मिस्टीरिअस मेसेज (भाग-१०)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, हळदीची पूर्ण तयारी झाली आहे.... पण, ईशा ला त्या हळदीत काहीतरी दिसलं आहे... आता पुढे....)
*************************
"ईशा दे ती हळद... या हळदीत मिक्स करायची आहे ती..." अनुजा म्हणाली. 

"मी करते ना... तसही मी करवली आहे ना... मग मला द्या कि करायला..." ईशा म्हणाली. आणि हळूच सोनाली ला बाकीच्यांचं लक्ष वेधून घे म्हणून खूण केली. 

"ईशा हळद मिक्स करे पर्यंत हे बघा.... सुशांत च्या हळदीचा व्हिडिओ... नियती तू पण ये... बघ कसा नाटकं करत होता हळद लावून घेताना..." सोनाली मोबाईल दाखवत म्हणाली. 

तिने सगळ्यांना व्हिडिओ दाखवण्यात गुंतवून ठेवलं... तोवर ईशा ने ती हळद त्यात मिक्स न करता दुसरी हळद त्यात मिक्स केली आणि तो सुशांत कडून आलेला हळदीचा बाऊल तिथेच स्टेज च्या खाली लपवला... 

"बास आता.... नंतर बघूया व्हिडिओ... मुहूर्त टळून चाललाय... झालं का गं मिक्स करून?" अनुजा म्हणाली. 

"हो... या सुरुवात करूया आपण..." ईशा म्हणाली. 

"तू सुद्धा नियती च्या बाजूला बस.... करवली म्हणून तुझा पण मान आहे...." आजी म्हणाल्या.

हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.... नियतीचं औक्षण केलं.... अनुजा ने तिला हळद लावली... नंतर आजींनी लावली... अश्याच अजून पाच बायकांनी हळद लावून झाल्यावर सोनाली ने सुद्धा लावली.... हळदीचा कार्यक्रम छान संपन्न झाला... पण, ईशा ला टेन्शन आलं होतं.... जर, सुशांत कडून आलेल्या हळदीत खरंच काही असेल आणि सोनाली तिथून निघाल्यावर सुशांत ला काही झालं असेल तर?.... कसंही करून डॉ. विजयंशी बोललंच पाहिजे हाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता.... 

"ईशा.... कुठे हरवलीस? चल आवरून येऊया..." नियती म्हणाली. 

"हो... तू हो पुढे... मी येते..." ईशा म्हणाली. 

नियती पुढे गेल्यावर अनुजा आणि आजी सुद्धा तिच्या सोबत गेल्या.... तेवढ्यात ईशा ने डॉ. विजय ना तिने लपवलेल्या हळदी बद्दल सांगितलं आणि ती हळद चेक करायला सांगितली. 

"काय झालं गं ईशा? तू मला मगाशी का खाणाखुणा करत होतीस?" सोनाली ने विचारलं. 

"त्या हळदीत काहीतरी असणार असा मला संशय आला म्हणून... त्या बाऊल च्या एका टोकाला मला निळसर रंग दिसला... उगाच रिस्क नको ना म्हणून ती हळद मी बदलली... एक काम कर ना, सुशांत ला फोन करून विचार त्याला काही झालं नाहीये ना...." ईशा म्हणाली. 

"ओके मी बघते.... जा तोवर तू आवर... आणि नियती पाशी थांब... मी सुयश सरांना कळवते..." सोनाली म्हणाली. 

ईशा तिचं आवरायला गेली.... तोपर्यंत डॉ. विजय सुद्धा काही सामान आणायच्या निमित्ताने त्या हळदीचं सॅम्पल घेऊन लॅब मध्ये गेले... सोनाली ने सुद्धा सुयश सरांच्या कानावर हि गोष्ट घातली.... आणि सुशांत ला फोन लावला...

"बोल सोनाली काय झालं?" सुशांत म्हणाला.

"तुला हळद लावून झाल्यावर काही इन्फेक्शन किंवा शरीरावर काही व्रण वैगरे आले आहेत का?" सोनाली ने विचारलं. 

"नाही... पण, असं का विचारतेस? नियतीला काही...." सुशांत बोलता बोलता थांबला.

"नाही रे! ईशा च्या वेळीच लक्षात आलं हळदीत काहीतरी भेसळ आहे म्हणून तिने ती हळद बदलली.... पण, तुला तीच हळद लावली होती म्हणून तुझी काळजी वाटली... डॉ. विजय ती चेक करायला घेऊन गेलेत लेट्स सी काय रिपोर्ट आहे..." सोनाली म्हणाली. 

"ओके... काय होतंय ते सांग मला तसं... आम्ही थोड्यावेळात निघतोच आहोत इथून... काहीही मदत लागली तरी सांग... आणि हे सुयश सरांना सांगून ठेव..." सुशांत काळजीने बोलत होता..

"रिलॅक्स... मी सांगितलं आहे सरांना... तू जास्त काळजी नको करुस... आम्ही आहोत इथे..." सोनाली त्याला शांत करत म्हणाली. 
************************
इथे डॉ. विजय लॅब मध्ये पोहोचले आणि त्यांनी हळद चेक करायला घेतली.... थोडी हळद टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन त्यांनी एक सोल्युशन त्यात टाकलं.... आणि ते मिक्स केलं.... थोड्याच वेळात हळदीचा रंग बदलला.... मग त्यांनी ते मायक्रोस्कोप खाली घेऊन तपासलं.... आणि जे काही त्यांनी बघितलं ते बघून त्यांना घामच फुटला.... त्यांनी पटकन सुयश सरांना फोन लावला...

"हॅलो... सर, तुम्ही लवकरात लवकर कार्यालयात पोहोचा मी पण तिथेच येतोय..." डॉ. विजय घाई घाईत म्हणाले. 

"येतो... पण, काय झालंय?" सुयश सरांनी विचारलं. 

"आत्ता फोन वर नाही सांगत... लवकर या.. आपल्याकडे वेळ फार कमी आहे...." डॉ. विजय म्हणाले. 

नक्कीच काहीतरी सिरिअस असणार म्हणून सुयश सरांनी सुद्धा जास्त काही न विचारता टीम सोबत कार्यालयात जायला निघाले. डॉ. विजय नी सुद्धा एक इंजेक्शन सोबत घेतलं... आणि पटकन ते सुद्धा निघाले... 
**************************
कार्यालयात ईशा ची अंघोळ आणि बाकी तयारी झाली.... ती आता नियतीच्या खोलीत जाणार एवढ्यात आजी तिथे आल्या.... 

"ईशा... जरा माझं एक काम करशील का? नियतीला तयार करायला आता पार्लर वाली आली असेल तू मला तयारी करायला मदत कर ना...." आजी म्हणाल्या. 

"हो... येते दहा मिनिटात... तोपर्यंत तुम्ही चहा नाश्ता करून घ्या... नियती ला सुद्धा विचारून येते तिला काही हवं आहे का..." ईशा म्हणाली. 

"बरं... पण, नक्की ये हा..." आजी म्हणाल्या आणि तिथून गेल्या. 

ईशा ने नियतीच्या खोलीचं दार वाजवलं... तर दार उघडचं होतं.... ती आत गेली तर आत कोणीही नव्हतं... अजून नियतीचं आवरलं नसेल असं तिला वाटलं म्हणून बाथरूम मध्ये पाहिलं.... तर तिथेही कोणी नव्हतं... बरं, हळदीचे दागिने सुद्धा कुठे काढून ठेवलेले दिसत नव्हते... तिने नियतीच्या मोबाईल वर फोन केला पण तो पण स्विच ऑफ येत होता... म्हणून मग तिने पटकन सोनाली ला फोन केला....

"ऐक, नियती कुठे खालीच आहे का?" ईशा ने एकदम विचारलं. 

"नाही... मगाशीच नाही का तू आणि नियती गेलात आवरायला...." सोनाली म्हणाली. 

"अगं पण, नियती तिच्या खोलीत नाहीये.... मी तिच्याच खोलीत आहे आत्ता..." ईशा म्हणाली. 

"काय? नीट बघ ना... बाथरूम मध्ये वैगरे असेल...." सोनाली सुद्धा आता टेन्शन मध्ये आली... 

"हो गं! सगळी कडे बघितलं.... infact तिचे हळदीचे दागिने, साडी काहीही नाहीये इथे... आम्ही खाली येताना रूम जशी होती अगदी तशीच आहे..." ईशा म्हणाली. 

"थांब मी येते तिथे... बघू आपण..." असं म्हणून सोनाली ने फोन ठेवला... 

ती सुद्धा नियती च्या खोलीत आली.... नियती कुठेच नव्हती.... अश्या परिस्थितीत कोणाला विचारणं सुद्धा योग्य नव्हतं.... सगळेच टेन्शन मध्ये आले असते शिवाय बिच्छु गँग वाले सुद्धा सावध झाले असते.... दोघींनी मिळून रूम नीट पहायचं ठरवलं... बाथरूम च्या खिडक्या, खोलीची खिडकी सगळं पाहिलं... पण, आतून सगळं बंद होतं... मोबाईल ची बॅटरी डाऊन झाली असेल आणि नियतीला समजलं नसेल; ती कुठे तरी खालीच असेल म्हणून दोघी खालीच शोधायला निघाल्या.... 

"ईशा.... हे बघ.... इथे हळदीचे मार्क्स दिसतायत..." सोनाली दाराच्या कोपर्याला लागलेले थोडेसे हळदीचे डाग दाखवत म्हणाली. 

"आणि हे बघ... हि तर नियतीची बिंदी आहे... पण, इथे कशी पडली... नक्कीच काहीतरी गडबड आहे.... एक काम कर सुयश सरांना सांग याबद्दल... तोवर मी अजून काही मिळतंय का बघते...." ईशा दाराच्या बाहेर डाव्या कोपऱ्यात पडलेली बिंदी सोनाली ला दाखवत म्हणाली. 

सोनाली ने सुयश सरांना फोन करून सगळं सांगितलं.

"काय? पण, तुम्ही दोघी तिथे असताना हे झालंच कसं?" सुयश सर पहिल्यांदा एवढं चिडून बोलले. 

"सर ते..." सोनाली बोलतच होती... पण, तिला तोडत सुयश सर म्हणाले; "काहीही सांगायची गरज नाही... आम्ही सगळे तिथे यायला निघालो आहे बघू काय ते.... तेव्हाच काय सांगायचं आहे ते सांग... पण, कोणालाही काहीही कळू देऊ नका...."

"येस सर..." म्हणून सोनाली ने फोन ठेवला.

फोन झाल्यावर ती सुद्धा ईशा च्या मागे गेली.... 

"हे बघ... इथे पण हळद लागली आहे...." ईशा सोनाली ला भिंतीवर लागलेली हळद दाखवत म्हणाली. 

"हो! पण, या पुढे काहीही मार्क्स नाहीयेत... आणि हा कार्यालयाचा मागचा रस्ता आहे ना... इथून तिला कोणी घेऊन गेलं असेल तर कसं समजणार?" सोनाली म्हणाली. 

"बघूया.... तू सुयश सरांना सांगितलंस ना? ते आल्यावर ठरवू... आत्ता कोणाला काही कळणार नाही याची काळजी घेऊया..." ईशा म्हणाली. 

"ठीक आहे.... तू खाली जाऊन बाकी तयारी बघ.... मी अनुजा मॅडम आणि बाकी कोणी विचारलं तर सांगीन नियती तयारी करून गौरीहाराच्या पूजेची तयारी करतेय...." सोनाली म्हणाली. 

ठरल्याप्रमाणे ईशा बाकी तयारी बघायला गेली... कार्यालय छान सजल होतं.... पुढे मुख्य पाहुण्यांना बसलायला बेड, मागे खुर्च्या, रेड कार्पेट, फुलांच्या माळांनी सजवलेल्या भिंती, स्टेज वर दोन सिंहासनं, त्याच्या मागच्या लाल कपड्यावर सोनेरी रंगाच्या ग्लिटर शिट ने नियती वेड्स सुशांत लिहिलेलं नाव, एट्रन्स वर फुलांची सजावट, अक्षता वाटायला आणि गुलाब पाणी शिंपडायला दारावर दोन मुलं...   कार्यालयाच्या गार्डन मध्ये टेबल खुर्च्या मांडून, मंडप टाकून केलेली जेवणाची व्यवस्था सगळं छान सजल होतं..... ईशा ने सगळी व्यवस्था नीट झाली आहे ना पाहिलं... एवढ्यात आजी आणि अनुजा तिथे आल्या....

"छान व्यवस्था झाली आहे हा सगळी.... कशाची उणीव नाहीये.... मस्त केलंस सगळं..." अनुजा म्हणाली. 

"थँक्स... काही लागलं तर सांगा... मी इथेच आहे..." ईशा म्हणाली. 

"नियती च आवरलं का? मी बघून येते..." आजी म्हणाल्या. 

"नको... म्हणजे, तिचं आवरलं आहे ती गौरीहाराच्या पूजेची तयारी करतेय.... सोनाली आहे तिच्या बरोबर..." ईशा पटकन म्हणाली. 

एवढ्यात तिथे डॉ. विजय आणि सुयश सरांची टीम आली.... ईशा ला बरं वाटलं.... निदान नियतीच काय सुरु आहे या प्रश्नातून तरी सुटका झाली... शिवाय आता लवकर ती सापडेल तरी! हे विचार तिच्या मनात घोळत होते... 

क्रमशः.....
***********************
नियतीला कोणी किडनॅप केलं असेल की ती तिथेच कुठे असेल? हे सगळं कोण करत असेल? त्या हळदीत काय मिक्स केलं असेल? डॉ. विजय कसलं इंजेक्शन घेऊन आले असतील? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय कोण असेल या मागे कमेंट करून नक्की सांगा...

🎭 Series Post

View all