मिस्टीरिअस मेसेज (भाग-१३)

Finding codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, डॉ. विजय आणि निनाद आजोबांच्या घरात अडकले आहेत.... नियती च्या गळ्यात एक धारदार रिंग येऊन अडकली आहे आणि त्याचा पासवर्ड १५ मिनिटात टाकावा लागणार आहे.... आता पुढे)
****************************
सगळे आता दबावात होते.... काहीही झालं तरी नियती सोबत स्वतःचा जीव वाचवून बिच्छु गँग सारख्या सामान्य माणसाच्या जीवावर उठणाऱ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा देणं गरजेचंच होतं! काय कोड असेल याचा विचार करता करता अजून तीन मिनिटं संपली...... आता हातात फक्त ७ मिनिटं शिल्लक होती....

"सुशांत, सर! तुम्ही सगळे प्लिझ जावा इथून.... माझं जे होईल ते होईल.... पण, प्लिझ तुम्ही जावा इथून...." नियती रडत रडत म्हणाली.

"कोणी कुठेही जाणार नाहीये... आणि तुला सोडून तर अजिबात नाही.... तू शांत रहा जरा... जे काय होईल ते सगळ्यांचं एकत्रच होईल...." सुशांत तिला गप्प करत म्हणाला.

अजून एक मिनीट संपलं होतं! वेळ तर अगदी हातातून वाळू निसटावी अशी भराभर जात होती...

"सर! मला वाटतंय कोड ९० असावा...." ईशा म्हणाली.

"नक्की ना? म्हणजे एकदा पुन्हा विचार कर... अजून साडे चार मिनिटं आहेत!" विक्रम म्हणाला.

"हो सर! बघा ना, हे अंक; २३, ३८, ४५, ६४, ६७ असे आहेत.... मग जर हे १२ च्या पटीतले आहेत असं समजलं तर;
१२×२= २४-१= २३
१२×३= ३६+२= ३८
१२×४= ४८-३= ४५
१२×५= ६०+४= ६४
१२×६= ७२-५= ६७
तसंच, १२×७= ८४+६= ९०." ईशा ने सगळं explain करून सांगितलं.

"सुशांत ९० कोड टाकून बघ..... मला तरी ईशा च पटतंय.... आणि काही झालं तरी आपण प्रयत्न केला नाही ही सल नको मनात राहायला..." सुयश सर म्हणाले.

या सगळ्यात आता शेवटची फक्त दोन मिनिटं राहिली होती..... सगळ्यांचा देवाचा धावा सुरु होता.... सुशांत ने डोळे मिटून एकदा प्रार्थना केली..... आणि ०९० हा कोड प्रेस केला.... सगळ्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले होते.... काही सेकंद अशीच गेली....

"थँक्स ईशा.... तुझ्यामुळे मी आज वाचले..." नियती ईशा ला मिठी मारत म्हणाली.

तिच्या आवाजाने सगळ्यांनी डोळे उघडले.... तर नियतीच्या गळ्यातली ती धारदार रिंग निघाली होती आणि ती सुखरूप होती.....

"चला यातून सुद्धा सुटलो आपण.... सुशांत, नियती तुम्ही दोघं पुन्हा आता हॉल वर जावा... ईशा तू नियती ला घेऊन जा.... आम्ही बघतो इथे..." सुयश सर म्हणाले.

"ईशा म्हणजे तू पण....." नियती बोलता बोलता थांबली.

"हो! मी सुद्धा पोलीस आहे.... हे सगळं नंतर डिटेल मध्ये तुला सुशांत सांगेल... आत्ता आपण निघूया.... तुझी तयारी करायची आहे.... कोणाला काही कळु न देता तुला रूम मध्ये न्यायची आहे.... चल लवकर...." ईशा म्हणाली.

एवढ्यात सुशांत च्या मोबाईल वर पुन्हा एक ऑडिओ क्लिप आली....

"सर! अजून एक ऑडिओ..." सुशांत म्हणाला.

"एक काम कर तू मला सेंड कर ती क्लिप आणि जा इथून लवकर.... जर कोणाच्या लक्षात आलं ना तुम्ही दोघं कार्यालयात नाही आहात तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.... आम्ही बघतो काय ते..." विक्रम म्हणाला.

सुशांत ने ती क्लिप विक्रम ला सेंड केली आणि तिघं कार्यालयात जायला निघाले..... एव्हाना आता ११.२० झाले होते.... कार्यालयाच्या मागच्या दारातून च तिघं कोणी पाहत नाहीये ना हे बघून आत गेले..... सुशांत तिथून पटकन कोणाच्याही न कळत त्याला दिलेल्या रूम मध्ये गेला.... ईशा ने नियतीच्या रूम च दार वाजवलं...

"सोनाली! मी आहे.... दार उघड..." ईशा दबक्या आवाजात हळूच दार वाजवून म्हणाली.

सोनाली ने दार उघडलं.... दोघी आत आल्यावर पटकन सोनाली ने दार लावून घेतलं....

"चल नियती जा पटकन अंघोळ करून ये...." ईशा म्हणाली.

नियतीने सगळे दागिने काढून ठेवले आणि अंघोळीला गेली....

"नशीब तुम्ही दोघी लवकर आलात.... आणि सुखरूप आहात..... बरं मला सांग नक्की काय झालं होतं?" सोनाली म्हणाली.

"ते सगळं सांगते नंतर आधी मी आज्जींकडे जाऊन येते.... त्यांनी मला मदतीसाठी बोलावलं होतं!" ईशा म्हणाली.

"मी आत्ताच आजींना तयारीत मदत करून आली आहे.... नियतीचं आवरे पर्यंत काय झालं ते थोडक्यात सांग..." सोनाली म्हणाली.

ईशा ने सगळं थोडक्यात सांगितलं.... तोवर नियतीचं आवरून झालं....

"चल आता पटकन तयार हो.... मॅडम येतच असतील तयारी बघायला.... ११.५० झालेत!" सोनाली म्हणाली.

पार्लर वाली ने लगेच नियतीला तयार करायला घेतलं.... लग्न लागताना नेसायची मामा ने दिलेली पिवळी साडी सुयश सरांनी दिली होती... छान पिवळा रंग, हिरव्या रंगाचे काठ असलेली रेशमी साडी होती....  तिला ती साडी नेसवली..... एवढ्यात दार वाजलं.....

"पोरींनो दार उघडा.... मला एकदा नियती ला बघू दे...." अनुजा म्हणाली.

अनुजाच्या हट्टापुढे आणि तिला काही संशय येऊ नये म्हणून ईशा ने दार उघडलं....

"हे काय अजून फक्त साडी च नेसून झाली.... अरे १२ वाजले.... बाकी कधी आवरणार? आणि ईशा, सोनाली तुम्ही दोघी पण अजून तयार नाहीये.... आवरा गं पोरींनो...." अनुजा घाई घाई करत म्हणाली.

"रिलॅक्स... होईल सगळं.... मी करते तिला २० मिनिटात तयार..." पार्लर वाली म्हणाली.

"ठीक आहे आवरा लवकर.... आमचे हे पण कुठे आहेत काय माहित! ईशा, तुला काही कळलं का? एकतर यांचा फोन पण लागत नाहीये... शिवाय आजोबा पण दिसले नाहीयेत अजून...." अनुजा म्हणाली.

"येत असतील..... कदाचित वाटेत असतील... आपण आजींना विचारूया आजोबांचा काही फोन आला का ते...." ईशा अनुजा ला धीर देत म्हणाली.

अनुजा आणि ईशा आज्जींना विचारायला बाहेर पडल्या.... सगळीकडे शोधलं पण आजी कुठे दिसतच नव्हत्या....

"आजी कुठे गेल्या असतील आता?" अनुजा म्हणाली.

"असतील इथेच कुठेतरी आपण थोड्यावेळाने पाहूया... तुम्ही तोपर्यंत गुरुजींना काही हवं आहे का एकदा बघा.... मी माझं पटकन आवरून येते..." ईशा अनुजाचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून म्हणाली.

लग्नाचा मुहूर्त जसा जसा जवळ येत होता तसे पाहुणे यायला लागले...... संपूर्ण हॉल आता माणसांनी गजबजलेला होता..... सनई - चौघडे वाजत होते..... सगळ्यांना आता वधू - वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायची प्रतिक्षा होती.... लहान मुलं स्वतःच्याच तंद्रीत इथे - तिथे पळत होती..... स्वयंपाक बनत होता त्याचा घमघमाट प्रवेश द्वारातून आत येतानाच प्रत्येकाच्या नाकात जात होता..... त्यावरून आपसात चर्चा सुरु होती... अनुजा प्रत्येकाला भेटून हालचाल विचारून मगच पुढे जात होती..... ईशा आवरायच्या निमित्ताने गेली.....
****************************
दुसरीकडे सुयश सर, विक्रम आणि अभिषेक ती क्लिप ऐकत होते.....

"यातून तर वाचलात.... पण, तुमचा तो डॉक्टर आणि तो नवखा पोलीस.... त्यांचं काय? हा हा हा..."

"सर! म्हणजे डॉ. विजय आणि निनाद???" अभिषेक म्हणाला.

"नाही! काही नाही होणार त्यांना.... एक काम कर गणेश ला आजोबांच्या घरचा पत्ता पाठव आणि तिथे जायला सांग...." सुयश सर म्हणाले.

अभिषेक ने लगेच गणेश ला पत्ता पाठवला आणि फोन करून तिथे जायला सांगितलं....

"सर! मला काय माहित पण हा आवाज जरा ओळखीचा वाटतोय.... म्हणजे कोणीतरी ओळखीचं आहे जे मुद्दाम आवाज बदलून बोलतंय असं वाटतंय...." विक्रम म्हणाला.

"तू आठवण्याचा प्रयत्न कर.... कदाचित खूप मोठा क्लु मिळेल यावरून...." सुयश सर म्हणाले.

"सर, तो जो कोणी आहे त्याला आपण 'या' घटनेतून वाचलो आहोत हे कसं समजलं असेल? इथे कॅमेरा तर नसेल ना?" अभिषेक म्हणाला.

"असेल.... आपण अजून नीट पाहणी केली नाहीये.... चला सगळी कडे नीट बघा.... काही आढळतंय का ते!" सुयश सर म्हणाले.

सगळेजण तो सगळा मजला नीट पाहू लागले.... नियती ला जिथे बांधून ठेवलं होतं तिथे, वरच्या बाजूला एक छोटा कॅमेरा आणि कसलं तरी एक मेकॅनिझम लावलेलं विक्रम ला दिसलं....

"सर! हे बघा...." विक्रम ने बोट दाखवत तो कॅमेरा आणि 'ते' मेकॅनिझम दाखवलं.

"हम्म... या कॅमेरा मुळे तो आपल्यावर नजर ठेवून होता.... अभिषेक! ते बघ... तंगुस सारखा हा धागा कसा attached केला आहे ते बघ जरा.... हो पण जरा सावध हा..." सुयश सर म्हणाले.

अभिषेक ने हळूच ते मेकॅनिझम काढले आणि बघितलं तर तो धागा त्या धारदार रिंग ला जोडलेला होता.....

"सर! मला वाटतंय हे मेकॅनिझम रिमोट ने काम करत असणार.... आणि हे असे रिमोट १०० ते २०० मिटर च्या आतच काम करतात.... म्हणजे तो व्यक्ती आपल्या आसपास असणार...." अभिषेक म्हणाला.

"ठीक आहे! आत्ता आपण इथून निघूया... तू गणेश च्या टच मध्ये रहा..." सुयश सर म्हणाले.

एवढ्यात ईशा चा त्यांना फोन आला... आणि तिने तिथे घडलेलं त्यांना सगळं सांगितलं...

"आम्ही तिथेच येत आहोत.... आल्यावर बघूया..." सुयश सर म्हणाले.

"काय झालं सर? काही प्रॉब्लेम?" विक्रम ने विचारलं.

"हो! ईशा चा फोन होता..... आजी पण कार्यालयात कुठेच नाहीयेत... आपल्याला लवकरात लवकर तिथे गेलं पाहिजे.." सुयश सर म्हणाले.

सगळे कार्यालयात जायला निघाले....

क्रमशः.....
*****************************
आता डॉ. विजय आणि निनाद कोणत्या नव्या संकटात सापडले असतील? आजी कुठे गेल्या असतील? विक्रम ला तो आवाज आठवेल का? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मधून नक्की सांगा.... आणि हो तुम्हाला तो कोड शोधता आला होता का हे सुद्धा सांगा....

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...

🎭 Series Post

View all