मिस्टीरिअस मेसेज (भाग-१)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(ज्यांनी गूढ आणि मिशन मुंबई कथा वाचली आहे त्यांना या कथेतील पात्रांची ओळख लगेच समजेल.... जर तुम्ही अजूनही या दोन कथा वाचल्या नसतील तर नक्की वाचा.)
********************* 
        डॉ. विजय च्या घरी आज सगळी धावपळ सुरू होती..... कारण, संध्याकाळी त्यांच्या मानस कन्येचा; नियती चा साक्षगंध सोहळा होता..... अनुजा स्वतः सगळ्यात लक्ष घालून सगळी कामं करून घेत होती.... 

"अरे सदू! हे काय... तू अजून इथेच! जा अरे मिठाई घेऊन ये.... कधीचं सांगितलं तुला..." अनुजा त्यांच्या घरी काम करणाऱ्या सदू ला घाई घाईत सांगत होती... 

"हो! हो! निघालोच आहे ताई.." सदू म्हणाला.

"हे बघा! काय हे... अहो तुमच्या कधी लावून होणार आहेत माळा? सोहळा आजच आहे..." अनुजा फुलांच्या माळा लावायला आलेल्या माणसांना बोलत होती.... 

हि सगळी धावपळ आणि अनुजा ची गडबड पाहून नियती बेडरूम मधून बाहेर आली... 

"आई... अगं बस जरा... किती धावपळ करशील? होतील सगळी कामं वेळेत! तू बस बघू जरा..." नियती अनुजा ला सोफ्यावर बसवत म्हणाली. 

"काय बस जरा... खूप कामं आहेत... आणि तू इथे का आलीस... जा जरा झोप... संध्याकाळी फ्रेश दिसली पाहिजेस ना... अगं तूच उत्सव मूर्ती आहेस आज..." अनुजा म्हणाली. 

"काही नाही होत गं! मी करते तुला मदत..." नियती म्हणाली. 

अनुजा तिच्याकडे एकटक पाहत म्हणाली; "तू अशी अचानक आमच्या आयुष्यात आलीस काय... अगदी सख्या मुलीसारखी आमची काळजी घेतलीस... आमच्या बेरंगी आयुष्यात तूच रंग भरलेस! दिवस पण किती भुर्रकन उडाले ना..... आता आज तुझा साखरपुडा झाला की काही दिवसात लग्न, मग पुन्हा आम्ही एकटे! पण, नशीब काढलंस पोरी.. सुशांत सारखा मुलगा मिळाला तुला... काळजी घे त्याची..." नियातीचा हात हातात घेऊन ती भरलेल्या डोळ्यांनी बोलत होती. 

"अरे... कोण म्हणलं तुम्ही पुन्हा एकटे म्हणून? उलट आता तुम्हाला एक मुलगा सुद्धा मिळणार आहे... मला सुद्धा तुमच्याशिवाय कोण आहे.... आणि हे असं इमोशनल नको गं होऊस.... बघ तू मला पण रडवलंस ना!" नियती अनुजाला मिठी मारून बोलत होती. 

सगळा भूतकाळ दोघींच्या डोळ्यासमोरून अगदी चित्रपटासारखा जात होता.... नियतीने सुशांत च्या मदतीने अनुजा ला सोडवण्यासाठी डॉ. विजय ना केलेली मदत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अवयव तस्करी च्या गँग ला दिलेली झुंज, आणि शेवटी अनुजाने तिला मुलगी मानणं.... सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटत होतं!

"चल आता... जा बाळा थोडावेळ आराम कर... पुन्हा संध्याकाळी दगदग होईल.... आणि हो सुशांत शी सुद्धा एकदा बोलून घे हा! त्याचे आई - बाबा आज सकाळी दिल्ली वरून आले असतील त्यांची चौकशी कर एकदा..." अनुजाने नियतीला बाजूला करत डोळे पुसत बोलत होत्या. 

"हो! पण, मला आधी प्रॉमिस कर, असं तू इमोशनल होणार नाहीस!" नियती हात पुढे करत म्हणाली.

"काहीनाही... तू आई झालीस ना कि मगच कळेल तुला मुलगी सासरी जाताना किती त्रास होतो..." अनुजा तिचा हात बाजूला करत म्हणाली. 

एवढ्यात नियातीचा फोन वाजला..... सुशांत चा फोन आला होता.... ती फोनवर बोलायला गेली आणि अनुजा पुन्हा कामाला लागली. 

संध्याकाळ होत आली.... तसे निंबाळकर आजी - आजोबा आले! ते काही मदत करता येईल का म्हणून लवकरच आले होते... शेवटी त्यांच्या मानस नातीचा साक्षगंध सोहळा होता ना... थोड्याच वेळात सोनाली नियती च्या घरी पोहोचली..... तीच तिला तयारीसाठी मदत करणार होती! दोघी नियतीच्या खोलीत आवरत होत्या... तोपर्यंत बाहेर सुशांत आणि त्याचे आई - बाबा आले.... त्यांच्या मागोमाग ए.सी.पी. सुयश आणि त्यांची टीम सुद्धा आली.... सुशांत ने ऑफ व्हाईट कलर चा शर्ट आणि त्यावर नेवी ब्लू रंगाचे ब्लेझर घातले होते.... त्यालाच मॅचिंग पॅन्ट आणि टाय.... तो एकदम हँडसम दिसत होता.... अभिषेक आणि निनाद त्याला चिडवत होते; "काय आज सगळ्याच पोरींना पटवायचं आहे का? आम्हाला पण राहूदे एखादी.." 
         एवढ्यात नियती तयार होऊन बाहेर आली.... मरून कलर चा लेहंगा आणि त्यावर सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी केलेली होती... तिच्या गोऱ्या रंगावर तो खूप खुलून दिसत होता... सोनाली ने तिला छान हलकासा मेकअप केला होता.... ती बाहेर आली तसा सुशांत तिच्याकडे एकटक बघत होता.... निनाद ने खोकून त्याची तंद्री मोडली.... सगळेजण आलेलेच होते... सोहळ्याला सुरुवात झाली.... 

"अरे! अंगठी नियतीच्या खोलीतच राहिली..." अनुजा म्हणाली. 

"थांबा मॅडम मी आणते..." असं म्हणून सोनाली नियतीच्या खोलीत अंगठी आणायला गेली... 

खोलीत गेल्यावर तिने अंगठीची डबी घेतली.... तर त्याखाली एक कागद होता... तिने तो उचलून बघितला तर त्यावर काहीही दिसत नव्हतं! फक्त एका कोपऱ्यात विंचवाचे चित्र होते.... सोनाली ला संशय आला म्हणून तिने तो कागद सोबत घेतला.... बाहेर येऊन तिने अनुजाच्या हातात अंगठीची डबी दिली.... आणि पुन्हा सगळ्यांसोबत जाऊन उभी राहिली... थोड्यावेळात कोणाचं लक्ष नाही पाहून तिने विक्रम सरांना मेसेज केला; "सर! महत्वाचं बोलायचं आहे... जरा बाहेर अंगणात या ना प्लिझ!" आणि ती बाहेर अंगणात जाऊन उभी राहिली..... मेसेज वाचून विक्रम बाहेर आला..... 

"काय झालं सोनाली? असं बाहेर का बोलावलं आहेस?" विक्रम म्हणाला. 

"सर! आत्ता मी नियती च्या खोलीत अंगठी आणायला गेलेली तेव्हा मला हा कागद मिळाला.... यावर विंचवाचे चित्र होते म्हणून मला बिच्छु गँग चा संशय आला... आणि मी हा कागद आणला....." सोनाली विक्रम च्या हातात तो कागद देत म्हणाली. 

"हम्म! तू आत्ता नियती आणि सुशांत ला हे कळू देऊ नकोस... उगाच त्यांच्या आनंदात विरजण नको... आपण बघू काय ते... हा कागद नक्कीच कोरा नाहीये... फक्त सगळीकडे नीट लक्ष ठेव.... काही संशयास्पद आढळलं तर लगेच सांग... मी सुयश सरांना आणि अभिषेक ला सावध करतो तू निनाद आणि गणेश ला पण  सांग... सगळीकडे नीट लक्ष असुदे!" विक्रम म्हणाला. 

"हो सर!" सोनाली म्हणाली. 

एवढ्यात तिथे कोणीतरी लपून सगळं ऐकतंय असं विक्रम ला वाटलं.... त्याने पटकन सगळी कडे बघितलं पण कोणी दिसलं नाही.... 

"कदाचित तुझा संशय खरा आहे.... मला असं वाटतंय कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे... सावध रहा..." विक्रम एकदम हळू आवाजत सोनाली ला म्हणाला.... दोघं पुन्हा सोहळ्यात सामील झाले... एव्हाना सगळा सोहळा झाला होता...

सगळे अगदी हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत होते.... डॉ. विजय, नियती आणि सुशांत सगळे एकत्रच होते... सुशांत त्याच्या आई - बाबांशी सुयश सरांच्या टीम सोबत ओळख करून देत होता.... सोनाली आणि विक्रम ने ठरल्या प्रमाणे त्यांच्या साथीदारांना सावध केले... एवढ्यात सदू सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन आला.... सगळ्यांना प्लेट्स देऊन झाल्यावर तो तिथून गेला.... आणि सगळ्यांसाठी ज्युस आणला... नियती ज्युस पिणार एवढ्यात सोनाली तिच्या हातातून ग्लास काढून घेऊन म्हणाली; "नियती चल ना आपण फोटो काढू....." असं म्हणून तिला फोटो काढण्यासाठी घेऊन गेली.... थोड्यावेळात दोघी पुन्हा आल्या.... सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं होतं.... आता सगळे जायला निघाले... 

"चला आता आम्ही येतो..." सुयश सर म्हणाले.

 "बाय नियती, बाय मॅडम.... काही मदत लागली तर नक्की बोलवा..." सोनाली म्हणाली. 

"चला आम्ही पण निघतो... आजी - आजोबा तुम्ही पण चला... मी तुम्हाला जाता जाता घरी सोडतो..." सुशांत निंबाळकर आजी - आजोबांना म्हणाला. 

नियती आणि सुशांत एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात विक्रम ने डॉ. विजय ना सावध राहायला सांगितले... आणि सगळे निघाले.... गाडीत बसल्यावर सोनाली म्हणाली; "सर! तुम्ही मला नियती ला ज्युस पिऊ नको देऊ म्हणून का खूण केली?" सोनाली ने विचारलं. 

"मला जी स्नॅक्स ची प्लेट मिळाली होती, त्यावर ज्युस च्या ग्लासची प्रिंट होती आणि विंचू पण.... म्हणून मला संशय आला आणि तुला खूण केली... बोलता बोलता मी सुशांत चा सुद्धा ग्लास बदलला..." विक्रम म्हणाला. 

"पण, नियती आणि सुशांत च्या मागे का लागलेत हे बिच्छु गँग वाले?" निनाद म्हणाला. 

"काय माहित! पण, आपल्याला आता या वेळी त्यांना पकडलंच पाहिजे..." सुयश सर म्हणाले. 
क्रमशः.....
*******************
बिच्छु गँग चा पहिला प्रयत्न तरी सगळ्यांनी अयशस्वी ठरवला आहे.... आता पुढे बघूया ते लोक काय काय करतात आणि आपली सुयश सरांची टीम त्यांना कसं प्रतिउत्तर देते... सरळ सरळ चिठ्या ठेऊन किंवा कॉल करून उघड उघड धमकी देऊन पोलिसांना चॅलेंज करून हि गँग कितपत तग धरते पाहूया पुढील भागात... हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा... 

🎭 Series Post

View all