मिस्टीरिअस मेसेज (भाग-६)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं; नियतीला कसलीतरी विषबाधा झाली आहे.... सुशांत कडे ती विंचवाच्या चित्राची चिठ्ठी आहे आणि ईशा ला सुयश सरांनी पोलीस स्टेशन ला येऊन जायला सांगितलं आहे.... आता पुढे...)
************************
रात्री सगळे आपापल्या खोलीत जातात.... ईशा जेव्हा लॅपटॉप ऑन करते तेव्हा तिला सुयश सरांचा मेल आलेला दिसतो.... त्यांनी त्या ज्युस वाटणाऱ्या इसमाचा फोटो त्याची माहिती काढण्यासाठी तिला पाठवलेला असतो..... ती तो फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये घेते.... आणि पाणी आणायच्या निमित्ताने किचन मध्ये जाते... तिथे सदू असतोच! 

"सदू काका! माझं एक काम होतं.... मला जरा तुमची मदत हवी होती..." ईशा म्हणाली. 

"बोला ना... काही हवं होतं का तुम्हाला?" सदू ने विचारलं.

"Actually माझं अजून एका ठिकाणी वेडिंग प्लॅनिंग च काम सुरु आहे, तर तिकडे मला स्नॅक्स सर्व्ह करायला दोन माणसांची गरज होती.... तुमचे कोणी मित्र असतील तर सांगा ना.." ईशा म्हणाली. 

"एक मित्र आहे बघा माझा... उद्या बोलून घेतो त्याच्याशी.... तो तुम्हाला हवी तेवढी माणसं देईल.... परवा नियती ताईंचा साखरपुडा झाला बघा, तेव्हा पण त्याने पाठवलेलाच एक माणूस आला होता...." सदू म्हणाला. 

"ग्रेट! मला मग त्याचा नंबर द्या म्हणजे मी माझ्याकडे घेऊन ठेवते... मला सारखी गरज पडतेच माणसांची!" ईशा म्हणाली. 

सदू ने त्याच्या मित्राचा नंबर ईशा ला दिला... ती खोलीत आली.... एव्हाना खूप उशीर झाला होता.... थोडयाच वेळात ईशाच्या खोलीचे दार वाजले.... ईशा ने पाहिलं, तर डॉक्टर विजय आले होते.... 

"सर! तुम्ही आत्ता? काही सिरिअस आहे का?" ईशा ने विचारलं. 

"हम्म... थोडं बोलायचं होतं! पण, इथे नको गच्चीवर जाऊया?" डॉ. विजय म्हणाले. 

"हो चला..." ईशा म्हणाली. 

डॉ. विजय आणि ईशा गच्चीवर गेले.... 

"बोला सर, काय झालं?" ईशा ने विचारलं. 

"तू हॉस्पिटल मधून जे सॅम्पल पाठवले होतेस ते मी चेक करत होतो... पण, सगळं करता करता उशीर झाला आणि मी तडक घरी आलो... त्या टेस्ट्स चे हे रिपोर्ट्स! या बद्दलच तुला सांगायचं होतं! तू उद्या लवकर पोलीस स्टेशन ला जाणार आहेस असं सुयश सर म्हणाले... म्हणून हे रिपोर्ट्स तेवढे घेऊन जा..." डॉ. विजय ईशा ला रिपोर्ट्स देत म्हणाले.

ईशा ने रिपोर्ट्स घेतले....  

"तू नियती ला वेळीच हॉस्पिटल मध्ये नेलं म्हणून आज ती सुखरूप आहे.... तिच्या शरीरात एक असं केमिकल इंजेक्ट केलं होतं ज्यामुळे अर्ध्यातासात तिच्या हातात पूर्ण विष पसरून गँगरीन झालं असतं आणि हात कापण्याशिवाय पर्याय उरला नसता..." डॉ. विजय काळजीत बोलत होते. 

"काय? एवढं भयानक केमिकल... पण, नियती च्या शरीरात ते कसं गेलं हेच मला कळत नाहीये... मला त्या माणसावर संशय येतोय..." ईशा सुद्धा काळजीत म्हणाली. 

"म्हणजे? कोणता माणूस?" डॉ. विजय म्हणाले. 

ईशा ने सुरुवाती पासून तो माणूस नियती ला धडकला आणि तिचा हात सुजायला लागला इथपर्यंत सगळं डिटेल मध्ये सांगितलं. 

"मी एक काम करतो, उद्या नियतीची पट्टी खोलून जखम बघायचा प्रयत्न करतो आणि सांगतो तुला...." डॉ. विजय म्हणाले. 

"ठीक आहे! आता अजून काही रिस्क नको.... मी उद्या नसेन तर सोनाली ला बोलावते इथे... म्हणजे ती नीट सगळीकडे लक्ष ठेवेल..." ईशा म्हणाली. 

"हो चालेल.... चल आता जाऊन झोप... खूपच उशीर झालाय..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो! गुड नाईट सर!" ईशा म्हणाली. 

डॉ. विजय आणि ईशा पुन्हा खाली यायला मागे वळले तर नियती तिथे उभी होती.... आता हिने सगळं ऐकलं कि काय म्हणून दोघं टेन्शन मध्ये होते.... 

"नियती! तू एवढ्या रात्री का इथे आलीस? झोप जाऊन..." डॉ. विजय म्हणाले. 

"झोप येत नाहीये म्हणून तर आले.... म्हणलं जरा मोकळ्या हवेत फिरलं तर येईल झोप म्हणून.... पण, तुम्ही दोघं काय करताय?" नियती ने विचारलं. 

"आता परवा वर लग्न आलंय तुझं... तयारी कशी सुरु आहे काही हवं आहे का हे विचारायला नको.... त्याचंच बोलणं सुरु होतं!" डॉ. विजय म्हणाले. 

"बरं... मी येते थोड्यावेळात तुम्ही जा...." नियती म्हणाली. 

"नाही! तू सुद्धा चल.... तुला झोप नसेल येत तर आपण गप्पा मारू..." डॉ. विजय म्हणाले. 

"तुम्हा बाप - लेकीचं चालू दे... मी झोपते... उद्या मला एका कामासाठी जायचं आहे..." ईशा म्हणाली. आणि गच्चीवरून खोलीत आली. 

"नियती! मला एक सांग, तुझ्या हाताला काय लागलं आहे? हा लेप तर नक्कीच लावलेला नाहीये..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो! आई ला टेन्शन नको म्हणून मी खोटं बोलले पण, मलाच नाही माहित मला काय लागलं..." नियती म्हणाली. 

"असुदे! उद्या मी तुझी पट्टी बदलून देतो... लागलं असेल काहीतरी... काही काही वेळा नाही कळत आपल्याला लागलेलं... तू काळजी घे...." डॉ. विजय म्हणाले. 

"मला एक गोष्ट खटकतेय बाबा!" नियती म्हणाली. 

"कोणती?" डॉ. विजय नि विचारलं. 

"मला ईशा हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली होती तेव्हा तिचं आणि डॉक्टरांचं काहीतरी बोलणं झालं असणार पण, ती मला काही सांगत नाहीये आणि डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या गोळ्या जर काही विषबाधा झाली असेल तर त्यातून बरं होण्यासाठी देतात त्या आहेत.... मला काहीच कळत नाहीये... ईशा आणि सुशांत काहीतरी लपवतायत असं वाटतंय...." नियती म्हणाली. 

"असं काही नाही.... कदाचित तुला ज्या गोष्टीची ऍलर्जी आहे तीच गोष्ट तुला लागली असेल म्हणून सुद्धा हा डोस दिला असेल..... त्या गोळ्या ऍलर्जी कमी करण्यासाठी सुद्धा देतात हे विसरू नकोस...." डॉ. विजय पाठमोरे होऊन म्हणाले. 

"असेल! कदाचित मला माहित नसेल अजून मला कसली ऍलर्जी आहे ते... पण, ईशा नीट का काही सांगत नाही...." नियती म्हणाली. 

"बाळा का इतकं टेन्शन घेतेस? कदाचित डॉक्टरांनी तिला जे सांगितलं ते तिला नीट समजलं नसेल.... नको एवढा विचार करुस... जा जाऊन झोप... पुन्हा कार्यक्रमात दमून जाशील...." डॉ. विजय नियतीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. 

"ओके... तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं... झोपते मी आता.... तुम्ही सुद्धा लवकर झोपा... जास्त वेळ नका जागरण करू...." नियती म्हणाली. 

"हो! तू जा झोप... मी येतोच पाच मिनिटात...." डॉ. विजय म्हणाले. 

नियती पुन्हा खोलीत गेली.... डॉ. विजय तिथेच गच्चीच्या कठड्यावर हात टेकवून उभे होते... "काय सांगू बाळा... तुझ्या आणि सुशांत च्या जीवाला धोका आहे... बिच्छु गँग पकडली जात नाही तोवर मला काही झोप लागणार नाही..." ते मनात म्हणाले. 
*************************
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळं आवरून ईशा पोलीस स्टेशन ला जायला निघाली.... 

"काकू! मी येते दुपार पर्यंत... मोस्टली सगळी तयारी झाली आहे.... फक्त जरा काही एक्सट्रा सामान घेऊन येते...." ईशा म्हणाली. 

"हो... सांभाळून जा..." अनुजा म्हणाली. 

एवढ्यात दारावरची बेल वाजली.... अनुजा ने दार उघडलं.... सोनाली आली होती... 

"ये सोनाली..." अनुजा म्हणाली. 

"गुड मॉर्निंग मॅडम... नियती उठली कि नाही?" सोनाली ने विचारलं. 

"हो... उठली आहे.... आहे तिच्या खोलीत जा..." अनुजा म्हणाली. 

सोनाली नियती च्या खोलीत जायला निघाली... ईशा ने नजरेनेच नीट काळजी घे म्हणून खूण केली आणि ती बाहेर पडली....

ईशा पोलीस स्टेशन ला पोहोचली तर आधीच सगळे आलेले होते.... 

"जय हिंद सर!" ईशा सुयश सरांना सॅल्यूट करून म्हणाली. 

"केस मध्ये काही प्रोग्रेस?" सुयश सरांनी विचारलं.

"हो सर! मला त्या सदू च्या मित्राचा नंबर मिळाला आहे.... त्याच्या सांगण्यानुसार तो कामासाठी माणसं देतो... मी काल सुशांत ला मेसेज केला आहे, तो मॉल च्या सी. सी. टीव्ही च फुटेज घेऊन येतच असेल... शिवाय त्याच्याडे एक चिठ्ठी पण आहे कदाचित बिच्छु गँग ची आहे.... आणि हे कालचे रिपोर्ट्स..." ईशा म्हणाली. 

"ओके... तो नंबर दे" सुयश सर म्हणाले. 

ईशा ने तो नंबर दिला.... अभिषेक ने नंबर नोट करून घेतला आणि त्याचे डिटेल्स काढले..... त्यावरून त्यांना त्याच्या घरचा पत्ता मिळाला.... 

"अभिषेक, निनाद तुम्ही दोघं तिथे जा आणि या फोटोतल्या माणसाबद्दल चौकशी करून या...." सुयश सर म्हणाले. 

इतक्यात तिथे सुशांत आला.... 

"सॉरी सर थोडा उशीर झाला... या पेन ड्राईव्ह मध्ये सी. सी. टीव्ही च फुटेज आहे आणि हि चिठ्ठी..." सुशांत ती चिठ्ठी सुयश सरांना देत म्हणाला. 

सुयश सरांनी ती चिठ्ठी उघडली... त्यावर मेहंदी च्या डिजाईन ची प्रिंट होती.... 

"याचा काय अर्थ असेल?" विक्रम म्हणाला. 

"सर! आज नियती चा मेहंदी आणि संगीत चा कार्यक्रम आहे.... त्याच्याशी तर काही संबंध नसेल ना?" ईशा म्हणाली. 

"सर, आज आपल्याला तर तिथे जाता सुद्धा येणार नाही.... नियतीच्या घरी आज फक्त बायकांचा कार्यक्रम आहे.... आणि कार्यक्रम सुरु असताना कोणत्याही पुरुषाला एन्ट्री नाहीये.... त्यात जर आपण गेलो तर नक्कीच तिला संशय येईल...." सुशांत म्हणाला. 

क्रमशः.......
***************************
त्या मेहंदी च्या डिजाईन मध्ये काय असेल? सी.सी. टीव्ही च्या फुटेज मध्ये काही सापडेल का? या सगळ्या मागे सदू च्या मित्राचा हात असेल का? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा...

🎭 Series Post

View all