रहस्यमय हवेली (भाग -९)

Mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग-९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
नियतीने तिचा सी. व्ही. तयार केला आणि सुशांत सुद्धा सोनिया कडे जाण्यासाठी तयार झाला. 

"ऑल द बेस्ट नियती, सुशांत! मला सुद्धा कळवा पुढचे अपडेट्स!" डॉ. विजय म्हणाले. 

दोघं त्यांना थँक्यू म्हणाले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाले.... सुशांत ने असिस्टंट ला शोभेल असा फॉर्मल वेश परिधान केला होता, कोणी ओळखू नये म्हणून दाढी, मिशी आणि चष्मा सुद्धा लावला होता आणि नियती अगदी interview ला साजेसा फॉर्मल शर्ट, काळा कोट आणि हातात डॉक्युमेंट्स चा फोल्डर घेऊन निघाली. ती आधी त्या रिसर्च सेंटर मध्ये जाऊन आली होती त्यामुळे कोणी ओळखू नये म्हणून केसांचा विग आणि डोळ्यात निळ्या रंगाच्या लेन्स लावल्या होत्या. सुशांत ने अर्ध्या रस्त्यापर्यंत तिला सोडलं आणि तो पुढे सोनिया च्या घरी जायला निघाला....
***********************
"मे आय कम इन सर?" नियती रिसर्च सेंटर मध्ये डॉ. विजयंनी सांगितलेल्या डॉक्टरांच्या केबिन वर नॉक करून म्हणाली. 

"येस येस... कम इन... नियती? राईट?" डॉ. अभिनव यांनी विचारलं. 

नियती आत गेली... डॉ. अभिनव नी हातानेच बसण्यासाठी इशारा केला.... 

"हो! डॉ. विजय नी तुम्हाला कल्पना दिली असेलच ना?" नियती खुर्चीवर बसत म्हणाली. 

तिचा बेसिक इंटरव्ह्यू घेतला आणि सोनिया जे काम करायची तेच आणि त्याच बॅच मध्ये तिचं सिलेक्शन झालं. नियती केबिन मधून बाहेर आली.... तिथे असणाऱ्या लोकांशी तिची ओळख करून दिल्यावर डॉ. अभिनव त्यांच्या कामासाठी गेले. तिच्या सिनियर नी कामाचं स्वरूप, वेळा आणि बाकी तिला सांगे पर्यंत दुपार झालीच! लंच टाईम मध्ये ती बाहेर जेवायला आली तेव्हा डॉ. विजय ना फोन लावला... 

"हॅलो सर! आपलं काम झालं आहे.... माझं सोनिया ज्या टीम बरोबर काम करायची त्याच टीम सोबत काम करण्यासाठी सीलेक्शन झालं आहे." नियती म्हणाली. 

"अरे वा बरं झालं. ऑल द बेस्ट... कर आता काम... आणि काही मदत लागली तर नक्की कळव..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो नक्की... चला बाय... आता लंच टाईम संपत येईल मला पुन्हा जायचं आहे..." नियती म्हणाली आणि फोन ठेवला. 
************************
दुसरीकडे सुशांत सोनिया च्या घरी पोहोचला... नियती जेव्हा गेली होती तेव्हा ज्या माणसाने दार उघडलं त्याच माणसाने दार उघडलं... 

"नमस्कार! मी दिनेश! सोनिया मॅडम चा असिस्टंट म्हणून मला इथे पाठवलं आहे... त्या आहेत का घरी?" सुशांत ने विचारलं.

तो माणूस काही बोलणार एवढ्यात सोनिया स्वतःच बाहेर आली... 

"दिनेश? बरोबर? रिसर्च सेंटर मधून असिस्टंट म्हणून तुला इथे पाठवलं आहे ना?" सोनिया ने सुशांत ला बघून विचारलं. 

"हो..." सुशांत म्हणाला.

"ये ना आत ये... तुला तुझं काम समजावून सांगते... आपल्याला हवेलीत रिसर्च करण्याआधी काही कामं करायची आहेत त्याची तयारी तू करायची..." सोनिया म्हणाली. 

तो माणूस दोघं काय बोलतात हे ऐकतच तिथे थांबला होता... सुशांत ला नक्कीच काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं.... 
************************
"अभिनंदन सगळ्यांचं! तुम्ही सगळे खूप छान ट्रेनिंग करताय.... आता फक्त उद्याचा दिवस राहिला आहे तुमच्या ट्रेनिंग चा... मग, परवा परीक्षा झाली की तुम्ही सगळे ऑफिशिअली सी.आय.डी. ऑफिसर व्हाल." सुयश सरांच्या टीम ला ट्रेन करणारे ट्रेनर म्हणाले. 

"थँक्यू सर! आता देशाची सेवा करण्यासाठी आयती संधी चालून आली आहे तर त्याचं सोनं हे झालंच पाहिजे ना! शिवाय, या माझ्या टीम मुळे आज ही संधी मिळाली! यात आम्हा सगळ्यांचच योगदान आहे.. " सुयश सर म्हणाले. 

"वाह! तुमच्या बद्दल मी ऐकून होतो पण आज अनुभवलं. तुमची शिस्त, आपलेपणा सगळं पाहिलं. नक्कीच तुम्ही आणि तुमची टीम अजून मोठी यशाची शिखरं सर करणार..." ट्रेनर म्हणाले.

सगळ्या टीम ने एकमेकांकडे स्मित करत पाहिलं! आपण खूप नशीबवान आहोत की, सुयश सरांसारखे सर आपल्याला ए.सी.पी. म्हणून मिळाले हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच समाधानाने आणि देश सेवेच्या उत्साहाने पुन्हा त्यांचा सराव सुरू झाला!
**************************
 नियती आता रिसर्च सेंटर मध्ये चांगलीच मिसळी होती.... बऱ्याच जणांशी तिची मैत्री सुद्धा झाली... पहिल्याच दिवशी तिने तिच्या बोलक्या आणि लाघवी स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.... त्यातल्या त्यात तिथे काम करणाऱ्या केतकी शी तिची चांगली मैत्री झाली... नियती ला नवीन काम शिकवणे, सगळी माहिती देणे हे काम केतकी ने केलं होतं म्हणून त्यांचं बाँडीग चांगलं झालं होतं! 

"केतकी, मी तुला एक विचारू का ग?" नियती ने आता माहिती काढून घेण्यासाठी विषयाला सुरुवात केली.

"विचार ना! मी काही तुला नाही म्हणलं का?" केतकी म्हणाली. 

"परवा मी टीव्ही वर त्या हवेलीच्या लिलावाची बातमी बघितली. असं ऐकलं आहे सोनिया म्हणून कोणी आहेत त्या ती हवेली घेऊन कसला रिसर्च करणार आहेत आणि महाराणी कुसुमारंगिनि, ती हवेली अश्या काही रहस्यांचा उलगडा करणार आहेत म्हणे?" नियती म्हणाली.

"हो पण, मग त्याचं काय?" केतकी ने विचारलं.

"असं ऐकलं आहे की त्या आधी इथे काम करायच्या... मग, त्यांनी जॉब ते रहस्य शोधण्यासाठी सोडला का? आपल्या रिसर्च सेंटर ने केला असता ना हा प्रोजेक्ट?" नियती म्हणाली. 

केतकी ने तिला हळू बोल म्हणून खुणावले आणि म्हणाली; "संध्याकाळी घरी जाताना आपण बाजूच्या कॅफे मध्ये जाऊया... तिथे सांगते सगळं! पण, तू कोणाला काही बोलू नकोस हा... नाहीतर आपण इथून कायमचेच बाहेर पडू..." 

नियती ने फक्त मानेने हो म्हणलं. दोघी आता कामात व्यस्त झाल्या...
************************
सुशांत आणि सोनिया जरा सावध च होते... कारण, तो माणूस त्यांच्या प्रत्येक हालचाली नीट बघत होता... मध्येच इंग्लिश मध्ये बोलून त्यांनी बाहेर पडायचं असा प्लॅन आखला. त्या माणसाला संशय येऊ नये म्हणून सुशांत काळजी घेत होताच! 

"मॅडम सगळ्यात आधी काय करायचं आहे?" सुशांत ने सोनिया ला विचारलं. 

"आज हवेलीचं agreement तयार झालं असेल सगळ्यात आधी आपल्याला त्यांच्या वकिलांच्या ऑफिस मध्ये जायचं आहे... त्यावर सह्या झाल्या की  तुला ती हवेली दाखवते... तिथे आपल्या कामासाठी काही बेसिक गोष्टींची गरज लागेल त्याची यादी काढून तू तिथे सगळं तयार ठेव..." सोनिया म्हणाली. 

"ओके..." सुशांत म्हणाला. 

सोनिया ने सुशांत ला पुढे व्हायला सांगितले... तो जरा पुढे गेला असेल तोवर त्या माणसाने दार लावून घेतलं आणि सोनिया वर बंदूक रोखली! 

"नक्की कोण आहे हा? खरं सांग हा तुझ्या या डोक्यात काय शिजतंय?" तो बंदुकीचं टोक सोनियाच्या डोक्यावर ठेवत रागाने म्हणाला.

"सांगितलं ना... असिस्टंट आहे... दि... दिनेश... तुम्ही इथे असताना मी काय खोटे पणा करणार? मला या सगळ्या कामापेक्षा माझ्या मु..." सोनिया घाबरत घाबरत बोलतच होती पण, तिला तोडत तो माणूस म्हणाला; "हा हा समजलं समजलं... चल... आणि एक लक्षात ठेव आम्हाला चकवा द्यायचा प्रयत्न तर चुकून करू नकोस... नाहीतर परिणाम तुला माहीतच आहेत!" तो पुन्हा रागाने डोळे मोठे करून म्हणाला. 

सोनिया ने खाली मान घालून कसंबसं हो म्हणलं आणि ती निघाली... सुशांत तिथेच जिन्यात उभा होता... दाराचा आवाज ऐकुन तो पटकन खाली गेला... आपल्याला काहीही माहीत नाही याच आविर्भावात तो होता... सोनिया त्याला काही सांगायचा प्रयत्न करणार एवढ्यात त्याने तिला गप्प राहायला सांगितले... सोनिया ने नजरेनेच काय झालं म्हणून विचारलं! सुशांत ने हळूच तिला मागच्या दिशेने खुणावल! त्याच्या हातात मोबाईल होता आणि तो लॉक केल्यावर कोणीतरी सतत आपला पाठलाग करतंय हे त्याच्या लक्षात आलं होतं! त्याने हळूच फ्रंट कॅमेरा ओपन करून त्या माणसाचा न कळत फोटो काढला आणि तो डॉ. विजय ना सेंड केला... 

"मॅडम! त्या वकिलांचं ऑफिस कुठे आहे? म्हणजे मी कॅब बुक करतो... इथे जवळपास कुठे रिक्षा सुद्धा दिसत नाहीये..." सुशांत म्हणाला. 

सोनिया ने त्याला लोकेशन सांगितलं. तो कॅब बुक करणार एवढ्यात त्यांच्या समोर एक रिक्षा आली आणि त्या रिक्षेवाल्यानेच समोरून तेच लोकेशन सांगितलं. सुशांत ला संशय आला... तो काही बोलणार एवढ्यात त्याने त्या रिक्षा वाल्याला पाहिलं तर तो नजरेनेच सोनिया ला धमकावत होता... 

"चल दिनेश! आता रिक्षा आली आहे तर कॅब ची वाट नको बघायला..." सोनिया थोडी घाबरत म्हणाली. 

दोघं रिक्षेत बसले.... तो रिक्षा चालक सतत मिरर मधून त्या दोघांवर लक्ष ठेवून होता... त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तिथे काहीच बोलून उपयोग नव्हता! सुशांत फक्त त्या रिक्षा वाल्याच्या न कळत कसं बोलता येईल याचा विचार करत होता... पण, काहीही मार्ग दिसत नव्हता! एवढ्यात ते ऑफिस बाहेर पोहोचले. सुशांत त्याला पैसे देत होता तर त्याने ते घेतले नाहीत! 

"इधर आपको दुसरा रिक्षा मिलने मै तकलीफ होगा... हम इधर ही रुकते है आप जाके आईये.." तो रिक्षावाला म्हणाला. 

आपल्याला काही समजलं नाही हेच दाखवायचं होतं म्हणून सुशांत सुद्धा अगदी नम्रतेच्या स्वरात म्हणाला; "थँक्यु... आपके जैसे बोहोत कम होते है.... हम अपना काम खतम करके आते है! थँक्यू..." 

दोघं आत ऑफिस मध्ये गेले... त्या वकिलांच्या असिस्टंट ने त्यांना दोन मिनिटं बसायला सांगितलं आणि आत केबिन मध्ये जाऊन सोनिया आली असल्याचं त्यांना सांगून आली... वकिलांनी आत बोलावलं... 

क्रमशः..... 
***************************
काय सांगायचं असेल सोनिया ला? ती आता बोलेल तरी कशी? पुन्हा जाताना तोच रिक्षा वाला आहे.... सुशांत ला नक्की काय ते कळू शकेल का? नियती ला केतकी काय सांगणार असेल? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.

🎭 Series Post

View all