मिस्टीरिअस मेसेज (भाग-१९)

Finding codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण आजी आजोबांचं खरं रूप पाहिलं... सुयश सरांनी निनाद आणि गणेश ला काहीतरी खास काम दिलं आहे.... कुणाल ने दिलेल्या खोट्या बातमीचा घाव अगदी वर्मी लागला आहे.... आता पुढे...)
****************************
कार्यालायत आता जवळ जवळ सगळा कार्यक्रम आटोपलेला असतो! संध्याकाळचे चार वाजलेले असतात... थोड्याच वेळात आता पाठवणी होणार असते.... त्याआधीचं फोटो सेशन सुरु असतं! 

"आपण थोडा वेळ अजून थांबूया.... आजी आजोबा आणि सुयश सरांची टीम आली की त्यांच्या सोबत सुद्धा एक फोटो सेशन करूया..." अनुजा म्हणाली. 

"मी सोनाली ला फोन करून बघते आणि बोलावते...." असं म्हणून ईशा फोन करायला बाजूला गेली. 

ईशा ने सुयश सरांना फोन करून सगळं सांगितलं. 

"ओके.... आम्ही येतोय.... तसंही तुला सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यानुसार पुढच्या हालचाली करायच्या आहेत!" सुयश सर म्हणाले. 

ईशा च फोन वर बोलणं झाल्यावर तिने अनुजा ला ते सगळे थोड्याच वेळात येतायत म्हणून सांगितलं. 
******************************
       निनाद आणि गणेश मॉल मध्ये पोहोचले होते.... मनोज बरोबर निनाद होता आणि सिक्युरिटी गार्ड सोबत गणेश! निनाद आणि मनोज टेरेस वर गेले... तिथे एक काळ्या रंगाची ब्रिवकेस त्यांना दिसली.... निनाद ने मनोजला ती उचलून आणायला सांगितली... निनाद च्या सांगण्याप्रमाणे त्याने ती बॅग आणली आणि उघडली! त्यात जे काही होतं ते बघून मनोज भीतीने थर थर कापायला लागला... निनाद ने त्याच्या हातातून बॅग घेतली आणि त्याला शांत करून तुला काहीही होणार नाही म्हणून आश्वास्थ केलं! दोघं जण पुन्हा खाली आले.... गणेश आणि सिक्युरिटी गार्ड सुद्धा बाहेर उभे होते.... सिक्युरिटी गार्ड सुद्धा बऱ्यापैकी घाबरलेला होता..... 

"आम्ही दोघं पुढे होतोय.... आमच्या मागून या..." निनाद ने त्या दोघांना सांगितलं. 

निनाद आणि गणेश पुढे चालत होते... त्यांच्या मागून थोडं अंतर ठेवून मनोज आणि सिक्युरिटी गार्ड येत होते.... थोडं चालल्यावर ते त्यांच्या ठिकाणी पोहोचले. 

"सर, आपण हे कुठे आलोय?" मनोज ने विचारलं. 

"कळेल... तुमच्या सुरक्षेसाठीच आम्ही जे सांगतोय ते करा... तुमच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसता कामा नये... आम्ही दोघं तुमच्या बरोबर असू..." गणेश म्हणाला. 
****************************
इथे कार्यालयात सुयश सर, त्यांची टीम आणि आजी आजोबा आले..... 

"या या... काय हे तुमच्या नातीचं लग्न आणि तुम्हीच नाही..." अनुजा आजींना म्हणाली. 

"वयाप्रमाणे तब्येतीच्या कुरबुरी! म्हणून घरी गेलो होतो..." आजी म्हणाल्या. 

"पण आता बरं आहे ना? थोडावेळ बसा मग आपण फोटो सेशन करूया..." अनुजा म्हणाली. 

"हो.. बरं आहे आता.." आजी म्हणाल्या. 

त्यांना बसवून अनुजा पुन्हा नियती जवळ गेली... सोनाली ने ईशा ला बाजूला बोलावून आजी आजोबांबद्दल सगळं सांगितलं. 

"अगं मग हे दोघं इथे?" ईशा ने विचारलं. 

"अनुजा मॅडम ना आणि नियती ला एवढ्या आनंदाच्या क्षणी काही त्रास नको म्हणून त्यांना इथे आणलं आहे... शिवाय त्यांच्या बॉस ला गाफील ठेवायचं आहे ना... गणेश आणि निनाद एका स्पेशल कामासाठी गेले आहेत... ते काम झाल्याची खात्री पटणारा फोन या दोघांना येईल तेव्हा यांची आपल्याला गरज पडेल..." सोनाली ने ईशा ला सगळं समजावून सांगितलं. 

"शेवटी आपला संशय खरा ठरला.... आजी आजोबा यात सामील आहेत!" ईशा निराश होत म्हणाली. 

"हो गं! मला सुद्धा नियती साठी वाईट वाटतंय... पण, आपण काही नाही करू शकत... तू तिला आत्ताच काही कळू देऊ नकोस..." सोनाली म्हणाली. 

"हो... ड्युटी फर्स्ट!" ईशा म्हणाली. 

दोघी पुन्हा सगळ्यांमध्ये सामील झाल्या. फोटो शूट ला सुरुवात झाली.... सुयश सरांची टीम आणि आजी आजोबा तिच्या खास जवळचे होते म्हणून भरपूर फोटो काढायचे होते... 

"सर, निनाद आणि गणेश? ते दिसत नाहीयेत!" नियती ने विचारलं. 

"तुला माहितेय ना आपलं काम कसं असतं! एक चोरांची टोळी सक्रिय झाली आहे त्यांची माहिती काढायला गेलेत ते दोघं...." सुयश सर म्हणाले. 

"ओके.." नियती म्हणाली. 
*****************************
आता पाच वाजत आले होते.... निनाद आणि गणेश ने त्या दोघांना व्यवस्थित तयार केलं होतं... एका सामसूम गोडाऊन च्या पत्त्यावर त्या दोघांना बोलावलं होतं... ते दोघं बॅग घेऊन निघाले होते... गणेश आणि निनाद अंतर ठेवून त्यांच्या सोबत होतेच! बरोब्बर ५ वाजता ते पोहोचले! तिथे पोहोचल्यावर त्या चिठ्ठीत जसं लिहिलं होतं अगदी तसंच दोघांनी केलं.... एक मेकांसमोर आल्यावर मनोज आणि सिक्युरिटी गार्ड ने एक मेकांवर गोळी झाडली... दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले.... निनाद ने या बद्दल लगेच सुयश सरांना मेसेज करून सांगितलं. 

"ग्रेट! त्या दोघांचे फोटो काढ आणि मला पाठव.... पुढे काय करायचं हे तुला माहित आहेच!" सुयश सरांचा रिप्लाय आला... 

निनाद ने लगेच फोटो पाठवला.... 

सुयश सरांना फोटो मिळाल्यावर त्यांनी आजींच्या मोबाईल मध्ये तो ट्रान्सफर केला... एव्हाना आता सगळा कार्यक्रम झालेला असतो! नियती ची पाठवणी सुरु असते! अनुजा, आजी, डॉ. विजय सगळ्यांना मिठी मारून नियती खूप रडत असते... अनुजा आणि सुशांत ची आई तिला सावरतात.... 

"अगं एवढी स्ट्रॉंग मुलगी तू.... बास आता... थोड्या दिवसात तुझ्या बाबांना रोज भेटशील की लॅब मध्ये... आणि आजचं ठीक आहे हा.. पुन्हा तू रडायचं नाही...." सुशांत ने तिला समजावलं. 

नियती, सुशांत आणि त्याच्या घरचे गाडीतून घरी जायला निघाले.... 

"चला आता आम्ही पण येतो... सगळा कार्यक्रम छान झाला..." आजी म्हणाल्या. 

"हो... आम्ही पण निघतो आता... आजी आजोबांना घरी सोडून जातो..." सुयश सर म्हणाले. 

"चालेल... तुम्ही सगळे तुमच्या एवढ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आलात बरं वाटलं..." अनुजा सुयश सरांचे आभार मानत म्हणाली. 

ईशा मागची सगळी मदत करायला कार्यालयात थांबली... बाकी सगळे निघाले.... 

"हा तुझा फोन... बॉस ला आत्ताच्या आत्ता काम झाल्याचा फोटो पाठव..." सुयश सर केसी ला म्हणाले. 

केसी ने फोटो पाठवल्यावर समोरून त्या माणसाचा प्रायव्हेट नंबर वरून फोन आला... 

"चला एक काम तरी नीट केलंत! तुमचा मोबदला तयार आहे.... तुमच्या समोरच्या घरात येऊन भेटा...." तो माणूस एवढं बोलला आणि फोन कट केला. 
****************************
सगळेजण त्याने सांगितल्याप्रमाणे त्या घराच्या इथे आले.... सुयश सरांची टीम बाहेरच होती... 

"या.... या... आलात... तुमच्या सारख्या लोकांमुळेच बिच्छु गँग मोठी होतेय.... थांबा तुम्हाला तुमचा मोबदला देतो...." खुर्चीवर पाठमोरा बसलेला त्यांचा बॉस बोलत होता... 

तोपर्यंत मागून मनोज आणि सिक्युरिटी गार्ड आले होते आणि लपून बसले होते..... बॉस ने खुर्ची वळवली.... 

"हे घ्या तुमचा मोबदला...." असं म्हणून त्याने गन दोघांवर रोखली. 

"बॉस? आम्ही तर तुम्ही म्हणालात तसं केलं ना?" केसी म्हणाली. 

"तुम्हाला दोघांना जिवंत ठेवून काय मी मरु का?.... सॉरी पण तुम्हा दोघांची मुक्ती आता निश्चित!" बॉस म्हणाला. 

तो त्या दोघांना गोळी मारणार एवढ्यात मनोज आणि सिक्युरिटी गार्ड बाहेर आले.... 

"काय एवढा मोठा दगा? आता तर तुम्ही कोणीच वाचत नाही...." बॉस रागात म्हणाला. 

गोळी चालवण्याचा आवाज आला.... सगळ्यांनी घाबरून डोळे बंद करून कानावर हात ठेवला होता.... पण, बॉस च्याच ओरडण्याचा आवाज आला तेव्हा सगळ्यांनी बघितलं.... विक्रम ने बाजूच्या घरातून गुप्त दाराने येऊन बॉस च्या हातावर गोळी मारली होती... त्या आवाजाने सगळे जण आत आले... विक्रम ने बॉस ला धरून ठेवलं होतं.... 

"सर, हे तर सदू काका... डॉ. विजयंच्या घरी काम करतात..." सोनाली म्हणाली. 

"हम्म... मला याच्यावर संशय होताच! ज्या ताटात जेवला त्यातच छिद्र केलं..." सुयश सर म्हणाले. 

"हे.... हे.... कसं शक्य आहे? कार्यालयात तर स्मोक बॉम्ब अटॅक झाला होता ना... आणि हे दोघं यांनी तर एकमेकांना मारलं होतं ना..." सदू म्हणाला. 

"तुला काय वाटलं? हुशारी फक्त तुलाच जमते..." विक्रम म्हणाला. 

"स्मोक बॉम्ब च म्हणशील तर या दोघांना आम्ही तेव्हाच पकडलं होतं.... आणि खोटी बातमी प्रसारित केली.... जेव्हा तू कार्यालयात कुठे दिसत नव्हतास तेव्हाच तुझ्यावर आमचा संशय वाढत गेला..." सुयश सर म्हणाले. 

"तुझा प्लॅन आमच्या सरांनी आधीच ओळखला होता.... या दोघांसोबत आम्ही होतोच! मॉल मध्ये जेव्हा बॅग उघडली तेव्हा त्यातली गन आणि चिठ्ठी बघून आमची खात्री पटली या दोघांना तुला तुझ्या वाटेतून बाजूला करायचं आहे..... मॉल मधून निघून आम्ही एका आमच्या स्पेशल जागी गेलो.... या दोघांना बुलेट प्रूफ जॅकेट घातलं, आत लाल रंगाच्या पिशव्या ठेवल्या आणि तू दिलेल्या पत्त्यावर गेलो... तुझ्या सांगण्याप्रमाणे या दोघांनी एक मेकांवर गोळी चालवली... त्याचा फोटो मीच काढला आणि तोच तुला मिळाला..." निनाद म्हणाला. 

"एवढं मोठं कारस्थान? बिच्छु गँग शी पंगा?" सदू म्हणाला. 

"तू केलं ते काय होतं मग? या दोघांचं कुटुंबं कुठे आहे?" विक्रम ने त्याच्या सणसणीत कानाखाली मारून विचारलं. 

"ते तर मी कधीच नाही सांगणार...." सदू म्हणाला. 

सुयश सरांनी अभिषेक आणि सोनाली ला काहीतरी खूण केली... 

"विक्रम! आपण याला घेऊन आता डॉ. विजयंच्या घरी जाऊया.... हा त्यांचा सगळ्यात मोठा अपराधी आहे..." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक आणि सोनाली सोडून बाकी सगळे निघाले. 
******************************
ईशा, डॉ. विजय आणि अनुजा घरी पोहोचले होते...... 

"छान झाला ना आजचा कार्यक्रम.... लग्न अगदी निर्विघ्न पणे पार पडलं....  पण, सदू कुठे दिसला नाही... आहे कुठे तो?" अनुजा म्हणाली. 

"काय माहित! मी पण त्यांना दिवसभर बघितलं नाहीये...." ईशा म्हणाली. 

"असेल इथेच कुठेतरी.... आपण घाईत होतो म्हणून आपल्या लक्षात नसेल आलं...." डॉ. विजय म्हणाले. 

इतक्यात सुयश सरांची टीम आली... सोबत सदू, आणि आजी आजोबा होतेच! 

"सर तुम्ही? सदू तू यांच्या बरोबर?" अनुजा ने विचारलं. 

"हो!" सुयश सरांनी जे घडलं होतं ते सगळं सांगितलं. आजी आजोबांबद्दल सुद्धा खरं समजल्यावर त्या दोघांना त्रास झाला... 

क्रमशः....
**************************
सदू ने असं का केलं असेल? सोनाली आणि अभिषेक कुठे गेले असतील? मनोज आणि सिक्युरिटी गार्ड च कुटुंबं सुखरूप असेल ना? पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all