गूढ (भाग-३)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
नियती लॅब मध्ये पोहोचते.... थोड्याच वेळात डॉ. विजय सुद्धा येतात... थोडं फार काम झाल्यावर नियती डॉ. विजय शी बोलू लागते....
नियती:- सर.... मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि दाखवायचं पण आहे.
डॉ. विजय:- हा बोल ना! काय झालं?
नियती:- सर काल त्या आजी म्हणत होत्या तसंच काहीसं घडलं.... मी घरी गेले तेव्हा रात्री लाईट्स नव्हते... अचानक काहीतरी पडल्या सारखा आवाज आला म्हणून मी काय पडलं बघायला गेले तर तिथे काहीच पडलं नव्हतं पण, जेव्हा मी बेडरूम मध्ये परत आले तेव्हा आरशावर रक्ताने इथून निघून जा असं लिहिलं होतं! मी सगळ्या घरात पाहिलं कोणी लपून बसलं असेल तर.... पण कोणीच नव्हतं तिथे!
हा बघा ते लिहिलेलं होतं त्याचा मी फोटो काढला आहे... असं म्हणून फोटो पण दाखवते...
डॉ. विजय:- तुला खात्री आहे घरात कोणीच नव्हतं!
नियती:- हो सर! कारण हा सगळा प्रकार झाला आणि तेवढ्यात लाईट पण आले... मी नीट पाहिलं होतं सगळीकडे कोणीच नव्हतं!
डॉ. विजय:- ब्लड सॅम्पल आणलं आहेस का तू? आपण तपासून बघू काहीतरी नक्की हाती लागेल.
नियती:- हो सर आणलं आहे!
डॉ. विजय:- लवकर चेक कर...
नियती ते ब्लड सॅम्पल चेक करते...
नियती:- सर! हे तर माणसाचंच रक्त आहे! पण..
डॉ. विजय:- पण काय? काही गडबड आहे का?
नियती:- सर तुम्हीच बघा एकदा...
डॉ. विजय स्वतः चेक करतात.... त्यांनासुद्धा तेवढाच धक्का बसतो जेवढा नियतीला बसलेला असतो!
डॉ. विजय:- नियती! एक काम कर हे सॅम्पल डी.एन.ए. टेस्ट साठी पाठव दोन दिवसात त्याचे रिपोर्ट्स येतील मग आपण अजून जवळ पोहोचू या प्रकरणाच्या.....
नियती डॉ. विजय ने सांगितल्याप्रमाणे करते!
डॉ. विजय:- नियती मला वाटतंय तिथे तुझा जीव धोक्यात आहे... हे काही भुता बिताच प्रकरण नाही पण काहीतरी भयानक आहे एवढं नक्की! मुद्दामून हे सगळं घडवून आणलं जातंय... थोडे दिवस माझ्याकडे चल राहायला मी आमच्या सौ ना कळवतो...
नियती:- नको सर! उगीच त्रास नका करून घेऊ... माझा एक मित्र आहे सुशांत! तो एक अंडर कव्हर कॉप आहे.... तुम्ही सुद्धा ओळखत असाल त्याला... वर्षभरापूर्वी ओळख झाली होती.... त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतोच! हळूहळू आमच्यात मैत्री पण झाली!
डॉ. विजय:- हो! हो! आलं लक्षात... एका स्पेशल केस साठी त्याला बोलावलं होतं! तेव्हा आपली भेट झाली होती....
नियती:- हो! तोच सुशांत! मी त्याला सांगते माझी मदत करायला.... आम्ही दोघं मिळून करू या खोट्या भुताचा पडदा फाश!
डॉ. विजय:- ठीक आहे! काही मदत लागली तर सांग.... आणि जे कराल ते सांभाळून करा....
नियती:- हो सर! आणि मदत तर लागेलच! आता डी.एन.ए. रिपोर्ट्स आल्यावर आपल्याला नक्की काय ते सुद्धा कळेल... आपला संशय जर खरा असेल तर या प्रकरणात मला तुमचीच खूप मदत होणार आहे!
डॉ. विजय:- हो नक्कीच! चल आता कामाला लाग आणि आज लवकर घरी जा....
नियती राहिलेली कामं करते... आज ती लॅब मधून संध्याकाळी चार वाजताच निघणार असते! लंच ब्रेक मध्ये तिने सुशांतला आज भेटायला ये जरा मदत हवी आहे असं सांगितलेलं असत! साडेचार वाजता गोल्डन कॅफे मध्ये भेटायचं ठरतं! संध्याकाळी कॅफे मध्ये सुशांत आणि नियती भेटतात... आधी थोडंफार इकडंच तिकडंच बोलणं होतं!
सुशांत:- बरं आपण बोलत बसलो तर असच सुरु राहील! काय काम होतं तुझं?
नियती त्याला सगळा घडलेला प्रकार सांगते...
सुशांत:- हे आत्ता एकदाच घडलं आहे की या आधी पण असं घडलं होतं?
नियती:- हे माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं! पण घरमालक आणि समोर जे निंबाळकर आजी आजोबा राहतात त्यांच्या बोलण्यातून असं समजलंय कि तिथे माझ्याआधी चार ते पाच जण राहायला होते त्यांच्यासोबत पण अश्याच घटना घडल्या... चार पाच वेळा प्रत्येकाला अनुभव आला आणि नंतर ते कुठे गायब झाले ते कोणालाच माहित नाही!
सुशांत:- बरं! आणि ते ब्लड सॅम्पल च काय झालं?
नियती:- दोन दिवसात रिपोर्ट्स येतील तेव्हा तुला कनफॉर्म काय ते सांगते!
सुशांत:- ठीक आहे! तू निंबाळकर आजी आजोबांकडून अजून काही माहिती मिळते का बघ... आणि या अश्या घटना किती दिवसांच्या अंतराने घडतायत ते सुद्धा सांग... मग आपण पुढे काय करायचं हे ठरवू या! फक्त जराही घाबरू नकोस...
नियती:- हो रे मी तुझीच मैत्रीण आहे अशी तशी घाबरणाऱ्यातली नाही! मला पूर्ण विश्वास आहे हे सगळं फक्त तिथे राहणाऱ्या माणसांना पिटाळून लावण्यासाठी केलं जातंय... भूत बित काही नाहीये तिथे.... काहीतरी वेगळंच शिजतंय त्या भागात....
सुशांत:- हो! आपण लावूया त्याचा छडा.... बरं हे बघ मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि विसरलोच द्यायला! एक मिनिट हा.... हा! हे घे..
नियती:- वाव! किती छान आहेत हे कानातले!
असं म्हणून ती कानात घालते...
कानातले अगदी नियती ला आवडतात तसे असतात.... छोटे आणि गुलाबाच्या फुलाच्या डिजाईन चे! तिच्या गोल आणि गोऱ्या चेहऱ्यावर ते अगदी खुलून दिसत असतात....
सुशांत:- आवडले ना! अशीच हसत रहा... आणि टेन्शन घेऊ नकोस मी आहे! चल मी तुला घरी सोडतो...
नियती:- नको मी जाईन! जर घरावर कोणी पाळत ठेऊन असेल तर उगाच ते लोक सावध होतील...
सुशांत:- जैसा आप कहे मॅडम!
नियती:- बास रे आता नौटंकी! चल भेटू आपण पुन्हा... फोन वर टच मध्ये राहूच!
सुशांत:- हो! चल बाय आणि काळजी घे...
एकमेकांचा निरोप घेऊन दोघं आपल्याला वाटेने निघतात.... आज नियती जरा लवकरच घरी पोहोचते.... ती घराजवळ पोहोचते तेव्हा आजी बाहेरच बसलेल्या असतात.... त्या तिला हाक मारतात....
आजी:- नियती! आज लवकर आलीस वाटतं! ये इकडे चहा टाकते मी...
नियती:- हो येते पण उगाच त्रास नका करून घेऊ चहा वैगरे नको काही!
आजी:- अगं वेडे त्यात त्रास कसला.... आत्ता आमच्या दोघांचा चहा टाकणारच होते त्यात तुझा पण करते....
नियती त्यांच्या घरी जाते... मागच्यावेळेस एवढी नीट ओळख झालेली नसते ती आता होते.... आजोबांशी बोलण्याच्या ओघात तिला समजत आजी आजोबांना कोणी नाहीये... एवढ्यात आजी चहा घेऊन येतात...
आजी:- हे घे! पोहे पण आणलेत थोडं खाऊन घे!
नियती:- बघा! कशाला एवढा त्रास करून घेतलात!
आजी:- त्रास कसला त्यात! तू एवढी कामावरून दमून येतेस मग घरातलं आवरणार मग वेळ नाही मिळाला तर ते काय ते तुमचं फास्ट फूड का काय ते खाणार आणि आजारी पडणार! त्यापेक्षा हे खा! आम्हाला पण कोणी नाही! आम्हाला तू आमच्या नातीसारखी आहेस!
नियती:- मग तुमच्या या नातीला काही गोष्टी सांगाल का?
आजी:- तुझ्या बोलण्याचा रोख कळतोय मला.. तुला घरातल्या घटनांबद्दल विचारायचं आहे ना?
नियती:- हो.
आजोबा:- अगं पोरी काय सांगायचं! असं म्हणतात तिथे पूर्वी एक बाई राहत होती पण एकेदिवशी ती अचानक गायब झाली आणि नंतर पुढे एक जुना तलाव आहे त्यात तिचा मृतदेह पोलिसांना सापडला... तीच तिथे वावरते असं ऐकिवात आहे! कोणालाच ती तिथे राहून देत नाही!
आजी:- हो ना! आम्ही त्या घरात लाईट चालू बंद होताना बघितल्या आहेत, सावल्या पण बघितल्या आहेत!
नियती:- आजी पण एक विचारू? मी गेला आठवडा भर इथे राहतेय मला असं काहीच जाणवलं नाही... आणि काल सुद्धा सावल्या वैगरे काही नाही दिसलं!
आजोबा:- ती तर आत्ता सुरुवात आहे! अजूनही वेळ गेली नाही तू इथून दुसरीकडे जा...
आजी:- हो गं बाळा! हे बोलतायत ते खरं आहे! या घटना रोज नाही होत... दर आमावस्येला होतात फक्त! तिथे राहणारा कोणताही माणूस तीन महिनेच नीट असतो पण नंतर कुठे आणि कसा गायब होतो कळतही नाही!
नियती:- ओह! पण मला अजूनही वाटतंय हे माणसाचंच काम आहे! तुम्ही नका काळजी करू मी लवकरच या प्रकरणाचा छडा लावते!
नियती आणि सुशांत आता काय करतील... आणि ब्लड चेकिंग मध्ये असं काय समजलं होत ज्या मुळे डॉ. विजय आणि नियती ला धक्का बसला होता! पाहूया पुढच्या भागात....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा