मिस्टीरिअस मेसेज (भाग-३)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, डॉ. विजय ना ज्युस च सॅम्पल असणारा टिशू पेपर आणि धमकी ची चिठ्ठी टेस्ट साठी दिली आहे.... सुशांत सुद्धा पोलीस स्टेशन ला आला आहे... आता पुढे...)
***************************
सोनाली आणि सुशांत एकत्र पोलीस स्टेशन ला आले..... 

"अरे, सुशांत तू इथे कसा काय?" विक्रम ने विचारलं. 

"हो सांगतो! प्लिझ सुयश सरांना पण बोलवता का?" सुशांत म्हणाला. 

गणेश ने सुयश सरांना बोलावलं.... 

"सर, मी सुद्धा एक अंडर कव्हर कॉप आहे... तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका... मी सुद्धा तुमची मदत करेन...." सुशांत पोटतिडकीने बोलत होता.

"एक एक मिनीट... काय झालंय? सुयश सर म्हणाले.

"सर! मला माहितेय काल विक्रम ने माझा आणि नियती चा ज्युस बदलला.... नक्कीच काहीतरी घडलं असणार म्हणून ना..." सुशांत म्हणाला. 

"हो! तुला आणि नियती ला टेन्शन नको म्हणून आम्ही काही बोललो नव्हतो... आमच्या परीने सगळं करत होतो..." विक्रम म्हणाला. 

"पण, तुझ्या पारखी नजरेने बरोबर ओळखलं... ठीक आहे तू सुद्धा कर आमची मदत... पण, हा नियती ला काही कळू देऊ नकोस..." सुयश सर म्हणाले. 

"नक्की!" सुशांत म्हणाला. 

सुयश सरांनी त्याला जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं.... 

"बापरे! त्या बिच्छु गँग ची एवढी मजल गेली... हातात येऊ दे एकदा बरोबर त्या विंचवांच्या नांग्या ठेचतो!" सुशांत रागाने बोलत होता. 

"हो! हो! काळजी करू नकोस.... आणि शांत हो..... आपण कोणालाही काहीही होऊ द्यायचं नाही." विक्रम म्हणाला. 
**********************
इथे नियतीच्या घरी, ईशा आणि नियतीची आता चांगलीच मैत्री झालेली असते.... उद्या मेहंदी आणि संगीत चा कार्यक्रम असतो त्याची तयारी सुरु असते.... ईशा ने तयारी ला सुरुवात केलेली असते.... मेहंदी चा कार्यक्रम सुद्धा घरीच असल्यामुळे बैठक व्यवस्था कुठे असेल, खाण्या - पिण्याची व्यवस्था कुठे असेल, संगीतात नाचण्यासाठी मध्य भागी रिकामी जागा राहील अशी प्लॅनिंग ईशा ने केलेली असते आणि त्यानुसार सगळे डेकोरेटर्स कामाला लागलेले असतात.... 

"ईशा.... जरा चल ना माझ्याबरोबर.... इथे आता तू सांगितल्या प्रमाणे हे सगळे करतील कामं...." नियती म्हणाली. 

"हो! पण, कुठे जायचं आहे?" ईशा ने विचारलं. 

"मला सुशांत साठी गिफ्ट घ्यायचं आहे...." नियती थोडी लाजून म्हणाली. 

"ओ.... असं आहे तर...." ईशा सुद्धा तिला चिडवत म्हणाली. 

"थांब एक मिनीट मी आई ला सांगते.... आई... मी आणि ईशा जरा बाहेर जाऊन येतो..." नियती म्हणाली. 

"एक मिनीट! आत्ता कुठे जाताय? जरा संध्याकाळ होऊ दे ऊन ओसरलं कि जावा... तोपर्यंत कुठेही जायचं नाही." अनुजा ने बजावून सांगितलं. 

"हो! बरोबर आहे... आपण संध्याकाळी जाऊ..." ईशा म्हणाली. 

दोघींच्या पुढे नियातीचं काही चाललं नाही..... ती तिच्या खोलीत गेली आणि ईशा सदू वर लक्ष ठेवू लागली.... सदू ने त्याचा मोबाईल चार्जिंग ला लावलेला पाहून तिने त्याला मुद्दाम काहीतरी आणायच्या बहाण्याने बाहेर पाठवलं..... सदू गेल्यावर ती त्याचा मोबाईल चेक करू लागली.... पण, संशयास्पद असं काहीही नव्हतं... कदाचित मेसेज किंवा कॉल डिटेल्स डिलिट केले असतील म्हणून, तिने त्याच्या फोन वरून स्वतःला मेसेज केला आणि तो मेसेज डिलिट करून टाकला.... यामुळे तिला त्याचा फोन नंबर मिळाला.... एवढ्यात तिथे नियती आली.... 

"ईशा.... काय करतेयेस? चल ना माझ्या खोलीत..." नियती म्हणाली. 

नियतीने काहीही पाहिलं नाही म्हणून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या सोबत गेली.... 

"हे बघ... कालच्या फोटो आणि व्हिडिओ चा मेल आला आहे...." नियती म्हणाली. 

नियती ने लॅपटॉप ऑन केला आणि तिला साखरपुड्याचे फोटो दाखवायला लागली.... एवढ्यात, नियती ला तिच्या पार्लरवाली चा फोन आला म्हणून ती ईशा कडे लॅपटॉप देऊन गेली..... ईशाने सगळे फोटो आणि व्हिडिओ बघितले..... पण, त्यात नेमकं विक्रम सरांनी नियती आणि सुशांत चा ज्युस चा ग्लास बदलला होता हे सुद्धा कैद झालं होतं..... तिने पटकन ते स्वतःच्या पेन ड्राईव्ह मध्ये घेतले आणि तेवढा व्हिडिओ चा पार्ट ट्रिम करून ठेवला.... 

"कसा वाटला कालचा सोहळा?" नियती आत येत म्हणाली.

"खूप छान... मला ओळख करून दे ना या फोटो मधल्या सगळ्यांची..." ईशा म्हणाली. 

नियतीने तिला सगळ्यांची ओळख करून दिली... एव्हाना दुपार झाली होती... सगळे जण जेवले आणि आराम करायला आपापल्या खोलीत गेले..... ईशा ची व्यवस्था गेस्ट रूम मध्ये केली होती.... ती सुद्धा खोलीत आली.... आणि दार आतून लावून घेऊन सुयश सरांना फोन केला.... 

"सर! आज नियती ला फोटो च्या ई कॉपी मिळाल्या आहेत.... त्यातल्या काही मी माझ्याकडे घेतल्या आहेत त्या तुम्हाला पाठवते एकदा चेक करा.... आणि हा! मी त्या सदू चा मोबाईल नंबर मिळवला आहे, त्याचे कॉल डिटेल्स चेक करावे लागतील....." ईशा म्हणाली. 

"ओके! गुड जॉब.... पाठव सगळं.... आणि सावध रहा..." सुयश सर म्हणाले. 

ईशा चा फोन झाला तेवढ्यात डॉ. विजय तिथे आले.... 

"सर, तुम्ही अचानक?" सोनाली ने विचारलं. 

"हो! मी तो ज्युस चा टिशू चेक केला.... त्यामध्ये खूप हानिकारक ड्रग मिसळलं गेलं होतं! शिवाय त्याचा ओव्हर डोस त्यात मिक्स होता... ते जर नियती किंवा सुशांत ने घेतलं असतं तर, आतल्या आत रक्तस्त्राव होऊन काहीही घडलं असतं!" डॉ. विजय खूप चिंतेत येऊन बोलत होते....

"काय? एवढं भयानक ड्रग?" निनाद म्हणाला. 

"हो! ते असं एक ड्रग आहे जे एकदा जरी घेतलं तरी त्याची लत लागते..... मग त्यातून बाहेर पडणं महाकठीण काम! आणि यात तर ओव्हर डोस होता...." डॉ. विजय च्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं...

"तुम्ही आधी बसा इथे..." सुयश सर म्हणाले. 

"आत्ता कुठे सगळं नीट होत होतं तर हे काय मागे लागलं?" डॉ. विजय म्हणाले. 

सगळ्यांनी त्यांना कसंबसं शांत केलं.... 

"नका काळजी करू..... कोणालाही काहीही होणार नाही.... आपण कोणाला काही होऊ द्यायचं नाही...." अभिषेक म्हणाला. 

"बरं मला सांगा, त्या लिंबाच्या रसाच्या चिठ्ठी वरून काही समजलं का?" विक्रम ने विचारलं. 

"नाही.... त्यावर फक्त तुमच्या सगळ्यांचेच बोटांचे ठसे आहेत.... बहुतेक ग्लोज घालून त्या माणसाने चिठ्ठी ठेवली असणार...." डॉ. विजय म्हणाले. 

"ओके.... आपल्याला आता एवढं तरी समजलं आहे, त्या माणसाला ड्रग मधलं खूप काही समजतं.... सोनाली, आपल्या रेकॉर्डस् मध्ये एकदा चेक कर, कोणी ड्रग डीलर बिच्छु गँगशी मिळालेला आहे का.... किंवा आत्ता रिसेन्टली कोणी जेल मधून सुटलं आहे का..." सुयश सर म्हणाले. 

"येस सर!" सोनाली सॅल्यूट करून रेकॉर्ड चेक करायला गेली... 

"सर! तुम्ही पण काही काळजी न करता लॅब मध्ये जावा.... फक्त जरा सावध रहा... आम्ही आहोत ना..." विक्रम म्हणाला.

डॉ. विजय सुद्धा पुन्हा लॅब मध्ये गेले.... एवढ्यात ईशा ने मेल केलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ सुयश सरांना मिळाले.... 
क्रमशः.....
************************
ईशा ने मेल केलेल्या फोटो, व्हिडीओज मधून काही हाती लागेल का? सदू च्या कॉल डिटेल्स मध्ये काही संशयास्पद आढळेल? आता संध्याकाळी नियती आणि ईशा बाहेर जाणार आहेत तेव्हा काही घडेल का? कि, मेहंदी च्या कार्यक्रमात काही घडेल? पाहूया पुढच्या भागात..... 
तुम्हाला काय वाटतंय काय होईल पुढे? कमेंट मध्ये नक्की सांगा.... 

🎭 Series Post

View all