मिस्टीरिअस मेसेज (भाग-२०)

Finding codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-२०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं; सदू या सगळ्यांचा बॉस आहे.... आजी आजोबांचं खरं रूप आता डॉ. विजय आणि अनुजा ला समजलं आहे.... आता पुढे...)
******************************
"आम्ही तुमच्यावर इतका विश्वास ठेवला होता, नियती सुद्धा तुम्हाला खूप मानायची! एवढी आपुलकीने तिने तुमची काळजी घेतली.... तुम्ही सुद्धा तिला कधी परकं मानलं नाही... स्वतः पेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर होता...  आता तिला सत्य समजेल तेव्हा काय वाटेल? बिचारी आतून तुटून जाईल... का केलंत असं? बोला ना..." अनुजा ने रडत रडत आजी आजोबांना विचारलं. 

आजी आजोबा काहीही बोलले नाहीत.... 

"जाऊदे गं! इथे आपलंच नाणं खोटं आहे तर आपण दुसऱ्या ला काय विचारतोय? हा हा सदू.... एवढी वर्ष आपल्याकडे काम करतोय.... कधी आपल्याला याच्या वर संशय आला? नाही... त्या पोरी साठी तर सगळी दुनियाच नवीन होती... आपण एवढे चार पावसाळे जास्त बघून सुद्धा आपल्याला माणसांची खरी ओळख पटली नाही.... आपण या सदू ला नेहमी आपल्या कुटुंबातलंच  समजलं... आणि त्याने हे असं केलं.... अरे बोल ना आता तरी... आमचं काय चुकलं? कुठे कमी पडलो आम्ही?" डॉ. विजय नी सदू ची कॉलर धरून विचारलं. 

सुयश सरांनी त्यांना सावरत कसंबसं बाजूला केलं.  

"मी आधी पासूनच बिच्छु गँग साठी काम करत होतो.... असं नोकर बनून काम करणं सोपं जायचं.... कोणाला कळू नये म्हणून एक प्रायव्हेट नंबर घेऊन ठेवला होता... बाहेर असताना मी तोच वापरायचो... खोटे पासपोर्ट आणि बाकी आय.डी. प्रूफ बनवून कसाबसा तो नंबर घेतला होता... मला माहित होतं उद्या माझे कॉल डिटेल्स किंवा बँक अकाउंट तपासलं जाईल म्हणून ते सुद्धा खोट्या ओळखीने वेगळंच बनवलं होतं! तुम्हाला मी इजा पोहोचवली नसती पण, आमचं रॅकेट उघडं पडलं आणि माझी सगळी कमाई संपली..." सदू बोलत होता... 

"आम्ही तुला चांगला पगार देत होतो ना... शिवाय जास्तीचे पण पैसे द्यायचो... मी तर तुला दर रक्षाबंधनाला राखी बांधायचे.... चांगलं ऋण फेडलंस राखी च... बहिणीचाच आनंद बघवला नाही का?..." अनुजा ने रडत रडत विचारलं. 

ईशा ने तिला सावरलं... पाणी दिलं आणि सोफ्यावर बसवलं. 

"हो देत होतात ना पगार... पण, तो लाखोंमध्ये नव्हता ना... राखी बांधून, आपुलकी ची वागणूक देऊन मला सगळ्या सुख सोयी मिळणार होत्या का? नाही.... त्यासाठी तर पैसेच हवे ना? मला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनायचं होतं.... आणि हा देश सोडून दुसरीकडे जायचं होतं... मग माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता!" सदू म्हणाला. 

सदू च्या बोलण्यातून त्याला जराही पश्चाताप झालाय असं वाटत नव्हतं! त्याच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त लोभाची पट्टी बांधली गेली होती.... 

"जाऊदे सर, तुम्ही याला आमच्या नजरे समोरून घेऊन जा...." डॉ. विजय म्हणाले. 

निनाद त्यांना घेऊन गेला.... ईशा सुद्धा पोलीस आहे हे सुद्धा डॉ. विजय नी अनुजा ला सांगितलं. अनुजा ला धूसर कल्पना होती त्या नंतर जे काही घडलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं.

"थँक्स सर... तुम्ही माझ्या मुलीला प्रत्येक संकटापासून वाचवलं..." अनुजा हात जोडून म्हणाली. 

"असं काही नाही... ती आमची ड्युटी आहे... यात डॉ. विजय नी सुद्धा आमची मोलाची साथ दिली..." सुयश सर म्हणाले. 

"आता कसलीच काळजी न करता स्वतःला त्रास करून न घेता आराम करा... आम्ही येतो.." ईशा म्हणाली. 

सगळे पोलीस स्टेशन ला आले.... थोड्याच वेळात अभिषेक आणि सोनाली सुद्धा आले... त्यांच्या सोबत मनोज आणि सिक्युरिटी गार्ड ची फॅमिली होती.... ते एकमेकांना भेटले... 

"सर, तुमचा अंदाज खरा होता.... त्या बाजूच्या घरात एका खोलीत सगळ्यांना बांधून ठेवलं होतं..." अभिषेक ने सांगितलं. 

"सर, यात यांची काहीच चूक नाही ओ... यांना का जेल मध्ये ठेवलंय?" मनोज च्या बायको ने विचारलं. 

"यांनी गुन्हा करायला साथ दिली आहे.... हे दोघं वेळेत आमच्याकडे मदतीसाठी आले असते तर हे सगळं घडलंच नसतं! यांना शिक्षा होणारच! पण, मी स्वतः प्रयत्न करीन माफीचा साक्षीदार म्हणून या दोघांची शिक्षा कमी करण्याचा... आता तुम्ही सगळे घरी जा.... जास्त वेळ तुम्हाला इथे थांबता येणार नाही..." सुयश सर म्हणाले. 

सुयश सरांच्या बोलण्यामुळे मनोज आणि सिक्युरिटी गार्ड च्या कुटुंबाला थोडा धीर आला... गणेश स्वतः त्यांना घरी सोडायला गेला.
*****************************
सुशांत च्या घरी नियतीचं अगदी दणक्यात स्वागत झालं.... घर सुद्धा छान फुलांनी आणि लाईट्स च्या माळांनी सजवलं होतं.... थकवा जाण्यासाठी सगळे चहा घेत होते.... थोड्यावेळाने सुशांत चे सगळे मित्र गेले... आता घरात फक्त हे चौघं आणि त्यांच्या कडे काम करणाऱ्या रमा ताई होत्या... 

"नियती! आता हे तुझंच घर आहे.... तुला हवे तसे तू बदल कर... आज खूप थकला असाल दोघं... जा आता थोडावेळ आराम करा..." सुशांत ची आई म्हणाली. 

"सुशांत! नियती ला तिच्या बॅग ठेवायला मदत कर... तिला सगळं घर दाखव... आणि आत्ता काही काम करत बसू नका नंतर निवांत करा..." सुशांत चे बाबा म्हणाले. 

"हो बाबा.... डोन्ट वरी..." सुशांत म्हणाला. 

"आणि ताई तुम्ही कसली काळजी करायची नाही... काय हवं नको मला सांगायचं! मी लगेच देईन बघा..." रमा म्हणाली. 

"बरं... तुम्ही मला नावाने हाक मारलीत तरी चालेल.... माझ्या मोठ्या बहिणी सारख्या आहात तुम्ही..." नियती म्हणाली. 

"असं कसं? तुम्ही एवढ्या मोठ्या फिरेनसिक का काय त्या डाक्टर आहात मग..." रमा म्हणाली. 

"फॉरेन्सिक डॉक्टर मी घराच्या बाहेर... घरात फक्त आणि फक्त नियती...." नियती म्हणाली. 

"ते बघू आपण नंतर... आत्ता जा तुम्ही आराम करा..." रमा म्हणाली. 

"हो... सुशांत, नियती जा बाळांनो चेंज करा आणि फ्रेश होऊन या..." सुशांत ची आई म्हणाली. 

सुशांत नियती ला घेऊन खोलीत आला.... 

"ऐक ना सुशांत! सुयश सरांना जरा फोन कर ना.... त्या बिच्छु च काय झालं विचारायला हवं ना?" नियती म्हणाली. 

"हो मी करतो फोन... तू जा तोपर्यंत तुझं आवर..." सुशांत म्हणाला.

नियती आवरायला गेली तेव्हा लगेच त्याने सुयश सरांना फोन केला.... सुयश सरांनी जे घडलं होतं ते सगळं सांगितलं. 

"बापरे! आजी आजोबा आणि सदू? नियती ला खूप त्रास होणार आहे...." सुशांत म्हणाला. 

"हम्म... पण, तिला जेवढं लवकर कळेल तेवढं बरंय... तू तिला व्यवस्थित पणे सांग..." सुयश सर म्हणाले.

"ओके..." सुशांत म्हणाला. 

सुशांत चा फोन होई पर्यंत नियती आवरून आली होती.... 

"काय रे काय म्हणाले सर?" नियती ने विचारलं. 

सुशांत ने तिला आधी बसायला सांगितलं... आणि मग बोलायला सुरुवात केली; "बघ नियती, मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीस हे प्रॉमिस कर... मी जे काही सांगतोय ते शांत पणे ऐक..." असं म्हणून त्याने सगळं सांगितलं. 

"काय? सुशांत! सुयश सरांचा काही गैरसमज नाही होते ना? आई - बाबा? त्यांना काय वाटलं असेल हे ऐकून? किती त्रास होत असेल त्यांना?" नियती ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवून रडत रडत म्हणाली. 

"शांत हो आधी.... स्वतःला त्रास नको करून घेऊस... थोड्यावेळाने तू स्वतः घरी फोन करून बोल... आणि तुला आता स्ट्रॉंग राहिलं पाहिजे.... तू जर अशी इमोशनल झालीस तर आईंना पण त्रास होईल... आपल्या कामात हे असे प्रसंग येत राहतात... मला तुझं दुःखं समजतंय... पण, आपणच असं वागलो तर आई बाबा कोणाकडे बघतील?" सुशांत नियती ला शांत करत म्हणाला. 

थोड्यावेळाने नियती सावरली... 

"तू म्हणतोयस ते बरोबर आहे.... मला असं रडत बसून नाही चालणार... मी बाबांना फोन करते... त्यांना आता मलाच सावरलं पाहिजे..." नियती म्हणाली. 

तिने डॉ. विजय ना फोन लावला.... अनुजा सोबत सुद्धा बोलली... नियती सगळं धीराने घेतेय म्हणल्यावर डॉ. विजय आणि अनुजा ला सुद्धा सावरायला मदत झाली.... हे बोलून झाल्यावर थोडं विषय पालट होण्यासाठी नियती ने तिचं आज घरात झालेल्या स्वागताबद्दल सांगितलं आणि उद्याच्या पूजेचं निमंत्रण दिलं... 

दुसऱ्या दिवशी पूजा सुद्धा छान पार पडली.... या सगळ्या प्रकारातून प्रत्येक जण आता सावरत होता... कोणालाही त्या कटू आठवणी नको होत्या... सगळे मागचं सगळं विसरून छान एन्जॉय करत होते.... 

"हा तुमचा लग्नाचा आहेर.... मस्त आता आठवडाभर केरळ ला फिरून या..." डॉ. विजय त्यांच्या हातात टूर च पॅकेज देत म्हणाले. 

"कशाला बाबा? मी आता दोन दिवसात लॅब जॉईन करणार होते...." नियती म्हणाली. 

"ते काही नाही... आमचं ऐकावंच लागेल तुला..." अनुजा म्हणाली. 

शेवटी नियती आणि सुशांत तयार झाले.... त्यांची मस्त पैकी ट्रिप सुद्धा झाली.... आता बिच्छु गँग च्या प्रकरणातून सगळे सावरले होते... शेवटी देशाच्या युवा पिढीला नको त्या व्यसनांच्या दरीत अडकवणारी बिच्छु गँग गजाआड गेली होती.... आपण विश्वास ठेवलेल्या माणसांनी असं केलं म्हणून मनात थोडी सल असली तरी वेळच औषध बनून शेवट गोड केला होता... 

समाप्त. 
******************************
                    वाचक संवाद 
आपली हि मिस्टीरिअस मेसेज कथा सुद्धा संपली.... कथेचा मूळ उद्देश बिच्छु गँग ला पकडलेलं दाखवायचं होता... म्हणून बाकी गोष्टींवर जास्त भर दिलेला नाही.... तुम्हाला हि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.... लवकरच आता अश्या थरारक कथा येतील तेव्हा सुद्धा आपली हि सुयश सरांची टीम कायम असेल.... आता तुमची या पात्रांची चांगली ओळख झाली आहे.... म्हणून ही पात्र तशीच राहील... काही वेळा नवीन ऑफिसर्स ची एन्ट्री होईल... आणि पुन्हा अश्याच थरारक रहस्य असलेल्या कथा वाचायला मिळतील. 
धन्यवाद. 

🎭 Series Post

View all