Login

रहस्यमय हवेली (भाग -१७)

Finding the mystery of the mansion. Loop hole and mysterious mansion collaboration.

रहस्यमय हवेली (भाग -१७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)
**************************
घाई घाईत मोनिका चे बाबा सी.आय.डी. ब्यूरो मध्ये आले. 

"कुठे आहे मोनिका? काय झालंय तिला?" त्याने आल्या आल्या मोनिका बद्दल विचारलं. 

"सर.. सर... तुम्ही आधी इथे शांत बसा... मोनिका ला घेऊन आमची टीम येतच असेल..." गणेश ने त्याला बसायला खुर्ची दिली आणि हातात पाण्याचा ग्लास दिला. आणि तो सुयश सरांना फोन करायला बाजूला गेला. 

"हॅलो! सर, मोनिका चे बाबा आले आहेत!" गणेश ने सांगितलं. 

"आम्ही येतोच आहे... मोनिका बद्दल आत्ता काही बोलू नकोस मी येऊन बोलतो त्यांच्याशी." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर..." गणेश म्हणाला आणि त्याने फोन कट केला. 

"काय झालं? आता तरी मला सांगा काय झालंय.... सोनिया का रडतेय? अगं सोनिया तू तरी सांग ना..." केदार म्हणाला. 

"सर... तुम्ही शांत व्हा... टीम येतेय परत तेव्हा सांगतील सगळं..." गणेश ने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. 
***************************
इथे रणजित कुमार हे सगळं काय घडतंय या गोंधळात होता. 

"सर! हे सगळं नक्की काय चाललंय? आमच्या आऊट हाऊस मधून तो कोण माणूस बाहेर आला? ती मुलगी कोण होती? आणि या सगळ्यात हवेली चा काय संबंध?" त्याने विचारलं. 

सुयश सरांनी सगळं डिटेल मध्ये त्याला सांगितलं! आपली बायको आणि भाऊ हे असं काही करु शकतील यावर त्याचा विश्वास बसत नव्हता! 

"का केलं तुम्ही हे? काय कमी होती आपल्याला?" त्याने चिडून विचारलं. 

"आम्ही तिघेही एक रिसर्च करत होतो... आपल्या पुरातन हवेली ला काही आधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्हाला बदल करायचे होते... त्याचबरोबर मी काही बायोलॉजिकल रिसर्च पण करत होतो! या आधी मी यशवंत नाव घेऊन बऱ्याच ठिकाणी काम केलं! पुरातन वास्तूंचे आधुनिकीकरण आणि मानवाच्या शारीरिक क्षमतेचे आधुनिकीकरण हे आमचं ध्येय होतं! एखाद्या अपंग माणसाला सुद्धा शर्यतीत धावता येईल एवढी पॉवर होती आमच्या केमिकल मध्ये! हा पण, याने त्या माणसाचं आयुष्यमान कमी होत होतं...." रणवीर म्हणाला. 

"अरे पण निसर्गाने जसं ठेवलं आहे त्यात फेरबदल का करायला गेलात..." रणजित कुमार म्हणाला. 

"आम्हाला तिघांना पण असं वाटत होतं की ही दुनिया सगळी परफेक्ट व्हावी! कशाची कमतरता आम्हाला सहन होत नव्हती..." केतकी म्हणाली. 

"हो... आणि म्हणून जेव्हा लिलावाची बातमी समजली तेव्हा मी आणि रणवीर ने एका रात्रीत महाराणींनी काहीतरी सांकेतिक भाषेत लिहून ठेवलेलं आहे त्याचे अर्थ शोधा, या हवेलीत जी रहस्य आहेत ती आधी सोडवा म्हणून यांच्या मागे लागले... आम्हाला वाटलं हे सगळं थांबेल आणि हवेलीचा लिलाव टळेल.. पण, असं नाही झालं नाही.... म्हणून आम्ही महाराणी बोलतायत असं चित्र भासावलं! तलवारीच्या समजुती आमच्या पिढीमध्ये आधी पासून होत्या! त्यात भर म्हणून त्या तलवारीची खोटी कहाणी सुद्धा रचली.... ते खरं वाटावं म्हणून हवेलीच्या खोल्यांची दिशा बदलली...  तरीही लिलाव होणार म्हणून मग त्या सोनियाच्या मुलीचं अपहरण केलं! रवींद्र कडून तिची सगळी माहिती मिळालीच होती... त्यात ती अंशतः अपंग! मग काय आम्हाला प्रयोगासाठी आयाता बकरा मिळाला होता!" निलवंती म्हणाली. 

"चूप! तुम्हा दोघांकडून मी ही अपेक्षा केली नव्हती.... एवढा मोठा कट रचला... सर! आत्ताच्या आत्ता यांना माझ्या नजरेसमोरून घेऊन जा...." रणजित कुमार ने पाठ फिरवली आणि म्हणाला. 

"सोनाली! अभिषेक! जा या तिघांना घेऊन... तुमच्या सारख्या लोकांसाठी परफेक्ट जागा जेल च आहे... रहा आता तिकडेच स्वतःच्या परफेक्ट जगात!" सुयश सर म्हणाले. 

आता मोनिका ला नक्की काय झालं असेल आणि तिच्या आई - बाबांना हे सगळं कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल हा विचार करतच सुयश सर ब्यूरो मध्ये आले. 

"सर... माझी मोनिका?" सोनिया ने रडत रडत विचारलं. 

सुयश सरांनी जे तिथे घडलं ते सगळं सांगितलं. डॉक्टर विजय ना घेऊन ते सगळे सिटी हॉस्पिटल मध्ये गेले.

"आत्ता मोनिका म्हणून एका लहान मुलीची केस आली आहे ती कुठे आहे?" सुयश सरांनी रिसेप्शन वर विचारलं. 

"तो पेशंट आय.सी. यू. मध्ये आहे... तुम्हाला भेटता नाही येणार... बाहेरून बघा.. इथून डाव्या हाताला जा.." रिसेप्शनिस्ट ने सांगितलं. 

सगळे आय.सी. यू. च्या दिशेने गेले. बाहेर विक्रम थांबला होताच! 

"कशी आहे आता मोनिका? डॉक्टरांनी काय सांगितलं?" डॉ. विजय नी विचारलं. 

"ते अजून तिच्या टेस्ट करतायत... अजून ती शुध्दीवर आलेली नाही." विक्रम म्हणाला. 

सोनिया केदारच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. आधी मोनिका च अपहरण आत्ता ती सापडली तर तिच्या जीवाचा हा असा खेळ म्हणून तिला खूप त्रास होत होता. एवढ्यात डॉक्टर बाहेर आले. 

"कशी आहे आता मोनिका? काय झालंय तिला?" केदार ने विचारलं. 

"तुम्ही कोण?" डॉक्टर म्हणाले. 

"मी तिचा बाबा... सांगा ना काय झालंय मोनिकाला?" केदार ने विचारलं. 

"अजून नक्की काही सांगता येणार नाही... तिच्या हार्ट बिट्स एकदम लो झाल्या होत्या... वेळेत इथे आणलं म्हणून ती वाचली... आम्ही ब्लड टेस्ट केली आहे तिची तेव्हा समजेल अचानक असं का झालं... तिच्या हाता - पायावर कसलेतरी पुरळ उमटले आहेत.... आता रिपोर्ट्स आल्यावर समजेल.." डॉक्टर म्हणाले. 

"हॅलो डॉक्टर.. मी डॉ. विजय! मला मोनिका ला बघता येईल का? आणि तिचे रिपोर्ट आले की लगेच मला द्या!" डॉ. विजय म्हणाले. 

"हो नक्की... तुम्ही या माझ्यासोबत.." डॉक्टर म्हणाले. 

डॉ. विजय आणि मोनिका ची ट्रीटमेंट करणारे डॉ. प्रशांत आय.सी. यू. मध्ये गेले. तिथे डॉ. विजय नी मोनिकाच्या शरीरावर उमटलेले पुरळ बघितले! डॉ. प्रशांत कडून तिचे ब्लड सँपल घेतले आणि चेकिंग साठी लॅब ला आले. 
**************************
सी.आय. डी. ब्यूरो मध्ये रवींद्र ची कसून चौकशी सुरूच होती! त्याने असं काय केलं होतं म्हणून मोनिका बेशुद्ध पडली हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं! 

"काय केलंस तू मोनिकाला? अचानक ती बेशुद्ध कशी झाली? बोल लवकर...." अभिषेक ने त्याची मान मागून जोरात दाबून विचारलं. 

तरीही तो काहीही न बोलता फक्त हसत होता. त्याच्याकडून खूप पद्धतीने माहिती काढण्याचा अभिषेक प्रयत्न करत होता पण सगळं व्यर्थ जात होतं! एवढ्यात डॉ. विजय तिथे आले. 

"अभिषेक! आता त्याला काहीही विचारण्याची गरज नाही. मला समजलं आहे मोनिकाला काय झालं! ये माझ्याबरोबर..." डॉ. विजय म्हणाले. 

अभिषेक त्यांच्या सोबत गेला. 

"ऐक! मी मोनिका ची बल्ड टेस्ट केली त्यात कोणतं तरी नवीन केमिकल सापडलं आहे ज्यामुळे ती बेशुध्द झाली आणि ते पुरळ उमटले आहेत! हॉस्पिटल मध्ये मी तिला चेक केलं होतं तेव्हा तिच्या हातावर मला इंजेक्शन चा मार्क दिसला होता! मला वाटतंय तुमची तिथे झटापट झाली असेल तेव्हा त्या रवींद्र ने ते इंजेक्शन मोनिकाला दिलं असणार... मी त्याचा अँटी डोट बनवायचा प्रयत्न करतोय पण, सुशांत आणि ईशा अजून हवेलीत आहेत ना? त्यांना तिथे काही मिळतंय का बघायला सांग..." डॉ. विजय म्हणाले. 

"ओके... मी करतो सुशांत ला फोन..." अभिषेक म्हणाला आणि त्याने पटापट सगळ्या हालचाली करून सुशांत ला तिकडे शोध घ्यायला सांगितलं. 
************************
सुयश सरांनी तिथल्या डॉक्टरांना या बद्दल कल्पना दिली आणि सोनिया, केदार शी बोलायला आले. 

"आता मोनिका लवकर बरी होईल... डॉ. विजय नी टेस्ट केल्या आहेत आणि ते येतीलच लवकर इथे...." सुयश सर म्हणाले. 

सोनिया आता थोडी स्टेबल झाली होती. इतक्या वेळा पासून तिने पाण्याचा घोट सुद्धा घेतला नव्हता. म्हणून, केदार तिला घेऊन हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये गेला. दोघांसाठी त्याने कॉफी ऑर्डर केली आणि कॉफी घेता घेता दोघं बोलत बसले. 

"सोनिया! आता मला खरं सांग तू हे सगळं मला का नाही सांगितलं? अगं आपली मोनिका लगेच सापडली असती ना मला फक्त सांगायचं तरी होतं..." केदार तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. 

"काय करणार होतास तू? तू तिकडे भर समुद्रात जहाजावर! तुला टेंशन नको म्हणून काही बोलले नाही रे...." सोनिया म्हणाली. 

"ओके.. ओके.. आता काळजी नको करुस.. मी आलोय ना!" तो म्हणाला. 

तिने फक्त मान डोलावली आणि दोघं कॉफी घेऊन पुन्हा आय.सी. यू. बाहेर आले. तोवर तिथे डॉ. विजय, सुशांत आणि ईशा सुद्धा आले होते. त्या हवेलीच्या बंद खोलीत जी अभि ने दाखवलेली होती तिकडे सुशांत आणि ईशा ला काही केमिकल आणि फॉर्मुले मिळाले होते ते पटकन डॉ. विजयंना नेऊन दिल्याने त्यांचं अँटी डोट बनवायचं काम वाचलं. त्यांनी लगेच ते इंजेक्शन मोनिकाला दिलं. 

"साधारण १५ मिनिटात येईल मोनिका शुध्दीवर... तुम्ही आता कसलीच काळजी नका करू..." डॉ. विजय म्हणाले. 

सगळे आता निश्चिंत झाले होते. 

"थँक्यू सर! तुमच्यामुळे आज मोनिका वाचली." सोनिया हात जोडून सी.आय. डी. टीम ला म्हणाली. 

"अहो नाही... आम्ही आमचं काम केलं आहे... थँक्यू म्हणायचं असेल तर अभिज्ञा मॅडम ना बोला. त्यांनी त्या गुप्त रस्त्याने जाऊन ती बंद खोली आणि तिथली सगळी माहिती दिली म्हणून आपण लवकर मोनिका पर्यंत पोहोचलो." सुयश सर म्हणाले. 

"हो! अभि ने खूप मदत केली.... तिचे व्याप एवढे होते तरी ती इथे आली..." सोनिया म्हणाली. 

एवढ्यात नर्स ने येऊन मोनिका शुध्दीवर आल्याचं सांगितलं. सगळे जाऊन तिला भेटले. आता ती पूर्ण बरी होती आणि काही चेक अप करून आज संध्याकाळ पर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल असं डॉ. प्रशांत नी सांगितलं. 

"चला मग मॅडम! आमचं काम झालं... आम्ही आता निघतो... काही गरज लागली तर फोन करा..." सुयश सर म्हणाले आणि केदार ला हात मिळवला. 

सोनिया आणि केदार त्यांना पुन्हा थँक्यू म्हणाले. सी.आय. डी. टीम तिथून निघाली. 

"काय ग सोनिया अभिज्ञा म्हणजे आपण पुण्यात एका पुरातन वस्तूंच्या प्रदर्शनात जिला भेटलो होतो तीच ना? देशमुख ना?" केदार ने विचारलं. 

"हो तीच! आपण तिचे आभार मानायला तिथे जाऊया आता... ती इथे आली होती तेव्हा मी तिचं आणि अगम्य च बोलणं ऐकलं होतं, त्यांच्या पिढी मध्ये म्हणे कोणीतरी सूर्यकांत आहे तो त्यांच्या घराण्यातल्या पुरुषांना जगू देत नाही आता तो कोणत्या तरी पुस्तकात गेलाय त्याला हरवल्या शिवाय हा शाप काही संपणार नाही.... तिची मदत पण आपण आपल्या परीने करुया... म्हणजे हे जे नक्की काय आहे मला नाही माहित पण, फार भयंकर वाटतंय रे.." सोनिया काळजी ने म्हणाली. 

"हो.. हो... जाऊया... कदाचित आता हीच योग्य वेळ आहे तुला सांगण्याची!" केदार म्हणाला. 

सोनिया त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. त्याने काही क्षणाचा पॉज घेतला. 

"तू चिडू नकोस पण हे सांगितल्यावर... तू घाबरु नये म्हणून मी तुला या आधी सांगितलं नव्हतं! मला हे अभिज्ञा आणि अगम्य बद्दल माहिती आहे आधी पासून... खरंतर मी एका अघोरी बाबांचा शिष्य आहे! त्यांनी मला स्वप्नलोकातून हा संदेश दिला होता." केदार बोलत होता. 

"म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला?" सोनिया त्याला मध्येच तोडत म्हणाली.

"मी खूप वर्ष आधी पासून ही विद्या जाणतो! तुझा यावर विश्वास बसणार नाही आणि उगाच तू घाबरून जाऊ नये म्हणून मी कधी याचा उल्लेख केला नाही. मी ज्या बाबांचा शिष्य आहे ते खूप ज्ञानी आहेत आणि त्यांच्याकडून मी अघोरी विद्या शिकलो आहे. मला टेलेपथी सुद्धा येते.... म्हणून तर मी तुला म्हणालं, जर मोनिका बद्दल तू आधी सांगितलं असतं तर माझ्या विद्येचा वापर करून मी मोनिका चा तपास लावला असता." केदार म्हणाला. 

सोनिया साठी हा फार मोठा धक्का होता पण याने तिला किंवा तिच्या कुटुंबाला कोणताही त्रास होत नव्हता म्हणून तिने थोडाच वेळात स्वतः ला समजावलं. 

"ओके... मला समजलंय तुला काय म्हणायचं आहे... आता तुझ्या या विद्येचा जर अभि ला उपयोग होणार असेल तर आपण उद्याच जाऊ तिच्या घरी.... मोनिका पण आता स्टेबल आहे.. मी घेईन तिची काळजी... फक्त हे तिच्यासाठी सरप्राइज असेल हा..." सोनिया म्हणाली. 

तिने हे सगळं समजून घेतलं आहे आणि तिच्या मनात काही शंका नाहीत हे पाहून त्याला बरं वाटलं.... 

क्रमशः.... 
************************
उद्या आता सोनिया, केदार आणि मोनिका अभिच्या घरी जाणार आहेत... तिच्या घरी येणारे बाबा यांचा केदार हा एक शिष्य आहे! आता नक्की पुढे काय होईल? त्या सूर्यकांत चा अंत होईल का? केदार या सगळ्यात कशी मदत करेल पाहूया पुढच्या भागात. लूप होल पर्व २ वाचायला सुद्धा विसरू नका. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. 

🎭 Series Post

View all