मिस्टीरिअस मेसेज (भाग-१८)

Finding codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, सुयश सर आणि निनाद आजी आजोबांच्या घरा बाहेर आहेत! अभिषेक आणि गणेश ला त्या पासवर्ड वाल्या लॉकर मधून खोटे पासपोर्ट, विग आणि कसली तरी चावी मिळाली आहे... आता पुढे..)
***************************
कुणाल ला जे काम सांगितलं होतं त्या नुसार त्याचे एडिटिंग करून झाले होते..... 

"सर! माझं सगळं एडिटिंग करून झालं आहे... मी बातमी प्रसारित करायला घेतोय..." कुणाल ने सुयश सरांना फोन करून सांगितलं. 

"हो! लगेच घे..." सुयश सर म्हणाले. 

ठरल्याप्रमाणे कुणाल ने लगेच बातमी प्रसारित केली.... थोड्याच वेळात ती बातमी पूर्णतः पसरली... कोणी दुसरे पत्रकार तिथे जाऊ नये म्हणून त्या कार्यालयाच्या आजूबाजूने Do not enter च्या फिती लावल्या होत्या.... एक खोटी अँबुलन्स सुद्धा तिथे उभी केली होती.... अभिषेक आणि गणेश स्वतः तिथे कोणीही आत येणार नाही याची काळजी घ्यायला उभे होते... समोरची सगळी प्रवेश दारं बंद करून टाकली होती.... आणि कार्यालय आता पोलिसांनी सील केलंय असं सांगण्यात आलं. बाकी पत्रकारांना आत प्रवेश न देता, नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं सांगण्यात येईल असं सांगून कसंबसं वीस मिनिटात तिथून परत पाठवलं.... 

"सर! पत्रकार गेले... आता पुन्हा आपण लाईट चालू करू शकतो..." अभिषेक म्हणाला. 

"हो! एकदा खात्री करून घे कोणी तिथे नाहीये ना त्याची आणि कर सुरु..." विक्रम म्हणाला. 

बाहेर कसले आवाज जाऊ नये म्हणून गणेश ने तिथला मेन स्विच बंद करून ठेवला होता.... आणि जनरेटर ची सुद्धा वायर काढून ठेवली होती... काहीतरी लाईट मध्ये प्रॉब्लेम झाला आहे.... लवकरात लवकर पुन्हा सगळं सुरु होईल असं ईशा ने सांगून सगळं सावरलं होतं... 


"सर! आता हे एक काम झालं... पुढे?" सोनाली ने विचारलं. 

"वाट बघायची... नियतीशी बोलल्याशिवाय पुढचं काही करता येणार नाहीये..." विक्रम म्हणाला. 
***************************
दुसरीकडे सुयश सर आणि निनाद आड वाटेला गाडी उभी करून बाहेर लक्ष ठेवून होते... 

"सर, ते बघा... कोणीतरी त्या बाजूच्या घरातून बाहेर येतंय..." निनाद म्हणाला. 

"हम्म.. बातमीचा परिणाम तर झालाय... चेहरा नीट दिसत नाहीये... बघूया पुढे काय होतंय..." सुयश सर म्हणाले. 

इतक्यात मॉल मॅनेजर मनोज चा फोन वाजला.... 

"सर, या मॅनेजर चा फोन... प्रायव्हेट नंबर वरून फोन आहे..." निनाद मनोज चा मोबाईल सुयश सरांना दाखवत म्हणाला. 

"मनोज! हा फोन उचल... कदाचित त्या माणसांचा फोन असू शकतो... त्याला काहीही कळू द्यायचं नाही... फोन स्पीकर वर ठेव आणि एकदम नॉर्मल बोल..." सुयश सर मनोज ला फोन देत म्हणाले. 

मनोज ने फोन उचलला... 

"हॅलो... कोण?" मनोज ने विचारलं. 

"कोण, कुठला हे महत्त्वाचं नाहीये.... तुला तुझं कुटुंबं जिवंत हवं आहे की नाही एवढं सांग..." समोरचा व्यक्ती म्हणाला. 

"हो! हो! पण...." मनोज घाबरून बोलत होता.

त्याला तोडत तो माणूस म्हणाला; "ए गप.... तू तुझं काम चोख केलंय... म्हणून मी खुश आहे.... आता अजून एक काम करायचं... कार्यालयातून निघून सरळ मॉल मध्ये जायचं...  तुझ्या मॉल च्या टेरेस वर तुला एक बॅग दिसेल... ती बॅग संध्याकाळी ५ वाजता मी एक पत्ता पाठवतोय त्या ठिकाणी घेऊन जायची आणि काम करायचं...  त्यात एक चिठ्ठी आहे... काय काम आहे हे त्यातून कळेलच! जराही हुशारी करायचा प्रयत्न केलास तर तुझ्या बायका पोरांचं मेलेलं तोंड बघशील... हे काम झाल्यावर मग आपण बघू तुझ्या कुटुंबाचं काय करायचं ते... आणि हो या बद्दल त्या तुझ्या वॉचमन ला सुद्धा काही कळू द्यायचं नाही..." एवढं बोलून त्याने फोन कट केला... 

"साहेब! माझी बायको, मुलं... त्यांचं काय? प्लिझ साहेब त्यांना वाचवा ना..." मनोज सुयश सरांचे पाय धरून रडत रडत म्हणाला. 

"काळजी करू नकोस... आम्ही तुझ्या कुटुंबाला काही होऊ देणार नाही... आत्ता तो म्हणालाय तसं कर... आमच्या टीम पैकी कोणीतरी तुझ्यासोबत असेल..." सुयश सर त्याला धीर देत म्हणाले. 

त्यांचं हे बोलणं होतं ना होतं तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड चा फोन वाजला.... त्याच्या मोबाईल वर सुद्धा प्रायव्हेट नंबर वरून फोन आलेला होता... मनोज च्या अनुभवावरून त्याला आता काय करायचं हे माहीतच होतं! निनाद ने त्याच्या हातात मोबाईल दिला... 

सिक्युरिटी गार्ड काही बोलायच्या आधीच समोरचा माणूस बोलू लागला; "मला वाटलं होतं त्यापेक्षा तू हुशार निघालास रे.... म्हणूनच मी आता तुझ्यावर खुश आहे... माझं एक शेवटचं काम केलंस की तुझं कुटुंब आझाद! तुझ्या मॉल च्या स्टोअर रूम मध्ये तुला एक बॅग दिसेल.... मी एक पत्ता पाठवतोय तिथे ५ वाजता जाऊन माझं काम करायचं... काय काम आहे ते बॅगेत चिठ्ठी आहे त्यातून कळेलच! आणि हो, या कानाची खबर त्या कानाला होता कामा नये..." आणि फोन कट झाला. 

"सर! दोघांना तीच वेळ दिलीये आणि काम काय करायचं हा मेसेज पण... नक्की काय चाललंय या माणसाच्या डोक्यात..." निनाद ने विचारलं. 

"ते आपल्याला बॅग उघडून बघितल्यावरच कळेल... आता आपण तो कोणता पत्ता पाठवतोय ते आधी बघूया..." सुयश सर म्हणाले. 

तेवढ्यात त्या दोघांना पत्ता मिळतो... 

"सर, दोघांना एकाच ठिकाणचा पत्ता दिला आहे.... मग, दोघांना सुद्धा कोणाला काही कळू देऊ नका असं का सांगितलं?" निनाद ने विचारलं. 

"मला अंदाज आलाय खरा आता... एक काम कर तू गाडी घेऊन जा या दोघांना घेऊन... मी इथेच थांबून जरा लक्ष ठेवतो... आणि तुझ्या मदतीला गणेश ला पाठवतो..." सुयश सर म्हणाले. आणि निनाद च्या कानात त्यांनी काहीतरी प्लॅन सांगितला. 

"ओके सर!" निनाद एकदम जोशात म्हणाला. 
***************************
आता नियती पुन्हा तयार होण्यासाठी खोलीत जायला लागते.... हीच ती संधी आहे म्हणून ईशा सुद्धा तिच्या मागे जाते....

"नियती! आत्ता कसलेही जास्त प्रश्न न विचारता एवढंच सांग, हि चावी तुझ्या ओळखीची आहे का? म्हणजे या आधी तू पाहिली आहेस का हि चावी?" ईशा नियतीला ती चावी दाखवत विचारते. 

"हो! हि तर मी आधी ज्या घरात राहायचे त्या घराची चावी आहे...." नियती सांगते. 

"ओके... तू तुझी तयारी कर आपण नंतर बोलू..." असं म्हणून ईशा खोलीतून बाहेर येते. 

बाहेर येऊन ती विक्रम आणि बाकी सगळयांना त्या चावी बद्दल सांगते... 

"ओके... मी आणि सोनाली तिथे जातो... तुम्ही इथेच थांबा..." असं म्हणून ते दोघं जायला निघतात.... 

एवढ्यात सुयश सरांचा गणेश ला फोन येतो... 

"गणेश! ऐक... निनाद तुला सदाबहार मॉल च्या इथे भेटेल तिथे तू सुद्धा जा... काय करायचं आहे, कुठे जायचं आहे तो सगळं सांगेल तुला..." सुयश सर म्हणतात. 

"ओके सर! मी लगेच निघतो..." गणेश म्हणतो. 

तो सुद्धा अभिषेक आणि सोनाली ला सांगून सुयश सरांनी सांगितल्या प्रमाणे मॉल ला जायला निघतो.
******************************
विक्रम आणि सोनाली नियती आधी राहायची त्या घराजवळ पोहोचले.... सुयश सर तिथेच लपून सगळं बघत असल्यामुळे त्यांनी त्या दोघांना बघितलं.... आणि विक्रम ला फोन लावला... 

"एकदम मागे बघू नकोस... तुझ्या मागे जो थोडा आड रस्ता आहे तिथेच मी आहे... दोघं जण हळूच इथे या..." सुयश सरांनी सांगितलं. 

विक्रम आणि सोनाली फिरत फिरत पटकन सुयश सर जिथे होते तिथे गेले.... 

"सर, तुम्ही इथे कसे?" सोनाली ने विचारलं. 

सुयश सरांनी जे काही घडलं होतं ते सगळं त्या दोघांना सांगितलं. 

"मला सांगा तुम्ही दोघं इथे कसे?" सुयश सरांनी विचारलं. 

विक्रम ने सुद्धा त्या चावी बद्दल सांगितलं. 

"सर, सर ते बघा... कोणीतरी दोन जणं बाहेर आली... एक बाई आणि एक माणूस आहे वाटतंय...." सोनाली म्हणाली. 

ते तिघं त्यांच्यावर लक्ष ठेवून होते..... ते दोघं आजींच्या घरात गेले... 

"सोनाली, विक्रम! चला.... त्यांना काही कळायच्या आत आपण त्यांना पकडलं पाहिजे... त्या लोकांनी कपाट उघडलं तर प्रॉब्लेम होईल...." सुयश सर म्हणाले. 

तिघं त्यांच्या न कळत घरात घुसले.... थोडी झटापट सुद्धा झाली.... शेवटी तिघांनी मिळून त्या दोघांना पकडलं आणि खुर्चीवर बसवलं... 

जीन्स टॉप मध्ये असलेली आणि सोनेरी केसांची ती बाई भारतीय सुद्धा वाटत नव्हती... तर, तीच आजी असेल हे तर अविश्वसनीयच होतं... पण, तरी सगळ्यांनी ते दोघंच आजी आजोबा आहेत हे ओळखलं होतं... 

"तुम्हाला आत्ता पर्यंत मी कोण आहे हे समजलंच असेल! माझं खरं नाव केसी... आता तुम्ही म्हणत असाल हे कसं शक्य आहे... आमच्या दोघांचं खरं वय ४० च्या आसपास आहे... आणि चेहऱ्या वरच्या या सुरकुत्या एक ड्रग घेतल्यामुळे आल्यात... यावर थोडा मेकअप केला की झाला आजींचा चेहरा तयार... लग्नाच्या वेळी सुद्धा जेव्हा तू मेकअप करणार तेव्हा माझ्या लक्षात आलं, तू जर मला हात लावलास तर लगेच माझं खरं वय तुला समजेल... शेवटी काहीही झालं तरी ही ड्रग मुळे झालेली अशी स्किन आहे... म्हणून मी मेकअप सुद्धा तुला करू दिला नव्हता!" केसी म्हणाली. 

"कोण आहे तुमचा बॉस?" सोनाली ने विचारलं. 

"हा हा हा... बॉस कोण आहे हे कधीच तुम्हाला समजणार नाही..." केसी म्हणाली. 

"आमचं जे काम होतं त्याच्या आता फक्त दहा टक्के काम बाकी आहे.... ते सुद्धा संध्याकाळ पर्यंत होऊन जाईल... हा हा हा...." आजोबांचा वेष घेतलेला माणूस म्हणाला. 

सुयश सर, विक्रम आणि सोनाली तिघं एकमेकांकडे बघून हसत होते.... 

"स्वप्नात पूर्ण होईल हा ते काम... आता सांगा त्या मनोज आणि सिक्युरिटी गार्ड च्या कुटुंबाला कुठे लपवून ठेवलं आहे?" विक्रम ने विचारलं. 

दोघं सुद्धा काही बोलायला तयार नव्हते... अचानक सोनाली च लक्ष केसी वर गेलं तर ती काहीतरी हालचाल करत होती... त्या सिड ने जशी आत्महत्या केली तसं हिने काही करू नये म्हणून सोनाली ने पटकन तिचा हात धरून तिच्या कानाखाली मारली... आणि तिच्या हातातून एक पिन मिळली ती जप्त केली.... 

"बोल! कुठे आहेत ते निष्पाप जीव...." विक्रम ने सुद्धा त्या माणसाला कानाखाली देऊन विचारलं. 

आता आपलं काही चालणार नाहीये हे जाणून केसी म्हणाली; "खरंच माहित नाही... ते फक्त आमच्या बॉस ला माहितेय... आम्ही बॉस कोण हे सुद्धा पाहिलं नाहीये... संध्याकाळ च काम झाल्यावर बॉस आम्हाला त्या समोरच्या घरात भेटणार होता...." 

"सोनाली! ती चावी आणि त्या लॉकर मध्ये ठेव.." सुयश सरांनी सांगितलं.  

त्यांनी सांगितल्या प्रमाणे सोनाली ने केलं.. आणि ते तिघं त्या दोघांना घेऊन पोलीस स्टेशनला आले... 

क्रमशः..... 
***************************
आजी आजोबाचं खरं रूप तर बाहेर पडलं... पण, अजूनही त्यांचा बॉस कोण आहे हे माहित नाहीये.... कोण असेल बॉस? मनोज आणि सिक्युरिटी गार्ड ला काय काम सांगितलं असेल? काय असेल त्या बॅगेत? पाहूया पुढच्या भागात. 

🎭 Series Post

View all