गूढ (भाग-८)

The story of mysterious house.

गूढ (भाग-८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

          रात्री नियती बेड वर पडलेली असते... तिच्या डोक्यात विचारचक्र सुरूच असतं! मी यायच्या आधी इथून आवाज यायचे, इथे कोणी राहायला आलं की ते आवाज येत नाहीत काय कारण असेल? ते तर शेजारी असणारं घर! मग यात या घराचा काय संबंध?  
"एक मिनीट शेजारी असणारं घर! येस... म्हणूनच तर कदाचित हे होतंय..." असा विचार डोक्यात येऊन ती ताडकन बेड वरून उठून बसते.... उद्या सुशांतला या बद्दल सांगते.... कदाचित सरांची बायको इथेच असेल.... या बाजूच्या घरात.... माझ्या घरात सुद्धा कोणी मेन डोअर नी आत आलं नाही आणि चीप लावली होती म्हणजे कुठेतरी एक गुप्त दार सुद्धा असेल.... चला इतक्या दिवसांनी काहीतरी हाती लागलं तर.... आज आता शांत झोप लागेल..... 
         ती शांतपणे झोपते... सकाळी घरातून बाहेर पडल्यावर ती सुशांतला या बद्दल कल्पना देते.... सुशांत चा मेसेज येतो ठीक आहे! मी तुझ्या घरी वेष बदलून येतो आपण खरंच असं कोणतं गुप्त दार आहे का ते पाहूया.... आज काहीतरी कारण काढून दुपारीच घरी पोहोच!
लॅब ला गेल्यावर डॉ. विजय चिंतेत आहेत हे नियतीला जाणवतं! कालच्या प्रकारामुळेच असेल म्हणून ती आधी काही बोलत नाही... नंतर रिपोर्ट्स ची फाईल डॉ. विजय कडे देते त्यात एक पेपर असतो, ज्यावर नियतीने कालच्या प्रकाराबद्दल लिहिलेलं असतं; "सर मला माहितेय काल काय झालंय ते! आज मी लॅब मधून दुपारी घरी जाते आणि सुशांत पण येतोय आम्ही मॅडम ना वाचवू... नका काळजी करू!" नियती ची चिठ्ठी वाचून त्यांना एक आधार मिळाला आहे असं वाटतं! नियतीच्या डोळ्यात पण एक आश्वासकता जाणवत असते! डॉ. विजय मानेनेच हो म्हणतात आणि आधी पेक्षा जरा प्रसन्न वाटत असतात.... दुपारी नियती घरी पोहोचते.... सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखवत ती घरात थोडी साफ सफाई करायला लागते... तिने लॅब मधून एक केमिकल आणलेलं असतं! ज्यामुळे वाळवी सारखी पावडर दिसू लागेल.... सफाईच्या बहाण्याने थोडं फार केमिकल टाकते... थोड्याच वेळात दारावरची बेल वाजते...  सुशांत तिथे पेस्ट कंट्रोल करणाऱ्याच्या वेशात येतो. 
सुशांत:- मॅडम जी मै बबन... आज आपके एरिया का पेस्ट कंट्रोल है। उसका ही स्प्रे मारने आया हू। थोडा पानी चाहिये था... 
नियती:- हा! आप रुकिये मैं लेके आती हू।
असं म्हणून ती पाणी घेऊन येते.... 
बबन (सुशांत):- थँक्यू मॅडम जी! 
नियती:- अरे भाई जरा सुनो! आपको अभी टाइम होगा तो मेरे घर मे भी जरा पेस्ट कंट्रोल करके दो ना... 
बबन (सुशांत):- हा कर देंगे लेकिन... 
नियती:- हा हा... तुम्हे तुम्हारे पैसे मिल जायेगे...
          सुशांत पेस्ट कंट्रोल च्या निमित्ताने सगळ्या भिंती, फरश्या नीट पाहत असतो... नियतीच्या बेड च्या खाली त्याला फरशी पोकळ जाणवते... बॅटरी ने उजेड मारून तो बघतो तर तिथे एक दार असतं.... आणि बेड च्या खाली पण एक माणूस सहज आडवा झोपू शकेल एवढी गॅप असते... त्याचं काम तर झालेलं असतं! 
सुशांत:- मॅडम जी ये लिजिये इसपे आपका साईन किजिये...
असं म्हणून एक कागद देतो... त्या वर लिहिलेलं असतं; "तुझा संशय बरोबर होता! तुझ्या बेड खालीच आहे ते गुप्त दार..." नियती ते वाचते आणि लिहिते; "५ वाजता तुझ्या घरी" आणि परत देते... सुशांत नजरेनेच हो म्हणतो आणि तिथून निघून जातो.... संध्याकाळी ५ वाजता नियती त्याच्या घरी जाते.... 
नियती:- आता आपण सरांची मदत घेऊया... त्यांना माहित असेल तिथे किती लोक असतात आणि कोणत्या वेळेत ते तिथे नसतात... 
सुशांत:- बरोबर आहे तुझं! पण, सरांना आपण सांगायचं कसं? 
नियती:- थांब मी मेसेज करते त्यांना!
सुशांत:- अगं नको! त्यांचा फोन टॅप केलेला आहे त्यामुळे त्यांना जे फोन आणि मेसेज येतात ते तस्करीच्या टोळीला माहित होतात... 
नियती:- लॅब मध्ये पण बहुतेक काहीतरी गडबड आहे कारण सरांना जेव्हा मला काही सांगायचं असतं तेव्हा ते मला लिहून देतात... त्यामुळे तिथेही काही बोलता येणार नाही... भेटायचा प्रश्नच येत नाही कारण त्यांच्यावर सतत कोणीतरी पाळत ठेऊन असतं! 
सुशांत:- येस! मिळाला मार्ग! 
नियती:- अरे काय झालं सांग मला पण.... 
सुशांत:- आपण सरांचे कॉल डिटेल्स मागवूया त्या वरून आपल्याला अंदाज येईल.... आणि सरांच्या अवती भोवती सतत कोणता नंबर असतो हे पण ट्रेस करू म्हणजे मग आपल्याला नंबर मिळाला की आपणच शोधू... सरांना पण काही सांगायची गरज नाही आणि आपलं पण काम होईल.... 
नियती:- हो यार! लवकर कर... आता त्या लोकांचाच डाव त्यांच्यावर उलटा पाडू... 
          सुशांत लगेचच मोबाईल कंपनीत फोन करून सगळे डिटेल्स मागवतो...... त्या वरून त्यांना एक नंबर सुद्धा मिळतो... सुशांत स्वतः एक अंडर कव्हर कॉप असल्यामुळे लगेचच वरून परवानगी काढून त्या नंबर ला टॅप करायला सुरुवात करतो..... थोड्याच वेळात फोन वाजतो.... समोरून दोन्ही व्यक्ती काय बोलत असतात ते ऐकू यायला लागतं; "बॉस मी त्या डॉक्टर वर लक्ष ठेऊन आहे... अजून काही संशयास्पद वागला नाहीये तो... ती पोरगी पण काही शहाणपणा करत नाहीये... म्हणजे आपण जो त्या डॉक्टर ला मोबाईल दिला होता त्या पोरीला द्यायला त्यावरून तरी आता काही मेसेज किंवा कॉल गेलेले नाहीत!" 
हे ऐकून नियतीला कळतं तो सरांनी दिलेला मोबाईल या लोकांचा होता आणि बरं झालं मी सुशांत शी त्या वरून काही बोलले नाही.... सरांनी सुद्धा दबावाखाली येऊन हे केलं पण, वेळीच मला सावध पण केलं! म्हणून मनोमन देवाचे आभार मानते आणि सरांबद्दल असणारा आदर पण तिच्या मनात वाढतो..... एवढ्यात समोरून दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येतो; "ठीक आहे! तू तुझं काम कर आणि उद्या ती पोरगी कामाला गेली की त्या बाजूच्या घरात जाऊन सगळी साफ सफाई आणि ऑपरेशन ची तयारी करून ठेवा! रात्री नका जाऊ तिथे शहाणपणा करत त्या पोरीला कसला आवाज गेला तर सगळा लोचा होईल..." 
         सुशांत आणि नियती एकमेकांकडे बघतात... आणि आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटणार आहे म्हणून हसतात... 
इतक्यात तो पहिला माणूस बोलू लागतो; "ओके बॉस! पण त्या डॉक्टरची बायको तिथेच आहे... तिला शुद्ध आली तर?"
बॉस:- नाही येणार.... आणि आलीच तरी ती ओरडू नाही शकणार... तेवढी तिच्यात शक्तीच नाहीये.... चल फोन ठेव आता आणि त्या डॉक्टर वर लक्ष ठेव! 
फोन कट होतो.... 
नियती:- माझा हा संशय पण खरा ठरला... माझ्या बाजूच्या घरात सरांच्या मिसेस आहेत आणि मला कळलं पण नाही! मी आज रात्री तिथे जाऊन त्यांना सोडवून आणते.... 
सुशांत:- नाही! असा वेडेपणा करू नकोस! आज तू फक्त जाऊन ती जागा बघून ये.... आज तिथे कोणी नसेल.... मॅडम ना कुठे ठेवलंय हे फक्त हळूच बघ.... उद्या ते लोक सगळी तयारी करून ठेवतायत.... परवा सहा दिवस पूर्ण होतील.... कदाचित परवाच ते लोक तुला तिथे नेतील त्यामुळे सावध पण रहा... 
नियती:- हम्म! तू म्हणतोस ते पण बरोबर आहे... आत्ताच मी काही पावलं उचलली तर उगाच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल! 
सुशांत:- मी उद्या कसही करून डॉ. विजय ना थोडी कल्पना देतो.... 
नियती:- ठीक आहे! मी येते आता.... रात्री बघते तिथे जाऊन.... 
सुशांत:- हो सांभाळून जा.... बाय.... 
            नियती घरी येते.... रात्री ११ नंतर ती हळूच बेड खाली असणाऱ्या दारातून बाजूच्या घरात जाते..... तिथे गुंडांपैकी कोणीच नसतं! ४ खोल्यांचं ते घर ती नीट पाहते....  घरात प्रवेश केल्या केल्या ते एका मिनी हॉस्पिटल सारखंच दिसत असतं! खाट, सलाईन चे स्टँड, ऑपरेशन ची काही अवजारे असं सगळं पडलेलं असतं! एका खोलीत डॉ. विजय च्या बायकोला बेशुद्ध करून बांधून ठेवलेलं असतं! नियतीला आत्ताच आपण यांना इथून सोडवून नेऊया असं वाटत असतं पण, सगळ्या मेहनती वर पाणी फिरेल म्हणून जड अंतःकरणाने ती तिथून निघू लागते.... जाता जाता "मॅडम अजून फक्त एक दिवस! आम्ही वाचवू तुम्हाला!" एवढं बोलते आणि घरी परत येते.... 

आता सुशांत आणि नियतीला बरीच माहिती मिळाली आहे.... आता पुढे काय होईल? सुशांत आणि नियती डॉ. विजय च्या बायकोला वाचवू शकतील? पाहूया पुढच्या भागात.... 

          

🎭 Series Post

View all