गूढ (भाग-४)

The story of mysterious house.

गूढ (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

       नियती आजींकडून घरी येते.... आजीच्या बोलण्यानुसार तिला अंदाज आलेला असतो आज काही घरात वेगळी घटना घडणार नाहीये.... पुढची आमावस्या यायला आता महिना आहे! आत्ता जी माहिती मिळाली आहे ती सुशांत ला सांगितली पाहिजे असा विचार करून ती सुशांतला फोन करणार इतक्यात तिला सोफ्याच्या जवळ भिंतीची पोपडी पडलेली दिसते! हे कुठून पडलं आता म्हणून ती सगळी भिंत बघू लागते... नीट बघितल्यावर तिला समजत कोणीतरी आपल्या अनुपस्थितीत इथे येऊन चीप लावली आहे! त्या चीप मुळे नियती घरात कोणाशी काय बोलते हे रेकॉर्ड झालं असतं! तिच्या हे लक्षात येत आणि म्हणूनच ती बाहेर जाऊन सुशांतला फोन करून सगळं सांगते.... 
सुशांत:- तू ती चीप होती तशीच ठेव... काढून कुठेही फेकू नकोस! आपण सावध आहोत हे त्या खोट्या भुताला समजलं नाही पाहिजे! जरा बेसावध च असुदे त्याला! फक्त एक काम कर आजींच्या घरी जाऊन त्यांना बोलता बोलता कोणी घरात आलेलं का विचार! 
नियती:- हो विचारते! आपण उद्या भेटून सविस्तर बोलू आता फोन वर बोलणं सुद्धा जास्त शक्य होणार नाही बहुतेक! 
सुशांत:- हो चालेल! गोल्डन कॅफे मधेच भेटू आपण तू लॅब मधून निघालीस कि कॉल कर मग मी येईन... 
नियती:- हो चालेल... चल बाय... आजींकडे जाऊन येते.... 
सुशांत:- हो! बाय.... काळजी घे... 
         सुशांत शी बोलणं झाल्यावर नियती आजींच्या घरी जाते.... 
आजी:- काय गं नियती काय झालं? आत्ता कशी काय आलीस?
नियती:- अहो आजी मगाशी विचारायचं राहिलं... माझं एक पार्सल येणार होत ते आलं का मी नसताना? 
आजी:- नाही बाई! कोणी दिसलं तर नाही... आणि जर पार्सल आलं तर मी ठेऊन घेईन नको काळजी करुस तू बिनधास्त कामाला जा!
नियती:- थँक्यू आजी... चला येते... गुड नाईट!
नियती पुन्हा घरी येते.... संध्याकाळचे ७.३० वाजून गेलेले असतात... रात्रीच सगळं काम आवरून ती नेहमीप्रमाणे पुस्तक वाचून झोपायला गेली..... दुसऱ्या दिवशी नियती लॅब मध्ये जाते तेव्हा डॉ. विजय ना सुद्धा कालच्या घटनांबद्दल सांगते.... 
डॉ. विजय:- मी डी.एन.ए. लॅब ला अर्जंट मध्ये कालचे रिपोर्ट्स मागितले आहेत आजच देतील ते रिपोर्ट्स मग आपण सुशांत ला इथेच बोलवूया... 
नियती:- ओके... थँक्यू सर! 
डॉ. विजय:- हे बघ आलाच मेल! नियती आपला संशय बरोबर होता! तू सुशांतला लवकर इथे बोलावून घे... 
       नियती सुशांतला फोन करून लॅब मधेच यायला सांगते.... सुशांत एक तासाभरात येतो असं सांगतो.... तासाभरात सुशांत तिथे आल्यावर डॉ. विजय बोलू लागतात; "काल आम्ही नियती च्या घरी जे रक्त होतं त्याची टेस्ट केलेली आणि डी.एन.ए. टेस्ट ला पाठवलं होतं... त्याचे आज रिपोर्ट्स आलेत! त्या बद्दल च तुला सांगायचं होतं म्हणून बोलावलं!"
सुशांत:- हो काल नियती बोलली मला.... पण नक्की काय झालं होतं? असं काय होतं त्या ब्लड सॅम्पल मध्ये? 
नियती:- काल लॅब मध्ये एक बॉडी आली होती माझ्या घराच्या जरा पुढेच एक सामसूम तलाव आहे त्यातून पोलिसांना मिळाली होती ती! चेहरा पूर्ण पणे खराब केल्यामुळे अजूनही काही ओळख पटलेली नाही पण त्या माणसाच्या शरीरात जे औषधांचे ट्रेसेस सापडले होते त्याचेच अंश या सॅम्पल मध्ये सापडले! म्हणून कनफॉर्म करण्यासाठी सरांनी डी.एन.ए. टेस्ट साठी ते पाठवलं! डी.एन.ए. मॅच झाला!
डॉ. विजय:- महत्वाचं म्हणजे जे ट्रेसेस मिळाले ते त्याला फक्त बेशुद्ध करायला होते! त्या नंतर त्या माणसाच्या शरीरातून किडनी आणि ह्रदय काढून घेतलेले आणि त्यामुळेच या बिचाऱ्याचा जीव गेला! 
सुशांत:- ओह! आलं लक्षात! म्हणजे हे सगळं अवयव तस्करी साठी सुरु आहे! आणि लोकांच्या मनात भूतबाधा आहे हे बिंबण्यासाठी आमावस्या टार्गेट केली आहे त्या लोकांनी! आपली जबाबदारी आता वाढली आहे! नियती तुला आता खूप सावध राहिलं पाहिजे! 
नियती:- हो! काल तर आता मला ती चीप दिसली! पण एक प्रश्न आहे ज्याने कोणी ती तिथे लावली तो घरात आला कसा? 
सुशांत:- माझ्याकडे एक प्लॅन आहे त्याने ते लोक बेसावध राहतील आणि आपलं काम सुद्धा होईल! नियती मी तुला उद्या एक फोटो फ्रेम देतो त्यात हिडन कॅमेरा आहे.... ती फ्रेम तू मेन डोअर नीट दिसेल अशी लाव! 
नियती:- बरं चालेल! 
         सगळा प्लॅन नीट समजावून झाल्यावर सुशांत तिथून जातो. नियती आणि डॉ. विजय पुन्हा लॅब च्या कामात व्यस्त होतात.... संध्याकाळी नेहमी प्रमाणे नियती घरी येते.... घरी आल्यावर ती आधी चीप च्या व्यतिरिक्त अजून काही वेगळे झालेले नाही ना हे तपासून बघते..... काहीही वेगळं नसतं! ती नेहमी प्रमाणे काम करून पुस्तक वाचून झोपते... दुसऱ्या दिवशी सुशांत नियतीला कॅमेरा वाली फ्रेम देतो! त्याने सांगितल्या प्रमाणे सगळं नियती करते! आठवडा होऊन सुद्धा घरात काहीच वेगळी हालचाल झालेली नसते! या मध्यंतरी च्या काळात डॉ. विजय च्या सल्ल्याने नियती ने या विषयावर बोलण्यासाठी वेगळा फोन नंबर आणि वेगळा फोन घेतलेला असतो जो ती घरात कधीच काढत नसते! घरी असताना तो फोन ऑफ ठेवत असते! याचं महत्वाचं कारण असतं; जर त्या लोकांनाही नियती चा फोन टॅप केला असेल तर प्लॅन आधीच फ्लॉप होईल म्हणूनच डॉ. विजय नी त्यांच्या कडंचच एक एक्सट्रा सिम कार्ड आणि फोन दिलेला असतो! 
          नियती चे आजींसोबत रोजचे नियमित येता जाता बोलणं सुरु असतंच! पण जशी जशी आमावस्या जवळ येऊ लागते आजी पुन्हा तिला तू इथून सुरक्षित जागी जा म्हणून सांगू लागतात..... नियतीच्या लक्षात येतं आता जे काही होईल ते आमावस्येलाच होईल! लवकरच आता हा पडदा फाश केला पाहिजे! 
         
आता अमावास्येला काय होईल? नियती, सुशांत आणि डॉ. विजय यांना यश मिळेल? पाहूया पुढच्या भागात..... 

🎭 Series Post

View all