न ओळ्खलेली नाती

Na Olkhleli Nati
प्राजक्ता आज सकाळी खूप खुश होती .....आज तिला एक लग्नाच्या ठिकाणी make up आणि मेहंदी ची ऑर्डर आली होती ....ही तिची पहिलीच ऑर्डर होती.... आणि ती ही खूप मोठी होती.....तिला एका बाईचा फोन आला होता.. ती त्या ऑर्डर चे तिला 5000 रुपये देणार होती.. प्राजक्ताची ही पहिली कमाई होती आणि तिने ठरवले होते आपली पहिली कमाई किती ही कमी असली तरी ती खूप महत्त्वाची आणि मोठ्या भाग्याची असेल ....जे तो देव देईल तो मी स्वीकारेल..... तिला तर घर चालवायचे आहे फक्त.... तिला मिळालेले ही ऑर्डर आधी एका मोठ्या parlour वालीला मिळाली होती ,तिने ह्या ऑर्डर चे तिला 10 हजार सांगितले होते..... ती नवरी मुलगी इतके देऊ शकत नव्हती म्हणून तिला कोणी तरी प्राजक्ता चा फोन नंबर दिला ....आणि तिने प्रजक्ताला फोन लावला..... तिला वाटले प्राजु निदान 7 हजार मागेल ....पण आपण 5 हजार बोलून बघू ....तर तिने सगळ्या तयारीचे आणि साडी नेसण्याचे सगळे मिळून 5 हजार देईल असे कबूल केले आणि कुठे 500 ,अपेक्षित असलेल्या प्राजूला ही मोठी लॉटरी लागल्या सारखे झाले...... तिच्या आनंदाला पारा नव्हता उरला. तिने काही विचार न करता समोरच्या व्यक्तीला हो म्हणून कळवले आणि गम्मत काय पहिल्या कमाईत ती ही प्रचंड खुश आणि जी नवरी होती ती ही खुश झाली होती....

प्राजु आपला आनंद आपल्या आईसोबत share करायला आईच्या रूम मध्ये आली ती एकदम नाचतच आणि लगेच कपड्याच्या घड्या घालत असलेल्या आईच्या गळ्यात पडली..... उठवून ती आई सोबत फुगडी घालू लागली....
आई मी आज खूप खूप खूपच खुश आहे .....मला माझी पहिली ऑर्डर आली आहे ग ......तुला मी सगळ्यात आधी तुला आवडणारी जांभळी पैठणी घेईल अशी ऑर्डर मिळाली आहे, आईने लगेच प्राजूला खूप आशीर्वाद दिले.... आईच्या ही आनंदाला पारा नव्हता .....जेव्हा ही प्राजु खुश नसत तेव्हा उदास प्राजु ला बागून जीव जळत ...तिची खूप चिंता वाटत असत... कुठे तरी तिला वाटत आपण काहीच करू शकत नाही आईसाठी आणि घरासाठी .....सगळे आकाश कवेत घ्यायचे तर खूप वाटते पण हात आणि नशीब अपुरे  पडते की काय....

प्राजुने तिची पहिली ऑर्डर पूर्ण केली आणि तिच्या कायमचे खूप कौतुक ही झाले....तिथे असणाऱ्या काही महिलांनी तिचा contact नंबर ही घेतला आणि तिला काही ऑर्डर ही मिळाल्या होत्या ,पण नवरी आज व्यस्थ होती म्हणून तिने प्राजूला सांगितले की तू 5 दिवसांनी पैसे घेऊन जा ....

प्राजूला वाईट वाटले होते की आज तिने जे अपेक्षित केले होते पहिल्या कमाईचे ते तिला मिळाले नाही ....पण ते 5 दिवसांनी मिळतीलच कुठे जातील..

त्या नवरीने प्राजु चे पैसे प्राजु च्या parlour वाल्या काकू कडे दिले होते ....कारण प्राजु तिला भेटली नाही.... आणि तिला हनिमून ला लवकरच्या flight ने निघायचे होते.

प्राजूला तसा त्या नवरीने फोन करून सांगितले ही होते, की तुझे पैसे काकू कडे दिले आहेत तू त्यांच्या कडून घे.

प्राजु parlour मध्ये गेली पण काकू काहीच बोलल्या नाहीत ,पण प्राजु समजत होती की त्या आठवणीने देतील,पण तिच्या मनात कुठे तरी असे आले की मी त्यांची ऑर्डर घेतली आणि म्हणून त्यांना माझ्या कमाईत हिस्सा हवा की काय...

दोन दिवसांनी काकुला आठवले अरे,प्राजु चे पैसे दिले नाही....हे कसे लक्ष्यात नाही आले माझ्या....काय समजत असेल ती माझ्या बद्दल ....गैरसमज नको म्हणून त्यांनी तिला लगेच बोलावून पैसे दिले.....

प्राजूला खूप आनंद झाला आपली कमाई पहिली नसती तर मी त्यांना जाणीव ही करून नसती दिली ...आणि इकडे काकुला वाटले तिला काय वाटले असावे....

त्यांचे मन खात होते त्यासाठी त्यांनी ठरवले की,आज जी मोठी ऑर्डर आली आहे ती मी न घेता ती प्राजूला देईल...
त्यांनी प्राजूला त्या ऑर्डर बद्दल सांगितले.... आणि सांगितले की मी काही दिवस बाहेर गावी जाते तू ही ऑर्डर घे .....

प्राजुने ही ही ऑर्डर घेतली आणि तिला चांगले पैसे मिळाले..

ती parlour मध्ये आली ....सगळ्यांना तिने तिच्या आनंदात सहभागी केले,,,, पार्टी दिली ...तितक्यात विषय निघाला की काकू असत्या आज तर आणि नेमके त्यांना बाहेर गावी जावे लागले नसते तर त्यांना ही खूप आंनद झाला असता ...

तितक्यात उर्वी म्हणाली, अग त्या तर घरीच आहे....त्या गावाला नाही गेल्या....

प्राजूला काकू चा हेतू कळला होता....की मला ऑर्डर मिळावी म्हणूनच त्यांनी ही ऑर्डर घेतली नाही...

तिला पहिल्या ऑर्डर वालीचा ही फोन आला तिने परत एक ऑर्डर आहे माझ्या दिराची आणि तूच ये सांगितले.. तेव्हा तिच्या कडून कळले की पहिली ऑर्डर ही काकू मुळेच मिळाली होती ...त्यांनीच माझा फोन दिला होता

कुठे तरी प्राजु ला वाटले आपण आपल्या गुरू बद्दल जो काही पैस्या खातर  अभद्र विचार केला तो चुक होता

कमाई जरी मी केली तरी त्याचे श्रेय फक्त काकू चे होते, त्यांनी माझ्या वर विश्वास दाखवला त्याचे हे फळ होते, त्यांना माझ्याशी स्पर्धा करायची नव्हती हे मला कळले नाही.

तिने लगेच गाडी काढली आणि काकू चे घर गाठले, तिने त्यांच्या घरी जातांना त्यांच्यासाठी पहिल्या कमाईतून आईला साडी घेतली आणि काकुला छान गणपतीची मूर्ती घेतली...... आली तशी ती त्यांच्या पाया पडली....

मनात एक अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याने मला खूप छोटे केले याबद्दल माफी ही मागितली ....


जर तुम्ही क्सहुक करत असाल तर त्याची दुरुस्ती ही केलीच पाहिजे म्हणजे पुन्हा अशी चूक होत नाही,,, आणि मन साफ होते.