रहस्यमय हवेली (भाग -८)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सोनिया ने दिलेला कागद नियतीने पटकन पर्स मध्ये ठेवल्याने जरा चुरगळला होता. डॉ. विजय नी तो सरळ करून घेतला. 

"अगं नियती! सोनिया ने यावर काही लिहिलं नाहीये.... हे बघ कसलं तरी चित्र वाटतंय!" डॉ. विजय नी नियती ला तो कागद दाखवला. 

"हो! मी त्या माणसावर नजर ठेवून होते म्हणून मला याकडे लक्ष नाही देता आलं! आता? काय असेल या चित्राचा अर्थ?" नियती ते चित्र बघत म्हणाली. 

"थांब आपण त्याचा नंतर विचार करू..... तू ती डॉक्युमेंट्स ची फाईल दाखव... त्यावर काही वेगळं आहे का बघूया..." डॉ. विजय म्हणाले. 

नियती ने सोनिया च्या सह्या घेतलेली फाईल डॉ. विजय ना दिली.... डॉ. विजय नी ती फाईल नीट पाहिली... 

"नियती! हे बघ, या फाईल मध्ये सह्या नाहीत तर काही ना काही लिहिलं आहे...." डॉ. विजय फाईल दाखवत म्हणाले. 

नियती ने सुद्धा फाईल बघितली.... सही केल्या सारखं प्रत्येक पानावर काहीतरी वेगळं होतं! 

"हे काय असेल? कसलं तरी चित्र असल्या सारखं वाटतंय...." नियती म्हणाली. 

"हम्म... आपण हे उद्या सुशांत ला दाखवू... तो नक्की काहीतरी मदत करेल..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो चालेल.... मी आज जी काही माहिती मिळवली आहे ती सुद्धा त्याच्या कानावर घालते.... आणि मी निघते आता... पुन्हा उशीर होईल..." नियती म्हणाली. 

"अगं थांब ना इथेच... जेवून तरी जा..." अनुजा बाजूच्या काकूंकडून घरात येत म्हणाली. 

"अगं नको आई... सुशांत घरी वाट बघत असेल.. घरी जाऊन च जेवते..." नियती म्हणाली. 

दोघांचा आशीर्वाद घेऊन ती तिच्या घरी जायला निघाली. अर्धा रस्त्यात आल्यावर तिचा मोबाईल वाजला! 

"हॅलो... हॅलो.... माझ्या कडे जास्त वेळ नाहीये... प्लीज माझी मदत करा.... उद्याच्या उद्या कोणाला तरी पाठवा...." समोरून आवाज आला. 

नियती काही बोलायच्या आत फोन कट झालेला.... सोनिया ने मदतीसाठी फोन केलेला होता! नियती ला नक्की असं काय घडलं हे कळेना! त्याच विचारांच्या तंद्रीत ती चालत होती.... 

"पिप... पीप....." अचानक जोरात गाडीचा हॉर्न वाजला.

नियती भानावर आली... तिने बाजूला पाहिलं.

"अगं काय हे? कुठे लक्ष होतं! मी केव्हा पासून तुला हाका मारतोय! अशी काय चालतेस रस्त्याने? काही झालं असतं तर?" सुशांत तिच्या बाजूला गाडी उभी करत म्हणाला. 

"अरे नाही काही नाही... तू आत्ता इथे कसा?" नियती ने विचारलं. 

"तू आधी बस... नाहीतर रस्त्यावरच्या गाड्या उडवशील..." सुशांत तिची मस्करी करत म्हणाला. 

"गप ना..." नियती ने त्याच्या हातावर एक फटका मारला आणि त्याच्या मागे बसली. 

दोघं आता घरी जायला निघाले. 

"सुयश सर आणि बाकी सगळे आता सी.आय.डी. ऑफिसर ची ट्रेनिंग घ्यायला गेले आहेत ना! त्यांचं प्रमोशन झालं ना.." सुशांत म्हणाला. 

"हो! पण, मी हे तुला सांगितलं नव्हतं! तुला कसं समजलं? आणि आत्ता कसा तू इथे आलास सांगशील का काही?" नियती ने तिच्या प्रश्नांची यादी च सुरू केली. 

"अग हो हो... सांगतो... तू शांत बसशील तेव्हा बोलेन ना मी!" सुशांत पुन्हा तिला चिडवत म्हणाला. 

"बोल...." नियती म्हणाली. 

"मी आत्ता बाबांना फोन केला होता तेव्हा समजलं सुयश सरांच्या टीम च्या प्रमोशन च! आणि तू नुकतीच तिकडून निघाली होतीस तर म्हणलं बायकोला घेऊन येऊ... म्हणून आलो! आणि बरं झालं आलो... तू तर बेधुंद चालत होतीस रस्त्यावर..." सुशांत म्हणाला. 

"बेधुंद नाही रे... जरा विचारात होते... त्यामुळे लक्ष विचलित झालं!" नियती म्हणाली. 

"आता तरी सांग एवढं जीवावर उदार होऊन कसला विचार चालू होता... काही प्रॉब्लेम झाला आहे का?" सुशांत ने काळजीने विचारलं.

"घरी पोहोचल्यावर सांगते सगळं... तुझी सुद्धा मदत लागणारच आहे..." नियती म्हणाली. 

थोड्याच वेळात दोघं घरी पोहोचले. हात पाय धुवून नियती स्वयंपाक करायला किचन मध्ये गेली तर सुशांत ने आधीच सगळं करून ठेवलं होतं! दोघांनी पानं वाढून घेतली आणि जेवता जेवता नियती ने जे काही घडलं होतं ते सगळं सुशांत ला सांगितलं. 

"हे एवढं सगळं झालं? ठीक आहे आपण सोनिया मॅडम ची मदत करू..." सुशांत म्हणाला. 

"हो ते तर करायचं च आहे.... सुयश सरांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे." नियती म्हणाली. 

"ठीक आहे! उद्या डॉ. विजय, तू आणि मी एकत्र भेटू तेव्हा प्लॅनिंग करुया... तो पर्यंत तू त्या फाईल वरच्या सह्या आणि चित्र काही तरी सांगत होतीस ते दाखव..." सुशांत म्हणाला. 

नियती ने त्याला ती फाईल आणि तो चित्र असलेला कागद दिला आणि ती बाकी काम आवरायला गेली. सुशांत अगदी बारकाईने ते सगळं पाहत होता.... 

"नियती! या सगळ्याचा अर्थ लागला. हे जे चित्र आहे त्याचा अर्थ हात दगडाखाली आहेत असा काहीसा होतोय... हे बघ ना हे ओबड धोबड काहीतरी आहे आणि त्याच्या खाली हे हाताची बोटं असल्यासारखं दिसतंय... या फाईल मध्ये हे जे दिसतंय ते मी भिंग घेऊन बघितलं... सोनिया ने स्व इच्छेने आधीचा जॉब सोडला नाहीये.... एकतर तिला तिथून काढून टाकलं आहे किंवा कोणीतरी तिला राजीनामा द्यायला लावला आहे..." सुशांत ने नियती ला सगळं समजावलं. 

"अरे पण, मी तिथे जाऊन आले! तिथल्या एक दोन जणांना मी सोनिया बद्दल विचारलं तर ते म्हणाले तिने च राजीनामा दिला... काहीतरी पर्सनल कारण होतं असं सांगितलं मला." नियती ने तिला मिळालेली माहिती सुशांत ला सांगितली. 

"बरं! आत्ता आता झोप... दिवसभर दमली असशील.... आपण उद्या सगळ्या घटनांचा पुन्हा अभ्यास करू आणि एक प्लॅन तयार करून लागू कामाला." सुशांत म्हणाला. 

नियती सुद्धा हो म्हणाली. दोघं फार दमले होते... सुशांत चे सुद्धा नुकतेच एक मिशन झाले होते त्यामुळे त्याला आरामाची गरज होती... दोघं झोपले.... दुसऱ्या दिवशी सगळं आवरून नियती आणि सुशांत लॅब ला जायला निघाले. दोघं लॅब ला पोहोचले तेव्हा डॉ. विजय आलेले च होते... 

"या या जावई बापू.... काय कसे आहात?" डॉ. विजय म्हणाले. 

"मी मस्त च आहे.... आणि काय तुम्ही पण! सुशांत च म्हणा मला.... तुमचा मुलगाच आहे मी! आणि लॅब मध्ये असताना तर तुम्ही माझे सर आहात." सुशांत म्हणाला. 

"हो! सगळी नाती बाहेर आणि सुशांत बरोबर बोलतोय... मी पण, इथे असताना तुम्हाला सर च म्हणते ना..." नियती म्हणाली. 

"बरं बरं.... चला मग आता कामाला लागू! दोन दिवस होऊन गेलेत... आज तिसरा दिवस आहे! उद्या परवा मध्ये agreement सुद्धा येईल..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो! मी काल सुशांत ला सगळी कल्पना दिली आहे... आता सरळ आपण अँक्शन प्लॅन वर च येणार आहोत..." नियती म्हणाली. 

"सुशांत काही ठरवलं आहेस का तु?" डॉ. विजय नी विचारलं. 

"हो! काल त्या सह्या आणि चित्राचा अर्थ लागला आहे... नियती तुम्हाला सगळं सांगेलच! तोपर्यंत मी जरा सोनिया मॅडम शी बोलतो... नियती त्यांचा नंबर मसेज कर..." सुशांत म्हणाला. 

नियती ने त्याला सोनिया चा नंबर दिला आणि डॉ. विजय ना त्या चित्राबद्दल, सह्यांबद्दल आणि रात्री ती रस्त्यात असताना आलेल्या फोन बद्दल  सांगितलं. तोपर्यंत सुशांत फोन वर बोलून आला... 

"सर, नियती मला एक प्लॅन सुचला आहे..." सुशांत म्हणाला. 

"बोल..." डॉ. विजय म्हणाले. 

"मी सोनिया चा असिस्टंट म्हणून तिथे चाललो आहे... आत्ता मी फोन वर तेच बोलून आलो. नियती, तू सोनिया आधी काम करायची तिथे वेश बदलून कामाला जा.. तिथे काहीतरी वेगळं घडलं असणार जे आपल्याला समजलं पाहिजे.." सुशांत म्हणाला. 

"हो चालेल! नियती! तू आजच सी. व्ही. तयार कर आणि तिथे जा.... इथलं सगळं मी बघतो... तिथे माझ्या ओळखीचे एक डॉ. आहेत त्यांना मी या बद्दल कल्पना देतो..." डॉ. विजय म्हणाले.

"ओके सर! सुशांत, तू आत्ता फोन वर बोललास तेव्हा सोनिया बोलताना काही जाणवलं का? म्हणजे, कोणाला संशय आला नसेल ना?" नियती ने विचारलं. 

"नाही! मी फोन वर माझं नाव दिनेश सांगितलं आहे... त्यांना हवेलीच्या कामात असिस्ट करायला माझी निवड करण्यात आली आहे असं मी सांगितलं... आता तू सोनिया ला मागच्या वेळ सारखा फोन करून मी तिथे तिचा असिस्टंट म्हणून जातोय हे सांग... म्हणजे, कोणी ऐकलं असेल तरी संशय नको यायला." सुशांत म्हणाला. 

नियतीने त्याने सांगितल्या प्रमाणे सोनिया ला फोन लावला. 

"हॅलो! सोनिया मॅडम मी रिसर्च कमिटी मधून बोलतेय... आम्हाला तुमच्या सह्यांचे डॉक्युमेंट्स मिळाले. शिवाय आता तुम्ही एवढी मोठी कामगिरी करणार आहात म्हणून तुम्हाला एक असिस्टंट आम्ही देतोय... आज तो तुमच्या पत्त्यावर येईल... काही बेसिक काम त्याच्याकडून तुम्हाला करून घ्यायची असतील तर तुम्ही करून घेऊ शकता." नियती म्हणाली. 

"ओके.. थँक्यु मॅडम! मला आला होता फोन.. मी त्यांची वाट बघतेय... आहेत बरीच कामं जी रिसर्च सुरू करण्याआधी करावी लागतील." सोनिया पुन्हा दबक्या आवाजात म्हणाली.

क्रमशः....
***********************
आता सुशांत सोनिया चा असिस्टंट बनून तिथे जातोय... आणि नियती ती आधी ज्या रिसर्च सेंटर मध्ये काम करायची तिथे! त्यांच्या हाती काही लागेल का? सुयश सरांची टीम आता चार दिवसात ट्रेनिंग संपवून येईल... तोपर्यंत हे सगळे आवश्यक तेवढी माहिती मिळवू शकतील का? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all