मिस्टीरिअस मेसेज वाचक संवाद

Talks with readers

मिस्टीरिअस मेसेज वाचक संवाद 

© प्रतिक्षा माजगावकर 

आज तुमच्या सगळ्यांशी जरा बोलावंसं वाटतंय.... तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच गूढ, मिशन मुंबई आणि सध्या सुरू असलेली मिस्टीरिअस मेसेज या रहस्य कम थरारक कथा लिहायची प्रेरणा मिळते.... काल आता संजना मॅडम नी पोस्ट टाकली होती, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा वाचायला आवडतील? बऱ्याच जणांनी भयकथा, रहस्य कथा, थ्रिल कथा, विज्ञान विषयक कथा असं म्हणलं.... म्हणजे तुम्हा सगळ्यांना यात रस आहे.... पण, मग एक गोष्ट कळत नाहीये, आपल्या कथा या interactive का नाही होत आहेत? गूढ कथेला खरंच तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात.... मिशन मुंबई आणि मिस्टीरिअस मेसेज ला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळेल हि अपेक्षा होती.... पण, याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.... खरंतर याच कथा असं नाही बाकी लेखकांच्या पण रहस्य कथा किंवा थरारक कथा आहेत त्यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाहीये.... असं का? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना या विषयावर वाचण्यात रस असून सुद्धा! आता आपल्या कथांमध्ये काहीवेळेला पासवर्ड शोधणं, कोड शोधणं हे असतंच! त्या कोड्यांची उत्तरं त्याच भागात नसतात कारण एक अपेक्षा असते, तुम्ही त्याचा विचार करून नक्की कमेंट करावं.... कोणतीही कथा लिहिणं म्हणजे त्याआधी त्याचा अभ्यास करावा लागतो, मग योग्य मांडणी कशी करता येईल हे पाहावं लागतं, कोडी टाकण्यासाठी त्याचा वेगळा अभ्यास.... मग शुद्ध लेखन, व्याकरण तपासून बघावं लागतं आणि मग ती कथा तुमच्या पर्यंत येते... एवढं करून झाल्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देणार, तुम्हाला कथा आवडेल का हे प्रश्न असतातच! जेव्हा कमेंट बॉक्स ओपन केल्यावर तुमचा भरगोस प्रतिसाद दिसतो त्यातूनच पुढे लिहिण्याची नवी उमेद मिळते.... एक लेखक नेहमी त्याच्या वाचकांना संतुष्ट करण्यासाठीच प्रयत्न करत असतो! मग, तुम्ही सुद्धा त्याला भरगोस प्रतिसाद द्याल एवढीच माफक अपेक्षा असते.... खरंतर आपली हि मिस्टीरिअस मेसेज कथा संपल्यावर मग हा वाचक संवाद मला करायचा होता पण, तुम्ही कोणीच कथा interactively घेत नाही आहात म्हणून आजच हा संवाद केला! आता ही मिस्टीरिअस मेसेज कथा सुद्धा संपत आली आहे... पुढचा भाग लवकरच येईल.... तोपर्यंत कालच्या भागात जे कोडं विचारलं आहे त्याचं काय उत्तर असेल हे नक्की कमेंट करून सांगा.... आता हे कथानक संपलं कि पुन्हा भेटू... 
धन्यवाद...

🎭 Series Post

View all