Login

मिस्टीरिअस मेसेज (भाग-५)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, नियतीच्या हाताला काहीतरी लागलं आहे आणि तिचा हात सुजायला लागला आहे.... त्यात ईशा ला कसली तरी चिठ्ठी सुद्धा मिळाली आहे... आता पुढे...)
*********************
"ओके... मी सुशांत ला तुझं लोकेशन कळवतो... तो सुद्धा आपल्याला मदत करतोय... तो तिथे आल्यावर नियती ला संशय येणार नाही याची काळजी घेऊन तो येईल तिथे!" सुयश सरांचा रिप्लाय येतो. 

नियती चा हात आता काळा - निळा पडायला सुद्धा लागेला असतो! दोघी रिक्षेतून उतरून तिथेच असणाऱ्या एका हॉस्पिटल मध्ये जातात... डॉक्टर नियती चा हात चेक करत असतात... ते तिला एक इंजेक्शन देतात त्यामुळे हाताचा तेवढा भाग बधिर होतो आणि तिला ग्लानी येते.... डॉक्टर सिरींज ने जखम झालेल्या भागातून काहीतरी बाहेर काढतात...

"सिस्टर तुम्ही ड्रेसिंग करून घ्या.... मी आलोच... मिस ईशा, जरा माझ्याबरोबर या..." डॉक्टर म्हणाले. 

ईशा आणि डॉक्टर बाहेर आले.... 

"काही सिरिअस आहे का डॉक्टर? काय झालंय नियती च्या हाताला?" ईशा काळजीत विचारत होती. 

"हो! तुम्ही यांना वेळेत आणलं नसतं तर कदाचित यांचा हात कापावा लागला असता... त्यांना झालेल्या जखमेतून विषबाधा झाली आहे..." डॉक्टर म्हणाले. 

"काय? डॉक्टर पण, आता ती सुखरूप आहे ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना?" ईशा ने विचारलं. 

"नाही... आता काही काळजीचं कारण नाही... मी त्यांच्या शरीरातून सगळं विष काढलं आहे.... थोड्यावेळात त्या शुद्धीवर येतील मग दोन तासांनी तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता..." डॉक्टर म्हणाले. 

एवढ्यात तिथे सुशांत आला... 

"काय झालं ईशा? नियती आता कशी आहे?" सुशांत काळजीने विचारात होता.

ईशा ने सगळं सांगितलं. सुशांत ने सुद्धा एकदा डॉक्टरांशी बोलून घेतलं आणि बाकी formalities करून घेतल्या... 

"मी डॉक्टरांना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं आहे, आणि त्यांच्या कडून नियतीचं ब्लड सॅम्पल आणि त्या जखमेतून मिळालेला द्रव मागितला आहे तेवढा तू फॉरेन्सिक लॅब मध्ये देशील?" ईशा ने विचारलं.

"अरे यात विचारायचं काय.... नक्की देईन..." सुशांत म्हणाला. 

"आणि हि चिठ्ठी! हि सुयश सरांना दे.... यावर विंचवाचे चित्र होते म्हणून मी पटकन नियतीच्या न कळत उचलली होती...." ईशा ती चिठ्ठी सुशांत ला देत म्हणाली. 

त्या चिठ्ठीत काय आहे हे दोघं बघणारच एवढ्यात नियती ला शुद्ध आली... म्हणून सुशांत ने पटकन ती चिठ्ठी खिशात घातली. 

"अरे सुशांत तू इथे कसा? ईशा तू बोलावलं का याला?" नियती म्हणाली. 

"नाही... माझं इथे काम होतं म्हणून आलो होतो... ईशा ला डॉक्टरांशी बोलताना तुझं नाव घेतलेलं ऐकलं म्हणून चौकशी केली तर तूच होतीस म्हणून मग थांबलो...." सुशांत ने कसंबसं सावरलं. 

"ओ... तुझी पोलिसी सवय काही जाणार नाही ना..." नियती त्याला चिडवत म्हणाली. 

"हम्म.... बरं ते जाऊदे.... तू मॉल मध्ये का गेलेली? मी हिला विचारलं पण काही बोलायला तयारच नाही!" सुशांत ईशा कडे बघत म्हणाला.

"ते मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते.... पण, ते गिफ्ट तुला उद्याच मिळणार... जर तू मेहंदी च्या कार्यक्रमात कोणाच्याही न कळत येऊन दाखवलंस तर..." नियती म्हणाली. 

"बरं बाबा ठीक आहे... तू आता थोडावेळ आराम कर अजून दीड तासाने आपल्याला घरी जाता येईल..." सुशांत म्हणाला. 

"पण, मला एवढं काय लागलं होतं? ईशा, डॉक्टर काय म्हणाले गं?" नियती म्हणाली. 

"काळजी करण्यासारखं काही नाही म्हणाले." ईशा म्हणाली. 

"तुला कोणी सांगितलं आहे नसते विचार करायला आता बरं आहे ना.... मग झालं तर..." सुशांत नियती ने अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून बोलला. 

एवढ्यात डॉक्टर आले.... त्यांनी नियती ला एकदा पुन्हा चेक केलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या.... तिघं आता जायला निघाले. 

"मी गोळ्या घेऊन येतो आणि सोडतो तुम्हाला दोघींना घरी..." सुशांत म्हणाला.

"अरे नको.. उगाच ट्रिपल सीट कशाला जायचं... एक काम कर, तू आणि नियती पुढे व्हा.. मी गोळ्या घेऊन येते रिक्षेने..." ईशा म्हणाली. 

"एक मिनीट! सुशांत तू का वाट वाकडी करतोयस? आम्ही दोघी जाऊ... आणि सुशांत बघू रे ते प्रिस्क्रिप्शन... कोणत्या गोळ्या आहेत..." असं म्हणत सुशांत च्या हातातून प्रिस्क्रिप्शन घेतलं. 

ईशा आणि सुशांत एक मेकांकडे बघत होते.... नियती ला काही संशय आला तर काय बोलायचं हे कळत नव्हतं! शेवटी ज्याची भीती होती तेच झालं.

"ईशा, सुशांत या गोळ्या तर काही विषबाधा झाली असेल तर घेतात... नक्की काय झालं होतं मला? ईशा खरं सांग, डॉक्टर काय म्हणाले?" नियती म्हणाली. 

"अगं आम्ही काय तुझ्यासारखे डॉक्टर आहोत का हे सगळं कळायला...." सुशांत सारवासारव करत होता. 

"एक मिनीट सुशांत! हि काही साधी गोष्ट नाहीये... ईशा बोल तू... काय म्हणाले डॉक्टर?" नियती थोडी नाराजीच्या सुरात बोलत होती. 

"मला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, काळजी करण्यासारखं काही नाही त्या लवकर बऱ्या होतील." ईशा म्हणाली. 

"ठीक आहे! मीच जाऊन विचारते." नियती पुन्हा आत जायला लागली. 

"थांब थांब... एवढं लगेच टेन्शन घेऊ नकोस... घरी आई वाट बघत असेल ना... आधीच उशीर झालाय... त्यांना काळजी वाटत असेल... आत नेटवर्क नव्हतं हे बघ त्यांचे आधीच दहा मिस कॉल्स येऊन गेलेत..." ईशा नियती ला मोबाईल दाखवत म्हणाली. 

तशी नियती पुन्हा माघारी वळली... सुशांत आणि ईशा ने सुटकेचा निश्वास सोडला. 

"आता तरी ऐक माझं! तू सुशांत बरोबर पुढे हो... मी मागून येते औषध घेऊन... काकूंनी विचारलं तर सुशांत भेटला त्याच्या सोबत होते असं सांग... आणि मी माझ्या कामासाठी बाहेर गेले असं सांग." ईशा म्हणाली. 

"हा! ईशा बरोबर बोलतेय.... नियती चल आपण निघू..." सुशांत म्हणाला. 

नियती ने प्रिस्क्रिप्शन ईशा ला दिले आणि ते दोघे निघाले. नियती आणि सुशांत गेल्यावर ईशा ने सुयश सरांना फोन करून सगळे अपडेट्स दिले आणि हॉस्पिटल मधून नियती चे सॅम्पल फॉरेन्सिक लॅब ला जातील हे सुद्धा सांगितलं.

"ओके.... उद्या पोलीस स्टेशन ला येऊन जा.... आणि आता अजून सावध रहा..." सुयश सर म्हणाले. 

"येस सर!" ईशा म्हणाली. 

फोन झाल्यावर ती गोळ्या घेऊन घरी गेली. सुशांत सुद्धा अजून घरीच होता... 

"नियती तू कधी आलीस?" ईशा काहीच माहित नसल्या सारखं दाखवत म्हणाली. 

"अगं ती आत्ताच आली... बस तू पण मी चहा करतेय मस्त चहा घेऊ.... तुझं काम झालं ना?" अनुजा म्हणाली. 

"हो!.. उद्या मला जरा बाहेर जायचं आहे... म्हणजे संध्याकाळ साठी थोडी तयारी करायची आहे त्यासाठी..." ईशा म्हणाली. 

"बरं... तू आहेस म्हणून तयारी च जास्त टेन्शन नाहीये बघ..." अनुजा म्हणाली. 

ईशा फक्त हसते... सगळे गप्पा मारत बसलेले असतात..... अनुजा चहा घेऊन येते... 

"नियती बाळा हाताला काय लागलं? पट्टी का बांधली आहे?" अनुजा नियतीला चहा देत होती तेव्हा तिच्या हाताची पट्टी पाहत बोलते. 

"काही नाही... ते हात दुखत होता म्हणून लेप लावून आले आहे..." नियती सांगते. 

"ठीक आहे... अजून दुखत असेल तर सांग... मी मॉलिश करून देते..." अनुजा काळजी पोटी बोलत असते.

"नाही आई, थांबेल आता... नको काळजी करुस..." नियती म्हणते. 

"चला मी येतो आता... नियती उद्या मेहंदी चा फोटो पाठव हा..." सुशांत वातावरण हलकं करायला बोलतो. 

"नाही! आपली डिल लक्षात ठेव...." नियती म्हणते. 

"काय? कसली डिल?" अनुजा काही न कळल्यामुळे बोलते. 

"काही नाही... ते आमचं सिक्रेट आहे... तुला नंतर सांगीन..." नियती म्हणते. 

"ठीक आहे चालू दे तुमचं... मी बाकी बघते..." अनुजा बाकी तयारी करायला जाते. 

क्रमशः.....
************************
आता पुढील भागात पाहूया, नियती च्या सॅम्पल मध्ये काय असेल.... त्या चिठ्ठीत काय असेल? तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all