न उमलणरी फुले

न उमलणरी फुले

???? न उमलणरी फुले ????

( सदर लेख कोणालाही उद्देशून लिहिलेले नाही, समाजात कायम काही ना काही तरी विकृती असतातच कधि त्या उघड डोळ्यानी दिसतात कधि नाही इतकाच काय तो फरक, ह्या मजकुरातही सर्व नावे, जागा काल्पनिक आहेत.)

वसंता आता ज्या 2 मुलीना लस देण्या साठी घेऊन आला होतस त्या कोण रे??? रमेश ने जरा गोंधळात पडत विचारले....

वसंता- त्या माझ्या मुली आहेत.

रमेश - अरे पण मागच्या महिन्यांत तू दुसर्याच मुली आणल्या होत्या आणि ह्या 2 वेगळ्या आहेत लेका....काय भानगड आहे????????

वसंता - चल बाहेर टपरी बसुन सांगतो तुला असे म्हणत त्याला बाहेर नेले....

( रमेश एका सरकारी दवाखान्याचा साधा कंपौंडर गेली अनेक वर्षे तो आणि वसंता शाळे पासुन चे मित्र होते, पण रमेश ने ही नोकरी धरली, आणि वसंता ने आयुर्वेदा चा अभ्यास करुन अनेक तालुक्यात जाऊन अनेक लोकाना मदत करण्याचा ध्यास घेतला.... त्या मुळेच अनेक दिवस ते भेटत नसत...)

रमेश - चहा घेत बोल लेका काय भानगड आहे, वहिनी ला माहिती आहे की नाही ????

वसंता - अरे रम्या तुला जे वाटतय तसे काही नाही रे लेका..

रमेश - म्हणजे आता तर बोलला त्या गेल्या त्या माझ्या पोरी होत्या, आता महिन्या भरा पूर्वी दुसर्या 2 पोरी आता ह्या काय बोलतोय काय कळेना मला....

वसंता - अरे हो, दम काढ सांगतो बाबा सर्व....

अरे शहरात नविन मशीन आलय सोनॉ ग्राफी चे त्याने मुलगा की मुलगी आहे ते कळते म्हणे...

रमेश - ते मशिन येउन झाली लेका 2वर्ष झाली त्याचा आणि तुझ्या पोरींचा काय संबंध????

वसंता - अरे 2 महिने पूर्वी मी एका गावात एका घरी गेलो होतो तेव्हा येताना माणुस त्याच्या बायको ला मारत होता आणि विशेष म्हणजे ती बाई पोटुशी होती रे, मी मधे पडलो तर बोलतो दुसरी पण मुलगीच होणार आहे, नकोय सांगतोय तर एकत नाही ही म्हणून मारतोय...त्याला विचारले तेव्हा समजले की जिल्हा ला एका दवाखान्याचा डॉक्टर सांगतो पोरगी आहे का पोरगा... 10,000 घेतो...

मी परिस्थीतीचं अंदाज घेण्या साठी तिथे गेलो, तर बेड वर जागा नाही म्हणुन खालीच गादी टाकुन अनेक स्त्रिया झोपून होत्या...

ते बघुन हात पाय सुन्न पडू लागले म्हणजे एका दिवसात इतक्या मुली......पुढे तर विचारच करवत नव्हता....तसाच बाहेर पडत होतो....

तेव्हढ्यात मागुन आवाज आला, वैद्य बुवा इकडे कशाला आला होतात, मी त्याला नीट से ओळखले नव्हते तेव्हा त्यानेच सांगितले तुम्ही 6 महिन्या पूर्वी माझ्या आई ला औषधे दिली होती...तेव्हा कुठे ओळख पटली.. हा तर त्या लखवा झाल होते त्या बाई चा मुलगा हरी होता...

त्याला मी विचारले इथे लिंग निदान करुन मिळते का तसा तो मला संशयाने पाहू लागला म्हणाला दादा तुम्ही पण??? मी बोललो नाही रे खुळ्या मला काही मी विचारतोय फक्त तसे असेल तर मी लेखी तक्रार नोंद करेन....तसा तो मला बाजुला घेऊन गेला..इथे सर्व चालते आणि हा डॉक्टर एका मोठ्या नेत्याचा जावई आहे, तुम्ही तक्रार करुन काही बदलणार नाही???? उलट तुमची खोटी तक्रार करुन तूम्हाला कायमचे गायब करतील.... मग मी त्याला विचारले अर्र सर्व कायद्याने गुन्हा आहे, तो बोलला आहो काही नाही साहेब सर्व पैसे ची खेळी आहे...बाहेर जी चाचणी फुकट किंवा 1000 ला होते तिच इथे 15000 ला होते आणि मुलगी असेल तर लगेच कडून टाकायचे असेल तर 10000 अजून घेतात.

लोक सकाळ पासुन लाईन लावतात...आणि येणारे 99% सर्व मुल पाडून 2 तास आराम करुन जाताय घरी...????????????

बरेच वेळा मुलगा असतो तरी डॉक्टर मुलगीच सांगतो तेवढाच जास्त पैसे मिळणार असतात...????

साहेब काही काही तर 5, 6, आणि 7 व्या महिन्यात पण येतात...ते काळ्या पिशवीत जेव्हा कचरा टाकायला जातो ना दादा बर्याच वेळा हाथ पाय हालत असतात पण उघडून बघायच धाडस होत नाही ????????

वसंता त्या सांगतो मला दाखव ती जागा कुठ टाकतात तो कचरा... लपत छपत तो त्याला तिथे नेऊन सोडतो...

तिथे ढिगारा असतो काळ्या पिशव्याचा....वसंता नुकत्याच ठेवलेल्या काही पिशव्या फाडत बघत असतो एका पिशवीत 2 जिव हाथ भरच पण हाथ हलवत होते???????? त्या ने त्या दोन्ही जिवाना स्वता जवळच्या एका कपड्यात गुंढाळले आणि घरी घेऊन आला...त्या दोघी मुली ह्या त्याच दोघी????

तेव्हा पासुन रोज मी आणि हरी तिकडे जातो जे लेकर जिवंत आहेत त्याना मी प्राथमिक आरोग्य सेवा देऊन मग ज्या अनाथ आश्रमात जमेल तसे नेऊन देतो...

रम्या त्यात खोट वाटेल तुला पण अनेक वेळा मुले पण होती रे????????

कधि समजणार लोकाना...मुलगा आणि मुलगी हे दोन्ही देवाची च फुले असतात असे शिकवतात ना सर्वं लोकाना शाळेत मग???

का लोक अशी फुले उमलण्यापूर्वीच कचरा पेटीत टाकुन देतात रे????????

त्या न उमलेल्या फुलांचे पण काही तरी देणे लगतोच रे आपण....

रमेश च्या मात्र डोळ्यातून पाणी काही केल्या थांबत नव्हते.....

त्याने वसंता ला सांगितले मला ही आवडेल अशी न उमलली फुले जपायला???? मी तयार आहे सांग काही मदत लागली तरी????

तेव्ह्या पासुन हरी आणि वसंता ला अजून 2 हाथ मिळाले होते मदती साठी...

जेणे करुन कोणतेही फुल न उमलण्यापूर्वीच कचरा होणार नाही ????

-------समाप्त-----------

सर्व लोक वाईट नसतात पण आज काल उच्च शिक्षीत लोक पण ह्या सर्व गोष्टी ला बळी पाडतात, ह्या सर्व गोष्टी घडवून आणतात. हीच शोकांतिका आहे.

मुलगी झाली की सर्व माणसे त्या स्त्रीला शुभेच्छा न देता सल्ले देतात का पण मुला ला जन्म देणारी ही एक मुलगी असते हे विसरुन जातात.

शेवटी एकच सांगावे वाटते की मुलगी काय मुलगा काय दोघे तुमच्याच हाडा मासा पासुन बनतात ना??? दोघां ना सारखेच जपा????.....

©® हेमांगी सुर्यवंशी ©®

प्रकाशनचे सर्व हक्क लेखकाच्या नावावर राखीव आहेत.....

इतर नावाने प्रकशित केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल .