मिस्टीरिअस मेसेज (भाग-८)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, त्या मेहंदी च्या डिजाईन वर उलटी गिनती शुरु असा मेसेज होता, अभिषेक आणि निनाद ला एक चिठ्ठी मिळाली आहे आणि सोनाली च्या माहिती नुसार ईशा मेहंदी चे कोन बदलणार आहे... आता पुढे...)
*************************
ईशा ने घरी जाता जाता सोनाली ने जश्या कोनाचे फोटो पाठवले होते तसे घेऊन गेली... ती घरी पोहोचल्यावर तिने नियती ला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि तोवर सोनाली ने कोन बदलले आणि ईशा च्या खोलीत नेऊन ठेवले.... एव्हाना आता सगळ्यांची ये - जा सुरु झाली होती.... निंबाळकर आजी सुद्धा आल्या..... सगळे तिथे गप्पा मारत बसलेले असताना इशाने हळूच जाऊन ते कोन डॉ. विजयंच्या ड्रॉवर मध्ये ठेवले आणि ती सुद्धा सगळ्यांमध्ये सामील झाली.... 

"हि कोणी नवीन मैत्रीण का तुझी?" निंबाळकर आजींनी नियती ला ईशा बद्दल विचारलं. 

"तसंच म्हणा हवं तर..... आमची आत्ताच मैत्री झाली आहे....." नियती म्हणाली. 

"बरं.... ईशा छान नाव आहे.... काय काम करतेस तू?" आजींनी ईशा ला विचारलं. 

"थँक्यू! मी वेडिंग प्लॅनेर आहे.... नियती च्या लग्नाची सगळी व्यवस्था मीच पाहतेय....." ईशा म्हणाली. 

"छान छान.... खूप मोठी हो.... यशस्वी हो...." आजी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या.

"चला चला..... चहा नाश्ता करून घ्या..... थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात करूया...." अनुजा सगळ्यांना चहा आणि उपमा देत म्हणाली. 

सगळ्यांनी गप्पा मारत मारत खाऊन घेतलं..... आता सगळे आजूबाजूचे यायला लागले होते.... कॅट्रर्स वाले सुद्धा आले.... रात्रीच्या स्वयंपाकची तयारी सुरु झाली.... नियती ची पार्लर वाली आली.... तिच्या सोबत अजून दोन जणी मदतीसाठी आल्या होत्या....

"चला कार्यक्रमाला सुरुवात करूया..." अनुजा म्हणाली. 

संगीत सुरु झालं.... आणि सोबत मेहंदी सुद्धा सुरु झाली..... 

"बघूया हा आता उद्या किती मेहंदी रंगतेय.... सुशांत च तुझ्यावर जेवढं प्रेम असेल तेवढा गडद रंग येईल हा....." आजी नियती ला चिडवत म्हणाल्या. 

नियती लाजली.... सगळे तिला चिडवत होते.... 

"ए... पोरींनो बास आता.... किती पिडाल माझ्या मुलीला.... थोडं नंतर साठी पण ठेवा..." अनुजा म्हणाली. 

पुन्हा हशा पिकला.... 

"आई तू पण...." नियती लाडात येऊन म्हणाली. 

नियती च्या हातावर मेहंदी सुरु असताना, अनुजाने नाचायला सुरुवात केली..... सोबत ईशा आणि सोनाली सुद्धा नाचायला लागल्या.... मात्र दोघी नीट लक्ष ठेवून सुद्धा होत्या.... 

"मॅडम जी ज्युस...." नियती च्या पुढे ग्लास धरत एक कॅटरर वाला म्हणाला. 

नियती ने वर बघितलं तर तो सुशांत होता.... ईशा आणि सोनाली सुद्धा हे पाहत होत्या.... त्या दोघींनी सुद्धा त्याला ओळखलं होतं..... आणि तिघी एकमेकींकडे बघून हसत होत्या.... 

"आलो मी..... आता माझं गिफ्ट?" सुशांत तिच्या एका हातात ग्लास देत म्हणाला. 

"हो! थांब..." नियती म्हणाली. आणि तिने ईशा ला खूण करून बोलावून घेतलं... 

"ईशा... ते गि..." नियती बोलत होतीच कि तिला तोडत ईशा म्हणाली; "हो.... ते गिफ्ट देते आणून तुला... पण, इथून जरा बाजूला हो... नाहीतर सगळ्यांना कळेल हा सुशांत इथे आला आहे मग काय तुला अजून चिडवतील सगळे...." ईशा म्हणाली. 

दोन मिनिटात जाऊन येते असं म्हणून ती किचन च्या इथे जाऊन थांबली.... ईशा ने तिच्या हातात गिफ्ट आणून दिलं.... नियती ने ते सुशांत ला दिलं...

"जा आता.... कोणी बघितलं ना तर...." नियती म्हणाली. 

"तर काय? अजून चिडवतील ना.... चिडवू दे..." सुशांत म्हणाला. 

एवढ्यात अनुजा चा आवाज आला... "नियती... सुशांत ला बोलवायचं आहे का..." 

"जा ना यार लवकर.... आई बघेल...." नियती म्हणाली. 

एवढ्यात अनुजा स्वतः तिथे आली.... 

"चल ना बाळा तू.... सगळे वाट बघतायत...." अनुजा म्हणाली. 

नियती अनुजा सोबत गेली.... जाता जाता अनुजा हळूच तिच्या कानात म्हणाली; "दिलं का सुशांत ला गिफ्ट?"...

नियती काहीही न बोलता लाजून खाली मान घालून पुन्हा जागेवर येऊन बसली..... गप्पा, नाच, गाणी याच्या समवेत कार्यक्रम सुरु होता.... नियती ला सुद्धा ईशा आणि सोनाली ने नाचात सामील करून घेतले.... ती सुद्धा थोड्यावेळ नाचली.... 

"अरे पोरींनो हे काय तुम्ही दोघींनी अजून मेहंदी नाही काढली ते...." अनुजा म्हणाली. 

"नाही मॅडम! आमच्या डिपार्टमेंट मध्ये नाही चालत मेहंदी...." सोनाली म्हणाली. 

"हो! बरोबर आहे... असुदे... उद्या पुरती चिकटवायची मेहंदी येते ती लाव हा... मग पाण्याने धुतली कि जाईल..." अनुजा म्हणाली. 

"हो नक्की! मी उद्या लावणार आहेच ती!" सोनाली म्हणाली. 

"ईशा! तू तरी काढून मेहंदी.... तू कुठे पोलीस आहेस.... तुला चालेल कि..." त्यांचं बोलणं ऐकून आजी म्हणाल्या.

"बरोबर आहे! पण, मला बाकी व्यवस्था बघायच्या आहेत ना... मग मेहंदी लावून मला अवघड जाईल..." ईशा म्हणाली. 

"काही नाही गं! तुला फक्त सूचना द्यायच्या असतात ना.... मग काय तर.... घे काढून... आणि आता तू नियती ची मैत्रीण सुद्धा झाली आहेस... शिवाय उद्या करवली म्हणून तुझाच मान आहे...." अनुजा म्हणाली. 

"हो! ईशा... घे ना गं मेहंदी काढून..." नियती सुद्धा अनुजा च्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली.

कोणाला संशय येऊ नये म्हणून ईशा ला मेहंदी काढून घेणं भाग पडलं..... एव्हाना आता रात्र झाली होती.... सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा तिथेच असल्यामुळे सगळे जेवून घरी जाणार होते.... डॉ. विजय सुद्धा आता घरी पोहोचले होते..... 

"चला चला.... नियती, अनुजा जेवून घ्या बरं... आज मी भरवणार तुम्हा दोघींना..." डॉ. विजय दोन ताटं घेऊन आले आणि म्हणाले. 

"हे काय... मी एकाच हातावर काढली आहे मेहंदी मी जेवते माझी मी..." अनुजा म्हणाली. 

"आणि माझी मेहंदी सुकली आहे.... मी चमच्याने खाते...." नियती म्हणाली. 

"नाही... अगं उद्या तू आता सासरी जाशील... मग पुन्हा असे लाड करायला थोडीच मिळणार आहे... मी भरवणार... आणि अनु! इतक्या वर्षात मला तुला म्हणावा तसा वेळ नाही देता आला..... आता लेकीच्या लग्नात तरी हौस करूया...." डॉ. विजय दोघींना समजावत म्हणाले. 

"काय बोलताय.... सगळे आहेत इथे..." अनुजा लाजून म्हणाली. 

सगळे जण मनसोक्त हसले.... ईशा आणि सोनाली ला सुद्धा थोडं हलकं वाटलं.... इतक्या वेळ पासून सगळी कडे लक्ष ठेवता ठेवता त्या दोघींना ताण आला होता.... तो एकदम उतरल्या सारखा झाला....

"घे गं पोरी लाड करून.... पुन्हा अशी संधी मिळणार नाही...." आजी म्हणाल्या. 

सगळे जण जेवले आणि आपापल्या घरी जायला निघाले होते.... कॅट्रर्स वाले सुद्धा सगळं आवरून जायला निघाले.... 

"तू थांब जरा...." अनुजा एकाला थांबवत म्हणाली. 

बाकी सगळे कॅट्रर्स वाले गेले.... आणि हा थांबला.... 

"चल सुशांत जेवून घे..." अनुजा म्हणाली. 

"कौन सुशांत? मेरा नाम शांताराम है।" सुशांत म्हणाला. 

"सोड आता नाटक... ये आणि जेव...." अनुजा त्याचा कान धरत म्हणाली. 

"ओळखलं तुम्ही...." सुशांत डोक्यावर हात मारून म्हणाला. 

"ते आई ने केव्हाच ओळखलं आहे.... जेव आता..." नियती म्हणाली. 

त्याने सुद्धा जेवून घेतलं.... 

"सुशांत! मला घरी सोडशील का रे? नाही म्हणजे मी यांना फोन करत होते पण फोन लागत नाहीये...." आजी म्हणाल्या. 

"का नाही... चला..... आणि नियती सारखा मी सुद्धा तुमचा नातू आहे... त्याच हक्काने सांगा कि...." सुशांत म्हणाला. 

सुशांत आणि आजी सुद्धा गेले.... सोनाली सुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघाली. घरी डॉ. विजय, ईशा आणि अनुजा ने मिळून बाकी आवरा आवरी सुरु केली.... 

ईशा ने जेव्हा नियती ज्या आसनावर बसली होते ते उचललं तेव्हा त्याच्या खाली तिला एक कागद मिळाला.... तिने गपचूप तो घेऊन ठेवला आणि थोडी आवरा आवर झाल्यावर खोलीत गेली.... 

तिने चिठ्ठी उघडून बघितलं तर त्यावर, 'कसा केला पोपट'.... असं लिहिलं होतं.... तिने त्याचा फोटो सुयश सरांना पाठवला....

"याचा नक्की काय अर्थ असेल आत्ता नाही सांगता येणार.... कारण, अभिषेक आणि निनाद ला जो कागद मिळाला होता त्यावर नियती आधी राहायची तिथला पत्ता आहे...." सुयश सरांचा रिप्लाय आला... 

"ओह... पण, मग तिथेच काही असेल का?" ईशा ने मेसेज केला... 

"नाही माहित.... लेट्स सी... काय होतंय...." सुयश सरांनी रिप्लाय दिला... 

क्रमशः.....
*************************
कसा केला पोपट.... असं त्या चिठ्ठीत का लिहिलं असेल? नियती आधी जिथे राहायची तिथला पत्ता का असेल त्या कागदावर? उद्या ऐन हळदीच्या आणि लग्नाच्या दिवशीच काही घोळ होईल का? पाहूया पुढच्या भागात..... 

(मला माहितेय, हा भाग कालच पोस्ट करायला हवा होता... पण, काही कारणामुळे जमले नाही... त्याबद्दल खरंच सॉरी... तरी तुम्ही सगळे समजून घ्याल हि अपेक्षा....) 

🎭 Series Post

View all