रहस्यमय हवेली (भाग -१३)

Finding the mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग-१३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
आत्तापर्यंत आपण पाहिलं; सुयश सर आणि त्यांची टीम सी.आय.डी. ट्रेनिंग संपवून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत! सोनिया ने दिलेल्या चिठ्ठी मुळे सगळे तिची मदत करतायत! नियती सोनिया आधी ज्या रिसर्च सेंटर मध्ये काम करायची तिथे काही हाती लागतंय का म्हणून गेली आहे.  सुशांत ने ज्या रिक्षेचे डिटेल्स पाठवले आहेत त्यावरून निनाद आणि गणेश त्याच्या घरी जाऊन आले आणि आता नाकाबंदी केली आहे. सुयश सर, सोनाली आणि ईशा रवींद्र च्या घरी गेले आहेत. सोनिया आणि अभिषेक हवेलीतून खरी तलवार घेऊन डॉ. विजयच्या लॅब मध्ये आले! तिथे सोनिया आणि अभिज्ञाची खूप वर्षांनी भेट झाली. अभिज्ञाने सुद्धा त्या तलवारीच्या काही टेस्ट करायला सुरुवात केली.... आता पुढे.... 
***************************
अभिषेक लॅब मध्ये एका बाजूला उभा होता! डॉ. विजय आणि सोनिया अभिज्ञाला टेस्ट करायला मदत करत होते.... तिच्या टेस्ट्स झाल्या आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचे भाव बदलले. 

"काय झालं?" अभिषेक ने गोंधळून विचारलं. 

"म्हणजे माझी शंका खरी आहे तर?" सोनिया ने विचारलं. 

"हो! ही तलवार जेवढी दाखवली गेली आहे तेवढी पुरातन नाहीये.... केमिकल्स चा वापर करून या तलवारीला पुरातन दाखवण्यात आलं आहे... शिवाय या तलवारीची मूठ सुद्धा काहीतरी वेगळी आहे... नक्की इथे काहीतरी गडबड आहे." अभिज्ञा म्हणाली. 

"म्हणजे?" अभिषेक ला काहीही न समजल्यामुळे त्याने विचारलं. 

"ते तर आपल्याला हवेलीत गेल्यावर समजेल.. पण, ही तलवार जास्तीत जास्त पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे." अभिज्ञाने ठाम पणे सांगितलं. 

"ओके.... आपल्याला या तलवारीची अजून काही माहिती कळू शकेल का? म्हणजे कुठून घेतली असेल किंवा असं काही?" अभिषेक ने विचारलं. 

"वाटत तरी नाहीये... ही तलवार स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतली असणार कारण, याची मुठ एकदम स्पेशल आहे शिवाय कुठे लोगो सुद्धा दिसला नाही." अभिज्ञा म्हणाली. 

"बरं! मी सुयश सरांना याबद्दल कल्पना देतो मग ठरवू पुढे काय करायचं." अभिषेक म्हणाला. 
**************************
इथे सुयश सर, ईशा आणि सोनाली रविंद्रच्या घराची पाहणी करत होते! घरातलं सगळं सामान पांढऱ्या कापडाने झाकून ठेवलं होतं! खूप वर्ष घर बंद असल्यामुळे कुबट वास आणि जळमटं होती! 

"सर! खरंच रवींद्र इथे नसेल का? खूप काळ या घराला कोणा माणसाचा हात लागला असेल असं वाटत तरी नाहीये!" ईशा म्हणाली.

"हम्म! बघूया आपल्यासाठी रवींद्र इथे नक्की काय सोडून गेलाय..." सुयश सर म्हणाले. 

सगळ्यांनी हातात ग्लोव्हज घातले आणि झडती घ्यायला सुरुवात केली! तिथे बरेच पेपर्स, फाईल्स, जर्नल्स असं धूळ खात पडलं होतं! कसले तरी फॉर्म्युले त्यात लिहिलेले होते. 

"सर! हे बघा!" सोनाली ने एका बुक शेल्फ वर काहीतरी बघून सरांना आवाज दिला. 

"नियती ने आपल्याला ज्या रिसर्च बद्दल सांगितलं होतं हा तोच आहे असं वाटतंय... हे सगळं घेऊन चला... डॉ. विजयच आता हे नक्की काय आहे सांगू शकतील..." सुयश सर म्हणाले. 

ईशा आणि सोनाली ने मिळून तिथे असणारे सगळे पेपर्स, जर्नल्स आणि पुस्तकं सोबत घेतली आणि सगळे बाहेर पडू लागले. 

"ईशा! सोनाली! एक मिनिट..." सुयश सर अचानक जागीच थांबले आणि त्या दोघींना हाक मारली. 

"काय झालं सर?" ईशा ने विचारलं. 

"आपण इथून सुद्धा काहीतरी उचललं आहे का?" सुयश सरांनी एका टेबलाकडे बोट दाखवून विचारलं. 

"नाही..." सोनाली म्हणाली. 

"इथे नक्की काहीतरी होतं! हे बघा, सगळ्या टेबलावर धूळ आहे पण हा एवढाच भाग आहे जिथे टेबल स्वच्छ आहे..." सुयश सर म्हणाले. 

"म्हणजे सर आपण यायच्या आधीच कोणीतरी....." ईशा म्हणाली. 

"हम्म! एक काम कर ईशा! घरात जेवढे बोटांचे ठसे मिळतील तेवढे घे... आणि सोनाली तू आसपास बघ कुठे काही सापडतय का! मी बाहेर चौकशी करून येतो इथे कोणी आलं होतं का म्हणून..." सुयश सर म्हणाले. 

दोघी आपापलं काम करू लागल्या आणि सुयश सर बाहेर पडले.... एवढ्यात त्यांचा फोन वाजला... 

"हॅलो! हा बोल अभिषेक!" सुयश सर म्हणाले. 

"सर, सोनिया मॅडम आणि अभिज्ञा मॅडम नी त्या तलवारीच्या काही टेस्ट केल्या आहेत! ती तलवार जेमतेम पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे आणि त्यात काहीतरी विशेष आहे... तर अभिज्ञा मॅडम ना पुढच्या टेस्ट साठी हवेलीची पाहाणी करावी लागेल..." अभिषेक ने सगळं सविस्तर सांगितलं. 

"ओके... आम्ही सगळे तिथे पोहोचतोय तोपर्यंत तू त्यांना ब्यूरो मध्ये घेऊन ये... आपल्याला प्रॉपर प्लॅन करून सगळं करावं लागेल..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर!" अभिषेक म्हणाला आणि फोन ठेवला. 
***************************
इथे नियती डॉ. अभिनव यांनी दिलेलं काम करत होती. सगळ्या जुन्या स्टाफ चा डेटा आणि त्यांचे कोणत्या विषयावर रिसर्च सुरू होते याची माहिती सुद्धा त्यात होती....  

"चला! आपलं काम सोपं झालं... यात रवींद्र बद्दल माहिती मिळाली तर बरंच आहे...." नियती स्वतःशीच बोलली. 

तिने व्यवस्थित सगळे रिपोर्ट तयार करायला घेतले. सगळे डिटेल्स भरता भरता तिला रवींद्र चे डिटेल्स तिथे दिसले! लास्ट रिसर्च तो पुरातन वास्तूंना नवीन तंत्रज्ञानाशी जोडून आधुनिक कसं करता येईल, पुरातन आणि नवीन यांचा संगम कसा साधता येईल यावर करत होता! यात सोनिया, रॉबिन आणि यशवंत अशी तीन नावं समोर आली. 

"सोनिया च ठीक आहे पण आत्ता पर्यंत एवढ्या स्टाफ एन्ट्री केल्या त्यात रॉबिन आणि यशवंत असं कोणी दिसलं नाही... याबद्दल केतकी ला विचारावं लागेल बहुतेक...." ती मनात म्हणाली. 

सगळं काम झाल्यावर आसपास कोणी नाही हे बघून तो सगळा डेटा तिने तीच्याकडच्या पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा कॉपी करून घेतला. हे सगळं होई पर्यंत लंच ब्रेक झालच होता! 

"केतकी! चल आपण आज बाहेर जाऊन लंच घेऊ... इथे एक मी हॉटेल बघितलं आहे... खूप छान असतं म्हणे तिथलं जेवण... आपण तिथेच जाऊया..." नियती केतकीच्या डेस्क जवळ येऊन म्हणाली. 

नियती ला नक्की काहीतरी वेगळं बोलायचं असणार म्हणून ती बाहेर घेऊन जातेय हे केतकीच्या लक्षात आलं! दोघी बाहेर पडल्या आणि जेवायला हॉटेल मध्ये गेल्या आणि दोन लंच ऑर्डर केले. 

"बोल... काय विचारायचं आहे..." केतकी ने सरळ मुद्द्याला हात घातला. 

"अगं आज मला अविनाश सरांनी ते एन्ट्री च काम दिलं होतं माहितेय ना? त्यात मी आज रॉबिन आणि यशवंत अशी दोन नावं पाहिली जी रवींद्र सोबत काम करत होती... तुला याबद्दल काही माहिती आहे का?" नियती ने विचारलं. 

"नाही... ही नावं मी सुद्धा पहिल्यांदा ऐकली आहेत! तुला एक विचारायचं होतं, म्हणजे बघ हा, तू आत्ता आत्ता नवीन कामाला लागली आहेस तरी तुला त्या रवींद्र सरांच्या रिसर्च मध्ये एवढा का इंटरेस्ट आहे?" केतकी ने विचारलं. 

"इंटरेस्ट असं नाही ग! तू मला रवींद्र सरांबद्दल जे सांगितलं होतं त्या वरून मला खूप उत्सुकता होती ते असा कोणता रिसर्च करत होते आणि असे अचानक कुठे गायब झाले म्हणून बाकी काही नाही..." नियती ने सारवा सारव केली. 

"अच्छा... मला पण पडतो हा प्रश्न कधीतरी... कारण, आज पर्यंत ज्यांनी रवींद्र सरांच्या रिसर्च बद्दल काही माहिती काढायचा प्रयत्न केला आहे ते स्वतःच मानसिक संतुलन हरवून बसलेत... म्हणून कोणी ते काय करत होते हे बघायला जात नाही..." केतकी म्हणाली.

"ओके... हे बघ ऑर्डर आलीच... चल जेवून घेऊ..." नियती म्हणाली. 
**************************
सुयश सर, ईशा आणि सोनाली त्यांचं काम संपवून ब्यूरो मध्ये आले... अभिषेक अभिज्ञाला घेऊन तिथे आलाच होता! 

"नमस्कार! मी ए.सी.पी. सुयश" सुयश सरांनी स्वतःची ओळख करून दिली. 

"नमस्कार! सर तुम्हाला कोण नाही ओळखत! लहान मुलं सुद्धा तुम्हाला आणि तुमच्या टीम ला ओळखतात... आमचा आदु सुद्धा म्हणत असतो मी मोठं होऊन सुयश सरांसारखा होणार." अभिज्ञा म्हणाली. 

सगळ्यांनी स्मित केलं. फॉरेन्सिक लॅब मध्ये जे घडलं होतं ते सगळ्यांना समजलं होतं! पुढे काय करता येईल अभिज्ञाला हवेली मध्ये कसं घेऊन जाता येईल याचा विचार सगळे करत होते! एवढ्यात तिचा फोन वाजला. अभिज्ञाने मोबाईल बघितला! 

"सर! एक मिनिट हा... हा फोन मला घ्यावा लागेल..." असं म्हणून ती साईड ला गेली. 

"बोला आऊ... मी इथे सुखरूप पोहोचले आहे... कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे.. सॉरी ते गडबडीत फोन करायचा राहून गेला." तिने एका दमात सगळं बोलून टाकलं.

"हो! हो! तू कामात विसरली असणार म्हणून मीच फोन केला! तू बिनधास्त तिथलं काम कर... फक्त एकदा अज्ञांक शी बोलून घे... म्हणजे सारखा आई आई नाही करायचा..." आऊ म्हणाल्या. 

अभिज्ञा अज्ञांक शी बोलली आणि नंतर फोन ठेवला. तोपर्यंत इथे सगळ्यांनी एक आखणी केली होती. 

"मॅडम! आम्ही एक प्लॅन तयार केला आहे खरा पण, तुम्हाला यासाठी मन घट्ट करावं लागेल.." विक्रम म्हणाला. 

"तुम्ही फक्त काय करायचं ते सांगा! मी सोनिया साठी काहीही करेन..." अभिज्ञा म्हणाली. 

तिचं हे बोलणं ऐकून सोनियाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अभिज्ञानेच तिला धीर दिला आणि पुन्हा सगळे कामावर लक्ष देऊ लागले. 

"मॅडम! हा हवेली चा नकाशा आहे... याप्रमाणे हवेलीच्या मागच्या बाजूने एक भुयारी रस्ता आहे जो एक सरळ सोनिया मॅडम ना जी खोली रिसर्च साठी दिली आहे तिकडे उघडतो आणि  दुसरा जी खोली बंद आहे तिकडे! तुम्हाला या रस्त्यातून त्या रिसर्च च्या खोलीत जायचं आहे.. गोपाळ काकांना तुम्ही दिसणार नाही याची काळजी सुशांत आणि अभिषेक घेतीलच! पण, तुम्ही सुद्धा सावध रहा..." विक्रम ने सगळं समजावून सांगितलं. 

"ओके! एवढंच ना.. तुम्ही नका काळजी करू... मला आणि सोनिया ला जी शंका आली आहे ती जर खरी असेल तर या केस ला एक वेगळंच वळण लागेल..." ती गंभीर होत म्हणाली. 

"ओके! तुम्ही तुमचं काम पूर्ण करा आणि आम्हाला सांगा... तोपर्यंत आम्ही सोनिया मॅडम च्या मुलीच्या शोधात आहोत..." सुयश सर म्हणाले. 

एवढ्यात अभिषेक ला सुशांत चा फोन आला. 

"हॅलो! गोपाळ काका परत आले आहेत.. तुम्ही लवकर या..." सुशांत म्हणाला. 

"हो! येतोच आहे आम्ही... तू आपल्या त्या खोलीत जाऊन गुप्त दार शोधून थोडं उघडून ठेव आम्ही येतोच आहे.... गोपाळ काका कमीत कमी एक तास तिथे येणार नाहीत अशी काहीतरी सोय कर... " अभिषेक म्हणाला. 

"ओके..." सुशांत म्हणाला. 

क्रमशः...... 
**************************
सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना सॉरी! स्पर्धेची कथा पूर्ण करायची होती म्हणून या कथेच्या पुढच्या भागाला उशीर झाला. आता नियमित भाग पोस्ट होतील... 

आता अभिज्ञा या सगळ्यात कशी मदत करतेय? तिला महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे, अगम्य ला रात्री झोपू द्यायचं नाहीये... ती या एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कश्या पार पाडेल? सोनिया आणि तिला कसली शंका आली आहे? हवेलीत कोणती रहस्य दडली आहेत? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा आणि लूप होल चा पुढचा भाग वाचायला सुद्धा विसरू नका... 

🎭 Series Post

View all