मिस्टीरिअस मेसेज (भाग-१२)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, नियती एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये असेल असं सुयश सरांच्या टीम ला वाटतंय.... आणि त्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे.... डॉ. विजय निंबाळकर आजोबांना आणायला गेले आहेत... आता पुढे....)
*****************************
डॉ. विजय आणि निनाद नी आजोबांच्या दाराची बेल वाजवली.... बऱ्याच वेळाने आजोबांनी दार उघडलं....

"अरे! विजय तुम्ही इथे?" आजोबांनी विचारलं.

"हो! तुम्हाला घेऊन जायला आलो आहे.... तुमच्या नातीचं लग्न आहे आणि अजून तुम्हीच तिथे आला नाहीत! म्हणून म्हणलं आपणच जाऊन घेऊन येऊया...." डॉ. विजय म्हणाले.

"जरा पाच मिनिटात येतो हा... थोडं आवरायचं बाकी आहे... आणि बी.पी., डायबिटीस च्या गोळ्या पण राहिल्या आहेत घ्यायच्या त्या पण घेतो... तुम्ही या ना तोपर्यंत बसा आत..." आजोबा म्हणाले.

डॉ. विजय आणि निनाद आत गेले.... आजोबा गोळ्या घ्यायला आणि आवरायला त्यांच्या खोलीत गेले.... निनाद आणि डॉ. विजय तिथेच हॉल मध्ये त्यांची वाट बघत होते....

"हे नियतीचे सख्खे आजी आजोबा आहेत का?" निनाद ने विचारलं.

"नाही! पण सख्या पेक्षा सुद्धा जास्त आहेत..." डॉ. विजय म्हणाले, आणि त्याला सगळं आधी जे काही घडलं होतं, आजी आजोबांनी नियती ला केलेली मदत, त्यांच्यात हळू हळू कसं नातं तयार होत गेलं... ते सगळं सांगितलं... 

"मस्त... नियती खरंच खूप लकी आहे... सगळ्यांना अशी जीवाला जीव लावणारी माणसं नाही मिळत...." निनाद म्हणाला.

डॉ. विजय नी पण त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली....
************************
दुसरीकडे अनुजा पुन्हा नियतीच्या खोलीकडे आली... आणि तिने दार वाजवलं....

"थांबा... तयारी बाकी आहे...." आतून पार्लर वाली चा आवाज आला...

"मला बघू तरी दे माझी लेक कशी दिसतेय..." अनुजा म्हणाली.

"सगळी तयारी झाल्यावरच बघा तुमच्या लेकीला... अजून थोडावेळ..." पुन्हा आवाज आला..

शेवटी अनुजा तिथून निघाली.... सोनाली तिथेच लपून बसली होती.... तिने सुटकेचा निश्वास सोडला.... बरं झालं, आधीच पार्लर वाली ला विश्वासात घेऊन आत बसवून ठेवलं... स्वतःशीच म्हणाली आणि तिथून आजींच्या मदतीसाठी गेली....

"तू? ईशा कुठे आहे?" सोनाली ला बघून आजींनी विचारलं.

"हो! ईशा जरा दुसऱ्या कामात अडकली आहे ना म्हणून मग तिने मला पाठवलं तुमची मदत करायला..." सोनाली म्हणाली.

"बरं... ये ना... आणि मला पण काय ते तुमचं मेकअप का काय ते ते कर... मला काही ते जमत नाही... नातीच्या लग्नात मी पण छान दिसले पाहिजे ना..." आजी म्हणाल्या...

सोनाली त्यांचा मेकअप करायला गेली... नियती सापडली असेल का? कधी येतील सगळे तिला घेऊन? तिच्या डोक्यात विचार चक्र सुरु होतं....

"काय गं कुठे हरवलीस? कसली काळजी आहे का?" आजींनी तिच्या चेहऱ्याकडे बघून विचारलं.

"नाही काही नाही... तुमची कोणती हेअर स्टाईल करू याचा विचार करत होते...." सोनाली ने कसंबसं सावरलं.

"काहीही कर.... फक्त साजेसं दिसेल असं कर..." आजी म्हणाल्या.

सोनाली ने होकारार्थी मान डोलावली...
*************************
इथे त्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये नियती ची शोध मोहीम सुरू होती.... एकदम दबक्या पावलांनी लपून लपून सगळे जण प्रत्येक कोपरान् कोपरा बघत होते.... ईशा आणि अभिषेक ने तळ मजल्यावर नीट पाहिलं पण काहीही हाती लागलं नाही...

"इथे तर कोणीच नाहीये.... आता?" अभिषेक ने विचारलं.

"चल वर जाऊया... सुशांत आणि विक्रम सरांना काही मिळालं का बघू..." ईशा म्हणाली.

दोघं पहिल्या मजल्यावर आले.... नकारार्थी मान डोलावून विक्रम आणि सुशांत ला खाली कोणी नसल्याचं सांगितलं.... पहिल्या मजल्यावर सुद्धा कोणी नव्हतं... एवढ्यात सुयश सर जिन्यात आले.... त्यांनी फक्त वरच्या बाजूला बोट दाखवलं.... सगळेजण कसलाही आवाज न करता त्यांच्या मागे गेले....

"हे बघा... हे ब्रेसलेट इथे पडलं होतं.... नियती इथेच आहे.... नीट बघा..." सुयश सर हळू आवाजात ते ब्रेसलेट दाखवत म्हणाले.

सगळे जण वेगवेगळ्या दिशेला गेले.... थोडं आतल्या बाजूला गेल्यावर एका पिलर च्या मागे नियती ला बांधून ठेवलेलं सुशांत ने पाहिलं... तो पुढे जाणारच एवढ्यात तिथे एक माणूस हातात गन घेऊन पहारा देताना त्याला दिसला.... तो कसलाही आवाज न करता पुन्हा बाहेर च्या बाजूला आला आणि बाकीच्यांना तिथे नियती असल्याचं खुणावलं..... सगळेजण तिथे आले.... अभिषेक ने मुद्दाम तिथलाच एक दगड उचलला आणि तिथे असलेल्या सळी वर फेकला... त्या आवाजाने तो पहारा देणारा माणूस बाहेर आला... सुशांत ने त्याला धरलं.... ईशा ने पटकन आत जाऊन नियतीच्या हाताची, पायाची दोरी सोडली... तोंडाला बांधलेला रुमाल सोडवला.... पण, ती बेशुद्ध होती... तिथेच पडलेल्या पाण्याच्या बाटलीतून तिने नियतीच्या तोंडावर पाणी मारलं आणि तिला शुद्धीवर आणलं... तिला आधार देऊन उभं केलं आणि दोघी बाहेर येणार एवढ्यात; तिच्या गळ्यात एक धारदार रिंग येऊन अडकली....

"थांब नियती.... तू अजिबात जागची हलू नकोस...." सुशांत ओरडला.

ईशा आणि नियती ला काही कळलंच नाही.... अचानक हे नक्की काय झालं....

"त्या पहारा देणाऱ्या माणसाने हाता पायी मध्ये कसलं तरी बटन दाबलं आणि स्वतःला गोळी मारून घेतली.... तेव्हाच आम्हाला संशय आला नक्कीच काहीतरी गडबड असणार..." विक्रम ने सगळं सविस्तर सांगितलं....

एवढ्यात सुशांत च्या मोबाईल वर एका प्रायव्हेट नंबर वरून एक ऑडिओ क्लिप आली...

"मला माहित होतं.... तुम्ही सगळे या पोरीला शोधत येणार.... हा हा हा.... आता बरोबर तुम्ही सगळे अडकला आहात.... नियतीच्या गळ्याला जी रिंग आहे त्याचा जोवर तुम्ही बरोबर पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत काही ती सुटणार नाही.... आत्ता बरोबर ११ वाजले आहेत... ११.१५ पर्यंत जर तुम्ही पासवर्ड टाकू शकला नाहीत तर ही बिल्डिंग पण बॉम्ब ने उडेल.... काय पासवर्ड टाकायचा त्याचा क्लु शोधा... बघू आता तुम्ही स्वतः बरोबर त्या पोरीला वाचवता का शहिद म्हणून भिंतीवर लटकता..... हा हा हा...."

क्लिप ऐकून झाल्यावर सगळ्यांची क्लु शोधायला धावपळ सुरू झाली....
*************************
आजोबांच्या घरी बराच वेळ झाला तरी अजून आजोबा आले कसे नाहीत म्हणून निनाद आणि डॉ. विजय त्यांच्या खोलीत गेले.... जसे त्यांनी खोलीत पाऊल टाकले तसा दरवाजा बाहेरून लॉक झाला.... दोन मिनिटं दोघांना काही समजलेच नाही.... कोणाला मदतीसाठी फोन करावा तर नेटवर्क सुद्धा येत नव्हतं!

"सर! आजोबा असे का वागले? आपल्याला का अडकवलं त्यांनी... सर, तुम्हाला आठवतंय आपल्याला इथलाच पत्ता एका चिठ्ठीतून मिळाला होता.... तेव्हाच आपल्याला समजून जायला हवं होतं.... " निनाद म्हणाला.

"आत्ता ते सगळं जाऊ दे.... इथून कसं सुटता येईल ते बघू आधी..." डॉ. विजय म्हणाले.

दोघं काही करता येईल का विचार करत होते.... निनाद ने बाहेर कोणी नाहीये ना याची खात्री करून दार तोडायचा निर्णय घेतला...
****************************
दुसरीकडे आता अभिषेक ला एक कागद दिसला.... नियती ला जिथे बांधून ठेवलं होतं त्याच्या मागच्या पिलर च्या तिथे एका दगडाखाली ठेवला होता... तो कागद घेऊन अभिषेक ने सगळ्यांना बोलावलं.... त्या कागदावर काही अंक लिहिले होते; "२३, ३८, ४५, ६४, ६७, ?" त्या प्रश्न चिन्हांच्या जागी जो अंक येईल तो त्या रिंग मध्ये टाकायचा कोड होता.... सगळे जण विचार करू लागले.... कारण फक्त एक चूक आणि सगळे जण पंचतत्वात विलीन.... काहीही करून आता १० मिनिटात कोड टाकणं भाग आहे.... कारण १५ मिनिटातली ५ मिनिटं तर क्लु शोधण्यात गेली...

क्रमशः....
**************************
तुम्हाला काय वाटतंय काय असेल हा कोड? डॉ. विजय आणि निनाद सुटू शकतील का? हे सगळं आजी आजोबांनी केलं असेल का? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत त्या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे कमेंट करून नक्की सांगा...
**************************
आमच्या घरी गौरी गणपती असल्यामुळे कदाचित पुढचा भाग टाकायला उशीर होऊ शकतो.... तरी गणपती नंतर पुन्हा रेग्युलर पार्ट्स सुरु होतील.... जमेल तसं पुढचा भाग लवकर टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.... तोपर्यंत आत्ता पर्यंत या कथेचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला कोणता प्रसंग आवडला हे नक्की कमेंट करून सांगा... आणि हो उत्तर सांगायला सुद्धा विसरू नका...

🎭 Series Post

View all