘थॅक्य यू’
सारिका कंदलगावकर यांनी आज पंच्याहत्तर लाखा वाचकांचा टप्पा पार केला आहे. अहो ही तर सुरवात आहे आणखी करोंडाचा टप्पा पार करायचा आहे. ही संख्या अजून वाढत जावो. आता अजिबात थांबायच नाही. ‘जादू तेरी नजर जस शाहरूख खान म्हणत असतो तसच जादू तेरी कथा वाचकवर्ग हो गये इन पे फिदा..’ अस तर यांच्या लिखाणावर सर्वच फिदा झाले आहे. तशी मी ही... जादू तर असते त्यांच्या कथेत आणि ह्या शब्दांच्या जादूची सफर करायला सर्व वाचकवर्गाला खूप आवडते. या दुनियेत होतो देवांचा चमत्कार, कधी सत्याचा साक्षात्कार होतो तर मध्येच मंत्र म्हणू का? करत “ओम भट स्वाहा !” म्हटलं की भितीने अगांवर शहारे आल्याशिवाय राहात नाही म्हणून मी त्या वाड्यात जात नाही आणि गेली तर अक्षताच्या माळा घेऊन जाते. त्यांच्या कथेचे प्रसंग वर्णन प्रत्यक्षात बघत असेच वाटतात. त्यांच्या कथा इतक्या आहेत की त्याचं नाव लिहता लिहता माझी बोटे दुखू लागतील पण त्यांच्या साहित्यांची नाव संपणार नाहीत. अफाट वाचन त्यासोबत प्रभावी लेखन वाचकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे आणि त्याचीच ही पोचपावती आहे आणि ती हि तुम्हाला वेळोवेळी प्रतिक्रिया तून वाचक देत आहे . तुम्हाला पुढिल वाटचाली साठी खूप खूप आभाळ भरून शुभेच्छा मॅम… यशाची शिखरे असेच चढत राहा.
“सारिका मॅडम तुम आगे बढो
हम आपके साथ है।”
हम आपके साथ है।”
खरंतर तुम्हाला थॅक्य यू म्हणायला हवं तुम्ही वैविध्यपूर्ण कथासंग्रह आमच्यासाठी घेऊन आलात. मी ही तुमच्याकडून खुप शिकत आहे.. नेहमीच मला तुमचे खूप कौतुक वाटते.. तुमचा प्रवास माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे. असचे मला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळत राहो.
आणखी काय बोलू मी .. माहिती आहे मला न बोललेलं आणि लिहलेलं समजून घ्याल तुम्ही.
Thank you ...
इथेच मी माझे दोन तीन शब्द संपवते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
जय भारत !
©® धनदिया सम्राट
आणखी काय बोलू मी .. माहिती आहे मला न बोललेलं आणि लिहलेलं समजून घ्याल तुम्ही.
Thank you ...
इथेच मी माझे दोन तीन शब्द संपवते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
जय भारत !
©® धनदिया सम्राट
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा